ङग़्क्ष् ग़्दृ. ग्ॠएक्ष्/२००९/४०१२४
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ९, अंक २७ ] सोमवार, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ [पृष्ठे ७३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
¨É½þÉ®úɹ]Åõ Ê´ÉvÉÉxɺɦÉäiÉ ÊnùxÉÉÆEò १८ डिसेंबर, २०२३ ®úÉäVÉÒ {ÉÖ®ú:ºlÉÉÊ{ÉiÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä±Éä JÉɱÉÒ±É Ê´ÉvÉäªÉEò ¨É½þÉ®úɹ]Åõ Ê´ÉvÉÉxɺɦÉÉ ÊxÉªÉ¨É 116 +x´ÉªÉä |ÉʺÉr Eò®úhªÉÉiÉ ªÉäiÉ +ɽäþ.----
. ॠ. एक्ष् ग़्दृ. ज्क्ष्क्ष्क्ष् क़ २०२३.
A BILL
TO ESTABLISH AND INCORPORATE THE MARATHI BHASHA VIDYAPEETH FOR PROMOTING, PRESERVING, STRENGHTENING AND TRANSFORMING MARATHI LANGUAGE, MARATHI LITERATURE AND CULTURE AND FOR DEVELOPMENT AND ADVANCEMENT OF MARATHI LANGUAGE IN HIGHER EDUCATION IN THE STATE OF MAHARASHTRA AND FOR MATTERS CONNECTED THEREWITH OR INCIDENTAL THERETO.
सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८.
मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन, जतन, सक्षमीकरण व परिवर्तन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषेचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना व विधिसंस्थापन करण्याकरिता विधेयक.
ज्याअर्थी, मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन, जतन, सक्षमीकरण व परिवर्तन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषेचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींकरिता मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना व विधिसंस्थापन करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
भाग पाच-७२-१. एचबी-१७६४-१.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५प्रकरण एक
प्रारंभिक.
१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील, अशा दिनांकास अंमलात येईल.
व्याख्या. २. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ, आवश्यक नसेल तर,-----
(एक) " विद्यापरिषद " याचा अर्थ, विद्यापीठाची विद्यापरिषद, असा आहे ;
(दोन) "संलग्न प्राध्यापक", "संलग्न सहयोगी प्राध्यापक" किंवा "संलग्न सहायक प्राध्यापक" याचा अर्थ, विद्यापीठाबरोबरच्या सहयोगाच्या किंवा साहचर्याच्या कालावधीत जिला तसे पदनिर्देशित केले आहे अशी उद्योग, व्यापार, वाणिज्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही संलग्न क्षेत्रांमधील व्यी, असा आहे;
(तीन) " प्राधिकरणे " याचा अर्थ, या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये विर्िनदिष्ट केलेली विद्यापीठाची प्राधिकरणे, असा आहे ;
(चार) " व्यवस्थापन मंडळ " याचा अर्थ, विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ, असा आहे ;
(पाच) " केंद्र " याचा अर्थ, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे विद्यापीठाने स्थापन केलेले, व्यवस्थापन केलेले व संचालित केलेले केंद्र, असा आहे आणि त्यात शैक्षणिक सेवा केंद्राचा अंतर्भाव होतो ;
(सहा) " कुलपती " किंवा " कुलगुरू " याचा अर्थ, अनुक्रमे, विद्यापीठाचा कुलपती किंवा कुलगुरू, असा आहे ;
(सात) " पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती " याचा अर्थ, परिनियमांमध्ये विहित केल्याप्रमाणे, संचित श्रेयांकांसाठी पाठयक्रमांमधून (मुख्य, ऐच्छिक किंवा दुय्यम किंवा सुलभ कौशल्य किंवा कौशल्यवर्धक पाठयक्रम, इत्यादी) निवड करण्यासाठी जी पद्धती विद्याथ्यार्ंकरिता बहु आंतरज्ञानशाखीय निवडींची संधी देते अशी अभ्यासक्रम पद्धती, असा आहे ;
(आठ) " सहयोग " याचा अर्थ, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, उद्योग, व्यापार व वाणिज्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व अन्य कोणत्याही क्षेत्रातील स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिसंस्था, संशोधन परिसंस्था व संघटना यांसह इतर विद्यापीठे, विद्याविषयक परिसंस्था यांच्याबरोबर असलेले विद्यापीठाचे विद्याविषयक सहयोगी उपक्रम, असा आहे ;
(नऊ) " अधिष्ठाता " याचा अर्थ, विद्यापीठाच्या प्रशालेचा अधिष्ठाता, असा आहे ;
(दहा) " निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) " याचा अर्थ, राज्य शासनाने, अशा जमाती म्हणून वेळोवेळी घोषित केलेल्या जमाती, असा आहे ;
(अकरा) " विभाग " याचा अर्थ, विद्यापीठामधील एखादा विशिष्ट विषय किंवा विषयांचा गट शिकवण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेला विभाग, असा आहे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३(बारा) " संचालक " याचा अर्थ, व्यवस्थापन मंडळाकडून तसे संबोधण्यात आलेला, विद्यापीठाचे केंद्र किंवा प्रशाला यांसह त्या परिसंस्थेचा प्रमुख किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेचा प्रमुख, असा आहे ;
(तेरा) " र्आथिकदृष्टया दुर्बल घटक " याचा अर्थ, राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेला कोणताही र्आथिकदृष्टया दुर्बल घटक, असा आहे ;
(चौदा) " शुल्क " याचा अर्थ, विद्यापीठाने आणि त्याच्या उप-केंद्रांनी गोळा करावयाचे, विकास आकारांसह शिकवणी शुल्क, इतर शुल्क व आकार, असा आहे ;
(पंधरा) " विद्यापीठ विभागाचा प्रमुख " किंवा " विद्यापीठ केंद्राचा प्रमुख " याचा अर्थ, अनुक्रमे विद्यापीठ विभागाचा प्रमुख किंवा विद्यापीठ केंद्राचा प्रमुख, असा आहे ;
(सोळा) " उच्च शिक्षण " याचा अर्थ, उच्च माध्यमिक शालेय शिक्षणाच्या टप्प्यावरील किंवा त्याच्या समतुल्य स्तरावरील शिक्षणानंतरचा ज्ञानाचा व्यासंग, असा आहे ;
(सतरा) " वसतिगृह " याचा अर्थ, विद्यापीठाने तरतूद केलेले, स्थापन केलेले, चालविलेले, विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंसाठी असलेले निवासस्थान, असा आहे ;
(अठरा) " आंतर-ज्ञानशाखीय अभ्यास " याचा अर्थ, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे विविध ज्ञानशाखांमधील संयुक्त शैक्षणिक अभ्यास व संशोधन, असा आहे ;
(एकोणीस) " ज्ञान संसाधन केंद्र " याचा अर्थ, शिक्षण, संशोधन, विस्तार सेवा यांसाठी किंवा तत्सम प्रयोजनांसाठी उपयुक्त असलेले मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व दृक्-श्राव्य स्वरूपातील साहित्य, प्रबंधिका, संदर्भ ग्रंथ, पाठयपुस्तके व समीक्षा ग्रंथ, सर्व प्रकारच्या संशोधन पत्रिका (जर्नल्स) आणि कोणत्याही स्वरूपातील इतर कोणतेही साहित्य ठेवण्यासाठी, विद्यापीठाच्या परिसरामध्ये किंवा उप-केंद्रांमध्ये विद्यापीठाने स्थापन केलेले ग्रंथालय, असा आहे ;
(वीस) " बहु-ज्ञानशाखीय अभ्यास " याचा अर्थ, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे, एखाद्या विशिष्ट ज्ञानशाखेच्या विविध शाखांमधील संयुक्त शैक्षणिक अभ्यासक्रम व संशोधन अध्ययनक्रम, असा आहे ;
(एकवीस) " भटक्या जमाती " याचा अर्थ, आपल्या चरितार्थाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी भटकंती करणाया जमाती म्हणून राज्य शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या जमाती, असा आहे ;
(बावीस) " दीर्घ सुटी नसलेला विद्याविषयक कर्मचारीवर्ग " याचा अर्थ, राज्य शासन, दीर्घ सुटी नसलेला विद्याविषयक कर्मचारीवर्ग म्हणून वर्गीकृत करील असा कर्मचारीवर्ग, असा आहे आणि त्यामध्ये, जो विद्याविषयक कर्मचारीवर्गास पूरक आहे अशा सर्व कर्मचारीवर्गाचा समावेश होईल, परंतु केवळ प्रशासकीय कामे करणाया कर्मचारीवर्गाचा त्यात समावेश होणार नाही ;
(तेवीस) " इतर मागास वर्ग " याचा अर्थ, राज्य शासनाने नागरिकांचा सामाजिकदृष्टया व शैक्षणिकदृष्टया मागास वर्ग म्हणून घोषित केलेला कोणताही वर्ग, असा आहे आणि त्यामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र राज्याच्या संबंधात वेळोवेळी घोषित केलेल्या इतर मागास वगार्ंचा अंतर्भाव होतो ;
(चोवीस) " विहित " याचा अर्थ, या अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली केलेल्या परिनियमांद्वारे किंवा आदेशाद्वारे किंवा, यथास्थिति, विनियमांद्वारे विहित केलेले, असा आहे ;
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(पंचवीस) " कुलसचिव " याचा अर्थ, विद्यापीठाचा कुलसचिव, असा आहे ;
(सव्वीस) " प्रादेशिक केंद्र " किंवा "उप-केंद्र " याचा अर्थ, कार्यक्षमतेत व परिणामकारकतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, विद्याविषयक, प्रशासकीय, संशोधन व विस्तार कार्य यांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी असणारे विद्यापीठाचे सर्वसमावेशक अंगभूत स्वतंत्र केंद्र, असा आहे;
(सत्तावीस) "नियामक प्राधिकरणे " याचा अर्थ, उच्च शिक्षणाचा विद्याविषयक दर्जा सुनिश्चित करण्याची मानके व शर्ती निर्धारित करण्याकरिता, भारत सरकारने वेळोवेळी स्थापन केलेली विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद, दूरस्थ शिक्षण परिषद, इत्यादींसारखी नियामक प्राधिकरणे, असा आहे;
(अठ्ठावीस) " अनुसूचित जाती " याचा अर्थ, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४१ अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जाती म्हणून समजण्यात येणाया जाती, वंश किंवा जमाती अथवा अशा जाती, वंश किंवा जमाती यांचे भाग किंवा त्यांच्यातील गट, असा आहे ;
(एकोणतीस) " अनुसूचित जमाती " याचा अर्थ, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३४२ अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जमाती म्हणून समजण्यात येणाया, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागात राहणाया जमाती अथवा जमाती समूह किंवा अशा जमाती किंवा जमाती समूह यांचे भाग किंवा त्यांच्यातील गट, असा आहे ;
(तीस) " प्रशाला " याचा अर्थ, विद्यापीठाने चालविलेली व व्यवस्थापन केलेली अध्ययन प्रशाला, असा आहे ;
(एकतीस) " विशेष मागास प्रवर्ग " याचा अर्थ, राज्य शासनाने, विशेष मागास प्रवर्ग म्हणून घोषित केलेला नागरिकांचा सामाजिकदृष्टया व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्ग, असा आहे ;
(बत्तीस) " राज्य " याचा अर्थ, महाराष्ट्र राज्य, असा आहे ;
(तेहतीस) " राज्य शासन " किंवा " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे ;
(चौतीस) " परिनियम ", " आदेश " व " विनियम " याचा अर्थ, या अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली केलेले विद्यापीठाचे अनुक्रमे, परिनियम, आदेश व विनियम, असा आहे ;
(पस्तीस) " विद्यार्थी " याचा अर्थ, विद्यापीठाच्या कोणत्याही शैक्षणिक अध्ययनक्रमाकरिता जिने प्रवेश घेतला आहे आणि जिची नोंदणी केली आहे अशी व्यक्ती, असा आहे ;
(छत्तीस) " अध्यापक " याचा अर्थ, विद्यापीठाच्या कोणत्याही प्रशालेमधील, केंद्रातील, विभागातील किंवा उप-केंद्रातील किंवा प्रादेशिक केद्रांतील पूर्णकालिक मान्यताप्राप्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रपाठक, अधिव्याख्याता, ग्रंथपाल, प्राचार्य, परिसंस्थेचा संचालक, ज्ञान संसाधन केंद्राचा संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचा संचालक, विद्यापीठाचा उप किंवा सहायक ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक किंवा निर्देशक, असा आहे;
(सदतीस) " विद्यापीठ " याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम ३ अन्वये स्थापन केलेले मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती, असा आहे ;
१९५६ चा ३.
(अडतीस) " विद्यापीठ अनुदान आयोग " याचा अर्थ, विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ अन्वये स्थापन केलेला विद्यापीठ अनुदान आयोग, असा आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५प्रकरण दोन विद्यापीठ.
३. (१) " मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती " या नावाने संबोधले जाणारे एक असंलग्न विद्यापीठाचे विधिसंस्थापन.
एकात्म विद्यापीठ घटित करण्यात येईल.
(२) विद्यापीठ हे, पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नावाचे एक निगम निकाय असेल आणि त्याची एक अखंड परंपरा व सामायिक मोहोर असेल आणि त्यास व त्याच्याविरुद्ध उक्त नावाने दावा दाखल करता येईल.
(३) विद्यापीठाद्वारे किंवा विद्यापीठाविरुद्ध सुरू असलेल्या सर्व दाव्यांमधील किंवा अन्य कायदेशीर कार्यवाहीमधील वादकथनांवर, कुलसचिवाद्वारे किंवा याबाबतीत प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तींद्वारे, स्वाक्षरी करण्यात येईल, आणि ती सत्यापित करण्यात येतील, आणि दाव्यांतील किंवा कार्यवाहीमधील सर्व आदेशिका, कुलसचिवाला काढण्यात येतील व त्याच्यावर बजावण्यात येतील.
(४) विद्यापीठाचे मुख्यालय, रिद्धपूर, अमरावती, महाराष्ट्र येथे असेल.
(५) विद्यापीठाचे अधिकारक्षेत्र, संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर विस्तारित असेल.
(६) विद्यापीठ, जंगम व स्थावर अशा दोन्ही प्रकारची मालमत्ता संपादन करण्यास व धारण करण्यास, विद्यापीठाच्या प्रयोजनांसाठी त्याच्याकडे निहित असेल अशी किंवा त्याच्याकडून संपादन करण्यात येईल अशी, कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता, भाडेपट्टा, विक्री, गहाणखत, संमती-नि-परवाना, बक्षीस, सामंजस्य करार (एमओयु) या मार्गाने किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित करण्यास किंवा तिची विल्हेवाट लावण्यास आणि या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ करार करण्यास व आवश्यक असतील अशा इतर सर्व गोष्टी करण्यास सक्षम असेल :
परंतु, विद्यापीठाने नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त मूल्यनिर्धारकाकडून तिचे मूल्यनिर्धारण केल्याशिवाय आणि राज्य शासनाची पूर्वपरवानगी असल्याशिवाय, अशी मालमत्ता, भाडेपट्टा, विक्री, गहाणखत, संमती-नि-परवानगी, बक्षीस, सामंजस्य करार (एमओयु) याद्वारे किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित करण्यात येणार नाही अथवा तिची विल्हेवाट लावण्यात येणार नाही.
विद्यापीठाची उद्दिष्टे.
४. विद्यापीठाची सर्वसाधारण उद्दिष्टे ही, सर्वसाधारणपणे, मराठी भाषा व साहित्य यांमधील अध्यापन, संशोधन व विकास, कौशल्य विकास, प्रशिक्षण व शिक्षण, विस्तार व सेवा यांद्वारे ज्ञान व माहिती यांचा प्रसार, र्िनमिती व जतन करणे ही असतील आणि त्यासंबंधीची उद्दिष्टे, विशेषकरुन, पुढीलप्रमाणे असतील :----
(१) ज्ञानाच्या अभिवृद्धीसाठी व समाजाच्या उन्नतीसाठी मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांमधील शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण यांना चालना देणे ;
(२) संशोधनासाठी व ज्ञान अभिवृद्धीसाठी व ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, आणि सर्वसाधारणपणे, बहु-ज्ञानशाखा व आंतर-ज्ञानशाखा क्षेत्रे यांमध्ये मराठी भाषा व साहित्य यांचे संवर्धन करण्यासाठी व त्यास प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद करणे ;
(३) मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांमधील उच्च स्तरीय संशोधन केंद्र म्हणून काम करणे;
(४) राज्यभरातील मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे;
(५) कला, संस्कृती, संगीत, रंगभूमी-नाटयप्रयोग, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, पुरातत्वशास्त्र, भाषा, साहित्य, व्याकरण, भाषाशास्त्र, इतिहास, धर्म, तवज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान आणि हस्तकला यांमधील आणि ज्यांचा विकास मराठी भाषा व साहित्य याच्या आधारे होतो अशा तत्सम बाबींमधील प्रगत अभ्यास व संशोधन करण्यासाठी सुविधा पुरविणे व त्यास प्रोत्साहन देणे;
(६) भविष्यातील संभाव्य वैज्ञानिक विकास विचारात घेऊन, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक मराठी साहित्यावरील संशोधनासाठी तरतूद करणे;
(७) आधुनिक ज्ञान भाषा आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा विकास करणे;
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(८) एका बाजूला शैक्षणिक संस्था व संशोधक समुदाय आणि दुसया बाजूला उद्योग व शासन यांच्यामध्ये सहकार्य व परस्परसंवाद वाढविण्यासाठी एक केंद्र म्हणून सेवा करणे ;
(९) या बाबतीत, राज्य शासनाने, विद्यापीठ अनुदान आयोगाने व इतर नियामक प्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेले निदेश, केलेले नियम, विनियम व काढलेल्या अधिसूचना यांनुसार राज्यामध्ये व राज्याच्या बाहेर प्रादेशिक केंद्रे किंवा उप-केंद्रे स्थापन करणे ;
(१०) भारताच्या संविधानात जतन केलेले स्वातंय, धर्मनिरपेक्षता, समता व सामाजिक न्याय यांचे संवर्धन करणे, आणि राष्ट्रीय विकासाचे तत्व असलेल्या मूलभूत अभिवृत्ती व मूल्ये यांना चालना देऊन देशभक्तीकारी सामाजिक-र्आथिक परिवर्तनामध्ये प्रेरक शक्ती म्हणून कार्य करणे ;
(११) उच्च शिक्षणाच्या अध्यापन, अध्ययन, प्रशिक्षण व इतर आधारभूत सेवासुविधांचे समानतेने वाटप करण्यास चालना देणे ;
(१२) विविध धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान, कला, सभ्यता व संस्कृती यांच्या अभ्यासातून राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढीस लावणे आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे तसेच, भारतातील विभिन्न धर्म व विविध संस्कृती यांच्याप्रती आदर वृद्धिंगत करणे ;
(१३) सर्वसाधारणपणे, विद्यापीठाच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी व उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरविण्यासाठी विविध विद्यापीठे, आणि राज्यातील, प्रदेशातील, राष्ट्रातील व जागतिक स्तरावरील इतर विद्यापीठे यांच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे परस्परसंवाद व समन्वय साधणे ;
(१४) लवचिक व रचनात्मक अध्ययन मागार्ंची तरतूद करून त्याद्वारे बहुविध-प्रवेशाचे व निर्गमनाचे पर्याय उपलब्ध करून देणे ;
(१५) वरील उद्दिष्टांची आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची किंवा नियामक प्राधिकरणांनी दिलेल्या निदेशांची, केलेल्या विनियमांची पूर्तता करण्यासाठी व त्यास चालना देण्यासाठी आवश्यक असतील असे इतर उपक्रम हाती घेणे.
५. विद्यापीठाचे अधिकार व कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :----
विद्यापीठाचे अधिकार व कर्तव्ये.
