Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग दोन-मध्य उप विभाग, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

Published 18 May 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

RNI No. MAHBIL /२००९/२९२३६

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ९, अंक २०] गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई दिनांक ११ मे २०२३.

संदर्भ.---या सचिवालयाची अधिसूचना क्रमांक ९१३३/क-१, दिनांक ११ मे, २०२३.

क्रमांक ९१३४/क-१.----- या सचिवालयातील रिक्त असलेल्या ' सचिव-१ ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००-२२४१००) या पदाचा कार्यभार दिनांक ११ मे, २०२३ (म.पू.) पासून श्री. जितेंद्र मनोहर भोळे, सह सचिव यांचेकडे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपयर्ंत सोपविण्यात येत आहे. ' सचिव-१ ' पदावरील उक्त कार्यभार हा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्रमांक २८००६-२८००७/ २०१९ मधील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सायली कांबळी, उप सचिव (विधि), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई दिनांक ११ मे २०२३.

संदर्भ.---या सचिवालयाची अधिसूचना क्रमांक ९१३३/क-१, दिनांक ११ मे, २०२३.

क्रमांक ९१३५/क-१.----- या सचिवालयातील रिक्त असलेल्या ' सचिव-२ ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००-२२४१००) या पदाचा कार्यभार दिनांक ११ मे, २०२३ (म.पू.) पासून श्री. विलास गोटिराम आठवले सह सचिव यांचेकडे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपयर्ंत सोपविण्यात येत आहे. ' सचिव-२ ' पदावरील उक्त कार्यभार हा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिका क्र. २८००६-२८००७/२०१९ मधील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सायली कांबळी, उप सचिव (विधि), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

(१)

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई, दिनांक ११ मे २०२३.

संदर्भ.---या सचिवालयाची अधिसूचना क्रमांक ६५२६/क-१, दिनांक २० मार्च २०२३.

क्रमांक ९१३२/क-१.----- संदर्भाधिन अधिसूचनेन्वये श्री. विलास गोटिराम आठवले, श्रीमती मेघना दिलीप तळेकर, श्री. शिवदर्शन श्रीनिवास साठये व श्री. जितेंद्र मनोहर भोळे, यांची मा. सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्रमांक. २८००६-२८००७/२०१९ मधील अंतिम आदेशाच्या तसेच वित्त विभागाच्या पदर्िनमितीच्या आदेशाच्या अधिनतेने ' सह सचिव ' पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

' सह सचिव ' संवर्गात (वेतनस्तर एस-२७: १२३१००-२१५९००) दोन नवीन पदे निर्माण करण्याच्या या सचिवालयाच्या प्रस्तावास वित्त विभागाने आपल्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २४८/आपुक, दिनांक १० मे २०२३ अन्वये मान्यता दिली असून आता या सचिवालयात ' सह सचिव ' संवर्गात एकूण चार पदे अस्तित्वात आलेली आहेत. सबब, संदर्भाधिन अधिसूचनेतील आदेश दिनांक ११ मे २०२३ रोजीपासून अंमलात येत असल्याचे याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहेत.

उपरोक्त पदोन्नतीचे आदेश मा. सर्वोच्य न्यायालयातील वर नमूद याचिकेवरील अंतिम आदेशाच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत असून ' सह सचिव ' संवर्गातील उपरोक्त नमूद अधिकायांची आपापसातील सेवाज्येष्ठता ही उक्त याचिकेवरील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर स्वतंत्र आदेशान्वये निश्चित करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सायली कांबळी, उप सचिव (विधि),

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन, मुंबई, दिनांक ११ मे २०२३.

क्रमांक ९१३३/क-१.----- मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा अंतर्भाव असलेल्या '' मा. विशेष मंडळाने '' महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील ' प्रधान सचिव ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००-२२४१००) या नामाभिधानाचे पद ' सचिव-१ ' व ' सचिव ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००-२२४१००) या नामाभिधानाचे पद ' सचिव-२ ' असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यापुढे या सचिवालयातील ' प्रधान सचिव ' या पदाचे नामाभिधान ' सचिव-१ ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००- २२४१००) व ' सचिव ' या पदाचे नामभिधान ' सचिव-२ ' (वेतनस्तर एल-१५: १८२२००-२२४१००) असे राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सायली कांबळी, उप सचिव (विधि), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचा.--- (१) या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(२) या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(३) दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., मुंबई या बँकेच्या दिनांक १७ एप्रिल २०२३.

आदेश

क्रमांक ना. बँका/१-सआ/द.म.क. जावली बँक/का.क. १५६/२०२३/१३६८.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, या आदेशान्वये दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., मुंबई या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा

जिल्हे (१) (२) (३) (४) (५) १ श्री. राजाराम सखाराम शेलार व्यवस्थापक वसुली अधिकारी मुंबई २ श्री. विलास शंकर वाडकर व्यवस्थापक वसुली अधिकारी ठाणे व मुंबई ३ श्री. संजय ज्ञानदेव बेलोशे व्यवस्थापक वसुली अधिकारी सातारा व पुणे ४ श्री. विकास शंकर महामुलकर वरिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ५ श्री. श्यामराव यशवंत पार्टे वरिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी मुंबई ६ श्री. लालसिंग शिवाजी निकम कनिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी सातारा व पुणे ७ श्री. बाळासाहेब नारायण गोळे कनिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी मुंबई व ठाणे ८ श्री. विजयकुमार एस. लकडे कनिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ९ श्री. अंकुश महादेव तुपे कनिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य १० श्री. लक्ष्मण मारुती मराठे कनिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी मुंबई व पालघर ११ श्री. अंकुश बाजीराव तरडे अधिकारी वसुली अधिकारी मुंबई व ठाणे १२ श्री. अमोल रघूनाथ रांजणे अधिकारी वसुली अधिकारी मुंबई अटी.---

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१, व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहीत नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, (१) मुंबई यांना सादर करावी.

