RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ९, अंक २६ ] शुक्रवार, डिसेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ६७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १५ डिसेंबर, २०२३ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-
L. A. BILL No. LIII OF 2023.
A BILL
TO AMEND THE MAHARASHTRA
INTERNATIONAL SPORTS UNIVERSITY ACT, 2020.
सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५३.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० यात सुधारणा करण्यासाठी विधेयक.
२०२० चा महा. ३५.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० यात सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
संक्षिप्त नाव.
१. या अधिनियमास, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
(१)
भाग पाच-६७-१. एचबी-१७४७-१.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५२. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० याच्या कलम १२ मध्ये ,--
२०२० चा महा. ३५.
(१) पोट-कलम (३) मधील ,--
(क) खंड (क) मध्ये ,-
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम १२ ची सुधारणा.
(एक) "" समिती "" या मजकुराऐवजी, "" शोध-नि-निवड समिती "" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :---
"" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य असेल, जोे, उच्च शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती असेल आणि जो एकतर, शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय कीर्तीचा ख्यातनाम विद्याव्यासंगी किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल ;"";
(तीन) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड जादा दाखल करण्यात येईल :---
"" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला एक सदस्य."";
(ख) खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :----
"" (ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य हे, विद्यापीठाशी अथवा विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित नसलेल्या व्यक्ती असतील."";
(ग) खंड (घ) मधील, "" तीन "" हा मजकूर वगळण्यात येईल ;
(घ) खंड (च) मध्ये ,-
(एक) उप-खंड (एक) मधील, "" किंवा क्रीडा प्रवर्तन यातील "" या मजकुरानंतर, "" किमान, दहा वषार्ंच्या "" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(दोन) उप-खंड (चार) मधील, "" शैक्षणिक अर्हता "" या मजकुराऐवजी, "" अतिरिक्त शैक्षणिक अर्हता "" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५ ३(२) पोट-कलम (४) मधील ,-
(क) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-
"" परंतु, जर कुलपतीने निवड केलेली व्यक्ती, कुलगुरु पदाचा कार्यभार स्विकारीत नसेल तर, कुलपतीस, नामिकेमधील उर्वरित व्यक्तींमधून अन्य सुयोग्य व्यक्तीची निवड करता येईल किंवा त्यास, एकतर त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर अशा नवीन समितीकडून, नवीन नामिकेची मागणी करता येईल."";
(ख) विद्यमान परंतुकामधील, "" परंतु, "" या मजकुराऐवजी, "" परंतु आणखी असे की, "" हा मजकूर, दाखल करण्यात येईल.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १५, २०२३/अग्रहायण २४, शके १९४५उद्देश व कारणे यांचे निवेदन
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० (२०२० चा महा. ३५) याच्या कलम १२ मध्येे, कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी पात्रता निकषांची आणि त्याची नियुुक्ती करण्याकरिता कुलपतीस सुयोग्य नावांची शिफारस करण्यासाठी समिती घटीत करण्याची तरतूद केली आहे.
२. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कुलगुरूच्या पात्रता निकषांच्या आणि त्याची नियुुक्ती करण्याकरिता कुलपतीस सुयोग्य नावाची शिफारस करण्यासाठी समिती घटीत करण्याच्या तरतुदींमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३) याखाली तयार केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठांमधील व महाविद्यालयांमधील अध्यापक व इतर विद्याविषयक कर्मचारीवर्ग यांच्या नियुुक्तीकरिता किमान अर्हता आणि उच्च शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी इतर उपाययोजना) विनियम, २०१८ याद्वारे फेरबदल करण्यात आलेले आहेत.
३. सर्वोच्च न्यायालयाने, अलिकडेच, गंभीरदन के. गढवी विरुद्ध गुजरात राज्य व इतर [रिट याचिका (दिवाणी) क्र. २०१९ ची १५२५] आणि प्राध्यापक (डॉ.) श्रीजीथ पी. एस. विरुद्ध डॉ. राजश्री एम. एस. व इतर (दिवाणी अपील क्र. २०२२ चे ७६३४-७६३५) या प्रकरणांमध्ये असा निर्णय दिला आहे की, कुलगुरुच्या पात्रतेचे निकष व नियुक्ती करण्याची कार्यपद्धती ही, नेहमीच संबांधित विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांनुसार असेल आणि जर राज्य अधिनियम, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी एकरूप नसेल तर, तो लागू असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांनुरूप करण्यासाठी त्यात सुधारणा केली पाहिजे आणि तोपयर्ंत, उक्त विद्यापीठ अनुदान आयोग विनियम अधिभावी असतील.
४. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, उक्त कलम १२ मध्ये अंतभर्ूत असल्याप्रमाणे, कुलगुरुच्या नियुक्ती संबंधातील विद्यमान तरतुदींमध्ये, उक्त विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांनुसार सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणून, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० याच्या कलम १२ मध्ये, सुयोग्य सुधारणा करणे इष्ट आहे, असे शासनास वाटते.
५. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
नागपूर, दिनांक : १४ डिसेंबर २०२३.
संजय बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री.
विधान भवन : नागपूर, दिनांक : १५ डिसेंबर, २०२३.
जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.