(१) विद्यापीठ, वेळोवेळी निर्धारित करील, अशा पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती आणि भविष्यात उदयास येऊ शकेल अशी इतर कोणतीही पद्धती यांसह शाखा किंवा विषय किंवा ज्ञानशाखा व अभ्यास पाठयक्रम आणि यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण यांची तरतूद करणे ;
(२) संशोधन आणि ज्ञानवर्धन व ज्ञानप्रसार यांसाठी तरतूद करणे, आणि सर्वसाधारणपणे अध्ययनाच्या विविध शाखा आणि त्यांची बहु-ज्ञानशाखीय व आंतर-ज्ञानशाखीय क्षेत्रे यांमध्ये मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन करणे व त्यास प्रोत्साहन देणे ;
(३) विकसनशील जगातील विद्यमान सर्व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या मराठी भाषेच्या विकासासंबंधीची कार्यपद्धती निर्धारित करणे आणि त्यासाठी योग्य दृष्टिकोन विकसित करणे ;
(४) अध्ययन, अध्यापन, प्रशिक्षण, संशोधन व विकास किंवा विस्तार यांसाठी विद्यापीठ प्रशाला, विभाग, केंद्रे, प्रादेशिक केंद्रे किंवा उप-केंद्रे, प्रयोगशाळा, ज्ञान संसाधन केंद्रे, अध्ययन संसाधन केंद्रे, ग्रंथालये, इत्यादींची स्थापना करणे, त्यांचे संघटन करणे, ती चालविणे व व्यवस्थापन करणे ;
(५) मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करणे ;
(६) वसतिगृहे, आरोग्य केंद्रे, श्रोतृगृह व व्यायामशाळा आणि क्रीडा सुविधा यांची स्थापना करणे, ती चालविणे व त्यांचे व्यवस्थापन करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ७(७) विद्यापीठाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या गरजांनुसार, इतर भाषांमधील पुस्तकांचा मराठी भाषेत अनुवाद करणे आणि मराठी भाषेतील पुस्तकांचा अन्य भाषांमध्ये अनुवाद करणे ;
(८) महाराष्ट्र राज्यामधील आणि मराठी भाषिक लोक राहत असलेल्या इतर देशांमधील मराठी भाषा बोलणारे लोक वापरत असलेले मराठी शब्द, वाक्प्रचार, बोलीभाषेतील संज्ञा, परस्पर व्यवहाराच्या संज्ञा, उद्योग आणि इतर व्यवसायांमध्ये वापरले जाणारे शब्द संकलित करणे आणि प्रसिद्ध करणे ;
(९) अध्यापन व संशोधन या क्षेत्राच्या संबंधातील आधुनिक विकासाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने, भारतातील आणि विदेशातील इतर नामांकित परिसंस्थांबरोबर अध्ययनक्रमांचे आदानप्रदान करणे ;
(१०) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या धर्तीवर, राज्य शासन, केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व इतर नियामक प्राधिकरणे यांनी, याबाबतीत वेळोवेळी दिलेले निदेश, केलेले नियम, विनियम व काढलेल्या अधिसूचना यांनुसार, विशिष्ट क्षेत्रांमधील भारतातील किंवा विदेशातील इतर संस्था किंवा विद्यापीठे यांसह बहुविध परिसर अध्यापन व संशोधन करण्यास मुभा देऊन, त्याद्वारे सहपदव्या किंवा दुहेरी पदव्या देणे, आणि श्रेयांकांचे हस्तांतरण करणे ;
(११) विद्यापीठाच्या अध्यापकांना व विद्याथ्यार्ंना उपलब्ध असलेल्या संशोधन संधींची आणि वित्तपुरवठयाच्या पर्यायांची व्याप्ती वाढवण्याकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संघटनांसोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयु) करण्यासह दुवे निश्चित करणे व प्रस्थापित करणे ;
(१२) विद्यापीठासाठी आवश्यक असणारी, त्याच्या निधीतून आणि निधीपुरवठा करणाया इतर अभिकरणांकडून (राज्य शासन वगळून) प्राप्त झालेल्या निधींतून विद्यापीठ अध्यापक, दीर्घ सुटी नसलेला विद्याविषयक कर्मचारीवर्ग, अध्यापकेतर कुशल, प्रशासकीय, लिपिकवर्गीय कर्मचारी आणि इतर पदे निर्माण करणे आणि त्यांच्या अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी विहित करणे आणि त्यांच्या नियुक्त्या करणे ;
(१३) राज्य शासनाने, विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि इतर नियामक प्राधिकरणांनी वेळोवेळी विर्िनदिष्ट केलेल्या अर्हता व अनुभव यांनुसार, विद्यापीठाने निर्माण केलेली आणि राज्य शासनाने मंजूर केलेली विद्यापीठ अध्यापक, दीर्घ सुटी नसलेले विद्याविषयक कर्मचारी, अध्यापकेतर कुशल, प्रशासकीय, लिपिकवर्गीय कर्मचारी व इतर पदे आणि रिक्त पदे यांवर नियुक्त्या करणे ;
(१४) अन्य कोणत्याही विद्यापीठात, उद्योगात, संशोधन संस्थांमध्ये किंवा संघटनेत काम करणाया व्यक्तींना, विर्िनदिष्ट कालावधीसाठी विद्यापीठाचे संलग्न प्राध्यापक, संलग्न सहयोगी प्राध्यापक, संलग्न सहायक प्राध्यापक, व्यवसायी प्राध्यापक, गुणवान प्राध्यापक, अध्यासन प्राध्यापक, मान्यवर प्राध्यापक किंवा अभ्यागत प्राध्यापक म्हणून नियुक्त करणे किंवा मान्यता देणे ;
(१५) परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे विविध अधिकारी पदांवर विद्यापीठातील पात्र, कामगिरी करणाया आणि योगदान देणाया व्यक्तींना नामनिर्देशित करणे ;
(१६) एकल स्वरूपात किंवा इतर राज्य किंवा राष्ट्रीय किंवा जागतिक विद्यापीठाशी संयुक्त स्वरूपात विशिष्ट पदव्या, पदविका किंवा प्रमाणपत्रे यांसाठी असलेल्या विविध परीक्षांचे, पारंपरिक, समकालीन व भविष्यकालीन वितरण पद्धतींमधील व पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीमधील शिक्षण पाठयक्रम व अभ्यास पाठयक्रम विहित करणे ;
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(१७) विद्यापीठामधील विविध अध्ययनक्रमांच्या प्रवेशांचे पात्रता निकष ठरविणे आणि उप-केंद्रे किंवा प्रादेशिक केंद्रे यांसह बहु-ज्ञानशाखीय व आंतर-ज्ञानशाखीय प्रशाला, विद्यापीठ विभाग व केंद्रे यांसारख्या विद्यापीठाच्या शैक्षणिक घटकांतील विविध अभ्यास पाठयक्रमांसाठी विद्याथ्यार्ंना दिल्या जाणाया प्रवेशाचे पर्यवेक्षण, नियंत्रण व विनियमन करणे ;
(१८) ज्या व्यक्तींनी,-----
(क) विहित रीतीने त्यांना परीक्षांमधून सूट मिळालेली नसेल तर, विद्यापीठातील, प्रशालेतील, विभागातील किंवा केंद्रातील मान्यताप्राप्त अभ्यास पाठयक्रम पूर्ण केलेला असेल आणि विद्यापीठाने विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असतील आणि आवश्यक श्रेयांक किंवा गुण किंवा श्रेणी मिळविलेल्या असतील ; किंवा
(ख) विद्यापीठातील, प्रशालेतील किंवा केंद्रांतील मान्यताप्राप्त अभ्यास पाठयक्रम पूर्ण केलेला असेल आणि विद्यापीठाने विहित केलेल्या परीक्षा उतीर्ण केलेल्या असतील आणि आवश्यक श्रेयांक किंवा गुण किंवा श्रेणी मिळविलेल्या असतील ; किंवा
(ग) आदेशांद्वारे आणि विनियमांद्वारे तरतूद केलेल्या शतर्ींन्वये संशोधन केलेले असेल, अशा व्यक्तींच्या परीक्षा घेण्यासाठी किंवा त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यांना पदव्या, पदव्युत्तर पदविका, पदविकोत्तर पदविका प्रदान करण्यासाठी आणि उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर पदविका आणि प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक विशेषोपाध्या प्रदान करण्यासाठी परीक्षांच्या आधारे किंवा अन्य रीतीने पदव्या, पदव्युत्तर पदविका, पदविकोत्तर पदविका आणि उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर पदविका, प्रमाणपत्रे आणि इतर विद्याविषयक विशेषोपाध्या सुरू करणे ;
(१९) संमिश्र व दूर:स्थ शिक्षण, मुक्त, ऑनलाईन, संमिश्र व निरंतर शिक्षण पाठयक्रम यांसाठी अशा पदव्या, पदविका व प्रमाणपत्रे प्रदान करणे आणि देणे आणि त्यांची व्याख्याने, शिक्षण व प्रशिक्षण देण्याची तरतूद करणे ;
(२०) परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे, मानद पदव्या किंवा इतर विद्याविषयक विशेषोपाध्या प्रदान करणे ;
(२१) स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील सार्वजनिक व खाजगी, उद्योग, शासकीय संघटना यांकरिता विद्याविषयक अध्यापन, प्रशिक्षण व संलग्न अध्ययनक्रम, संशोधन, विकास सल्ला व चाचणी उपक्रम आणि किफायतशीर रीतीने, साधनसंपत्ती निर्माण करणाया सेवा हाती घेऊन, र्आथिक स्वयं- निर्भरता साध्य करणे ;
(२२) विद्यापीठ प्रशाला, विभाग व केंद्रे यांच्या शैक्षणिक कामगिरीचे आणि नियतकालिक अधिस्वीकृतीचे संनियंत्रण व मूल्यमापन करणे ;
(२३) विश्वस्त निधी व दाननिधी धारण करणे आणि त्यांची व्यवस्था पाहणे आणि विद्यापीठाचे अध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी अधिछात्रवृया, प्रवासी अधिछात्रवृया, शिष्यवृया, छात्रवृया, पदके आणि बक्षिसे सुरू करणे व ती देणे ;
(२४) आदेशांद्वारे वेळोवेळी विनियमित करण्यात येतील असे शुल्क व इतर आकार निश्चित करणे, त्यांची मागणी करणे व ती प्राप्त करणे किंवा वसूल करणे ;
(२५) विद्यापीठ, प्रशाला विभाग, केंद्रे आणि वसतिगृहे यांमधील विद्याथ्यार्ंची वर्तणूक व शिस्त यांचे पर्यवेक्षण, नियंत्रण आणि विनियमन करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ९(२६) विद्याथ्यार्ंना औपचारिक शिक्षणाकडून अनौपचारिक शिक्षणाकडे आणि अनौपचारिक शिक्षणाकडून औपचारिक शिक्षणाकडे जाता यावे यासाठी आणि राज्यातील, राज्याबाहेरील व देशातील इतर विद्यापीठांमध्ये देखील जाता यावे यासाठी तरतूद करणे ;
(२७) विद्यापीठाच्या अध्यापकांसाठी उजळणी किंवा सेवांतर्गत पाठयक्रमांच्या सुविधांची तरतूद करणे ;
(२८) अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या गुणवत्ता वाढीसाठी गुणवत्ता हमी क्षेत्रातील प्रशिक्षण व शिक्षण, व्यापक कार्यशाळा किंवा अध्ययन सराव यांसाठी आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी सुनिश्चित करणाया कार्यतंत्राची देखील तरतूद करणे ;
(२९) विद्यापीठ अनुदान आयोगाने किंवा, यथास्थिति, इतर नियामक प्राधिकरणांनी आणि राज्य शासनाने विहित केलेल्या मानकांनुसार विद्यापीठातील अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या कामगिरीचे मूल्यनिर्धारण करण्याची तरतूद करणे ;
(३०) विहित केल्याप्रमाणे अध्यापनाच्या वेळेत व अध्यापनाच्या वेळेनंतर विद्यापीठाच्या परिवास्तूमध्ये असणाया अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचायांच्या उपस्िथतीचे नियमन करणे आणि त्यासाठी तरतूद करणे आणि तसेच, खाजगी शिकवणी किंवा खाजगी शिकवणी वर्ग घेण्यास किंवा चालविण्यास अध्यापकांना मनाई करणे ;
(३१) विद्याथ्यार्ंची सनद विहित करणे व तिची अंमलबजावणी करणे ;
(३२) जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा,—
(क) ज्ञान संसाधन केंद्र ;
(ख) विद्यापीठ प्रशाला, विभाग, केंद्रे किंवा कक्ष ;
(ग) माहिती केंद्रे ;
(घ) प्रशिक्षण व सेवायोजन कक्ष आणि व्यवसाय मार्गदर्शन केंद्र ; आणि
(ङ) विद्यापीठाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक व शक्य असतील असे इतर उपक्रम,
स्थापन करणे, चालविणे व त्यांची व्यवस्था करणे ;
(३३) विद्याथ्यार्ंच्या,—
(क) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ;
(ख) राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) ;
(ग) गृह रक्षक व नागरी संरक्षण दल ;
(घ) राष्ट्रीय क्रीडा संघटना ;
(ङ) शारीरिक व लष्करी प्रशिक्षण ;
(च) बहि:शाला अध्यापन व संशोधन ;
(छ) आजीवन अध्ययन व विस्तार यांच्याशी संबंधित अध्ययनक्रम ;
(ज) विद्यापीठाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक व शक्य असतील असे सांस्कृतिक, र्आथिक व सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने आखण्यात आलेले इतर कोणतेही अध्ययनक्रम, सेवा किंवा उपक्रम,
यांमधील सहभागाची तरतूद करणे ;
भाग पाच-७२-२. एचबी-१७६४-२.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(३४) लोकसेवा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांमधील सेवाभरतीकरिता आणि रोजगाराच्या इतर स्पर्धात्मक संधींकरिता, स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षणाची किंवा खास शिक्षणाची तरतूद करणे ;
(३५) संशोधन उपाय व सल्लाविषयक सेवा देण्याकरिता परिस्थितीच्या मागणीनुसार, विवक्षित पाठयक्रम चालविण्यासाठी अन्य कोणतीही विद्यापीठे, परिसंस्था, उद्योगसमूह, प्राधिकरणे किंवा संघटना यांच्याबरोबर समुचित व्यवस्था करून, संशोधन व सल्लाविषयक सेवांसाठी आणि अशा प्रयोजनांसाठी, असे अन्य विद्यापीठ, परिसंस्था, उद्योगसमूह, प्राधिकरणे किंवा संघटना यांना सहकार्य करणे आणि त्यांच्याशी सहयोग करणे ;
(३६) विद्यापीठाच्या वतीने कोणत्याही जंगम मालमत्तेचे हस्तांतरण करणे किंवा हस्तांतरण स्वीकारणे ;
(३७) विद्यापीठाचा महसूल, वित्त, लेखे, गुंतवणुका, मालमत्ता, कामकाज आणि इतर सर्व प्रशासकीय व्यवहार यांचे व्यवस्थापन, नियमन व प्रशासन करणे आणि त्या प्रयोजनार्थ त्यास इष्ट वाटेल अशा अभिकत्र्याची किंवा अभिकत्यार्ंची नेमणूक करणे ;
(३८) विद्यापीठाचा संलेख (करार) निष्पादित करण्यासाठी किंवा त्याचे कोणतेही कामकाज चालविण्यासाठी, त्यास योग्य वाटेल अशा अधिकारांसह विद्यापीठाचा मुखत्यार म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे ;
(३९) भारतातील किंवा विदेशातील विद्यापीठे, संशोधन परिसंस्था, ना-नफा ना-तोटा संघटना, उद्योग समूह, व्यापार, व्यावसायिक संघ, उद्योग संघ, इतर संघटना अथवा इतर कोणत्याही अशासकीय संघटना यांमधील विभिन्न ग्राहकांकरिता, संशोधन व विकास, सल्ला व चाचणी आणि प्रशिक्षण अध्ययनक्रम यांसारख्या समन्वेषणकारी किंवा अभिनव उपक्रमांद्वारे विद्यापीठाच्या साधनसंपत्तीत वाढ करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे ;
(४०) व्यवस्थापन मंडळाच्या पूर्वमान्यतेने, विदेशातील विद्यापीठांबरोबर व परिसंस्थांबरोबर विद्याविषयक सहयोगी अध्ययनक्रम, संशोधन व सल्लाविषयक सेवा हाती घेणे :
परंतु, यामुळे या संबंधातील राज्य शासनाच्या धोरणांचे उल्लंघन केले जाणार नाही ;
(४१) यासंबंधातील, केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे नियम व विनियम यांनुसार, सहयोगी अध्ययनक्रमांसाठी विदेशी अभिकरणाकडून निधी स्वीकारणे ;
(४२) आपल्या अध्यापन, अध्ययन, प्रशिक्षण, संशोधन व विकास, सल्ला व चाचणी आणि अन्य कोणतेही विद्याविषयक व विस्तार व व्यापक उपक्रम यांमधून विद्यापीठ निर्माण करील अशा उत्पन्नातील शिल्लक रकमेतून विकास मूळ निधी निर्माण करणे आणि त्या निधीची व्यावसायिक रीतीने गुंतवणूक करणे आणि त्यामधून मिळालेल्या व्याजाचा शैक्षणिक वृद्धी व विकास, मानव संसाधन, संशोधन व विकास, शैक्षणिक व भौतिक पायाभूत सुविधा विकास यांच्या वाढीसाठी व विकासासाठी आणि इतर कोणत्याही पायाभूत सुविधांसाठी वापर करणे ;
(४३) विद्यापीठाच्या मते विद्याविषयक बाबींच्या संबंधात आवश्यक असतील अशा इतर सूचना किंवा निदेश विद्यापीठ अध्यापकांकरिता निर्धारित करणे ;
(४४) महसूल व साधनसंपत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने, शुल्क आकारून, बाहेरील अभिकरणांकरिता उच्च शिक्षण, संशोधन, सल्ला सेवा यांवर आधारित प्रकल्पांमधील विकास अध्ययनक्रम आणि प्रशिक्षण अध्ययनक्रम हाती घेणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ११(४५) पटनोंदणीचे एकूण प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने, यथोचित उपाययोजना करणे ;
(४६) विद्यापीठाने स्वत: किंवा इतर विद्यापीठाच्या किंवा संघटनांच्या सहकार्याने, सर्वसाधारणपणे भारतीय व परदेशी भाषांचा आणि विशेषत: आशियाई भाषांचा अभ्यास करण्यास चालना देणे ;
(४७) विद्यापीठाचे अध्यापक, दीर्घ सुटी नसलेले शैक्षणिक व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या जबाबदाया यांची सुनिश्चित करण्याची कार्यात्मक योजना विकसित करणे ;
(४८) जे समकालीन, जागतिकदृष्टया स्पर्धात्मक आणि स्थानिक तसेच प्रादेशिक व राष्ट्रीयदृष्टया महवपूर्ण आहे अशा ज्ञानाची र्िनमिती करणे व त्याचा प्रसार करणे आणि श्रेष्ठ दर्जाच्या संशोधनाची जोपासना करणे ;
(४९) विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन ठेवणे आणि ज्ञान निर्मात्याची भूमिका बजावणे;
(५०) उद्योगाकरिता व समाजाकरिता उत्पादने, सेवा व तंत्रज्ञान विकसित करणे आणि विद्यापीठासाठी महसूल व इतर साधनसंपत्ती निर्माण करणे ;
(५१) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून ' सहयोगातून ' व ' सहभागातून ' शिक्षणाच्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करण्यासाठी इ-अध्ययन व इ-प्रशासन या दोन्ही सेवांसाठी सर्वसमावेशक डिजिटल विद्यापीठ आराखडा तयार करणे ;
(५२) ज्या राज्य, देश व समाज यांच्यासमोरील काही महवाच्या समस्यांचे निराकरण करतील अशा अनेकविध ज्ञानशाखांमधील बहुविध विद्याशाखांतील गटांचा अंतर्भाव असणाया विद्यापीठामधील संशोधनाचे वाणिज्ियक क्षेत्रांमध्ये व समन्वयीत प्रकल्पांमध्ये रुपांतर करण्यासाठी संशोधन पार्क, तंत्रज्ञान नवसंशोधक व इतर अभियोजन संस्था यांची र्िनमिती करणे ;
(५३) स्थानिक गरजा, उपलब्ध प्रशिक्षण सुविधा, उद्भवणाया गरजा आणि नवीन रोजगाराच्या संधी विचारात घेऊन, विद्याथ्यार्ंना जी कौशल्ये माहीत करून देण्याची गरज आहे अशी कौशल्ये निश्चित करणे ;
(५४) तरुण पिढीला देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देऊन, त्याद्वारे त्यांच्या सवार्ंगीण विकासाकरिता पोषक वातावरण तयार करणे आणि तंत्रज्ञानातील कौशल्य विकास करण्याकरिता संधी निर्माण करणे ;
(५५) बहुविध-प्रवेशाचे किंवा निर्गमनाचे पर्याय निर्माण करण्यासाठी आणि विद्यापीठांमधील किंवा त्याच्या प्रांतांतील किंवा क्षेत्रांतील गतिशीलतेच्या संधी देण्यासाठी, श्रेयांक संचयनाचे (क्रेडीट बँकिंग) किंवा हस्तांतरण पद्धतीचे कार्यतंत्र व सुविधा देणे ;
(५६) मुख्यत्वेकरून विद्याशाखा, तंत्रज्ञान शाखा, व्यावसायिक व सामाजिक शाखा आणि व्यक्ितमत्व व सांस्कृतिक विकास शाखा या चार शाखांमधील हस्तांतरणयोग्य आणि मिळण्यायोग्य असलेल्या श्रेयांक गुणांसह पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती सुरू करण्याची सुनिश्चिती करणे ;
(५७) ज्ञानाचे वर्धनक्षम वास्तव जीवनातील व्यावहारिक उपयोगांमध्ये रुपांतर करण्यासाठी सामाजिक विकासात सहभागी असलेले उद्योग, संशोधन व विकास प्रयोगशाळा, व्यावसायिक संघ, उद्योगसंघ, अशासकीय संघटना यांसारख्या संस्थांच्या सहयोगाने अध्यापकांच्या गतिशीलतेला चालना देणे आणि त्यातून विद्यापीठाचा अध्ययनक्रम समृद्ध करणे ;
(५८) विद्यापीठाचे वरील अधिकार, कर्तव्ये व जबाबदाया यांच्या संदर्भात, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निदेशांचे अनुपालन करणे व ते पार पाडणे ;
(५९) नियमित कालांतरांने विद्यापीठ प्रशालांचे, विभागांचे आणि केंद्रांचे शैक्षणिक व प्रशासकीय परिनिरीक्षण करणे ;
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(६०) अनुक्रमे संबंधित व्यवस्थापन मंडळ, राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या परवानगीने राज्यामध्ये, राज्याबाहेर व परदेशांमध्ये प्रादेशिक केंद्रांची किंवा उप-केंद्रांची स्थापना करणे ;
(६१) अभ्यागत प्राध्यापक, गुणवान प्राध्यापक, सल्लागार आणि विद्यापीठाच्या उद्दिष्टांच्या अभिवृद्धीसाठी योगदान देतील अशा इतर व्यक्ती यांची कंत्राटी तवावर किंवा अन्यथा नेमणूक करणे ;
(६२) विद्यापीठाची सर्व किंवा त्यांपैकी कोणतीही उद्दिष्टे पार पाडण्यासाठी आवश्यक किंवा आनुषंगिक किंवा हितावह असतील अशा इतर सर्व कृती किंवा गोष्टी करणे.
६. (१) भारताच्या कोणत्याही नागरिकास स्त्री-पुरुष भेद, वंश, पंथ, वर्ग, जात, जन्मस्थान, धर्मश्रद्धा विद्यापीठ सवार्ंना खुले असणे.
किंवा व्यवसाय किंवा राजकीय किंवा इतर मतप्रणाली केवळ या कारणांवरून, विद्यापीठाच्या कोणत्याही पदापासून किंवा त्याच्या प्राधिकरणांपैकी, मंडळांपैकी किंवा समित्यांपैकी कोणत्याही प्राधिकरणाचे, मंडळाचे किंवा समितीचे सदस्यत्व मिळण्यापासून किंवा कोणत्याही पदावरील नेमणुकीपासून किंवा कोणतीही पदवी, पदविका, प्रमाणपत्र किंवा इतर विद्याविषयक विशेषोपाधी किंवा अभ्यास पाठयक्रम यासाठी प्रवेश मिळवण्यापासून अपर्वजित केले जाणार नाही.
(२) अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या वेगवेगळया पदांवरील नियुक्त्यांच्या बाबतीत व विद्यापीठामध्ये विद्याथ्यार्ंना प्रवेश देण्याच्या प्रयोजनांकरिता, विद्यापीठ, अनुसूचित जातींसाठी, अनुसूचित जमातींसाठी, निरधिसूचित जमातींसाठी (विमुक्त जाती), भटक्या जमातींसाठी, इतर मागासवगार्ंसाठी आणि र्आथिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी राखीव जागा ठेवण्यासंबंधातील शासनाचे धोरण अंगीकारील व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे अनुपालन करील.
(३) विद्यापीठ, राज्य शासनाकडून वेळोवेळी निदेश देण्यात येईल त्यानुसार, समाजाच्या दुर्बल घटकांतील विविध प्रवर्ग, अल्पसंख्याक, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्या कल्याणासंबंधातील राज्य शासनाच्या सर्वसाधारण धोरणांचे अनुपालन करील.
७. (१) राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय, विद्यापीठ,—
(क) जी राज्य शासनाच्या राज्यकोषावर अतिरिक्त र्आथिक दायित्व लादील अशी अध्यापकांची, राज्य शासनाचे विद्यापीठावर नियंत्रण असणे.
अधिकायांची किंवा इतर कर्मचायांची नवीन पदे निर्माण करणार नाही ;
(ख) राज्य शासनाच्या मंजूर पदांवर ज्यांची नियुक्ती व आस्थापना केली आहे अशा त्याच्या अध्यापकांचे, अधिकायांचे व इतर कर्मचायांचे वेतन, भत्ते सेवानिवृत्तीनंतरचे लाभ व इतर लाभ यात सुधारणा करणार नाही ;
(ग) राज्य शासनाच्या निधीतून राज्य शासनाच्या मंजूर पदांवर नियुक्त केलेल्या त्याच्या कोणत्याही अध्यापकांना, अधिकायांना किंवा विद्यापीठाच्या इतर कर्मचायांना सानुग्रह रकमेचे प्रदान किंवा अपेक्षित वित्तीय भार असणारे अन्य लाभ यांसह कोणतेही विशेष वेतन, भत्ते किंवा कोणत्याही स्वरूपाचे अन्य अतिरिक्त पारिश्रमिक देणार नाही ;
(घ) राज्य शासनाकडून मिळालेला कोणताही राखीव निधी, तो ज्या प्रयोजनासाठी मिळालेला होता, त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वळविणार नाही ;
(ङ) राज्य शासनाकडून किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून ज्या प्रयोजनांकरिता निधी मिळाला आहे त्या प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विकास कामासाठी तो निधी खर्च करणार नाही ;
(च) विक्री किंवा भाडेपट्टा याद्वारे स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण करणार नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ १३(२) विद्यापीठ, राज्य शासनाची धोरणे आणि त्याने वेळोवेळी दिलेले निदेश यांच्याशी सुसंगत राहून, पुढील संस्थांकडून मिळालेल्या निधीतून खर्च करण्यास सक्षम असेल :—
(क) राज्य शासनाचा कोणताही हिस्सा किंवा अंशदान याशिवाय विविध निधी पुरवठा करणाया विविध एजन्सी ;
(ख) विद्यापीठाच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी, व्यक्ती, उद्योगसमूह, परिसंस्था, संघटना किंवा कोणतीही व्यक्ती यांच्याकडून मिळालेली अंशदाने ;
(ग) अनुदानित व स्वयंसहाय्यित शैक्षणिक अध्ययनक्रमांसाठी विद्यापीठाने पुरवलेल्या शैक्षणिक किंवा इतर सेवा यांची अंशदाने किंवा शुल्क ;
(घ) प्रायोजित संशोधन व सल्ला व चाचणी यांतून मिळालेला आकार ;
(ङ) (एक) विविध संवगार्ंतील पदे निर्माण करणे ;
(दोन) ज्या पदांसाठी शासनाचे योगदान मिळाले आहे, अशी पदे ज्या व्यी धारण करतात त्या व्यी, ती पदे धारण करीत नसतील तर, त्या पदांसाठी तरतूद केलेल्या स्वत:च्या निधीतून निर्माण केलेल्या पदांसाठी वेतन, भत्ते व इतर लाभ देणे ;
(तीन) स्वयंसहाय्यित तवावर कोणताही शैक्षणिक अध्ययनक्रम सुरू करणे ;
(चार) कर्मचायांची नियमित कर्तव्ये व जबाबदाया यांव्यतिरिक्त त्यांना सोपविलेले कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी त्यांना पारिश्रमिक किंवा प्रोत्साहके देणे ;
(पाच) कोणत्याही विकासविषयक कामांवर आणि त्याचे विद्यार्थी व कर्मचारी यांच्या कल्याण उपक्रमांवर खर्च करणे,
या प्रयोजनांकरिता, विद्यापीठाने स्थापना केलेला विकास निधी किंवा इतर कोणताही निधी :
परंतु, यामुळे राज्य शासनावर, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, तात्काळ किंवा भविष्यात, कोणतेही वित्तीय दायित्व येणार नाही.
(३) राज्य शासनास, या अधिनियमात अंतभर्ूत असलेल्या तरतुदींस अनुसरून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये समान मानकांची सुनिश्चिती करण्याच्या आणि ती कायम राखण्याच्या प्रयोजनासाठी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, विद्यापीठाचे अधिकारी, अध्यापक व इतर कर्मचारीवर्ग यांचे वर्गीकरण, निवडीची रीत व पद्धती, नियुक्ती, पदस्थापना व प्रगत प्रशिक्षण, क्षेत्र अनुभव, प्रतिनियुक्ती आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग, र्आथिकदृष्टया दुर्बल घटक यांमधील व्यक्तींसाठी पदे राखून ठेवणे, त्यांची कर्तव्ये, कामाचा भार, वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ, इतर लाभ, वर्तणूक व शिस्तभंग विषयक बाबी आणि त्यांच्या सेवेच्या इतर शर्ती यांबाबत तरतूद करणारी, प्रमाण संहिता विहित करता येईल. जेथे अशी संहिता केली असेल तेथे संहितेत केलेल्या तरतुदी अधिभावी ठरतील, आणि या अधिनियमान्वये केलेले परिनियम, आदेश व विनियम यांत केलेल्या तरतुदी, संहितेमध्ये अंतभर्ूत असलेल्या बाबींच्या संबंधात, त्या संहितेमधील तरतुदींशी, जेथवर विसंगत असतील तेथवर, विधिअग्रा असतील.