(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निर्दशनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ (६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायांस त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे कलम १०७ अन्वये) असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., मुंबई "" असा फलक लावता येईल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबाजवणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सुचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसूल अधिकारी यांनी नोटीसा बजावताना नोटीसीमध्ये त्यांचे नाव, पदनाम व भ्रमणदुरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

पुणे, दिनांक २ मे २०२३.

शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचा.--- (१) या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(२) या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८. (३) स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि., मुंबई या बँकेच्या दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजीचा प्रस्ताव.

आदेश

क्रमांक ना. बँका/१-सआ/स्टेट ट्रान्सपोर्ट बँक/का.क. १५६/२०२३/१२३८.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, या आदेशान्वये स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक लि., मुंबई या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----

अधिकायांचे नाव अधिकायाचा हुद्दा

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र जिल्हा (१) (२) (३) (४) (५)

पुणे १ श्री. सुर्यकांत गोविंद जगताप महाव्यवस्थापक वसुली अधिकारी मुंबई २ श्री. किशोर शंकर आहेर उप महाव्यवस्थापक वसुली अधिकारी मुंबई, ठाणे, नाशिक व अहमदनगर ३ श्री. राहुल रमेश पुजारी बँक निरीक्षक वसुली अधिकारी कोल्हापूर व नांदेड ४ श्री. विजय मधुकर ढगे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी ५ श्री. शरिक मोईल खान वरिष्ठ व्यवस्थापक वसुली अधिकारी नागपूर, गडचिरोली व जालना ६ श्री. माधव छगन ठाकरे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी धुळे, रायगड व पालघर ७ श्री. भगवान रामदास धनजे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी जळगाव, भुसावळ, नंदूरबार,

नाशिक व परभणी ८ श्री. अनिल भानुदास मोरे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी सातारा, सांगली व सोलापूर ९ श्री. पंडित नारायण चाटे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी औरंगाबाद १० श्री. अशोक सुर्यभान शिवणकर शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी वर्धा, चंद्रपूर, भंडारा व अमरावती ११ श्री. प्रविण सखाराम म्हापणकर शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी रत्नागिरी व गडचिरोली १२ श्री. हरिषचंद्र लालसिंग राठोड शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी अकोला, यवतमाळ, पुसद व बीड १३ श्री. अनंत विश्वनाथ देशमुख शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर

व सोलापूर अटी.---

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कजर् वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१, व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहीत नमुन्यात कर्ज वसूलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई (१) यांना सादर करावी.

(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निर्दशनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायांस त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक लि., मुंबई"" असा फलक लावता येईल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदारांच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदारांकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबाजवणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायाचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमीत करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसूल अधिकारी यांनी नोटीसा बजावताना नोटीसीमध्ये त्यांचे नाव, पदनाम व भ्रमणदूरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

पुणे, दिनांक २० एप्रिल २०२३.

शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

कृष,ि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ एप्रिल २०२३.

आदेश

क्रमांक कृपवि ८०२३/प्र.क्र.७/प्रशा-१.---या विभागातील श्री. माणिक आबाजी गुट्टे, सह सचिव हे वयाची ५८ वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे दिनांक ३० एप्रिल २०२३ (म.नं) रोजी नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. नि. साखरकर, शासनाचे अवर सचिव.

--------------------------------------------

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय संकुल आवार, ९ वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २० एप्रिल २०२३.

अधिसूचना

क्रमांक आयुसे-०४२३/प्र.क्र. ४५/आयु-१.----- वैद्य चंद्रकांत दत्तत्रय वायकोस, प्राध्यापक, शरीररचना (गट-अ), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती, पुणे हे दिनांक ३० एप्रिल २०२३ (म.नं) रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. द. धोंडे, शासनाचे अवर सचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

गृह विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ मे २०२३.

अधिसूचना

क्रमांक पीइएन-१०२३/प्र.क्र ९६/राउशु-१.----- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक (गट-ब) तसेच सहायक आयुक्त (गट-ब) या संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर) नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. नाव

पदनाम व नियुक्तीचे जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा

ठिकाण

दिनांक (१) (२) (३) (४) (५) १ श्री. एस. एन. देशमुख निरीक्षक, राउशु, ईद्य अचलपूर, ०६.०१.१९६५ ३१.०१.२०२३

जि. अमरावती

२ श्री. जयराम बाळकृष्ण निरीक्षक, राउशु, नळदुर्ग सीमा ३१.०१.१९६५ ३१.०१.२०२३ चव्हाणके (आंध्र प्रदेश) तपासणी नाका,

जि. धाराशिव

३ श्रीमती अश्िवनी सहायक आयुक्त ०९.०१.१९६५ ३१.०१.२०२३ अशोक उईके (देशी विदेशी मद्य), राउशु

उपरोक्त अधिकायांविरूध्द शिस्तभंग/विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.