(४) (क) विद्यापीठामधील, अध्यापकांची नियुक्ती करण्याच्या प्रयोजनार्थ, असलेली अर्हता व अनुभव हा, विद्यापीठ अनुदान आयोगाने, किंवा यथास्थिति, इतर कोणत्याही नियामक प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या मानकांनुसार असेल.
(ख) विद्यापीठातील अध्यापकेतर कर्मचायांची नियुक्ती करण्याच्या प्रयोजनार्थ, असलेली अर्हता व अनुभव, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
(५) या अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, जर परिस्थितीनुसार तसे आवश्यक असेल आणि राज्य शासनाला तसे करणे आवश्यक वाटले तर, विद्यापीठास, एका वेळी एका वर्षापेक्षा अधिक नसेल आणि एकूण तीन वषार्ंपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी आणि परीक्षा१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ व मूल्यमापन मंडळाचा संचालक याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी आवश्यक अर्हता धारण करणाया एखाद्या योग्य व्यक्तीची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करता येईल.
(६) राज्य शासनास प्राप्त झालेल्या कोणत्याही तक्रारीच्या बाबतीत, राज्य शासनास, सहसंचालक, उच्च शिक्षण किंवा सहसंचालक, तंत्र शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही अधिकायामार्फत, विद्यापीठाचे निरीक्षण व चौकशी करण्याचा अधिकार असेल.
(७) कलम ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेले अधिकार वापरण्यास किंवा कर्तव्ये पार पाडण्यास विद्यापीठाने कसूर केली असेल त्याबाबतीत, किंवा जेव्हा विद्यापीठाने असे अधिकार यथोचितपणे वापरलेले नसतील किंवा अशी कर्तव्ये पार पाडलेली नसतील त्याबाबतीत, किंवा जेव्हा राज्य शासनाने काढलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन करण्यात निष्फळ ठरले असेल त्याबाबतीत किंवा राज्य शासनाला योग्य वाटेल अशा अन्य कोणत्याही परिस्थितीत, राज्य शासनास, चौकशी करता येईल आणि राज्य शासनाने विर्िनदिष्ट केले असेल अशा कालावधीच्या आत, अशा अधिकारांचा योग्य वापर करण्यासाठी किंवा अशी कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी किंवा आदेशाचे पालन करण्यासाठी विद्यापीठाला निदेश देता येईल ; आणि अशा निदेशांचे पालन करणे हे विद्यापीठाचे कर्तव्य असेल. अशा निदेशांचे पालन करण्यास, विद्यापीठ निष्फळ ठरल्यास अशा बाबतीत, राज्य शासन, या निदेशांचे पालन का करण्यात आले नाही त्याची लेखी कारणे, राज्य शासनाने विर्िनदिष्ट केले असेल अशा कालावधीच्या आत देण्यास विद्यापीठाला फर्मावील. जर विद्यापीठ, राज्य शासनाने विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीच्या आत कारणे देण्यात कसूर करील, किंवा जर त्या स्पष्टीकरणाने राज्य शासनाचे समाधान झाले नाही तर, त्यास, कलम ८ च्या पोट-कलम (३) अन्वये आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी ती बाब कुलपतीकडे र्िनदिष्ट करता येईल.
(८) राज्य शासन, त्याला योग्य वाटेल अशा कालांतराने, विद्यापीठाच्या लेख्यांची नियमितपणे चाचणी दाखल लेखापरीक्षा किंवा संपूर्ण लेखापरीक्षा करील.
प्रकरण तीन
विद्यापीठाचे अधिकारी.
८. (१) महाराष्ट्राचा राज्यपाल हा, विद्यापीठाचा कुलपती असेल आणि तो, आपल्या पदीय नात्याने कुलपती व त्याचे अधिकार. विद्यापीठाचा प्रमुख असेल.
(२) कुलपती, उपस्थित असेल तेव्हा, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद भूषवील, आणि त्यास, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा, विशिष्ट प्रयोजनाकरिता विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाची बैठक बोलाविण्याचा निदेश कुलगुरुला देता येईल, आणि कुलगुरु, अशा बैठकीचे कार्यवृत्त, कुलपतीला त्याच्या अवलोकनार्थ आणि आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करील.
(३) कुलपतीस,-----
(क) अशा प्रकरणात कलम ७ च्या पोट-कलम (७) च्या तरतुदींन्वये राज्य शासनाकडून कोणताही संदर्भ प्राप्त झाल्यावर; किंवा
(ख) त्यास, कोणत्याही प्रकरणात स्वाधिकारे किंवा अन्यथा,
अशा प्रकरणाशी किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही प्रकरणाशी किंवा कारभाराशी संबंधित असणारा अहवाल किंवा स्पष्टीकरण किंवा अशी माहिती व अभिलेख कुलपती विर्िनदिष्ट करील अशा कालावधीच्या आत मागविता येईल, आणि तो, असा अहवाल किंवा स्पष्टीकरण किंवा माहिती किंवा अभिलेख विचारात घेतल्यानंतर, त्यावर विद्यापीठाच्या किंवा विद्याथ्यार्ंच्या हितासाठी किंवा व्यापक जनहितार्थ, त्यास योग्य वाटतील असे आदेश, त्याचे अनुपालन न केल्याबद्दल शास्ती लादण्यासह, देईल, आणि त्याचे आदेश अंतिम व बंधनकारक असतील आणि विद्यापीठाकडून त्यांचे तात्काळ अनुपालन करण्यात येईल.
(४) कुलपतीस, कुलगुरूकडून लेखी अहवाल घेतल्यानंतर, त्याच्या मते कोणत्याही प्राधिकरणाचा, मंडळाचा, समितीचा किंवा अधिकायाचा जो कोणताही ठराव, आदेश किंवा कार्यवाही, या अधिनियमाशी किंवा त्याखाली केलेल्या परिनियमांशी, आदेशांशी किंवा विनियमांशी सुसंगत नसेल, किंवा विद्यापीठाच्या हिताची नसेलमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ १५ तर, ते स्थगित करता येईल, किंवा त्यात फेरबदल करता येईल आणि विद्यापीठ, प्राधिकरण, मंडळ, समिती व अधिकारी त्याचे पालन करतील :
परंतु, कुलपती, असा कोणताही आदेश देण्यापूर्वी, असा आदेश का देण्यात येऊ नये याची कारणे दाखविण्यासाठी विद्यापीठ, प्राधिकरण, मंडळ, समिती किंवा, यथास्थिति, अधिकारी यांना फर्मावील आणि कुलपतीने विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत, जर कोणतेही कारण दाखविण्यात आले तर, कुलपती ते विचारात घेईल आणि जेव्हा त्यास आवश्यक वाटेल तेव्हा, राज्य शासनाशी विचारविनिमय केल्यानंतर तो, त्या प्रकरणात करावयाची कारवाई ठरवील, आणि त्यावरील त्याचा निर्णय अंतिम असेल.
(५) जेव्हा, कुलपतीच्या मते, नामनिर्देशित केलेल्या किंवा नियुक्त केलेल्या कोणत्याही सदस्याचे वर्तन, विद्यापीठाचे, किंवा कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे किंवा समितीचे कामकाज सुरळीतपणे चालण्यास बाधक ठरत असेल तर, त्यास, अशा सदस्याला, त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर आणि असे कोणतेही असल्यास अशा स्पष्टीकरणावर विचार केल्यानंतर आणि तसे करणे आवश्यक असल्याबद्दल स्वत:ची खात्री पटल्यानंतर, अशा सदस्याला अपात्र ठरवता येईल किंवा त्यास योग्य वाटेल अशा कालावधीकरिता त्याला निलंबित करता येईल.
(६) कुलपती, या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये त्यास प्रदान करण्यात येतील किंवा त्याच्याकडे निहित असतील अशा अन्य अधिकारांचा वापर करील व अशी अन्य कर्तव्ये पार पाडील.
९. विद्यापीठाचे इतर अधिकारी पुढीलप्रमाणे असतील :---
विद्यापीठाचे इतर अधिकारी.
(१) कुलगुरू ;
(२) कुलसचिव ;
(३) प्रशालेचा अधिष्ठाता ;
(४) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ ;
(५) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ ;
(६) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र ;
(७) वित्त व लेखा अधिकारी ;
(८) परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील असे, विद्यापीठाच्या सेवेतील इतर अधिकारी.
कुलगुरू व त्याची नियुक्त्ती.
१०. (१) विद्यापीठाचा एक कुलगुरू असेल जो विद्यापीठाचा मुख्य विद्याविषयक आणि कार्यकारी अधिकारी असेल आणि तो, विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संशोधन आणि नवोपक्रम, नियोजन व विकास मंडळ, विद्यार्थी विकास मंडळ आणि वित्त व लेखा समिती, यांचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. कुलपतीच्या अनुपस्थितीत, पदव्या प्रदान करण्याच्या कोणत्याही दीक्षांत समारंभात तो, अध्यक्ष म्हणून काम पाहील.
(२) अन्यथा तरतूद करण्यात आली असेल त्याखेरीज, कुलगुरूचे वेतन व भत्ते, त्याच्या सेवेच्या अटी व शर्ती, राज्य शासन वेळोवेळी निर्धारित करील त्याप्रमाणे असतील.
(३) यात याखाली नमूद केलेल्या रीतीने, कुलपतीकडून, कुलगुरुची नियुक्ती करण्यात येईल :-----
(क) कुलगुरुच्या नियुक्तीसाठी कुलपतीला सुयोग्य नावांची शिफारस करण्याकरिता शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, राज्य शासनाने विर्िनदिष्ट केलेल्या रीतीने, पुढील सदस्यांचा समावेश असलेली एक शोध-नि-निवड समिती घटित करण्यात येईल :-----
(एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य, जो उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ख्याती असलेली व्यक्ती असेल आणि राष्ट्रीय कीर्तीचा ख्यातनाम विद्याव्यासंगी किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्म पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती असेल ;
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(दोन) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सचिव किंवा राज्य शासनाने नामनिर्देशित केलेला शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही अधिकारी ;
(तीन) व्यवस्थापन मंडळाने आणि विद्यापरिषदेने संयुक्तपणे नामनिर्देशित केलेला, मराठी भाषा व साहित्य यांचे जतन व संवर्धनासाठी काम करणाया राष्ट्रीय लौकिकप्राप्त परिसंस्थेचा किंवा संघटनेचा संचालक किंवा प्रमुख ;
(चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य ;
(ख) खंड (क) च्या उप-खंड (एक) अन्वये कुलपतीने नामनिर्देशित केलेला सदस्य हा, समितीचा अध्यक्ष असेल ;
(ग) समितीवर नामनिर्देशित केलेले सदस्य हे, ज्या व्यक्ती विद्यापीठाशी अथवा त्या विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयाशी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त परिसंस्थेशी कोणत्याही रीतीने संबंधित नसतील अशा व्यक्ती असतील ;
(घ) समितीचे सर्व सदस्य उपस्थित असल्याशिवाय, समितीची कोणतीही बैठक घेण्यात येणार नाही ;
(ङ) समिती, कुलगुरू म्हणून नियुक्ती केली जाण्यासाठी कुलपतीच्या विचारार्थ पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सुयोग्य व्यक्तींच्या नामिकेची शिफारस करील. अशा प्रकारे शिफारस केलेल्या व्यक्तींची नावे, कोणताही पसंतीक्रम न दर्शविता वर्णानुक्रमानुसार नमूद केलेली असतील. समिती, नामिकेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुयोग्यतेच्या सविस्तर माहितीसह अहवाल तयार करील आणि तो कुलपतीला सादर करील ;
(च) कुलगुरू म्हणून नियुक्तीकरिता, समितीनेे शिफारस केलेली व्यक्ती,—
(एक) सर्वोच्च पातळीची सक्षमता, सचोटी, नैतिकता व परिसंस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्ती असेल ;
(दोन) विद्याविषयक नेतृत्व सिद्ध केलेले असल्याच्या पुराव्यासह, विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव असलेली मराठी भाषा व साहित्य या क्षेत्रातील अथवा मराठी भाषा व साहित्य या क्षेत्रातील लौकिकप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेमधील दहा वषार्ंचा अनुभव असलेली, एक विख्यात शिक्षणतज्ज्ञ असेल ;
(तीन) तिच्या स्वत:च्या आदर्शातून नेतृत्व करण्यास सक्षम असेल ;
(चार) दूरदृष्टी देण्यास सक्षम असेल ; आणि विद्यार्थी व समाज यांच्या हिताच्या दृष्टीने, ती वास्तवात आणण्याची क्षमता तिच्यात असेल ; आणि
(पाच) कुलपतीशी विचारविनिमय करून, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे राज्य शासनाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशी, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता व अनुभव तिने धारण केलेला असेल :
परंतु, शैक्षणिक अर्हता व अनुभव, विद्यापीठ अनुदान आयोगाने किंवा यथास्थिति, इतर कोणत्याही नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या मानकांशी सुसंगत असेल ;
(छ) कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्याच्या पात्रतेच्या शर्ती आणि नावांची शिफारस करण्याची प्रक्रिया यांस, अधिक सुयोग्य उमेदवारांची शिफारस करण्याची सुनिश्चिती करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.
(४) कुलपतीस, नामिकेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी समितीने शिफारस केलेल्या एका व्यक्त्तीची, कुलगुरू म्हणून नियुक्ती करता येईल :
परंतु, जर कुलपतीने निवड केलेल्या व्यक्तीने, कुलगुरु पदाचा पदभार स्वीकारला नाही तर, कुलपतीमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ १७ नामिकेतील उर्वरित व्यक्तींमधून अन्य योग्य व्यक्तीची निवड करील किंवा तो, एकतर त्याच समितीकडून किंवा त्या प्रयोजनाकरिता नवीन समिती घटित केल्यानंतर अशा नवीन समितीकडून नवीन नामिका मागवील :
परंतु आणखी असे की, जर कुलपतीने, अशाप्रकारे शिफारस केलेल्या कोणत्याही व्यक्तीस मान्यता दिली नाही तर, त्यास, त्याच समितीकडून किंवा या प्रयोजनासाठी नवीन समिती घटित केल्यानंतर, अशा नवीन समितीकडून नवीन नामिका मागविता येईल.
(५) कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यासाठी सुयोग्य व्यक्तींची नामिका तयार करण्याची प्रक्रिया ही, कुलगुरूचे पद रिक्त होण्याच्या संभाव्य दिनांकाच्या किमान सहा महिने अगोदर सुरू करण्यात येईल, आणि कुलगुरूच्या नियुक्तीची प्रक्रिया, कुलगुरूचे पद रिक्त होण्याच्या संभाव्य दिनांकाच्या किमान एक महिना अगोदर पूर्ण करण्यात येईल.
(६) कुलसचिव, कुलपतींच्या कार्यालयाशी विचारविनिमय करून, व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षाच्या मान्यतेने, प्रक्रिया सुरू करील.
(७) कुलगुरू म्हणून नियुक्ती केलेली व्यक्ती ही, सेवाविषयक कराराच्या अटी व शतर्ींना अधीन राहून, तिने अधिकारपद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वषार्ंच्या किंवा तिच्या वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपयर्ंतच्या कालावधीसाठी, यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी, पद धारण करील, आणि ती पुर्ननियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
(८) कुलगुरू म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती ही, नियुक्तीपूर्वी तिने धारण केलेल्या कायम पदावरील तिचा धारणाधिकार, कोणताही असल्यास, धारण करील.
(९) पुढीलपैकी कोणत्याही परिस्थितीत, त्याची निकड असल्याचा निर्णय, केवळ कुलपतीच करतील, म्हणजेच :-----
(एक) जेव्हा पोट-कलम (३) च्या खंड (क) अन्वये नियुक्ती केलेली समिती, कुलपतीने विर्िनदिष्ट केलेल्या कालमर्यादेत कोणत्याही नावाची शिफारस करण्यास समर्थ नसेल त्याबाबतीत ;
(दोन) जेव्हा मृत्यू, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे कुलगुरूचे पद रिक्त झाले असेल, आणि ते पद, पोट-कलम (३) व (४) च्या तरतुदींनुसार सोयीस्करपणे व शीघ्रतेने भरता येऊ शकत नसेल त्याबाबतीत ;
(तीन) जेव्हा रजा, आजारपण किंवा अन्य कारणांमुळे कुलगुरूचे पद तात्पुरते रिक्त झाले असेल त्याबाबतीत ; किंवा
(चार) जेव्हा इतर कोणत्याही प्रकारची निकडीची परिस्थिती असेल त्याबाबतीत,
कुलपतीला, त्याच्या आदेशात तो विर्िनदिष्ट करील अशा, एकूण सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या मुदतीकरिता, प्राध्यापक पदापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही योग्य व्यक्त्तीची, कुलगुरू म्हणून काम करण्यासाठी नियुक्ती करता येईल :
परंतु, अशा प्रकारे नियुक्ती केलेली व्यक्ती ही, पोट-कलमे (३) व (४) च्या तरतुदींनुसार, कुलगुरू म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती ज्या दिनांकास पद ग्रहण करील किंवा कुलगुरू त्या पदावर पुन्हा रूजू होईल, त्या दिनांकापासून असे पद धारण करण्याचे बंद करील.
(१०) कुलगुरू हा, विद्यापीठाचा पूर्णवेळ वेतनी अधिकारी असेल आणि त्याला, राज्य शासनाद्वारे निर्धारित करण्यात येईल असे वेतन व भत्ते आणि अशा इतर सुविधा मिळतील. याशिवाय, तो, नि:शुल्क असलेले सुसज्ज निवासस्थान, त्याच्या वापरासाठी मोटारगाडी, तिचे परिरक्षण व दुरूस्ती आणि त्यासाठी आवश्यक असलेले इंधन यांसह पगारी वाहनचालकाची मोफत सेवा मिळण्यास हक्कदार असेल.
(११) जर राज्याच्या एकत्रित निधीतून मानधन मिळत असलेल्या व्यक्तीची, किंवा विद्यापीठाच्या अध्यापकाची कुलगुरू म्हणून नियुक्ती केलेली असेल तर, कुलगुरू म्हणून असलेल्या तिच्या पदावधीत तिच्या सेवेच्या अटी व शतर्ींमध्ये तिचे अहित होईल अशा प्रकारे बदलण्यात येणार नाही.
भाग पाच-७२-३. एचबी-१७६४-3.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(१२) पूर्वगामी पोट-कलमांमध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, पोट-कलम (८) मध्ये र्िनदिष्ट केलेली व्यक्ती, तिच्या मूळ पदाच्या सेवेच्या अटी व शर्तीनुसार त्या पदावरून निवृत्त होईल.
(१३) कुलगुरूस, कुलपतीला उद्देशून आपल्या सहीने लिहिलेली एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर, आपल्या पदाचा राजीनामा देता येईल आणि कुलपतीने त्याचा राजीनामा स्वीकारल्यावर किंवा उक्त नोटिशीचा कालावधी समाप्त झाल्यावर, यापैकी जे अगोदर घडेल त्या दिवसापासून, तो आपले पद धारण करण्याचे बंद होईल.
(१४) जर कुलगुरू,---
(क) विकल मनाचा आहे आणि तो तसा असल्याचे सक्षम न्यायालयाने घोषित केले आहे ;
किंवा
(ख) नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही अपराधाकरिता न्यायालयाकडून त्याला दोषसिद्ध ठरविण्यात आले आहे ; किंवा
(ग) अविमुक्त नादार झाला आहे आणि तो तसा असल्याचे सक्षम न्यायालयाने घोषित केले आहे ;
किंवा
(घ) तो शारीरिकदृष्टया अपात्र झाला आहे आणि दीर्घकाळच्या आजारामुळे किंवा विकलांगतेमुळे त्याची कार्ये पार पाडण्यास तो असमर्थ झालेला आहे ; किंवा
(ङ) त्याने, या अधिनियमाच्या तरतुदींचे पालन करण्याचे बुद्धिपुरस्सर र्वजिले आहे किंवा पालन करण्याचे नाकारले आहे किंवा सेवाविषयक कोणत्याही अटींचा किंवा शतर्ींचा किंवा पोट-कलम (२) अन्वये राज्य शासनाने विहित केलेल्या अन्य कोणत्याही शतर्ींचा भंग केला आहे, किंवा त्याच्याकडे निहित असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग केला आहे किंवा जर कुलगुरूला पदावर पुढे चालू ठेवणे, विद्यापीठाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने हानिकारक आहे ; किंवा
(च) तो कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाया कोणत्याही संघटनेचा सदस्य आहे अथवा त्या पक्षाशी किंवा संघटनेशी अन्यथा संबंधित आहे, किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात भाग घेत आहे किंवा त्याच्या मदतीसाठी वर्गणी देत आहे,
अशी कुलपतीची खात्री पटली असेल तर, तो, कुलगुरूला त्याच्या पदावरून काढून टाकू शकेल.
स्पष्टीकरण. या उप-खंडाच्या प्रयोजनार्थ, कोणताही पक्ष राजकीय पक्ष आहे, किंवा कोणतीही संघटना राजकारणात भाग घेते किंवा कोणतीही चळवळ किंवा क्रिया, या उप-खंडाच्या व्याप्तीमध्ये येते किंवा कसे यासंबंधातील कुलपतीचा निर्णय अंतिम असेल :
परंतु, उप-खंड (घ), (ङ) व (च) यांन्वये कुलगुरूला त्याच्या पदावरून काढून टाकण्यापूर्वी कुलपतीकडून, कुलगुरूला कारणे दाखवण्याची वाजवी संधी देण्यात येईल.
कुलगुरूचे अधिकार व कर्तव्ये.
११. (१) कुलगुरू हा, विद्यापीठाचा प्रमुख विद्याविषयक व कार्यकारी अधिकारी असेल आणि तो, विद्यापीठाच्या शैक्षणिक अध्ययनक्रमांच्या विकासासाठी जबाबदार असेल. तो, विद्यापीठाचे कामकाज कार्यक्षमपणे व सुव्यवस्थितरीत्या चालविण्याची सुनिश्चिती करण्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक अध्ययनक्रमांची अंमलबजावणी आणि सामान्य प्रशासन यांच्यावर देखरेख करील व संनियंत्रण ठेवील.
(२) तो, विद्यापीठाच्या इतर कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या किंवा समितीच्या कोणत्याही बैठकीमध्ये हजर राहण्याचा व बोलण्याचा हक्कदार असेल, परंतु, जर तो, त्या प्राधिकरणाचा किंवा मंडळाचा अध्यक्ष, किंवा सदस्य नसेल तर, तो, तेथे मतदान करण्यास हक्कदार असणार नाही.
(३) कुलगुरूला, तसे करणे त्याला आवश्यक वाटेल तेव्हा, कोणत्याही प्राधिकरणांची, मंडळांची किंवा समित्यांची बैठक बोलावण्याचा अधिकार असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ १९(४) कुलगुरू, कुलपतीने व राज्य शासनाने दिलेल्या निदेशांचे काटेकोर अनुपालन, किंवा, यथास्थिति, अंमलबजावणी करण्यात येत असल्याची खात्री करील.
(५) व्यवस्थापन मंडळाचे निदेश, कोणतेही असल्यास, आणि या अधिनियमाच्या तरतुदी, परिनियम, आदेश व विनियम यांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याची तसेच हा अधिनियम, परिनियम, आदेश व विनियम यांच्याशी विसंगत नसतील असे, प्राधिकरणांचे, मंडळांचे व समित्यांचे निर्णय यांची योग्यरीत्या अंमलबजावणी करण्यात येत असल्याची खात्री करणे हे, कुलगुरूचे कर्तव्य असेल.
(६) विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण, मंडळ किंवा समिती यांनी घेतलेला निर्णय किंवा संमत केलेला ठराव हा, कुलगुरूच्या मते, व्यवस्थापन मंडळाच्या निदेशांशी किंवा अधिनियम, परिनियम, आदेश व विनियम यांच्या तरतुदींशी सुसंगत नसेल अथवा असा निर्णय किंवा ठराव, विद्यापीठाच्या हिताचा नसेल तर, कुलगुरूला, त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकता येईल आणि तो निर्णय किंवा ठराव, पुढील बैठकीमध्ये फेरविचार करण्यासाठी संबंधित प्राधिकरण, मंडळ किंवा समिती यांच्याकडे परत पाठविता येईल. जर मतभेद कायम राहिले तर, कुलगुरू, कारणे देऊन तो एक आठवडयाच्या आत कुलपतीच्या निर्णयार्थ सादर करील आणि असे केल्याबद्दल संबंधित प्राधिकरण, मंडळ किंवा समिती यांच्या सदस्यांना कळवील. कुलपतीचा निर्णय मिळाल्यानंतर, कुलगुरू, कुलपतीच्या निदेशांनुसार कार्यवाही करील आणि त्यानुसार संबंधित प्राधिकरण, मंडळ किंवा समिती यांना कळवील.
(७) जर, कुलगुरूला, तातडीने कार्यवाही करण्यासारखी निकडीची परिस्थिती आहे किंवा विद्यापीठाच्या हितासाठी कोणतीही कार्यवाही करणे आवश्यक आहे, असा विश्वास ठेवण्यासाठी वाजवी कारण असेल तर, तो, त्यास आवश्यक वाटेल अशी कार्यवाही करील, आणि निकडीची परिस्थिती निर्माण झाली असल्याबद्दल त्याने विश्वास ठेवण्याची कारणे आणि त्याने केलेली कार्यवाही, ज्यांनी या बाबींच्या संबंधात सामान्य ओघात कार्यवाही केली असती त्या प्राधिकरणाला किंवा मंडळाला शक्य तितक्या लवकर लेखी कळवील. निकडीची परिस्थिती खरोखरच होती किंवा कसे, याबद्दल किंवा विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा कार्यवाहीमुळे बाधा पोचत नसेल त्या बाबतीत केलेल्या कार्यवाहीबद्दल किंवा दोन्हींबद्दल, कुलगुरू आणि प्राधिकरण किंवा मंडळ यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर, ती बाब, निर्णयासाठी कुलपतीकडे पाठवण्यात येईल, त्यावरील त्याचा निर्णय अंतिम असेल :
परंतु, जेव्हा कुलगुरूने केलेल्या अशा कोणत्याही कार्यवाहीमुळे विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला बाधा पोचत असेल तर, त्याबाबतीत, अशी व्यक्ती, अशा कारवाईची नोटीस तिला मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, व्यवस्थापन मंडळाकडे अपील दाखल करण्यास हक्कदार असेल.
स्पष्टीकरण.--- या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, कुलगुरुने केलेल्या कारवाईमध्ये विद्यापीठाच्या कोणत्याही कर्मचायाविरोधात केलेल्या शिस्तभंगविषयक कारवाईचा अंतर्भाव असणार नाही.
(८) जेव्हा कोणतीही बाब, परिनियम, आदेश किंवा विनियम याद्वारे विनियमित करावयाची असेल, परंतु त्याबाबतीत कोणतेही परिनियम, आदेश किंवा विनियम केलेले नसतील किंवा जेव्हा परिनियम, आदेश किंवा विनियम यांत सुधारणा करण्याची निकडीची परिस्थिती असेल त्याबाबतीत, कुलगुरू, त्यास आवश्यक वाटतील असे निदेश देऊन ती बाब, त्या वेळेपुरती विनियमित करू शकेल, आणि शक्य तितक्या लवकर, मान्यतेसाठी संबंधित नियामक मंडळापुढे किंवा प्राधिकरणापुढे किंवा मंडळापुढे मांडील. त्याचवेळी, तो, त्याबाबतीत करण्याची आवश्यकता असलेले परिनियम, आदेश किंवा, यथास्थिति, विनियम यांचा मसुदा विचारार्थ अशा प्राधिकरणापुढे किंवा मंडळापुढे ठेवील :
परंतु, असे परिनियम, आदेश, किंवा, यथास्थिति, विनियम याचा मसुदा, असा निदेश काढल्यापासून सहा महिन्यांच्या आत, विद्यापीठाच्या समुचित प्राधिकरणाद्वारे मान्य करण्यात येईल, असे करण्यात निष्फळ ठरल्यास, असा निदेश आपोआप व्यपगत होईल.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(९) कुलगुरू हा, विद्यापीठ अध्यापकांसाठी नियुक्ती व शिस्तभंगविषयक प्राधिकारी असेल.
(१०) कुलगुरू हा, वित्त व लेखा अधिकायाचे पद वगळता, विद्यापीठातील सहायक कुलसचिवाच्या दर्जाच्या आणि त्याच्याशी समतुल्य असलेल्या व त्यावरील दर्जाच्या अधिकायांसाठी नियुक्ती व शिस्तभंगविषयक प्राधिकारी असेल.
(११) एखाद्या सदस्याने, कामकाजात सतत अडथळे आणल्याबद्दल किंवा ते थांबविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा सदस्याला न शोभणारी वर्तणूक केल्याबद्दल त्याला प्राधिकरणाच्या, मंडळाच्या किंवा समितीच्या बैठकीतून निलंबित करण्याचा अधिकार, विद्यापीठाची प्राधिकरणे किंवा मंडळे किंवा समित्या यांचा अध्यक्ष म्हणून, कुलगुरूला, असेल, आणि तो, ती बाब त्यानुसार कुलपतीला कळवील.
(१२) कुलगुरूस, तो निदेश देईल अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे निकाय यांच्याकडून विद्यापीठ, त्याच्या इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, कार्यशाळा व साधनसामग्री यांची आणि तसेच विद्यापीठाकडून चालविण्यात येणारी किंवा विद्यापीठाने मान्यता दिलेली कोणतीही सभागृहे किंवा वसतिगृहे यांची, आणि विद्यापीठाकडून किंवा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाया परीक्षांची, करण्यात येणाया अध्यापनाची व इतर कामांची तपासणी करवून घेण्याचा, आणि विद्यापीठाचे प्रशासन किंवा वित्तव्यवस्था यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबींची त्याच रीतीने चौकशी करवून घेण्याचा हक्क असेल.
(१३) कुलगुरू, या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये, त्याला प्रदान करण्यात येतील अशा अन्य अधिकारांचा वापर करील व अशी अन्य कर्तव्ये पार पाडील.
१२. (१) कुलसचिव हा, विद्यापीठाचा पूर्णकालिक अधिकारी असेल आणि त्याची नियुक्ती व्यवस्थापन मंडळाद्वारे करण्यात येईल.
कुलसचिव आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.
(२) पोट-कलम (१) अन्वये नियुक्ती करण्याकरिता, कुलसचिवाची निवड करण्याच्या प्रयोजनासाठी असलेली अर्हता व अनुभव हा, वेळोवेळी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केल्याप्रमाणे व राज्य शासनाने मान्यता दिल्याप्रमाणे असेल. या अधिनियमाखाली, त्या प्रयोजनासाठी घटित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरु, कुलसचिवाची नियुक्ती करील.
(३) कुलसचिव, थेट कुलगुरुच्या अधीक्षण, संचालन व नियंत्रण यांखाली काम करील.
(४) कुलसचिवाची नियुक्ती, पाच वषार्ंच्या मुदतीसाठी किंवा त्याचा नियत सेवावधी पूर्ण होईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल तितक्या मुदतीसाठी, करण्यात येईल आणि तो, पुर्ननियुक्त्तीकरिता पात्र असणार नाही.
(५) जेव्हा कुलसचिवाचे पद रिक्त झाले असेल किंवा तो, आजारपणाच्या किंवा अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे, तीन महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी, त्याच्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा, कुलगुरू, नवीन कुलसचिव पदावर रुजू होईपयर्ंत किंवा, यथास्थिति, कुलसचिव पदावर रुजू होईपयर्ंत, कुलसचिव म्हणून काम पाहण्यासाठी योग्य व्यक्तीची तात्पुरती नियुक्ती करील.
(६) कुलसचिव,---
(क) व्यवस्थापन मंडळाचा, विद्या परिषदेचा आणि या अधिनियमाद्वारे किंवा त्यांन्वये विहित केल्याप्रमाणे, अशा इतर प्राधिकरणांचा, मंडळांचा व समित्यांचा सदस्य-सचिव म्हणून काम करील ;
(ख) अध्यापकांव्यतिरिक्त्त विद्यापीठाच्या अन्य कर्मचायांचा, दीर्घ सुटी नसलेला विद्याविषयक कर्मचारी- वर्गाचा व सहायक कुलसचिव यांच्यापेक्षा निम्न दर्जाचे अधिकारी व तत्सम दर्जाची पदे धारण करणारे इतर अधिकारी यांचा, नियुक्त्ती व शिस्तभंगविषयक प्राधिकारी असेल. कुलसचिवाच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्त्तीस, असा निर्णय कळवल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, कुलगुरूकडे अपील दाखल करता येईल ;
(ग) विद्यापीठाचा अभिलेख, सामाईक शिक्का व व्यवस्थापन मंडळ त्याच्याकडे सुपूर्द करील अशी विद्यापीठाची इतर मालमत्ता यांचा, अभिरक्षक असेल ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ २१(घ) प्राधिकरणे, मंडळे किंवा समित्या यांच्याकडून वेळोवेळी मान्यता देण्यात येईल असे परिनियम व विनियम यांचे एक निदेशपुस्तक तयार करील व ते अद्ययावत ठेवील आणि प्राधिकरणांचे सर्व सदस्य व विद्यापीठाचे अधिकारी यांना ते उपलब्ध करून देईल ;
(ङ) प्रशासनात सुधारणा करण्यासंबंधातील तक्रारी व सूचना स्वीकारील आणि त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यासंबंधात विचार करील ;
(च) कुलगुरुकडून निदेश देण्यात येईल अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे निकाय यांच्याकडून विद्यापीठ, त्याच्या इमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालये, ज्ञान संसाधन केंद्र, वस्तुसंग्रहालये, कार्यशाळा व साधनसामग्री यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य देईल ;
(छ) विद्यापीठातील अध्यापकेतर कर्मचायांसाठी प्रशिक्षण व दिशानिदेशन कार्यक्रम आयोजित करील ;
(ज) विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निर्णयांच्या अधीन राहून, विद्यापीठाच्या वतीने करार करण्याचा, दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याचा व अभिलेख अधिप्रमाणित करण्याचा त्याला अधिकार असेल ;
(झ) विद्यापीठाच्या विकास उपक्रमांचा अहवाल, दर सहा महिन्यांनी व्यवस्थापन मंडळासमोर मांडील ;
(ञ) राज्य शासनास आणि इतर बा अभिकरणांस सादर करण्यासाठी विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांकडून, वित्त व लेखा अधिकायाकडून आणि इतर कोणत्याही अधिकायांकडून, विद्यापीठाच्या कोणत्याही प्रकरणासंबंधातील माहिती मागवण्याचा अधिकार असेल ;
(ट) या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये वेळोवेळी विहित केलेल्या किंवा कुलगुरूकडून त्यास नेमून देण्यात आलेल्या अशा इतर अधिकारांचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये पार पाडील.
१३. (१) प्रत्येक प्रशालेसाठी एक अधिष्ठाता असेल, तो, कुलगुरूकडून नामनिर्देशित करण्यात येईल.
(२) अधिष्ठाता म्हणून नामनिर्देशित करावयाची व्यक्ती, प्राध्यापकाच्या पदासाठी आवश्यक असलेली
अधिष्ठाता आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.
अर्हता व अनुभव धारण करील.
(३) प्रशालेचा अधिष्ठाता, पाच वषार्ंच्या कालावधीसाठी किंवा त्याचे नियत सेवावधी पूर्ण होईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत, पद धारण करील.
(४) अभ्यास प्रशालेचा अधिष्ठाता, अभ्यास प्रशालेचा प्रमुख असेल आणि तो, अभ्यास प्रशालेमधील अध्ययनक्रम व संशोधन चालविण्यासाठी व त्याचा दर्जा राखण्यासाठी जबाबदार असेल. तो, थेट कुलगुरुचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण याखाली काम करील.
(५) अधिष्ठाता हा,----
(क) प्रशालेतील अध्यापकांचे अध्यापन व संशोधन व त्यांचे प्रशिक्षण यांचा दर्जा राखण्यासह विद्याविषयक विकास, शैक्षणिक गुणवत्ता राखणे यासंबंधात, विद्यापरिषदेने मान्य केलेल्या अध्ययनक्रमांचे विद्याविषयक नियोजन व विद्याविषयक परिनिरीक्षण तसेच विद्याविषयक धोरणांची अंमलबजावणी करण्यास जबाबदार असेल ;
(ख) उच्च शिक्षणाच्या विविध विद्याविषयक व प्रशासकीय कार्यक्रमांचे गुणवत्ताविषय मापदंड किंवा परिमाणे यांचा विकास व त्यांचे उपयोजन याकरिता जबाबदार असेल ;
(ग) गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता हितावह असणारी अध्ययनार्थी-केंद्रित परिस्थिती निर्माण करणे सुलभ करील ;
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(घ) गुणवत्तेशी संबंधित असणाया संस्थात्मक प्रक्रियेवर विद्यार्थी, अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारीवर्ग, पालक व इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याकडून मिळणाया प्रतिसादाचा पाठपुरावा करण्याची व्यवस्था करील ;
(ङ) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने तपशील दिल्याप्रामणे अध्यापनाचा दर्जा राखण्याकरिता आवश्यक आहे त्याप्रमाणे उचित कार्यवाही सुरू आहे याची सुनिश्चिती करील ;
(च) विद्याथ्यार्ंद्वारे अध्यापकांचे मूल्यमापन होत आहे आणि त्याचा अहवाल संबंधित विद्यापीठ प्राधिकायांकडे पाठविला आहे याची सुनिश्चिती करील ;
(छ) शैक्षणिक परिसंस्थांमधील गुणवत्ता निर्धारण व मानांकन करण्याशी संबंधित असणाया विविध राष्ट्रीय स्तरावरील संस्थांकडून निश्चित करण्यात येतील अशा उच्च शिक्षणाच्या विविध गुणवत्ता विषयक मापदंडावरील माहितीचा प्रसार करण्याकरिता जबाबदार असेल ;
(ज) गुणवत्तेशी संबंधित विषयांवर आंतर--परिसंस्थात्मक व परिसंस्थाअंतर्गत कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करील व गुणात्मक गटांचे प्रचालन करील ;
(झ) चांगल्या प्रथांचा स्वीकार व प्रसार करणे यांसह गुणवत्तेशी संबंधित असलेल्या कार्यक्रमांचे समन्वयन करणे, संस्थात्मक गुणवत्ता कायम राखणे व गुणवत्तेत वाढ करणे, या प्रयोजनार्थ व्यवस्थापन माहिती यंत्रणेमार्फत संस्थात्मक आधारसामग्रीचा विकास व परिरक्षण करील ;
(ञ) उच्च शिक्षणामधील गुणवत्तापूर्ण संस्कृतीच्या विकासासाठी जबाबदार असेल ;
(ट) संबंधित गुणवत्ता हमी मंडळांनी विहित नमुन्यात विकसित केलेले गुणवत्तेचे परिमाण किंवा निर्धारण निकष यांच्यावर आधारित त्याच्या विद्याशाखेमधील कार्यक्रमांचा वर्ाषिक गुणवत्ता हमी अहवाल तयार करील ;
(ठ) वर्ाषिक गुणवत्ता हमी अहवालाच्या आधारे उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता परिमाणांचा द्वि-वर्ाषिकी विकास करण्यासाठी आणि अविभाज्य युनिटांची श्रेणीव्यवस्था लावण्यासाठी जबाबदार असेल ;
(ड) राज्य गुणवत्ता हमी कक्षाशी अधिस्वीकृतीपूर्ण आणि अधिस्वीकृतीत्तर गुणवत्ता निर्धारण, शाश्वतता व वाढीचे प्रयत्न यासंबंधात विचारांची देवघेव करील ;
(ढ) अधिछात्रवृत्ती, प्रवासी अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्ती, छात्रवृत्ती, पदके व बक्षिसे देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे प्रस्तावांची शिफारस करील व ते देण्यासाठी विनियम करील ;
(ण) त्याच्या कार्यकक्षेतील अभ्यास प्रशालांच्या विद्याविषयक विकासाच्या सुनिश्चितीसाठी आणि प्रशालेच्या संबंधातील व्यवस्थापन मंडळाच्या, विद्यापरिषदेच्या, व्यवस्थापन परिषदेच्या आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असेल ;
(त) आदर्श उत्तरांसह प्रश्नसंग्रह तयार करण्यासाठी जबाबदार असेल त्या सतत अद्ययावत करण्यात येतील व त्यात वाढ करण्यात येईल ;
(थ) अभ्यास प्रशालेतील कोणत्याही विद्याविषयक अध्ययनक्रमांमध्ये केलेल्या कोणत्याही गैरव्यवहारांची, विद्यापरिषदेने निदेश दिल्यावर, विद्यापीठ विभागाद्वारे किंवा केंद्राद्वारे चौकशी करील आणि याबाबतच्या निष्कर्षाचा अहवाल, विद्यापरिषदेला सादर करील ;
(द) प्रशालेतील विद्याथ्यार्ंच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य देईल ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ २३(ध) विद्यापरिषदेकडे सादर करण्यासाठी, अभ्यास प्रशालेतील अधिछात्रवृया व इतर विशेषोपाध्या प्रदान करण्याचा प्रस्ताव तयार करील ;
(न) विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी किंवा मंडळांनी, राज्य शासनाने, केंेद्र सरकारने, केंेद्रीय शैक्षणिक आयोगांनी किंवा परिषदांनी, आयोगाने आणि अशा इतर कोणत्याही संस्थेने मागणी केलेले अहवाल तयार करील ;
(प) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विहित केलेल्या किंवा कुलगुरुने त्याला वेळोवेळी सोपविलेल्या अशा अन्य अधिकारांचा वापर करील आणि अशी इतर कर्तव्ये पार पाडील.
१४. (१) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, हा पूर्णकालिक वेतनी अधिकारी असेल आणि तो, थेट कुलगुरुच्या निदेशांखाली व नियंत्रणाखाली काम करील. तो, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे पर्यवेक्षण, निदेशन व नियंत्रण यांखाली आपली कार्ये पार पाडील, आणि परीक्षा व मूल्यमापन
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.
मंडळाने आखलेली धोरणे व दिलेले निदेश यांची अंमलबजावणी करण्याशी संबंधित असेल.
(२) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ याची, परिनियमांमध्ये विहित केल्याप्रमाणे, त्या प्रयोजनासाठी घटित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून विद्यापीठाच्या अध्यापक सदस्यांमधून कुलगुरूद्वारे नियुक्ती करण्यात येईल.
(३) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ याचा पदावधी, पाच वर्षे किंवा त्याचा नियत सेवावधी पूर्ण होईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल, तोपयर्ंत असेल :
परंतु, जर मृत्यु, राजीनामा या किंवा इतर कारणामुळे पद रिक्त झाले तर, कुलगुरू, नवीन संचालकाची नियुक्ती करण्यात येईपयर्ंत, स्थानापन्न संचालकाची नियुक्ती करील.
(४) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ हा,----
(क) विद्यापीठाच्या परीक्षा, चाचणी परीक्षा घेणे व मूल्यमापन करणे व त्यांचे निकाल जाहीर करणे याचा प्रमुख प्रभारी अधिकारी असेल ;
(ख) परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा सदस्य-सचिव असेल ;
(ग) परीक्षा व चाचणी परीक्षा घेणे, मूल्यमापन करणे व त्यांचे निकाल वेळेत जाहीर करणे यांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यासाठी जबाबदार असेल ;
(घ) परीक्षा व मूल्यमापन कक्षाशी विचारविनिमय करून, परीक्षा व मूल्यमापन योग्य व सुरळीतपणे पार पाडण्याची प्रक्रिया तयार करील आणि तिची अंमलबजावणी करील ;
(ङ) परीक्षा व मूल्यमापन मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर, परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ स्वरूपात तयार करील व ते जाहीर करील ;
(च) गैरप्रकारांच्या प्रसंगी किंवा जर परिस्थितीनुसार तशी गरज असेल तर, परीक्षा पुढे ढकलील अथवा अंशत: किंवा पूर्णत: रद्द करील, आणि गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्त्ती- विरूद्ध किंवा व्यक्त्तींच्या गटांविरुद्ध कुलगुरूच्या मान्यतेने, शिस्तभंगाची कारवाई करील किंवा कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही सुरू करील ;
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(छ) परीक्षांच्या व मूल्यमापनाच्या संबंधातील गैरप्रकारांबद्दल दोषी असल्याचे आढळून आलेले परीक्षांशी व मूल्यमापनाशी संबंधित असलेले उमेदवार, प्राश्निक, परीक्षक, नियामक किंवा अन्य कोणत्याही व्यक्त्ती यांच्यावर आवश्यक असेल तेव्हा, शिस्तभंगाची कारवाई करील ;
(ज) विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या विशिष्ट पाठयक्रमाच्या प्रत्येक परीक्षेचा व मूल्यमापनाचा निकाल, त्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि कोणत्याही परिस्थितीत, कलम ५५ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे निकाल जाहीर करील आणि विलंब झाल्यास, त्याबाबतची कारणे अधोरेखित करणारा एक सविस्तर अहवाल तयार करील ;
(झ) परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या सर्व विद्याविषयक व प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक ती सर्व उपाययोजना करील ;
(ञ) परीक्षा व मूल्यमापन प्रक्रियेसंबंधात विविध विद्यापीठ प्राधिकरणांनी घेतलेले निर्णय अंमलात आणील ;
(ट) पदवीपूर्व, पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवर आणि इतर अध्यापन अध्ययनक्रमांमध्ये पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीच्या संदर्भातील सर्व धोरणात्मक व कार्यात्मक निर्णय अंमलात आणील ;
(ठ) अध्यापकांना, बोधात्मक व ज्ञानात्मक मूल्यनिर्धारण, प्रश्नसंग्रह तयार करणे व त्यांचा वापर करणे, प्रश्नपत्रिका तयार करताना व परीक्षा, चाचण्या घेताना व मूल्यमापन करताना, तंत्रज्ञानाचा वापर करणे यांसारख्या मूल्यमापण प्रक्रियेमधील नवीन प्रवाहांची त्यांना ओळख करून देण्याच्या दृष्टीने, अध्यापकांसाठी संबंधित विषयांची कार्यशाळा आयोजित करील ;
(ड) परीक्षा घेण्याच्या व मूल्यमापन करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा अभिनव व परिणामक वापर करण्याची सुनिश्चिती करील ;
(ढ) परीक्षांमधील उमेदवारांच्या कामगिरीचे उचित मूल्यनिर्धारण करण्याची व्यवस्था करील आणि निकाल प्रक्रिया पार पाडील ;
(ण) सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे, आदेशांमध्ये विहित केलेल्या यंत्रणा व पद्धती यांमार्फत मूल्य निर्धारण केले जात असल्याबाबत सुनिश्चिती करील ;
(त) विद्यापीठामधील प्रत्येक अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी, विद्यापीठाच्या परीक्षांच्या बाबतीत व मूल्यमापन प्रक्रियेमध्ये आवश्यक ते सहाय्य व सेवा देत आहेत याची सुनिश्चिती करील ;
(थ) परीक्षा व मूल्यमापन मंडळाने त्याच्याकडे नेमून दिलेली इतर सर्व कर्तव्ये व कार्ये पार पाडील ;
(द) परीक्षा व मूल्यमापन मंडळाची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी आणि विद्यापीठाची उद्दिष्टे साध्य करण्याची सुनिश्चिती करण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांनी त्याच्याकडे नेमून दिलेली अन्य कामे हाती घेईल ;
(ध) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विहित करण्यात येतील किंवा कुलगुरूकडून त्याला वेळोवेळी, सोपविण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये पार पाडील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ २५१५. (१) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ हा, कुलगुरुच्या थेट अधीक्षणाखाली, निदेशनाखाली व नियंत्रणाखाली काम करील.
संचालक, विद्यार्थी विकास मंडळ व त्याचे अधिकार व कर्तव्ये.
(२) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ हा, पूर्णकालिक वेतनी अधिकारी असेल. त्याची, अध्यापनाचा कमीत कमी दहा वषार्ंचा अनुभव असणाया आणि अभ्यासक्रमेतर व विस्तार कार्यक्रमांच्या क्षेत्रामध्ये समाधानकारक कामगिरी पार पाडलेल्या अध्यापकांमधून, परिनियमांमध्ये विहित करण्यात येतील अशा प्रयोजनांसाठी घटित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरुंकडून नियुक्ती करण्यात येईल.
(३) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ याचा पदावधी, पाच वर्षे किंवा त्याचा नियत सेवावधी पूर्ण होईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल, तोपयर्ंत असेल.
(४) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ हा,------
(क) विद्यापीठाच्या सांस्कृतिक, मनोरंजन व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमांना चालना देण्याचे काम करील ;
(ख) विद्याथ्यार्ंसाठी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करील ;
(ग) विद्यापीठामध्ये तरुण विद्याथ्यार्ंसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन कक्ष असल्याची खातरजमा करील ;
(घ) रॅगिंग प्रतिबंधक समित्या व पथके यांची रचना करील आणि विद्यापीठामध्ये रॅगिंग करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची खातरजमा करील ;
(ङ) विद्याथ्यार्ंच्या गाहाण्यांचे निवारण करील व त्यांच्या सर्वसाधारण कल्याणाची सुनिश्चिती करील ;
(च) विद्याथ्यार्ंचे सवार्ंगीण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मदत करील आणि त्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तयार करील ;
(छ) प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करील ;
(ज) युवकांच्या अभिरुचीला चालना देईल आणि ललित व प्रयोगनिष्ठ कला, विशुद्ध कला व साहित्यिक कौशल्ये वाढीस लागण्यासाठी युवकांची कौशल्ये विकसित करील ;
(झ) विद्याथ्यार्ंकरिता विविध क्षेत्रांमध्ये विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा, कौशल्य विकास कार्यशाळा आणि परस्परसंवाद कार्यक्रम आयोजित करील ;
(ञ) विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पधार्ंसाठी विद्याथ्यार्ंना प्रशिक्षण देईल ;
(ट) व्यवस्थापन मंडळापुढे सादर करावयाचा विद्यार्थी विकास मंडळाच्या उपक्रमांचा अहवाल तयार करील ;
(ठ) विद्यार्थी विकास मंडळाची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्राधिकरणांनी त्याला नेमून दिलेले अन्य कोणतेही काम हाती घेईल ;
(ड) राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमांना चालना देण्यासाठी, त्यात समन्वय साधण्यासाठी व ते आयोजित करण्यासाठी काम करील ;
(ढ) राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसाठी विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे, शिबिरे व स्पर्धा आयोजित करील ;
(ण) राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांशी संबंधित असणाया राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पधार्ंसाठी विद्याथ्यार्ंना प्रशिक्षण देईल ;
(त) राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टये पार पाडण्यासाठी राज्य राष्ट्रीय सेवा योजना समन्वयकाने त्याला नेमून दिलेले इतर कोणतेही काम हाती घेईल ;
भाग पाच-७२-४. एचबी-१७६४-4.
२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(थ) विविध क्रीडा प्रकारांत प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पधार्ंकरिता विद्याथ्यार्ंना प्रशिक्षण देईल, (द) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विहित करण्यात येतील अशा किंवा कुलगुरुकडून त्यास वेळोवेळी नेमून देण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करील आणि अशी इतर कर्तव्ये पार पाडील.
१६. (१) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र हा, विद्यापीठाचा पूर्णकालिक वेतनी अधिकारी असेल आणि तो, विद्यापीठामधील ज्ञान संसाधन केंद्राचा प्रभारी असेल. तो, थेट कुलगुरुच्या अधीक्षणाखाली, निदेशनाखाली व नियंत्रणाखाली काम करील.
संचालक, ज्ञान संसाधन केंद्र आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.
(२) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र यांची अर्हता, अनुभव आणि त्याच्या सेवेच्या अटी व शर्ती या, विद्यापीठ अनुदान आयोगाने, शिफारस केल्याप्रमाणे आणि राज्य शासनाने स्वीकृत केल्याप्रमाणे असतील.
(३) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र याची नियुक्ती, विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरुकडून करण्यात येईल.
(४) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र हा,----
(क) ज्ञान संसाधन केंद्र समितीचा सदस्य-सचिव असेल आणि ज्ञान संसाधन केंद्र समितीने घेतलेल्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी केली जात असल्याची सुनिश्चिती करील ;
(ख) मुद्रित, ध्वनिमुद्रित आणि डिजिटल स्वरूपातील सर्व पुस्तके, नियतकालिके, हस्तलिखिते, शोधपत्रिका (जर्नल) यांचा आणि ज्ञान संसाधन केंद्रातील सामग्रींचा परिरक्षक असेल ;
(ग) ज्ञान संसाधन केंद्रातील पुस्तके, नियतकालिके, हस्तलिखिते, शोधपत्रिका (जर्नल) आणि साधनसामग्री गहाळ होऊ नये किंवा तिचे नुकसान होऊ नये, आणि ज्ञान संसाधन केंद्रामध्ये कोणत्याही नियमबा गोष्टी घडू नयेत याची खातरजमा करण्यासाठी अशा प्रक्रिया व कार्यपद्धती विकसित करील व त्यांची अंमलबजावणी करील ;
(घ) साठयाच्या नियतकालिक पडताळणीची व्यवस्था करील, हानीबाबतची माहिती समाविष्ट असलेला योग्य अहवाल तयार करील आणि तो ज्ञान संसाधन केंद्र समितीपुढे ठेवील ;
(ङ) विद्यापीठ ज्ञान संसाधन केंद्राच्या विकासासाठी, आधुनिकीकरणासाठी, त्याची निगा राखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार असेल ;
(च) विद्यापीठाच्या ज्ञान संसाधन केंद्रातील संबंधित अधिकायाला सहाय्य करील आणि मार्गदर्शन करील ;
(छ) राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रंथपालांचे कौशल्य व ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करील ;
(ज) संसाधने, माहिती, संशोधन तंत्रे व आधारसामग्री यांच्या उपलब्धतेसंबंधी विद्यापीठाच्या विविध विभागांच्या विद्याथ्यार्ंमध्ये, माहिती साक्षरता कार्यक्रमामार्फत जागरूकता निर्माण करील ;
(झ) ज्ञान संसाधन केंद्राची उद्दिष्टे पार पाडण्याची सुनिश्चिती करण्याकरिता विद्यापीठ प्राधिकरणांनी त्यास नेमून दिलेली अन्य कोणतीही कामे हाती घेईल ;
(ञ) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विहित करण्यात येतील अशा किंवा कुलगुरुकडून त्याला वेळोवेळी सोपविण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करील आणि अशी अन्य कर्तव्ये पार पाडील.
१७. (१) वित्त व लेखा अधिकारी हा, विद्यापीठाचा प्रमुख वित्त, लेखा व लेखापरीक्षा अधिकारी असेल. तो, पूर्णकालिक वेतनी अधिकारी असेल आणि तो, थेट कुलगुरूच्या अधीक्षणाखाली, निदेशनाखाली व नियंत्रणाखाली काम करील.
वित्त व लेखा अधिकारी आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये.
(२) या अधिनियमान्वये, त्या प्रयोजनासाठी घटित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीवरुन, कुलगुरूकडून वित्त व लेखा अधिकायाची नियुक्ती करण्यात येईल तो, पाच वषार्ंपेक्षा कमी नसेल इतका व्यावसायिक अनुभव असलेला सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल असेल किंवा उप संचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकायाची प्रतिनियुक्तीद्वारे, नियुक्ती करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ २७(३) वित्त व लेखा अधिकायाची नियुक्ती, पाच वषार्ंच्या मुदतीसाठी किंवा त्याच्या नियत सेवावधीचे वय पूर्ण होईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल, तोपयर्ंत असेल.
(४) वित्त व लेखा अधिकारी,–
(क) विद्यापीठाच्या निधीवर सर्वसाधारण देखरेख ठेवील आणि विद्यापीठाच्या वित्तव्यवस्थेसंबंधात कुलगुरूला सल्ला देईल ;
(ख) विद्यापीठाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, कुलगुरुच्या मान्यतेने, निधी, मालमत्ता व गुंतवणुका तसेच विश्वस्तव्यवस्था व दान केलेली मालमत्ता धारण करील;
(ग) एखाद्या वर्षातील आवर्ती व अनावर्ती खर्च, विद्यापीठाने त्याकरिता निश्चित केलेल्या मर्यादांपेक्षा अधिक होत नाही आणि तसेच, वाटप करावयाच्या सर्व रकमा, ज्या प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या आहेत किंवा त्या रकमांचे नियतवाटप करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनांसाठी त्या खर्च केल्या जात असल्याची खात्री करील ;
(घ) रोख रक्कम व बँकेतील शिल्लक रकमा आणि गुंतवणुका यांच्या स्थितीवर लक्ष ठेवील ;
(ङ) महसूल वसुलीच्या कार्यपद्धतीवर व प्रगतीवर लक्ष ठेऊन प्रभावी महसूल व्यवस्थापन केले जात असल्याची सुनिश्चिती करील, आणि त्यासंबंधात अनुसरावयाच्या पद्धतींबाबत कुलगुरूला सल्ला देईल;
(च) खंड (क) ते (ङ) खालील कर्तव्ये, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ लेखा संहितेनुसार पार पाडील ;
(छ) विद्यापीठाच्या लेख्यांची नियमितपणे लेखापरीक्षा करून घेईल ;
(ज) इमारती, जमीन, साधनसामग्री, यंत्रसामग्री व इतर मत्ता यांच्या नोंदवह्य अद्ययावत ठेवल्या जात आहेत आणि विद्यापीठाची सर्व कार्यालये, कार्यशाळा व भांडारे यांमधील या मत्तांची आणि इतर उपभोग्य साहित्याची नियमितपणे प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे आणि त्यांचा मेळ बसविला जात आहे, यांची खात्री करील ;
(झ) सहायक कुलसचिवाच्या किंवा त्याच्या समकक्ष आणि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या, विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याविषयक सदस्याकडून किंवा दीर्घ सुटी नसलेल्या विद्याविषयक कर्मचायाकडून किंवा अधिकायाकडून अनधिकृत खर्च किंवा इतर वित्तीय अनियमितता याबद्दल स्पष्टीकरण मागण्यात यावे, असे कुलगुरूला प्रस्तावित करील ;
(ञ) सहायक कुलसचिवाच्या किंवा त्याच्या समकक्ष दर्जापेक्षा कमी दर्जा असलेला विद्यापीठाचा अध्यापक, दीर्घ सुटी नसलेला विद्याविषयक कर्मचारी व अधिकारी यांव्यतिरिक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अध्यापकेतर सदस्याकडून, कोणत्याही विशिष्ट प्रकरणातील अनधिकृत खर्च किंवा अनियमितता यांबद्दल स्पष्टीकरण मागण्यात यावे, असे कुलसचिवाला प्रस्तावित करील आणि कसूरदार व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करील ;
(ट) आपल्या वित्तीय जबाबदाया योग्य रीतीने पार पाडण्यासाठी कोणतेही कार्यालय, केंद्र, प्रयोगशाळा किंवा विद्यापीठाचा विभाग यांच्याकडून त्यास आवश्यक वाटेल अशी कोणतीही माहिती आणि विवरणे मागवील;
(ठ) वित्त व लेखा समितीच्या बैठकींची कार्यवृत्ते ठेवील ;
(ड) वित्त व लेखा समितीला आणि व्यवस्थापन मंडळाला वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रके (अर्थसंकल्प), लेख्यांचे विवरणपत्र आणि लेखापरीक्षा अहवाल सादर करून, उपर्ाजित तवावर दुहेरी नोंद लेखांकन प्रणालीस अनुसरून लेखे तयार करण्यास आणि ते ठेवण्यास जबाबदार असेल ;
(ढ) विद्यापीठाची विविध प्राधिकरणे किंवा मंडळे, राज्य शासन, केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच विद्यापीठाला निधी पुरविणारी अशी कोणतीही संस्था यांनी मागणी केलेले वित्तीय अहवाल तयार करील ;
(ण) या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विहित करण्यात येतील अशा किंवा कुलगुरूकडून वेळोवेळी त्यास नेमून देण्यात येतील अशा अन्य अधिकारांचा वापर करील आणि अशी अन्य कर्तव्ये पार पाडील.
२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५१८६० चा ४५.
१८. विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे, समित्यांचे किंवा मंडळांचे, सर्व वेतनी अधिकारी, सदस्य, अध्यापक आणि इतर कर्मचारी हे, भारतीय दंड संहितेच्या कलम २१ च्या अथार्ंतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येतील.
प्राधिकरणांचे, समित्यांचे व मंडळांचे अधिकारी व सदस्य आणि विद्यापीठाचे कर्मचारी लोकसेवक असणे.
१९. सावधी पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती, अशा नियुक्तीपूर्वी तिने धारण केलेल्या कायम पदावरील धारणाधिकार, कोणताही असल्यास, धारण करील आणि अशी व्यक्ती, त्या पदाच्या सेवेच्या अटी व शर्तीनुसार तिच्या मूळ पदावरुन सेवानिवृत्त होईल.
सावधी पदावर नियुक्ती केलेल्या इतर अधिकायांचा धारणाधिकार व त्यांची सेवानिवृत्ती.
स्पष्टीकरण.--- या कलमाच्या प्रयोजनार्थ, "सावधी पद'' याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीस, या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे जे पद मर्यादित कालावधीपेक्षा अधिक कालावधीसाठी धारण करता येत नाही असे पद, असा आहे.
प्रकरण चार
विद्यापीठाची प्राधिकरणे.
२०. विद्यापीठाची प्राधिकरणे पुढीलप्रमाणे असतील :---
विद्यापीठाची प्राधिकरणे.
(१) व्यवस्थापन मंडळ ; (२) विद्यापरिषद ; (३) नियोजन व विकास मंडळ ; (४) अभ्यास पाठयक्रम मंडळ ; (५) परीक्षा व मूल्यमापन मंडळ ; (६) संशोधन, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ ; (७) विद्यार्थी विकास मंडळ ; (८) विद्यापीठाची प्राधिकरणे म्हणून परिनियमांद्वारे पद निर्देशित केली असतील अशी विद्यापीठाची व्यवस्थापन मंडळ.
इतर मंडळे. २१. (१) व्यवस्थापन मंडळ हे, विद्यापीठाचे धोरण तयार करणारे व कार्यकारी प्रमुख प्राधिकरण असेल आणि ते, विद्यापीठाचा कारभार पाहण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्राधिकरणास विशेषरीत्या नेमून देण्यात आली नसतील अशी कर्तव्ये पार पाडण्यासाठी जबाबदार असेल.
(२) व्यवस्थापन मंडळाच्या, एका वर्षात चारपेक्षा कमी नसतील इतक्या बैठका होतील. (३) बैठकीतील गणपूर्तीसह बैठकीत अनुसरावयाची कामकाज चालविण्याची कार्यपद्धती आणि बैठकीच्या संबंधात आवश्यक असतील अशा इतर बाबी, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.
(४) व्यवस्थापन मंडळात, पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरू, अध्यक्ष ; (ख) कुलपतीने नामनिर्देशित करावयाच्या शिक्षण क्षेत्रातील दोन विख्यात व्यक्ती, त्यांपैकी एक मराठी भाषा व साहित्य या क्षेत्रात लक्षणीय योगदान असणारी व्यक्ती असेल ;
(ग) कुलगुरूने अडीच वषार्ंच्या कालावधीसाठी आळीपाळीने नामनिर्देशित करावयाचे दोन अधिष्ठाते ; (घ) सचिव, उच्च व तंत्रशिक्षण किंवा उप सचिव, उच्च शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली त्याची नामनिर्देशित व्यक्ती ;
(ङ) संचालक, उच्च शिक्षण किंवा सहसंचालक, उच्च शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली त्याची नामनिर्देशित व्यक्ती ;
(च) कुलसचिव, सदस्य-सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ २९२२. व्यवस्थापन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये पुढील प्रमाणे असतील :----
व्यवस्थापन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये.
(१) राष्ट्रीय व जागतिक स्तरावर घडून येत असलेल्या विद्याविषयक, संशोधन व विकास कार्यक्रम, वित्त व्यवस्था, व्यवस्थापन व नियमन यांमधील अल्प व दीर्घकालीन सुधारणा विद्यापीठामध्ये रूजविण्याच्या दृष्टीने, त्यांचा आढावा घेणे व त्यांवर विचारविनिमय करणे ;
(२) विद्यापीठाच्या सर्व प्रांतांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यरत यंत्रणेचा अभ्यास करणे व त्या संबंधात निर्णय घेणे ;
(३) ज्यायोगे विद्यापीठाला विशेषीकृत अभ्यास व पाठयक्रम हाती घेणे शक्य होईल अशा तरतुदी करणे, आणि जेथे आवश्यक किंवा इष्ट असेल तेथे, अध्यापनासाठी व संशोधनासाठी सामाईक प्रयोगशाळा, ग्रंथालये, संग्रहालये व साधनसामग्री यांचे आयोजन करणे व त्याबाबत तरतूद करणे ;
(४) विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून, संशोधन व विशेषीकृत अभ्यासासाठी, प्रशाला, विभाग, केंद्रे, कक्ष स्थापन करणे ;
२०१३ चा १८.
(५) अध्यापकांना व विद्याथ्यार्ंना संशोधनाला व नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ याच्या कलम ८ अन्वये, कंपन्या स्थापन करण्यासाठी अर्ज करण्यास परवानगी देणे ;
(६) परिनियम, आदेश व विनियम तयार करणे, त्यांत सुधारणा करणे किंवा त्यांचे निरसन करणे ;
(७) विद्यापीठाची मत्ता व मालमत्ता यांचे नियंत्रण करणे व तिच्या प्रशासनाची व्यवस्था करणे ;
(८) वित्त व लेखा समितीकडून प्राप्त होतील असे फेरबदल, कोणतेही असल्यास, वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रके किंवा अर्थसंकल्प, म्हणजेच, राज्य शासनाकडून प्राप्त होईल असा निधी, विद्यापीठ निधी आणि निधी पुरवठा करणारी अन्य अभिकरणे यांच्याकडून स्वतंत्रपणे प्राप्त होईल असा निधी यांवर, चर्चा करणे आणि त्यांस मान्यता देणे ;
(९) विद्यापीठाच्या वतीने सामंजस्य करार किंवा करारनामे करण्याच्या, त्यात सुधारणा करण्याच्या, ते अंमलात आणण्याच्या व ते रद्द करण्याच्या प्रस्तावांचा विचार करणे ;
(१०) विद्यापीठाच्या सामाईक मोहोरेचा नमुना ठरविणे आणि त्याच्या वापराची तरतूद करणे ;
(११) विद्यापीठाकडे केलेले कोणतेही विश्वस्तनिधी, मृत्युपत्रित दान, देणग्या यांचे हस्तांतरण आणि कोणत्याही जंगम, स्थावर मालमत्तेचे आणि बौद्धिक संपदेचे हस्तांतरण विद्यापीठाच्या वतीने स्वीकारणे ;
(१२) विद्यापीठ परिसर, केंद्रे व उप-केंद्रे यांकरिता राखीव निधीतून जमीन, इमारत व अन्य पायाभूत सोयीसुविधा यांच्या स्वरूपात स्थावर मालमत्ता निर्माण करणे ;
(१३) वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशींनुसार, विद्यापीठाच्या वतीने, कर्ज घेणे, कर्ज देणे किंवा निधी गुंतविणे ;
(१४) विशिष्ट प्रयोजनांसाठी विद्यापीठाकडे असलेल्या निधीचा वापर करण्याबाबतचे धोरण ठरविणे ;
(१५) विद्यापीठाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या इमारती, जागा, र्फनिचर, साधनसामग्री व इतर संसाधने यांची तरतूद करणे ;
(१६) विद्यापरिषदेने शिफारस केल्याप्रमाणे मानद पदव्या व विद्याविषयक विशेषोपाध्या प्रदान करण्यास मान्यता देणेे ;
(१७) विद्यापरिषदेने शिफारस केल्याप्रमाणे अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक विशेषोपाध्या सुरू करणे व प्रदान करणे आणि आदेशाद्वारे तरतूद केल्यानुसार त्यांचे प्रदान करण्याकरिता दीक्षांत समारंभाची व्यवस्था करणे ;
३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(१८) अधिछात्रवृया, प्रवासी अधिछात्रवृया, शिष्यवृया, छात्रवृया, प्रदर्शने, पारितोषिके, पदके व बक्षिसे सुरू करणे व ते प्रदान करण्याचे विनियम विहित करणे ;
(१९) विद्यापरिषदेने शिफारस केलेल्या परस्पर लाभदायी विद्याविषयक कार्यक्रमांसाठी इतर विद्यापीठे, परिसंस्था व संघटना यांच्याशी सहयोग करण्याकरिता विनियम करणे ;
(२०) आवश्यक असेल तेव्हा व त्यानुसार, विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून, विद्यापीठ निधीमधून व निधी पुरवठा करणाया (राज्य शासन वगळून) अन्य अभिकरणांकडून मिळालेल्या निधीमधून विद्यापीठ अध्यापकांची व दीर्घ सुटी नसलेल्या विद्याविषयक कर्मचारीवर्गाची पदे निर्माण करणे आणि त्यांची अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी विहित करणे आणि परिनियमांद्वारे विहित केलेल्या निवड प्रक्रियेमार्फत विद्यापीठाने केलेली निवड व नियुक्त्या यांना मान्यता देणे ;
(२१) आवश्यक असेल तेव्हा व त्यानुसार, विद्यापीठ निधीमधून व निधी पुरवठा करणाया (राज्य शासन वगळून) अन्य अभिकरणांकडून मिळालेल्या निधीमधून अधिकारी, अध्यापकेतर कुशल, प्रशासनिक, लिपिकवर्गीय व इतर पदे निर्माण करणे आणि त्यांची अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी विहित करणे आणि परिनियमांद्वारे विहित केलेल्या निवड प्रक्रियेमार्फत विद्यापीठाने केलेली निवड व नियुक्त्या यांना मान्यता देणे ;
(२२) प्राश्निक व परीक्षाविषयक इतर कर्मचारीवर्ग, विद्याशाखेचे अभ्यागत यांच्यासाठी मानधन, पारिश्रमिक, शुल्क आणि प्रवास व इतर भत्ते व विद्यापीठाला दिलेल्या इतर कोणत्याही सेवांसाठी शुल्क व इतर आकार विहित करणे ;
(२३) कुलसचिवांकडून दर सहा महिन्यांनी प्राप्त झालेल्या, विद्यापीठाच्या विकास कार्यक्रमांचा अहवाल स्वीकारणे व त्यावर विचार करणे ;
(२४) विद्यापरिषदेकडून प्राप्त झालेल्या विद्याविषयक अध्ययनक्रमांच्या प्रस्तावांचे निर्धारण करणे व त्यांना मान्यता देणे ;
(२५) राज्य शासनाचे निधी, विद्यापीठ निधी व इतर अभिकरणांकडून स्वतंत्रपणे मिळालेले निधी यांचे वर्ाषिक अहवाल, वर्ाषिक लेखे व लेखापरीक्षा अहवाल यांवर विचार करणे व त्यांना मान्यता देणे ;
(२६) परिनियम व आदेश काढण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्याचे निरसन करण्याचा अधिकार वगळता, आपल्या अधिकारांपैकी कोणतेही अधिकार कुलगुरुकडे किंवा त्यास योग्य वाटेल अशा विद्यापीठाच्या अधिकायाकडे किंवा प्राधिकरणाकडे किंवा त्याने नियुक्त केलेल्या समितीकडे सोपविणे ;
(२७) विद्यापीठ निधीमधून व निधी पुरवठा करणाया इतर अभिकरणाकडून मिळालेल्या निधीमधून निर्माण केलेल्या पदांच्या बाबतीतील, विद्यापीठातील अध्यापकेतर कर्मचायांची कार्ये, कर्तव्ये, अधिकार व जबाबदाया निश्चित करणे ;
(२८) शुल्क निश्चिती समितीने शिफारस केलेल्या विविध शुल्कांना मान्यता देणे ;
(२९) माजी विद्यार्थी, लोकहितैषी व्यक्ती, उद्योगसमूह आणि इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्याकडून देणग्या, बक्षिसे आणि इतर स्वरूपातील वित्तीय सहाय्य स्वीकारणे आणि अशा देणग्या, बक्षिसे, इत्यादी स्वीकारण्यासाठी विद्यापीठाने अनुसरावयाची कार्यपद्धती विहित करणे ;
(३०) विद्याथ्यार्ंची सनद तयार करणे व ती अंगीकारणे ;
(३१) विद्यापीठाच्या वर्ाषिक लेखापरीक्षेसाठी सांविधिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे ;
(३२) व्यवस्थापन मंडळाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांद्वारे, प्रत्येक विभागाचा किंवा केंद्राचा बा यंत्रणेद्वारे सखोल अर्धवर्ाषिक आढावा घेणे. मंडळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अभिकरणांमधील दर्जाच्या निकालाचा देखील आढावा घेईल आणि सुधारात्मक कारवाईची, कोणतीही असल्यास, शिफारस करील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३१विद्यापरिषद.
२३. (१) विद्यापरिषद हीे, विद्यापीठाची विद्याविषयक प्रधान प्राधिकरण असेल आणि ती, विद्यापीठातील अध्यापन, संशोधन व मूल्यमापन यांचे नियमन करण्यास व त्यांचा दर्जा कायम राखण्यास जबाबदार असेल. ती, अध्यापन, संशोधन, विस्तार व विद्याविषयक बाबींमधील सहयोगी अध्ययनक्रम यांसंबंधातील दर्जा राखणे व सुधारणे आणि अध्यापकांच्या कार्यभाराचे मूल्यमापन करणे यासंबंधातील विद्याविषयक धोरणे निर्धारित करण्यास देखील जबाबदार असेल.
(२) विद्यापरिषद, एका वर्षामध्ये चारपेक्षा कमी नसतील इतक्या बैठका घेईल.
(३) विद्यापरिषदेत पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरु, अध्यक्ष ;
(ख) प्रशालांचे सर्व अधिष्ठाते ;
(ग) उप-केंद्रांचे सर्व प्रमुख ;
(घ) विद्यापीठामधील विद्यापीठ विभागांचे सर्व प्रमुख व विद्यापीठ केंद्रांचे संचालक ;
(ङ) कुलगुरूने, नामनिर्देशित करावयाचे, अभ्यास मंडळाचे सदस्य नाहीत असे सहा अध्यापक, त्यापैकी दोन प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक व दोन सहायक प्राध्यापक असतील :
परंतु, नामनिर्देशित करावयाच्या सहा अध्यापकांपैकी, एक महिला अध्यापक असेल आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांमधील एक अध्यापक आळीपाळीने, नामनिर्देशित करण्यात येईल.
(च) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचे मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे संवर्धन करण्यामध्ये लक्षणीय योगदान असणारे तीनपेक्षा कमी नसतील इतके विख्यात तज्ञ ;
(छ) संचालक, उच्च शिक्षण, किंवा सह संचालक, उच्च शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली त्याची नामनिर्देशित व्यक्ती ;
(ज) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ ;
(झ) संचालक, संशोधन व नवोपक्रम मंडळ;
(ञ) कुलसचिव, सदस्य--सचिव.
२४. (१) विद्यापरिषदेस पुढील अधिकार व कर्तव्ये असतील :---
विद्यापरिषेदेचे अधिकार व कर्तव्ये.
(क) विद्यापीठ हे, संशोधन व विकास यांस चालना देणारे, उद्योगांशी परस्परसंबंध व साहचर्य राखणारे, बौद्धिक संपदा हक्क व उपक्रमशीलता यांची जोपासना करणारे आणि ज्ञानसंलग्नित उद्योगांचे नवसंशोधन करणारे एक गतिमान मध्यवर्ती केंद्र होईल याची सुनिश्चिती करणे ;
(ख) प्रशालेकडून तिच्याकडे विचारार्थ पाठविलेल्या, बाबींवर विचार करणे आणि फेरबदलांसह, कोणतेही असल्यास, त्यास मान्यता देणे ;
(ग) सर्व प्रमाणपत्रे, पदविका, पदव्या, पदव्युत्तर अध्ययनक्रम व इतर विद्याविषयक विशेषोपाध्या यांसाठी पसंतीवर आधारित श्रेयांकपद्धती असल्याबाबत सुनिश्चिती करणे ;
(घ) विद्यापीठाच्या सर्व प्रशाला व विभाग यांमध्ये संशोधनाची व उपक्रमशीलतेची भावना रूजविली जात आहे याची सुनिश्चिती करणे ;
(ङ) शुल्क निश्चिती समितीमार्फत, प्रशालेच्या अधिष्ठात्याने, शिफारस केलेले शुल्क, इतर शुल्क व आकार यांची व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणे ;
(च) पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे आणि इतर विद्याविषयक विशेषोपाध्या सुरू करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणे ;
३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(छ) विद्याविषयक बाबींशी संबंधित असणाया आदेशांचा मसुदा व्यवस्थापन मंडळाकडे प्रस्तावित करणे ;
(ज) विद्याविषयक बाबींच्या संबंधातील आदेश व विनियम करणे, त्यात सुधारणा करणे व त्यांचे निरसन करणे ;
(झ) प्राश्निक, परीक्षक, नियामक आणि परीक्षा घेण्याच्या व मूल्यमापन करण्याच्या कामाशी संबंधित असणाया इतर व्यक्ती यांच्या नियुक्तीसाठी अर्हता व प्रमाणके विहित करणे ;
(ञ) विद्यापीठ निधीमधून व निधी पुरवठा करणाया इतर अभिकरणांकडून (राज्य शासन वगळून) मिळालेल्या निधीमधून विद्यापीठास आवश्यक असलेल्या विद्यापीठ अध्यापकांची व दीर्घ सुटी नसलेल्या विद्याविषयक कर्मचारीवर्गाची पदे निर्माण करण्याबाबत विचार करणे व त्याबाबत व्यवस्थापन मंडळाला शिफारस करणे आणि त्यांची अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी विहित करणे ;
(ट) विद्यापरिषदेने तयार केलेल्या सर्वसमावेशक यथार्थदर्शक आराखडयाची व्यवस्थापन मंडळाला शिफारस करणे ;
(ठ) त्यांच्याकडे विचारार्थ पाठवलेले नवीन पाठयक्रम, आंतर-ज्ञानशाखीय पाठयक्रम व अल्पमुदती प्रशिक्षण कार्यक्रम यांना मान्यता देणे ;
(ड) संबंधित प्रशालेने शिफारस केलेले पाठयक्रम, क्रमिक अभ्यासक्रम, प्राश्निक, परीक्षक व नियामक आणि विविध पाठयक्रमांच्या मूल्यमापन योजना यांना मान्यता देणे ;
(ढ) प्रमुख व (बहुविध) गौण पदवी अभ्यासक्रमांना मान्यता देणे ;
(ण) सर्व विद्याविषयक बाबींच्या संबंधात विद्यापीठाला सल्ला देणे आणि विद्याविषयक अध्ययनक्रमांबाबत व्यवस्थापन मंडळाला सुसाध्यता अहवाल सादर करणे ;
(त) सर्व विद्याविषयक अध्ययनक्रमांकरिता पसंती-आधारित श्रेयांक पद्धतीसाठी धोरण, कार्यपद्धती व कार्यप्रथा निर्माण करणे ;
(थ) देशातील विविध विद्यापीठांमधील विद्याथ्यार्ंच्या गतिशीलतेबाबतचे धोरण तयार करणे, आणि विद्यापीठातील किंवा अन्य विद्यापीठांतील, विविध विभाग, प्रशाला, केंद्रे यांमधून विविध पाठयक्रम घटक निवडण्यास व त्याचे अध्ययन करण्यास लवचिकता देण्याबाबतचे धोरण देखील निर्धारित करणे ;
(द) पदवी शिक्षण व इतर विद्याविषयक अध्ययनक्रम पूर्ण करण्यासाठी किमान व कमाल कालावधी असलेल्या शिक्षणाबाबतचा व " अनुकूल अध्ययनगती " बाबतचा अधिक लवचिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्यपद्धती, धोरणे व कार्यप्रथा याबाबत तपशीलवार योजना तयार करणे ;
(ध) एखादे पदवी शिक्षण व इतर विद्याविषयक अध्ययनक्रम पूर्ण करण्यासाठी किमान व कमाल कालावधी असलेल्या शिक्षणाबाबतचा व " अनुकूल अध्ययनगती " बाबतचा अधिकाधिक लवचिक दृष्टिकोन रुजविणे ;
(न) संशोधन प्रकल्प हे, पदव्युत्तर अध्ययनक्रमांच्या पसंतीआधारित प्रतिमानाचा एक अविभाज्य भाग असल्याची सुनिश्चिती करणे ;
(प) विद्यमान शैक्षणिक वर्ष संपण्याच्या तीन महिने अगोदर, नियामक प्राधिकरणांच्या मार्गदर्शक तवांनुसार, पुढील शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३३(फ) प्रशाला, विभाग, केंद्रे स्थापन करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणे ;
(ब) हा अधिनियम, परिनियम, आदेश व विनियम यांद्वारे किंवा त्यान्वये प्रदान करण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे किंवा सोपविण्यात येतील अशी कर्तव्ये पार पाडणे.
(२) विद्यापरिषद, वित्तीय भारांचा अंतर्भाव असणाया सर्व बाबी किंवा निर्णय, मान्यतेसाठी वित्त व लेखा समितीमार्फत व्यवस्थापन मंडळाकडे विचारार्थ पाठवील.
नियोजन व विकास मंडळ.
२५. (१) नियोजन व विकास मंडळ ही विद्यापीठाची प्रमुख नियोजन संस्था असेल, आणि ते, विद्यापीठाच्या उद्दिष्टांनुसार विद्यापीठाच्या विकासाचे संनियंत्रण करण्यासाठी जबाबदार असेल. ते, विद्यापीठाच्या भौतिक आणि विद्याविषयक अशा दोन्ही विकासाचे नियोजन करण्यासाठी आणि एक व्यापक दृष्िटकोन व धोरणात्मक आराखडा पुरविणाया अध्यापक व अध्यापकेतर संसाधनांचे संनियंत्रण करण्यासाठी जबाबदार असेल, आणि ते, विद्यापीठाच्या विभागांचे व केंद्रांचे विद्याविषयक परिनिरीक्षण करील.
(२) नियोजन व विकास मंडळात, पुढील सदस्यांचा समावेश असेल :----
(क) कुलगुरू- अध्यक्ष ;
(ख) डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा कुलगुरू ;
(ग) भारतातील कोणत्याही भाषा विद्यापीठाचा कुलगुरू ;
(घ) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा अध्यक्ष ;
(ङ) विश्वकोश र्िनमिती मंडळाचा अध्यक्ष ;
(च) महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष ;
(छ) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाची, प्रगत संगणक विकास केंद्र (सी-डॅक) किंवा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय आय टी) मधील संगणकीय भाषाशास्त्र या क्षेत्रात सक्रियपणे काम करणारी एक व्यक्ती ;
(ज) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा, इतिहास संशोधन, आंतरविद्याशाखीय अभ्यास, सामाजिक भाषाशास्त्र, इत्यादी क्षेत्रातील एक विख्यात तज्ञ ;
(झ) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचे मराठी भाषा व साहित्य यांची अभिवृध्दी व विकास यांमध्ये भरीव योगदान असलेले दोन प्रख्यात तज्ज्ञ ;
(ञ) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा, महाराष्ट्राचा अभ्यास आणि प्रयोगनिष्ठ कला, इत्यादी क्षेत्रांतील एक प्रख्यात तज्ज्ञ ;
(ट) प्रशालांचे अधिष्ठाता ;
(ठ) संचालक, उच्च शिक्षण किंवा सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला त्याचा प्रतिनिधी ;
(ड) उप केंद्रांचे प्रमुख ;
(ढ) व्यवस्थापन मंडळाने त्याच्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला एक सदस्य ;
(ण) विद्यापरिषदेने तिच्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला एक सदस्य ;
(त) कुलसचिव, सदस्य--सचिव.
(३) नियोजन व विकास मंडळ, त्यास इष्ट वाटेल अशा कालांतराने बैठक घेईल, परंतु, ते, एका वर्षातून किमान तीनदा बैठका घेईल.
भाग पाच-७२-५. एचबी-१७६४-5.
३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५२६. नियोजन व विकास मंडळ पुढील अधिकारांचा वापर करील आणि पुढील कर्तव्ये पार पाडील :----
(१) विद्यापीठाच्या उद्दिष्टांचा विचार करून शिक्षणातील व्यापक विकास अध्ययनक्रमांची व्यवस्थापन नियोजन व विकास मंडळाचे अधिकार व कर्तव्ये.
मंडळाला शिफारस करणे ;
(२) विद्यापीठातील अध्ययन, शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण व परीक्षा यांमधील दर्जा राखण्याबाबत पुर्नविलोकन करणे ;
(३) विद्यापीठांची शैक्षणिक कामगिरी व गरजा यांचे मूल्यनिर्धारण करण्याच्या दृष्टीने, विद्यापीठाच्या विभागांचे व केंद्रांचे निरीक्षण करण्याची व्यवस्था करणे ;
(४) विद्यापीठाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक वाटेल अशा कोणत्याही बाबीवर व्यवस्थापन मंडळास आणि विद्यापरिषदेला सल्ला देणे ;
(५) अधिनियमात निर्धारित केलेली विद्यापीठाची उद्दिष्टे विचारात घेऊन आणि राज्य व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा योग्य विचार करून, अल्प मुदतीचे व दीर्घ मुदतीचे, अशा दोन्ही प्रकारचे, विद्यापीठ यथार्थदर्शी विकास आराखडे तयार करणे आणि ते, मान्यतेसाठी व्यवस्थापन मंडळाला सादर करणे ;
(६) विद्यापीठाचे विभाग व केंद्रे यांच्या विकास व सहयोगी अध्ययनक्रमांची व्यवस्थापन मंडळाला, शिफारस करणे ;
(७) मान्य केलेल्या अशा सर्व विकास व सहयोगी अध्ययनक्रमांचे संनियंत्रण करणे आण ित्यांच्या प्रगतीचा अहवाल व्यवस्थापन मंडळाला पाठविणे ;
(८) विकास प्रकल्पांच्या बाबतीत विद्यापीठ विभागांनी व केंद्रानी केलेल्या अनुदानाच्या वापराचे मूल्यमापन व मूल्यनिर्धारण करणे आणि त्याचा अहवाल विद्यापरिषदेला पाठवणे ;
(९) वाणिज्य, उद्योग, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींच्या मुनष्यबळाच्या गरजांचे मूल्यनिर्धारण करणे आणि संबंधित अभ्यासपाठयक्रम सुरू करण्यासाठी आणि त्याचे सक्षमीकरण करण्यासाठी विद्यापरिषदेला आवश्यक शिफारशी करणे ;
(१०) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या किंवा राष्ट्रीय मूल्यनिर्धारण व अधिस्वीकृती परिषदेच्या मार्गदर्शक तवांनुसार, विद्यापीठाच्या विकास व सहयोगी अध्ययनक्रमांचे, तीन वषार्ंतून किमान एकदा किंवा आवश्यक वाटल्यास, त्यापूर्वी, शैक्षणिक परिनिरीक्षण करणे आणि ते अंमलात आणण्यासाठी विद्यापीठाला आवश्यक शिफारशी करणे ;
(११) शिक्षणाचे व संवादाचे माध्यम म्हणून मराठीला प्रोत्साहन देणे ;
(१२) पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्याथ्यार्ंसाठी अभ्यास साहित्य म्हणून मुद्रित व इलेक्ट्रॉनिक स्वरुपात पाठयपुस्तके तयार करणे ;
(१३) विद्याथ्यार्ंसाठी शैक्षणिक अभिजात साहित्य कृतींचा, विशेषत:, इंग्रजीमधून व इतर आधुनिक भाषांमधून मराठीमध्ये मुद्रित व इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अनुवाद करणे ;
(१४) समोद्देशी संघ म्हणून इतर विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या सहयोगाने विविध विषयांतील इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करणेे ;
(१५) मराठी भाषा व मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३५(१६) इतर भाषांशी निगडीत असलेल्या सांस्कृतिक व भाषिक संबंधात मराठीमध्ये प्रगत संशोधन करणे, आंतर-सांस्कृतिक संबंध विचारात घेऊन, इतर भाषांमधील साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद करणे ;
(१७) मराठीमध्ये वैचारिक, समीक्षणात्मक, सर्जनशील व सैद्धांतिक विचारांना प्रोत्साहन देणे ;
(१८) मराठीमध्ये व्यावसायिक व उपयोजित स्वरूपाचे पाठयक्रम तयार करणे आणि ते उपलब्ध करूण देणे ;
(१९) विविध प्रदेशांतील मराठी भाषेच्या विभिन्नतेचे संशोधन करणे ;
(२०) मराठीमध्ये अहवाल, प्रबंधिका, पुस्तके, संशोधन खंड प्रसिद्ध करण्याची सुविधा करणे ;
(२१) हा अधिनियम, परिनियम, अध्यादेश व विनियम यांद्वारे किंवा त्याअन्वये प्रदान करण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे आणि सोपविण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.
२७. विद्यापीठाच्या अभ्यास प्रशाला पुढीलप्रमाणे असतील :----
अभ्यास प्रशाला.
(१) भाषाशास्त्र व भाषा अभियांत्रिकी प्रशाला :---- या प्रशालेत, पुढील विद्यापीठ विभाग व केंद्रे यांचा समावेश असेल :----
(एक) भाषा व लिपीशास्त्र विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) भाषेचे तत्वज्ञान, भाषा नियोजन, भाषा कुलाची संकल्पना;
(ख) ऐतिहासिक, वर्णनात्मक व तौलनिक भाषाशास्त्र;
(ग) लिपीशास्त्र व मराठी भाषेतील विविध लिपींचा, म्हणजेच, मोडी, महानुभाव, ब्रेल, सांकेतिक भाषा (अर्गोट), इत्यादींचा अभ्यास ;
(घ) शिलालेख, ताम्रपट, नाणी, ऐतिहासिक कागदपत्रे, जुनी हस्तलिखिते यांवरील चिन्हांचा, कोरीव लेखांच्या संकेतांचा किंवा शिला वर्णनाचा व लिपींचा अभ्यास करणे आणि मराठीमध्ये सचित्र व वर्णनात्मक शब्दकोशांची र्िनमिती करणे ;
(ङ) मराठी साहित्यातील मिथकांचा अभ्यास.
(दोन) भाषा अभियांत्रिकी व संगणकीय भाषाशास्त्र विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) माहिती निष्कर्षण व मजकुर मंथन;
(ख) संभाषणातील वाक्यबंधाचे रसप्रधान विश्लेषण;
(ग) यांत्रिक अनुवाद;
(घ) नैर्सगिक भाषेतील आंतरसंवाद;
(ड.) मराठीतील उच्चारानुसारी संगणक आज्ञावली (सॉफ्टवेअर), लेखन दुरुस्ती कळफलक;
(च) अवतरण बहुपद्धती वाचक, वाङमयचौर्य शोधक, सुगम वाचन क्षमता वाचक किंवा यंत्र यांचा विकास;
(छ) भाषा संपादन संगणक आज्ञावली (सॉफ्टवेअर), ऑनलाईन संभाषण संगणकीकृत आज्ञावली (चॅट बॉट), संदेश फलक, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) साधने, प्रतिमा वर्गीकरण, भाषण प्रतिलेखन संगणक आज्ञावली, इत्यादींसारख्या अध्यापन साधनांचा विकास;
(ज) संगणक भाषा, अभिरूप खेळ, इत्यादींचे अध्यापन;
(झ) अध्यापन व संशोधन कार्यक्रमांसाठी भाषा प्रयोगशाळेचा वापर.
३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(तीन) मानस-बोधात्मक व चेता-भाषाशास्त्र विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देेईल :----
(क) भाषण, वाचा उपचारपद्धती व उपचारात्मक भाषाशास्त्र यांचे आकलन;
(ख) कर्ायिक उच्चारणदोष व श्रवणलोप यांचा अभ्यास;
(ग) लवकर वाचण्याच्या क्षमता, शाळापूर्व साक्षरता, उच्चार शास्त्रविषयक जाणीव, सांकेतिक (अशाब्दिक) बुद्धिमत्ता, इत्यादींच्या चाचण्या.
(चार) समाज-भाषाविज्ञान व बोलीविज्ञान विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) समाज-भाषा विज्ञान सिद्धांत, भौगोलिक बोली विज्ञान, बोलींचे सर्वेक्षण, बोलींचा अभ्यास आणि व्याकरण व शब्दकोश तयार करणे ;
(ख) बोलींचे भाषाशास्त्रीय संपादन व जतन; सांकेतिक (अर्गोट) बोलींचा अभ्यास;
(ग) बोली, आदिवासी भाषा व प्रमाण मराठी यामधील अंतर कमी करणे.
(पाच) भाषा अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) भाषेतील अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन ; थेट पद्धती, व्याकरण अनुवाद, मौखिक क्षमता विकसित करणे, शब्दसंग्रह वाढविणे यासारख्या अध्ययन-अध्यापन पद्धती;
(ख) संप्रेषणात्मक भाषा अध्यापन, भाषा अध्यापनशास्त्र;
(ग) कार्याधिष्ठीत भाषा शिक्षण, इत्यादी.
(सहा) भारतीय व विदेशी भाषा आणि अनुवाद अभ्यास विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) भारतीय भाषांचे अध्यापन--आंतरभारती प्रकल्प (गुजराती, कन्नड, तेलगू, मल्याळी, बंगाली, सिंधी, पंजाबी, इत्यादी);
(ख) विदेशी भाषांचे अध्यापन--विश्व भारती प्रकल्प (इंग्रजी, फ्रेंच, जपानी, अरेबिक, इत्यादी);
(ग) अनुवाद अभ्यास (अनुवाद अभ्यास व दूभाषण सेवा अकादमी).
(सात) कोश-रचनाशास्त्र विभाग :---- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :----
(क) भारताच्या भाषा धोरणानुसार, प्रशासन, शिक्षण, न्यायालये, विधिमंडळ, जनसंवाद, इत्यादींमध्ये भाषांचा वापर;
(ख) विविध क्षेत्रांतील मराठी परिभाषेमधील शब्दकोशांचा विकास;
(ग) कोशरचनाशास्त्राचे अध्यापन व संशोधन अध्ययनक्रम, शब्दकोशाच्या घटकांचे व संरचनांचे सिद्धांत, विदा (डेटा) संघटन, इत्यादीे;
(घ) वीजकीय (इलेक्ट्रॉनिक) शब्दकोश, हायपरटेक्स्ट लेखन, इत्यादी तयार करणे.
(२) कला व साहित्य प्रशाला :---- या प्रशालेत, पुढील विद्यापीठ विभाग व केंद्रे यांचा समावेश असेल :----
(एक) ललित कला, प्रयोगनिष्ठ कला, उपयोजित कला व हस्तकला विभाग :--- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल:---
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३७(क) ललित कला, प्रयोगनिष्ठ कला, उपयोजित कला, सुलेखन;
(ख) भौतिक वस्तूंचे संकल्पन व सजावट, फॅशन डिझायनिंग, इत्यादी (सिरेमिक कला व शिल्पकला, र्फनिचर संकल्पन);
(ग) औद्योगिक संकल्पन, वास्तुशास्त्र, अंतर्गत संकल्पन, ग्राफिक संकल्पन;
(घ) संगीत, नृत्य, नाटक, इत्यादींमधील सादरीकरणासाठी "कलाभवन''.
(दोन) अभिजात भाषा व मध्ययुगीन मराठी वाङमय विभाग :-- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल:---
(क) संस्कृत, प्राकृत, पाली, फारसी, दखनी यांसारख्या अभिजात भाषांचा व साहित्याचा अभ्यास;
(ख) महानुभाव, वारकरी, जैन, सुफी, वीरशैव, बौद्ध, नाथ किंवा शाक्त पंथ, पंडित व बखर साहित्य, इत्यादींचे सामाजिक व साहित्यिक योगदान;
(ग) आधुनिक व समकालीन मराठी साहित्याचा अभ्यास, प्रभाव अभ्यास, साहित्यातील विविध प्रवाह व चळवळी.
(तीन) तवज्ञान, प्राचीन व पाश्चात्य सौंदर्यमीमांसा, शैलीशास्त्र व अर्थनिरूपणशास्त्र (हर्मेन्युटिक्स) विभाग :--- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान;
(ख) सौंदर्यमीमांसा व काव्यशास्त्र (प्राचीन व पाश्चात्य);
(ग) शैलीशास्त्र व व्यावहारिक समीक्षा;
(घ) मराठी काव्यशास्त्राचा व समीक्षेचा इतिहास;
(ङ) मराठीतील तात्विक विचारवंत व साहित्यिक समीक्षक.
(चार) मराठीतील सर्जनशील व व्यावसायिक लेखन विभाग :-- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) बालसाहित्य, कथा-कादंबरी लेखन, नाटक व सायबरपंक लेखन;
(ख) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे, २०२० याच्या विशेष संदर्भासह साहित्याच्या माध्यमातून मूल्य शिक्षण;
(ग) सर्जनशील लेखनातील परंपरा व आधुनिकता.
(३) महाराष्ट्रविद्या व समाजशास्त्र प्रशाला :---- या प्रशालेत, पुढील विद्यापीठ विभाग व केंद्रे यांचा समावेश असेल :----
(एक) महाराष्ट्रविद्या व सांस्कृतिक अभ्यास विभाग:--- हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) भारतविद्या व महाराष्ट्रविद्या संकल्पनात्मक संरचना व पद्धतीशास्त्र;
(ख) महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास (सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संस्था, जाती व्यवस्था, ग्रामीण-शहरी समाज, तात्विक विचारप्रणाली व परंपरा, नैर्सगिक संपत्ती व मानव संसाधन, वर्ग-संघर्ष, नैतिक व सौंदर्यात्मक मूल्ये, सामाजिक परिवर्तन, कला, साहित्य, विज्ञान, परंपरा, कृषी, उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक प्रशासन, मानवाधिकार, सामाजिक सुधारणा);
३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ग) प्रादेशिक व उप-सांस्कृतिक अभ्यास (लोककथा, लोक-संस्कृती, लोक साहित्य व कला, उपाश्रयीं (सबाल्टर्न) अभ्यास, अधोलोक (गुन्हेगारी जगतातील) संस्कृती, पारंपारिक लिंगभाव भूमिका, महिलांचे हक्क आणि स्त्रीवादी चळवळी);
(घ) मराठी समाजाचे समकालीन सामाजिक प्रवाह;
(ङ) सायबर-सांस्कृतिक बदल आणि त्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम.
(दोन) बृहन्महाराष्ट्र अभ्यास विभाग :---हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) मराठी प्रांतांचा इतिहास व संस्कृती (महाराष्ट्राबाहेरील तंजावर, बडोदा, ग्वाल्हेर, इत्यादी);
(ख) मराठी प्रांतांतील प्रशासकीय व सामाजिक सुधारणा;
(ग) मराठी प्रांतांतील कला, साहित्य, संस्कृती, भाषा व बोली.
(तीन) समाज विज्ञान विभाग :---हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) इतिहास, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र व समाजशास्त्र;
(ख) राज्यशास्त्र, लोक प्रशासन, कायदा;
(ग) अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र अभ्यास;
(घ) भूगोल, नैर्सगिक संसाधने व पर्यावरण.
(४) आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाला :--- या प्रशालेत, पुढील विद्यापीठ विभाग व केंद्रे याचा समावेश असेल :---
(एक) पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग:---हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) जनसंपर्क विज्ञान;
(ख) मुद्रित माध्यमे;
(ग) जनसंपर्क माध्यमे;
(घ) डिजिटल माध्यमे;
(ङ) तार किंवा ऑनलाइन पत्रकारिता;
(च) जाहिरात;
(छ) अॅनिमेशन;
(ज) सायबरपंक;
(झ) इलेक्ट्रॉनिक साधनांनी जोडलेल्या व्यक्तींचा समूह (इलेक्ट्रॉनिक नेबरहूड);
(ञ) प्रसार माध्यम समीक्षा, इत्यादी.
(दोन) वाणिज्य व व्यवस्थापन विभाग:---हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) व्यवसाय व विपणन, विमा, कर्जरोखे, भाग भांडवल आणि शेअर बाजार;
(ख) जाहिरात, चिन्हांकन (ब्रँडीग), स्वामित्वाधिकार व व्यावसायिक लेखन आकृतिबंध व पद्धती.
(तीन) ग्रंथालय व माहिती विज्ञान विभाग :---हा विभाग, पुढील विषय, शाखा व विद्याशाखा यांमधील शिक्षण, विस्तार, अध्यापन, अध्ययन व प्रशिक्षण देईल :---
(क) ग्रंथालय व माहिती विज्ञान;
(ख) माहितीचे संघटन, उपलब्धता, माहिती निष्कर्षण पद्धती, माहितीचे संकलन व नियमन, माहिती स्रोतांचा प्रसार;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३९(ग) दस्तऐवजीकरण शास्त्र;
(घ) ग्रंथालयाचा इतिहास व पुरातत्वशास्त्र;
(ङ) वर्गीकरण पध्दती व अभिलेख व्यवस्थापन;
(च) निर्देशांकन व संदर्भ सेवा.
२८. विद्यापीठ, पुढील शैक्षणिक सेवा केंद्रे स्थापन करील :----
शैक्षणिक सेवा केंद्र.
(१) ज्ञान संसाधन, अनुवाद व दुभाषण सेवा केंद्र :----हे केंद्र, या व इतर विद्यापीठांना मूलभूत अध्ययन साहित्य आणि संदर्भ पुस्तके, इत्यादींचा अनुवाद आणि मराठीतील अन्य कोणत्याही अनुवाद व दुभाषण विषयक आवश्यक सेवा, अभ्यासक्रम तयार करणे, प्रश्न पेढी, सर्जनशील व नवसंशोधन पद्धती आणि परस्पर सहयोगदायक ज्ञान र्िनमिती यांमधील प्रशिक्षण कार्यक्रम पुरवील.
(२) द्दक्-श्राव्य (ए. व्ही.) आणि संगणकीय साहित्य र्िनमिती केंद्र :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) द्दक्-श्राव्य (ए. व्ही.) कलागृहाच्या माध्यमातून, ऑनलाइन अध्यापन-अध्ययन कार्यक्रमांबाबतची विद्यापीठाची संकल्पना;
(ख) द्दक्-श्राव्य (ए. व्ही.) अध्यापन-अध्ययन साहित्याची र्िनमिती करणे आणि ज्ञान प्रक्षेपण वाहिन्यांच्या मार्फत विविध क्षेत्रातील तज्ञांच्या पाठांचे प्रसारण व प्रक्षेपण करणे;
(३) मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांस प्रोत्साहन देण्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांस प्रोत्साहन देण्यासाठी विदेशी विद्यापीठे व मराठी भाषा संघटना यांच्या सहयोगाने अध्ययनक्रम सुरु करणे;
(ख) सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम, परस्पर सहयोगी संशोधन उपक्रम, इत्यादी.
(४) ग्रंथालय व माहिती केंद्र :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) विद्याथ्यार्ंना व अध्यापकांना, संदर्भ पुस्तके व संदर्भ सेवा यांमार्फत विचार, संकल्पना यांचा अभिलेख उपलब्ध करून देण्याची सेवा;
(ख) संदर्भ ग्रंथ, डिजिटल पुस्तके व नियतकालिके यांचा संग्रह;
(ग) चित्रपट, छायाचित्रे आणि इतर पुस्तकेतर साहित्य, वृत्तपत्रे, भित्तीपत्रके, ध्वनिमुद्रणफिती, सूक्ष्म चित्रफिती, आलेख, तक्ते, इत्यादींचा संग्रह.
(५) वस्तुसंग्रहालय व पुरातव केंद्र :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) मराठी हस्तलिखिते, दर्ुमिळ पुस्तके, कीर्तनाच्या द्दक्-श्राव्य (ए. व्ही.) फिती, नाटय प्रयोग, संगीत, मराठी संस्कृती व इतिहास यांच्याशी संबंधित असलेल्या सांस्कृतिक वस्तूंचा लोकप्रिय संग्रह, संगीतवाद्ये, इत्यादींचे वस्तुसंग्रहालय;
(ख) महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीचा वारसा जतन करणे.
(६) संगणकीय भाषा विषयक प्रयोगशाळा :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) संभाषण विश्लेषण, संभाषण ओळख, न्यायवैद्यक विश्लेषण याकरिता स्वनीय प्रयोगशाळा;
(ख) भाषा अध्यापन कार्यक्रमासाठी बहु-संभाषण द्दक् स्वनिक विद्युत आलेखाचा व संगणक आज्ञावलीचा वापर;
(ग) भाषाशास्त्रातील संशोधनाच्या नवीन आकर्षक क्षेत्रासाठी संभाषण जुळणी (सिन्थेसायझर), यांत्रिक अनुवाद, मजकुरात अतिरि माहिती टाकण्याचे व त्याचे विश्लेषण व अर्थबोधनाचे साधन (कॉर्पस अॅनोटेशन टूल्स), इत्यादी गोष्टीसह यांत्रिक अध्ययन, सखोल अध्ययन, कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय), इत्यादी सुविधांसाठी संगणकीय भाषिक प्रयोगशाळा.
४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(७) मनो-भाषाशास्त्रीय प्रयोगशाळा :---- मनो-भाषाशास्त्रीय प्रयोगशाळा, जलद वाचन क्षमता चाचणी, ध्वनीशास्त्रीय प्रक्रियेची सर्व समावेशक चाचणी व शाळापूर्व जलद साक्षरता चाचणी, सांकेतिक बुध्िदमत्तेची प्राथमिक चाचणी यांसारख्या विविध भाषिक चाचण्यांसाठी सुविधा पुरवील.
(८) पुस्तक र्िनमिती व मुद्रण सेवा केंद्र :----हे केंद्र, पुढील गोष्टी पुरवील :---
(क) मराठीतील विविध संदर्भ ग्रंथांचे प्रकाशान करणे;
(ख) प्रबंध व संशोधन साहित्याचा मराठीत अनुवाद करणे;
(ग) पाठयपुस्तके व पूरक वाचन साहित्य व रचनांतरण पाठ यांचे संपादन करणेे;
(घ) पाठ संपादन, भाषा संपादन, प्रतीचे संपादन, मुद्रित शोधन, मांडणी संकल्पन, संकल्पचित्रण करणे.
अभ्यास मंडळ. २९. (१) प्रत्येक प्रशालेचे एक अभ्यास मंडळ असेल.
(२) अभ्यास मंडळ हे, विद्यापीठ विभागांमध्ये आणि प्रशालेच्या अधिपत्याखालील केंद्रामध्ये शिकविल्या जाणाया विषयांच्या किंवा विषयांच्या गटांच्या संबंधातील अभ्यास व संशोधनाच्या बाबतीत प्रत्येक प्रशालेचे प्रमुख शैक्षणिक प्राधिकरण असेल. अभ्यास मंडळ, पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :---
(क) प्रशालेचा अधिष्ठाता-अध्यक्ष;
(ख) प्रशालेच्या अंतर्गत असलेल्या विभागांचे प्रमुख व केंद्रांचे प्रमुख;
(ग) कुलगुरूने नामनिर्देशति केलेले प्रशालेमधील दोन ते पाच तज्ज्ञ प्राध्यापक;
(घ) विभागाच्या किंवा केंद्रांच्या प्रमुखाव्यतिरिक्त प्रशालेतील अन्य दोन सहयोगी प्राध्यापक व दोन सहायक प्राध्यापक, ज्येष्ठतेनुसार, आळीपाळीने अडीच वषार्ंच्या कालावधीसाठी ;
(ङ) प्रशालेला नेमून दिलेल्या कोणत्याही विषयातील किंवा कोणत्याही संलग्न ज्ञान शाखांमधील विशेष ज्ञान असलेल्या विद्यापीठाबाहेरील विद्यापरिषदेने नामनिर्देशित केलेले तीन सदस्य;
(च) प्रशालेच्या अधिष्ठात्याकडून नामनिर्देशित करावयाचा, प्रशालेचा एक सहयोगी प्राध्यापक, सदस्य-सचिव.
३०. अभ्यास मंडळाचे अधिकार व कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :----
(१) प्रशालेच्या अंतर्गत असलेले विभाग व केंद्रे यांमधील अध्यापन व संशोधन कार्यामध्ये समन्वय अभ्यास मंडळाचे अधिकार व कर्तव्ये.
ठेवणे;
(२) प्रशालेच्या अंतर्गत असलेल्या एकापेक्षा अधिक विभागांशी व केंद्रांशी संबंधित असलेल्या किंवा जे कोणत्याही विभागाच्या किंवा केंद्राच्या कक्षेत येत नाही अशा विषयांतील किंवा क्षेत्रांतील अध्यापन व संशोधन कार्याचे व्यवस्थापन करण्यासाठी समित्या नियुक्त करणे, आणि अशा समित्यांच्या कायार्ंवर देखरेख ठेवणे. अशा समित्यांची रचना, अधिकार व कार्ये, विनियमांद्वारे विहित करण्यात येतील;
(३) विद्यापीठ विभागाने किंवा प्रशालेच्या अंतर्गत असलेल्या केंद्राने शिफारस केलेले पाठयक्रम किंवा अध्ययनक्रम यांची विद्या परिषदेकडे शिफारस करणे;
(४) विद्यापीठामधील पदव्युत्तरपदवी पाठयक्रम किंवा अध्ययनक्रम यांचा विचार करणे आणि त्याची विद्या परिषदेकडे शिफारस करणेे;
(५) संशोधन पदव्यांच्या बाबतीत असेल त्या खेरीज, परीक्षकांच्या व नियामकांच्या नावांची विद्या परिषदेकडे शिफारस करणेे;
(६) विभागांकडून व केंद्रांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर विचार केल्यानंतर, अध्यापक पदांची र्िनमिती करण्याची आणि ती पदे रद्द करण्याची विद्या परिषदेकडे शिफारस करणेे;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ४१(७) हंगामी कामांच्या मूल्यमापनासाठी सर्वसाधारण नियम करणेे;
(८) याबाबतीत केलेल्या आदेशांनुसार प्रगत अध्ययन व संशोधन करण्यासाठी आणि पदव्या प्रदान करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना संशोधन विषयक पदव्या प्रदान करण्यासाठी, समितीच्या शिफारशींवरून मान्यता देणेे;
(९) अध्यापन व संशोधन विषयक दर्जा उंचावण्याच्या योजनांवर विचार करणे, आणि विद्या परिषदेकडे असे प्रस्ताव सादर करणेे;
(१०) प्रशालेच्या अंतर्गत संशोधनास प्रोत्साहन देणे आणि संशोधन अहवाल विद्यापरिषदेला सादर करणेे;
(११) अभ्यास प्रशालेचे वेळापत्रक तयार करणेे;
(१२) विद्यापीठ विद्यार्थी परिषद, प्रशालेच्या विद्याथ्यार्ंच्या कल्याणाच्या संबंधात सादर करील अशा कोणत्याही प्रस्तावांवर विचार करणेे;
(१३) विद्यापीठ विभागांची व प्रशालेच्या अंतर्गत असलेल्या केंद्रांची यथार्थदर्शक योजना तयार करणे आणि ती, मान्यतेसाठी विद्या परिषदेमार्फत, व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करणेे;
(१४) अधिनियम, परिनियम किंवा आदेश यांद्वारे विहित करण्यात येतील अशी इतर सर्व कार्ये पार पाडणे, आणि व्यवस्थापन परिषदेकडून, विद्या परिषदेकडून, अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा कुलगुरूकडून र्िनदिष्ट करण्यात येतील अशा सर्व बाबींवर विचार करणेे;
(१५) मंडळाकडून वेळोवेळी, ठरविण्यात येतील असे सर्वसाधारण किंवा विशेष अधिकार, अधिष्ठात्यास किंवा मंडळाच्या कोणत्याही सदस्यास किंवा एखाद्या समितीस प्रदान करणे.
३१. (१) परीक्षा व मूल्यमापन मंडळास, परीक्षा व मूल्यमापन यासंबंधीच्या सर्व बाबींसंबंधी कार्यवाही परीक्षा व मूल्यमापन मंडळ.
करण्याचा प्राधिकार असेल. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठ विभागांमधील परीक्षा घेण्यावर देखील देखरेख करील.
(२) परीक्षा व मूल्यमापन मंडळाची प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान दोनदा आणि आवश्यकता असेल त्यावेळी बैठक होईल. बैठकीची गणपूर्ती सहा सदस्यांनी मिळून होईल.
(३) परीक्षा व मूल्यमापन मंडळात पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरु, अध्यक्ष ;
(ख) सर्व प्रशालांचे अधिष्ठाते ;
(ग) कुलगुरूने नामनिर्देशित केलेले विद्यापीठ विभागांचे किंवा केंद्रांचे दोन प्रमुख ;
(घ) व्यवस्थापन मंडळाकडून नामनिर्देशित करावयाचा, इतर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा एक संचालक, किंवा इतर प्रख्यात उच्च अध्ययन शिक्षण परिसंस्थांचा विद्याविषयक अधिष्ठाता ;
(ङ) कुलगुरूने नामनिर्देशित केलेला एक मूल्यमापन तज्ज्ञ ;
(च) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सदस्य--सचिव.
भाग पाच-७२-६. एचबी-१७६४-6.
४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५३२. (१) परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :----
(क) विद्याथ्यार्ंच्या कामगिरीचे कार्यक्षमतेने व कालबद्ध रीतीने मूल्यमापन करण्यासंबंधातील कामे करण्यासाठी धोरणे, यंत्रणा व कार्यात्मक कार्यतंत्रे तयार करणे ;
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अधिकार व कर्तव्ये.
(ख) नियमन, कोष्टकीकरण, मूल्यमापन व वेळेवर निकाल घोषित करणे यांसह विद्यापीठाच्या परीक्षा व चाचण्या योग्यप्रकारे आयोजित करण्याची सुनिश्चिती करणे ;
(ग) विद्यापीठाच्या वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रकात (अर्थसंकल्प) समाविष्ट करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन यासंबंधीची वित्तीय अंदाजपत्रके तयार करणे आणि ती वित्त व लेखा समितीस सादर करणे ;
(घ) विद्यार्थी, अध्यापक, समवेक्षक, पर्यवेक्षक इत्यादींद्वारे कोणत्याही गैरप्रकारांचा अवलंब करण्यास आळा घालण्याच्या दृष्टीने परीक्षा घेताना काटेकोर दक्षता घेण्याची व्यवस्था करणे ;
(ङ) अध्यापकांद्वारे प्रमाणमापक (मॉडयुलर) संरचनेमधील श्रेयांक मूल्यनिर्धारणाची कार्यपद्धती प्रस्थापित करणे व कार्यात्मक यंत्रणा विकसित करणे आणि प्रश्नपत्रिका संचाचा संग्रह निर्माण करणे व त्याचा प्रभावीपणे वापर करणे यांसह मूल्यनिर्धारणाच्या व मूल्यमापनाच्या संपूर्ण प्रक्रियेकरिता संगणक तंत्रज्ञानाचा वापर करणे ;
(च) गुप्तता बाळगण्याच्या उद्दिष्टांची सुनिश्चिती करण्यासाठी उत्तरपत्रिकांना आच्छादन घालण्याच्या आणि आच्छादन काढण्याच्या प्रणालीद्वारे किंवा ऑन-स्क्रीन मूल्यनिर्धारण करून, त्याद्वारे मध्यवर्ती मूल्यनिर्धारण प्रणालीमार्फत उत्तरपत्रिकांचे मूल्यनिर्धारण केंद्रीभूत रीतीने करण्यात येईल याची सुनिश्चिती करणे ;
(छ) परीक्षा व मूल्यमापन पद्धती यामध्ये वस्तुनिष्ठता व पारदर्शकता आणण्यासाठी परीक्षा व मूल्यमापनविषयक सुधारणा हाती घेणे ;
(ज) संबंधित प्रशालेने तयार केलेल्या नामिकेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींमधून प्राश्निक, परीक्षक व नियामक यांची नियुक्ती करणे आणि पोट-कलम (५) च्या खंड (ख) अन्वये समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन, आवश्यक असेल तेव्हा, त्यांना काढून टाकणे किंवा त्यांना प्रतिरोधित करणे ;
(झ) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ याने तयार केलेल्या परीक्षा व मूल्यमापनाच्या तपशीलवार कार्यक्रमास मान्यता देणे ;
(ञ) संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ याने पाठविलेल्या विद्यापीठ परीक्षांच्या निकालाच्या पुर्नविलोकन अहवालावर विचार करणे ;
(ट) परीक्षा घेणे व मूल्यमापन करणे यासंबंधातील तक्रारी ऐकून घेणे व त्यावर निर्णय देणे ;
(ठ) या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये परीक्षा व मूल्यमापनाच्या संबंधात त्याच्याकडे नेमून देण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे.
(२) जीमुळे तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक असेल अशी कोणतीही आकस्मिक निकड असल्यास, अशा बाबतीत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा संचालक किंवा याबाबत त्याने प्राधिकृत केलेला इतर कोणताही अधिकारी किंवा व्यक्ती, त्यास योग्य व आवश्यक वाटेल अशी कारवाई करील, आणि त्याने केलेल्या कारवाईचा अहवाल, व्यवस्थापन मंडळाच्या पुढील बैठकीत मांडील.
(३) (क) प्राश्निक, परीक्षक व नियामक यांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, प्रत्येक विद्याशाखेसाठी पुढील व्यक्तींचा समावेश असणाया समित्या घटित करील :
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ४३(एक) संबंधित प्रशालेचा अधिष्ठाता, अध्यक्ष ;
(दोन) विभागांचे प्रमुख ;
(तीन) परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा संचालक, अशा समितीचा सचिव म्हणून काम करील.
(ख) परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या किंवा या कलमान्वये घटित केलेल्या समित्यांच्या कोणत्याही सदस्याची प्राश्निक, परीक्षक, नियामक किंवा निर्देशी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही :
परंतु, पाठयक्रम अध्यापक, त्याने शैक्षणिक सत्रात शिकविलेल्या पाठयक्रमाची प्रश्नपत्रिका तयार करील :
परंतु आणखी असे की, जेव्हा जो परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा किंवा समितीचा सदस्य नाही असा, अशा विषयाच्या संबंधातील कोणताही अध्यापक उपलब्ध नसेल त्याबाबतीत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या किंवा या कलमान्वये घटित केलेल्या समितीच्या सदस्याची प्राश्निक, परीक्षक, नियामक किंवा निर्देशी म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार कुलगुरुला असेल.
(४) परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा व विद्याथ्यार्ंचे मूल्यमापन यांसंबंधात आवश्यक ते सहाय्य आणि सेवा देणे हे, विद्यापीठाच्या प्रत्येक अध्यापकावर आणि अध्यापकेतर कर्मचायावर, बंधनकारक असेल. जर कोणत्याही अध्यापकाने किंवा अध्यापकेतर कर्मचायाने याबाबतीतील विद्यापीठाच्या आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास, ती गैरवर्तणूक समजण्यात येईल आणि तो कर्मचारी, शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र असेल. विद्यापीठाच्या अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचायाच्या बाजूने या बाबतीतील विद्यापीठाच्या आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर झाल्यास, कुलगुरूस, त्यांच्याविरुद्ध, यथोचित कारवाई करण्याचा अधिकार असेल, त्यामध्ये परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे, अध्यापकाच्या नियुक्त्तीच्या मान्यतेस स्थगिती देण्यासह शास्ती लादण्याच्या अधिकारांचा समावेश असू शकेल.
(५) (क) विद्यापीठाद्वारे किंवा त्याच्या वतीने परीक्षांचे किंवा विद्याथ्यार्ंचे मूल्यमापन करण्याच्या अथवा औपचारिक कार्यवाही करण्याच्या बाबतीत सहाय्य किंवा सेवा देण्याच्या विद्यापीठाच्या आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केल्याबद्दल आणि परीक्षापूर्व टप्पा आणि परीक्षेनंतरचा टप्पा यांसह किंवा अशा इतर कोणत्याही टप्प्यावर परीक्षा घेण्याशी संबंधित असलेले उमेदवार, प्राश्निक, परीक्षक, नियामक, निर्देशी, अध्यापक किंवा इतर कोणत्याही व्यक्त्ती यांच्याकडून झालेल्या चुकांबद्दल अन्वेषण करण्याच्या व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या दृष्टीने, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पाचपेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्त्तींची, समिती घटित करील, त्यामध्ये एक अध्यक्ष असेल.
(ख) अशी समिती, तिचा अहवाल व शिफारशी कुलगुरूला सादर करील. कुलगुरूस, गैरप्रकारांत, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या व्यक्त्तीविरुद्ध किंवा व्यक्त्तींविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ याला निदेश देता येईल, आणि संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ हा, कुलगुरूच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करील.
संशोधन व नवोपक्रम मंडळ.
३३. (१) नवोपक्रमाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी आणि ज्यामुळे अंतिमत: उपक्रमाची र्िनमिती होते अशा नवसंशोधन प्रक्रियेद्वारे नवनवीन कल्पना, कार्यकारी प्रतिमानांमध्ये रुपांतरित करण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याकरिता व रुजवण्याकरिता एक संशोधन व नवोपक्रम मंडळ असेल.
(२) संशोधन व नवोपक्रम मंडळामध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरू, अध्यक्ष ;
(ख) सर्व प्रशालांचे अधिष्ठाते ;
४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ग) उद्योग, व्यवस्थापन, संशोधन पार्क व नवसंशोधन केंद्रे, इत्यादी क्षेत्रांमधून व्यवस्थापन मंडळाने नामनिर्देशित केलेले, किमान पाच ख्यातनाम उद्योगपती, ज्येष्ठ उद्यमशील व्यक्ती ;
(घ) उद्योग, निगम किंवा बँक यांमधून कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा एक मुख्य वित्त अधिकारी किंवा समकक्ष अधिकारी ;
(ङ) जे संशोधन व विकास आणि नवोपक्रम यांत सक्रिय आहेत असे कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचे, विद्यापीठ विभाग व केंद्रे यांमधील दोन अध्यापक ;
(च) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाच्या, संशोधन व विकास संघटनांमधील दोन व्यक्ती ;
(छ) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा कोणत्याही प्रशालेचा अधिष्ठाता, सदस्य-सचिव.
(३) मंडळाच्या, वर्षभरात चारपेक्षा कमी नसतील इतक्या बैठकी घेण्यात येतील.
३४. संशोधन व नवोपक्रम मंडळाची कार्ये व कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील :---
(क) प्रंबधाचा विषय किंवा शोधनिबंधाचा विषय मान्य करणे ;
संशोधन व नवोपक्रम मंडळाची कार्ये व कर्तव्ये.
(ख) विद्या परिषदेने मान्य केलेल्या निकषांच्या आधारे पदव्युत्तर पदवी, विद्यावाचस्पती पदवी (डॉक्टरेट) व उच्च पदव्या प्रदान करण्यासाठी प्रबंधासाठी किंवा शोधनिबंधांसाठी परीक्षकांच्या नामिकेची कुलगुरूंला शिफारस करणे ;
(ग) संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळण्यासाठी, योग्य प्रक्रियेचे पालन करून, पदव्युत्तर शिक्षक, मान्यताप्राप्त संशोधन व इतर संस्था यामधील संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन व विकास प्रयोगशाळा व विविध उद्योगांमधील केंद्रे यामधील दहा वषार्ंपेक्षा कमी नसेल इतका अनुभव असलेले सक्रिय संशोधन व विकास तज्ञ यांची नावे संबंधित प्रशालेच्या अधिष्ठात्याकडे शिफारस करणे.
(घ) अधिष्ठात्याकडून व विद्या परिषदेकडून त्याच्याकडे सोपवण्यात येतील अशा शैक्षणिक व संशोधन आणि विकास बाबींमधील इतर कोणतेही कार्य हाती घेणे.
विद्यार्थी विकास मंडळ.
३५. (१) विद्यापीठामधील विद्याथ्यार्ंच्या विविध सांस्कृतिक, कल्याण, क्रीडा व विस्तार कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी व त्याची देखरेख करण्यासाठी एक विद्यार्थी विकास मंडळ असेल. विद्यार्थी विकास मंडळाची कामे, विद्यार्थी विकास संचालकाकडून पार पाडण्यात येतील.
(२) विद्यार्थी विकास मंडळामध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :-----
(क) कुलगुरू----अध्यक्ष ;
(ख) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा, प्रयोगनिष्ठ कला, ललित कला, क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना या क्षेत्रामधील प्रत्येकी एक व्यावसायिक ;
(ग) कुलगुरूने नामनिर्देशित करावयाचा, सांस्कृतिक, कल्याण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांशी संबंधित असलेला प्रत्येकी एक अध्यापक, त्यांपैकी दोन महिला असतील ;
(घ) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ यानेे नामनिर्देशित करावयाचे, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे दोनपेक्षा अधिक नसतील इतके पदाधिकारी ;
(ङ) विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक ;
(च) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, सदस्य-सचिव.
३६. विद्यार्थी विकास मंडळास पुढील अधिकार व कर्तव्ये असतील :----
(क) विद्यापीठातील सांस्कृतिक, क्रीडा, विस्तार व विद्यार्थी विकास कार्यक्रमांच्या प्रचालनासाठी आवश्यक विद्यार्थी विकास मंडळाची कार्ये व कर्तव्ये.
त्या उपाययोजना करणे ;
(ख) विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांच्या बाबतीत प्रादेशिक व राष्ट्रीय संस्थांशी दुवा साधणे आणि त्यांच्याबरोबर संयुक्तपणे विविध कार्यक्रमांचे प्रचालन करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ४५(ग) प्रयोगनिष्ठ कला, विशुद्ध कला व रंग चित्रकला कौशल्ये, क्रीडा व इतर विस्तार कार्यक्रम या क्षेत्रातील अभिरूची व कौशल्ये यांना चालना देण्यासाठी विद्यापीठामध्ये कार्यक्रम हाती घेणे ;
(घ) समाजास विद्यापीठाच्या जवळ आणण्याच्या दृष्टीने, विद्यापीठ स्तरीय स्पर्धा, कौशल्य विकास कार्यशाळा, परस्परसंवाद उपक्रम आयोजित करणे ;
(ङ) गट (राजकीय पक्ष वगळता), समाज व अन्य व्यावसायिक संस्था यांना, विद्यार्थी विकास मंडळाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे ;
(च) कमवा व शिका योजना, शैक्षणिक कर्ज, संचालक मदत निधी, दाननिधी योजना, विद्यार्थी आदानप्रदान योजना, इत्यादींसह विद्याथ्यार्ंच्या विकासाच्या अभिनव योजना तयार करणे, त्या विकसित करणे आणि राबविणे ;
(छ) विद्याथ्यार्ंच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि विद्याथ्यार्ंची लैंगिक छळवणूक व रॅगिंग करण्यास प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा उभारणे आणि विद्यार्थी विकास, राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) व क्रीडा यांच्याशी संबंधित असलेल्या उपक्रमांचा वर्ाषिक अहवाल तयार करणे व तो मान्यतेसाठी व्यवस्थापन मंडळास सादर करणे ;
(ज) विविध प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, क्रीडा व इतर उपक्रम यांमध्ये सुप्रशिक्षित संघांच्या सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे ;
(झ) दिव्यांग विद्याथ्यार्ंना व्यवसाय समुपदेशन, मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी योजना तयार करणे, विकसित करणे आणि राबविणे ;
(ञ) विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) व राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी) यांच्या कार्यक्रमांचे समन्वयन करणे ;
(ट) आदेशांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणेे, परीक्षांच्या संबंधित वेळापत्रकांच्या दरम्यान आलेल्या, आंतर-विद्यापीठीय किंवा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा किंवा राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी), राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) यांमध्ये सहभागी असणाया विद्याथ्यार्ंच्या परीक्षेच्या संबंधात पर्यायी व्यवस्था करण्याकरिता सक्षम प्राधिकरणाला शिफारस करणे ;
(ठ) मंडळाची उद्दिष्टे पार पाडण्याच्या दृष्टीने, विद्यापीठ प्राधिकरणाद्वारे सोपविण्यात येईल असे अन्य कोणतेही काम हाती घेणे ;
(ड) विद्यापीठाच्या धोरणानुसार आणि क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय धोरणांनुसार विविध खेळांमधील अभिरुचीस व कौशल्यास चालना देण्यासाठी विद्यापीठ विभागांमध्ये उपक्रम हाती घेणे ;
(ढ) महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठे यांना समाजाच्या अधिक जवळ आणण्याच्या दृष्टीने, विद्यापीठ-स्तरीय स्पर्धा, क्रीडा विषयक कौशल्य विकास शिबिरे, परस्परसंवादकारी कार्यक्रम व तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील प्रशिक्षण कार्यशाळा घेणे ;
(ण) आदेशांद्वारे विहित केल्याप्रमाणे, परीक्षांच्या संबंधित वेळापत्रकांच्या दरम्यान, आंतरविद्यापीठीय किंवा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडास्पधार्ंमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाया विद्याथ्यार्ंच्या परीक्षांशी संबंधित असणाया पर्यायी व्यवस्था करण्याकरिता सक्षम प्राधिकरणाला शिफारस करणे ;
(त) विद्याथ्यार्ंना, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या विविध पैलूंमधील आणि त्यांचे शैक्षणिक कार्य, व्यक्ितमत्व विकास व विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक जीवन यांच्याशी संबंधित असलेले इतर पैलू यांमधील प्रश्न व अडचणी सोडविण्यामध्ये सहाय्य करणे ;
(थ) विद्याथ्यार्ंच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि अशा तक्रारी कमी करण्यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी विविध मार्ग व साधने, उच्चतर प्राधिकरणांना सुचविण्यासाठी विद्यापीठामधील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाला सल्ला देणे.
४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५३७. या अधिनियमाच्या तरतुदींपैकी अन्य कोणत्याही तरतुदीन्वये निर्धारित न केलेल्या विद्यापीठाच्या प्राधिकरणांची रचना, अधिकार, कार्ये व कर्तव्ये ही, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे असतील.
प्राधिकरणांचे अधिकार, कार्ये व कर्तव्ये. प्राधिकरणांच्या सदस्यांचा पदावधी.
३८. (१) या अधिनियमामध्ये अन्यथा तरतूद केली असेल त्याखेरीज, या अधिनियमांन्वये घटित केलेल्या प्रत्येक प्राधिकरणाच्या पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांची मुदत, तो सदस्य पदावर आल्याच्या दिनांकापासून पाच वर्षे इतकी असेल.
(२) प्राधिकरणाच्या पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांची मुदत संपण्याच्या किमान सहा महिने अगोदर नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
सदस्यत्व बंद होणे.
३९. या अधिनियमात किंवा त्याखाली केलेल्या परिनियमांमध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, ज्याआधारे विद्यापीठाचा अधिकारी म्हणून किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचा किंवा मंडळाचा सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेली, किंवा, यथास्थिती, नियुक्त केलेली व्यक्ती, अशा पदाच्या, प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या संबंधातील या अधिनियमाच्या संबंधित तरतुदींद्वारे किंवा त्या अन्वये विर्िनदिष्ट केलेल्या अधिकायांच्या किंवा सदस्यांच्या कोणत्याही प्रवर्गातील असा अधिकारी किंवा सदस्य म्हणून अशा प्रकारे नामनिर्देशित केली जाण्यास, किंवा नियुक्त केली जाण्यास पात्र आहे ती व्यक्ती, अशा प्रवर्गातील अधिकारी किंवा सदस्य असण्याचे बंद झाल्याबरोबर लगेचच विद्यापीठाचा असा अधिकारी किंवा अशा प्राधिकरणाचा किंवा मंडळाचा सदस्य असण्याचे बंद होईल आणि असा अधिकारी किंवा सदस्य म्हणून तिने आपले पद रिक्त केले असल्याचे मानण्यात येईल.
४०. जर, एखादी व्यक्ती,--
(क) विकल मनाची असेल व एखाद्या सक्षम न्यायालयाकडून तिला तसे घोषित केलेले असेल ;
प्राधिकरणाच्या सदस्याची निरर्हता.
किंवा
(ख) अविमुक्त नादार असेल आणि सक्षम न्यायालयाकडून तिला तसे घोषित करण्यात आले असेल ;
किंवा
(ग) नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असेल अशा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरली असेल ; किंवा (घ) खाजगी शिकवण्या घेत असेल किंवा खाजगी शिकवणी वर्ग चालवत असेल ; किंवा (ङ) कोणत्याही परीक्षा घेताना व मूल्यमापन करताना, कोणत्याही प्रकारे व कोठेही अनुचित व्यवहार केल्याबद्दल किंवा त्याला अपप्रेरणा दिल्याबद्दल तिला शिक्षा करण्यात आलेली असेल ; किंवा
(च) तिने, या अधिनियमाच्या, परिनियमांच्या, विनियमांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे पालन करण्याचे जाणीवपूर्वक टाळले असेल किंवा नकार दिला असेल किंवा विद्यापीठाच्या हितास हानिकारक असेल अशा रीतीने कोणतीही कृती केली असेल ; किंवा
(छ) तिला, गैरवर्तणूक केल्याबद्दल सक्षम प्राधिकायाकडून कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्यात आली असेल ; किंवा
(ज) तिच्या पदीय स्थानामुळे, तिला परीक्षेसंबंधात आणि मूल्यमापनासंबंधात माहीत असलेली कोणतीही गोपनीय बाब, कोणत्याही रीतीने, तिने लोकांसमोर उघड केली असेल किंवा करण्याची व्यवस्था केली असेल, तर, ती व्यक्ती, कोणत्याही प्राधिकरणांची, मंडळांची व समित्यांची सदस्य होण्यास आणि प्राधिकरणे, मंडळे व समित्या यांमध्ये मतदान करण्यास निरर्ह ठरेल :
परंतु, खंड (ङ) व (छ) च्या बाबतीत, त्या व्यक्तीचा मतदानाचा हक्क, उक्त खंडाखालील शिक्षेच्या कालावधीमध्ये निलंबित ठेवण्यात येईल.
प्राधिकरणाच्या निर्णयाची निर्णायकता.
४१. या अधिनियमाच्या तरतुदींद्वारे किंवा त्यान्वये अन्यथा तरतूद केली असेल त्याखेरीज, विद्यापीठाच्या प्रत्येक प्राधिकरणाला, ते कायर्े करीत असताना आणि या अधिनियमाच्या तरतुदींद्वारे किंवा त्यान्वये त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करीत असताना आणि नेमून दिलेली कायर्े किंवा कर्तव्ये पार पाडीत असताना, या अधिनियमाच्या तरतुदींद्वारे किंवा त्यान्वये त्यास नेमून दिलेल्या बाबीसंबंधी कार्यवाही करण्याची आणि निर्णय घेण्याची आणि त्याला नेमून दिलेली कार्ये किंवा कर्तव्ये पार पाडण्याची अनन्य अधिकारिता असेल.
सदस्यत्वाचा राजीनामा.
४२. (१) पदसिद्ध सदस्याव्यतिरिक्त, अन्य सदस्यास, आपल्या सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल. कुलपतीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस, कुलपतीला संबोधून आपल्या सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल आणि इतर कोणत्याही सदस्यास, व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षाला किंवा कुलगुरूला संबोधून आपल्या सहीनिशी लेखीमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ४७ राजीनामा देता येईल. ती व्यक्ती, कुलपतीने, किंवा व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षाने किंवा, यथास्थिति, कुलगुरूने, तिचा राजीनामा स्वीकारल्यानंतर किंवा, राजीनाम्याच्या दिनांकापासून तीस दिवस पूर्ण झाल्यावर, यापैकी जे अगोदर घडेल तेव्हापासून सदस्य असण्याचे बंद होईल.
(२) कोणत्याही प्राधिकरणावर किंवा मंडळावर नामनिर्देशित केलेली किंवा नियुक्त केलेली व्यक्ती त्या प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय लागोपाठच्या तीन बैठकींना अनुपस्थित राहील तर, तिने आपले सदस्यत्व रिक्त केले असल्याचे मानण्यात येईल आणि ती, ज्या बैठकीस अनुपस्थित राहिली असेल अशा तिसया बैठकीच्या दिनांकापासून ती सदस्य असण्याचे बंद होईल.
प्राधिकरणांच्या बैठका.
४३. (१) या अधिनियमाद्वारे अन्यथा तरतूद केली असेल त्याखेरीज, विद्यापीठाने घटित केलेल्या प्राधिकरणांच्या, मंडळांच्या किंवा समित्यांच्या, कोणत्याही असल्यास, बैठकीच्या कामकाजाच्या संबंधातील सर्व बाबी, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.
(२) प्राधिकरणाची किंवा मंडळाची बैठक, त्याच्या सचिवाने काढलेल्या नोटिशीद्वारे अध्यक्षाने ठरविलेल्या दिनांकास बोलाविण्यात येईल.
(३) अन्यथा तरतूद केलेली असेल त्याखेरीज, बैठकीची गणपूर्ती, सर्वसाधारणपणे विद्यमान सदस्य संख्येच्या एक-तृतीयांश सदस्यांनी मिळून होईल. बैठकीची गणपूर्ती होत नसेल तर, अध्यक्ष, त्याच दिवशी किंवा नंतरच्या दिनांकास विशिष्ट वेळेपयर्ंत बैठक स्थगित करील आणि अशा स्थगित केलेल्या बैठकीसाठी गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही. पुढे चालू ठेवलेल्या बैठकीच्या पुढील दिवशी गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.
(४) जेव्हा विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद, अध्यक्षाने भूषविण्यासाठी परिनियमांद्वारे किंवा त्यान्वये तरतूद केली नसेल त्याबाबतीत किंवा जेव्हा अशाप्रकारे तरतूद केलेला अध्यक्ष अनुपस्थित असेल आणि अन्य कोणत्याही व्यक्तीने अध्यक्षपद भूषविण्याची तरतूद केलेली नसेल तेव्हा, उपस्थित असलेले सदस्य, त्यांच्यामधून एका व्यक्तीची, बैठकीचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी निवड करतील.
(५) अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, कार्यसूचीवरील सर्व बाबी, प्रश्न, विषय किंवा प्रस्ताव यांवर, उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमताने निर्णय घेण्यात येईल.
(६) अध्यक्षास, मत देण्याचा हक्क असेल. समसमान मते पडल्यास त्याबाबतीत, अध्यक्षास, निर्णायक मत देता येईल. सचिव, सदस्य नसेल तर, त्यास विचारविमर्शात भाग घेण्याचा हक्क असेल, परंतु त्यास मतदानाचा हक्क असणार नाही.
रिक्त पद भरणे.
४४. पदसिद्ध सदस्याव्यतिरिक्त एखाद्या सदस्याचे पद रिक्त होईल तेव्हा, असे रिक्त पद, तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत, त्याच प्रवर्गातून भरण्यात येईल.
प्रकरण पाच
परिनियम, आदेश व विनियम.
४५. या अधिनियमाच्या तरतुदींस अधीन राहून, परिनियमांमध्ये पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही परिनियम व त्यांचे विषय.
बाबींसाठी तरतूद करता येईल :-----
(१) मानद पदव्या आणि शैक्षणिक विशेषोपाध्या प्रदान करणे ; (२) उपकेंद्रे किंवा प्रादेशिक केंद्रे, विद्यापीठ विभाग, प्रशाला व वसतिगृहे सुरू करणे व ती चालविणे ; (३) या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींन्वये निर्धारित न केलेल्या विद्यापीठाच्या प्राधिकरणांची व मंडळांची रचना, अधिकार, कर्तव्ये व कार्ये ; (४) विद्यापीठ प्रशाला, विभाग किंवा केंद्रे बंद करणे ; (५) विद्यापीठ प्राधिकरणांच्या बैठकांमध्ये कामकाज चालण्यासंबंधीच्या कार्यपद्धतीचे नियम ; (६) विद्यापीठांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यापीठाच्या निधीचा विनियोग करणे ; (७) व्यक्तींकडून किंवा संघटनांकडून विश्वस्त निधी, मृत्युपत्रित दान, देणग्या, दाननिधी व अनुदाने स्वीकारणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे ;
४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(८) विद्यापीठाचे कसूरदार अध्यापक, अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे ;
(९) विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंच्या निवासस्थानाच्या, वर्तणुकीच्या आणि शिस्तीसंबंधीच्या शर्ती, आणि पुढील बाबींसह, शिस्तभंग किंवा गैरवर्तणूक केल्याबाबत त्यांच्याविरोधात करावयाची कारवाई :----
(क) परीक्षेत गैरमागार्ंचा वापर करणे किंवा त्यास अपप्रेरणा देणे ;
(ख) मूल्यमापन व परीक्षा यांच्या प्रभारी अधिकायाने किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकायाने किंवा प्राधिकायाने केलेल्या कोणत्याही अधिकृत चौकशीस हजर राहण्यास किंवा साक्ष देण्यास नकार देणे ; किंवा
(ग) गैरशिस्त किंवा अन्यथा आक्षेपार्ह वर्तणूक---मग ती, विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या बाहेर केलेली असो ;
(१०) विद्याथ्यार्ंच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा व कार्यपद्धती ;
(११) विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेची कार्ये व कर्तव्ये ;
(१२) या अधिनियमान्वये प्राधिकरणांवर, मंडळांवर व समित्यांवर कुलगुरुकडून सदस्यांचे नामनिर्देशन करताना अनुसरावयाची मानके व कार्यपद्धती ;
(१३) कलम ६२ च्या पोट-कलम (६) अन्वये खरेदीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती ; (१४) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी परिनियमाद्वारे विहित करावयाची किंवा आवश्यक असेल अशी कोणतीही बाब. ४६. (१) नियामक मंडळाला, वेळोवेळी, यात यापुढे तरतूद केलेल्या रीतीने नवीन किंवा अतिरिक्त परिनियम तयार करणे. परिनियम तयार करता येतील, किंवा त्यात सुधारणा करता येतील किंवा तेे निरसित करता येतील :
परंतु, पहिले परिनियम, नियत दिनांकापासून एका वषार्ंच्या आत करण्यात येतील. (२) व्यवस्थापन मंडळाकडून पुढीलप्रमाणे परिनियम समिती घटित करण्यात येईल :---
(क) कुलगुरु-अध्यक्ष, (ख) विद्यापीठाच्या प्रत्येक प्रशालेचा अधिष्ठाता ; (ग) विद्यापीठाचा एक प्राध्यापक ; (घ) विद्यापीठाचा कुलसचिव, सदस्य-सचिव ; (ङ) व्यवस्थापन मंडळाने नियुक्त केलेला एक विधी सल्लागार किंवा समुपदेशी ;
(३) अशी परिनियम समिती, मागील पूर्ववर्ती कलमामध्ये र्िनदिष्ट केलेल्या बाबींशी संबंधित असणाया परिनियमांचा मसुदा तयार करील व तो प्रस्तावित करील आणि तो व्यवस्थापन मंडळाला सादर करील.
(४) व्यवस्थापन मंडळाने संमत केलेला प्रत्येक परिनियम, कुलपतीकडे सादर करण्यात येईल, तो त्यास आपली अनुमती देईल किंवा ती रोखून ठेवील किंवा तो परिनियम पुर्नविचारासाठी नियामक मंडळाकडेे परत पाठवील. कुलपतीस, अशा परिनियमाच्या अंमलबजावणीमुळे राज्य शासनावर वित्तीय अथवा अन्यथा अपेक्षित भार पडत असेल तर, परिनियमांचा मसुदा राज्य शासनाकडे विचारार्थ पाठविता येईल.
(५) व्यवस्थापन मंडळाने संमत केलेला कोणताही परिनियम, कुलपतीकडून अनुमती देण्यात येईपयर्ंत विधिग्रा ठरणार नाही किंवा तो अंमलात येणार नाही.
(६) पूर्ववर्ती पोट-कलमांत काहीही अंतभर्ूत असले तरी, कुलपतीस, स्वाधिकारे किंवा राज्य शासनाच्या सल्ल्यावरून, त्याने विर्िनदिष्ट केलेल्या कोणत्याही बाबीच्या संबंधात परिनियमांमध्ये तरतुदीं करण्यासाठी विद्यापीठाला निदेश देता येतील आणि व्यवस्थापन मंडळानेे असे निदेश प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत, त्यांचे अनुसरण करण्यात कसूर केली तर, कुलपतीस, व्यवस्थापन मंडळाने, कळविलेली अशा निदेशांचे अनुपालन करणे त्याला शक्य न झाल्याबद्दलची कारणे, कोणतीही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, त्याबाबतीत सुयोग्य असे परिनियम करता येतील किंवा त्या परिनियमांत सुधारणा करता येतील.
(७) व्यवस्थापन मंडळास, परिनियमाचा मसुदा, एकतर स्वत:हून किंवा परिनियम समितीच्या प्रस्तावावरून, विचारात घेता येईल. व्यवस्थापन मंडळ, त्यावर विचार करण्यापूर्वी, परिनियम समितीचे मत मागवील :
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ४९परंतु, परिनियम समितीने, मसुदा मिळाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत, तिचे मत सादर करण्यात कसूर केली तर, व्यवस्थापन मंडळास त्या मसुद्यावर विचार करण्याची कार्यवाही सुरू करता येईल.
(८) व्यवस्थापन मंडळास, आवश्यक वाटल्यास, त्याच्यापुढे विचारार्थ असलेल्या कोणत्याही परिनियमाच्या मसुद्यासंबंधात, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकायाचे, प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे मत मागविता येईल :
परंतु, जर असा कोणताही परिनियमाचा मसुदा, विद्याविषयक बाबींशी संबंधित असेल तर, व्यवस्थापन मंडळ, त्यावर विचार करण्यापूर्वी, विद्यापरिषदेचे मत मागवील.
(९) व्यवस्थापन मंडळ, परिनियम संमत करील आणि ते, कुलपतींच्या मान्यतेसाठी, त्याला सादर करील.
४७. या अधिनियमाच्या तरतुदींस अधीन राहून, आदेशात पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबींसाठी आदेश व त्यांचे विषय.
तरतूद करता येईल :----
(१) या अधिनियमाखालील शुल्क निश्चिती समितीने स्वीकारावयाचे, पाठयक्रमांचे व अध्ययनक्रमांचे शुल्क, इतर शुल्क व आकार निश्चित करावयाची मानके व प्रक्रिया ;
(२) परीक्षकांच्या नेमणुका व कर्तव्ये यांचे नियमन करणाया शर्ती ;
(३) परीक्षा व इतर चाचण्या घेणे व मूल्यमापन करणे आणि ज्या रीतीने परीक्षक, उमेदवारांचे मूल्यनिर्धारण करतील किंवा त्यांची परीक्षा घेतील ती रीत ;
२०१६ चा ४९.
(४) विकलांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, २०१६ याच्या तरतुदींनुसार आणि वेळोवेळी काढलेली विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शकतवे व निदेश यांनुसार एक कक्ष स्थापन करण्याच्या तरतुदींसह समान संधी कक्षाची रचना, अधिकार, कर्तव्ये व कार्ये ;
(५) विद्यापीठामधील विद्याथ्यार्ंचे रॅगिंग करण्यास प्रतिबंध करण्याकरिता यंत्रणा ;
२०१३ चा १४.
(६) कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ याच्या तरतुदींनुसार विद्यापीठाचे अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या लैंगिक छळास प्रतिबंध आणि लैंगिक छळ व त्याच्याशी संबधित घटना यांच्याशी संबंधित असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि लैंगिक छळ करण्यात सहभागी असणायांना शिक्षा करण्याकरिता यंत्रणा ;
(७) हा अधिनियम किंवा परिनियम याद्वारे किंवा त्यान्वये, आदेशाद्वारे विहित करावयाची किंवा या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असेल अशी कोणतीही विद्याविषयक बाब.
४८. (१) व्यवस्थापन मंडळास, यात यापुढे तरतूद केलेल्या रीतीने वेळोवेळी, नवीन किंवा अतिरिक्त आदेश व ते तयार करणे.
आदेश तयार करता येतील, त्यात सुधारणा करता येईल किंवा ते निरसित करता येतील.
(२) विद्याविषयक बाबींशी संबंधित असलेला कोणताही आदेश हा, त्याचा मसुदा विद्यापरिषदेकडून प्रस्तावित करण्यात आल्याखेरीज, व्यवस्थापन मंडळाद्वारे तयार करण्यात येणार नाही, त्यात सुधारणा केली जाणार नाही किंवा तो निरसित केला जाणार नाही.
(३) व्यवस्थापन मंडळाने तयार केलेले सर्व आदेश, बैठकीच्या दिनांकापासून किंवा ते निदेश देईल अशा दिनांकापासून अंमलात येतील, परंतु, अशा प्रकारे तयार केलेला प्रत्येक आदेश, व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीच्या दिनांकापासून दोन आठवडयांच्या आत, कुलपतीला सादर करण्यात येईल. कुलपतीला, आदेश प्राप्त झाल्यापासून चार आठवडयांच्या आत, त्याची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याबाबत व्यवस्थापन मंडळाला निदेश देण्याचा अधिकार असेल, आणि तो, शक्य तितक्या लवकर, त्यावरील त्याचा आक्षेप व्यवस्थापन मंडळाला कळवील. त्याला, व्यवस्थापन मंडळाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर, आदेश स्थगित करणारा आदेश एकतर मागे घेता येईल किंवा तो नामंजूर करता येईल आणि त्यावरील त्याचा निर्णय अंतिम असेल.
भाग पाच-७२-७. एचबी-१७६४-7.
५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५४९. (१) या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये विहित केलेल्या तरतुदींना अधीन राहून, व्यवस्थापन मंडळास, विनियम.
या अधिनियमाशी, परिनियमांशी व आदेशांशी सुसंगत असतील असे विनियम, पुढील गोष्टींसाठी करता येतील :---
(क) अधिछात्रवृत्ती, प्रवासी अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्ती, छात्रवृत्ती, पदके व बक्षिसे सुरू करणे व ती प्रदान करणे ;
(ख) परस्परांच्या फायद्याच्या शैक्षणिक अध्ययनक्रमांसाठी अन्य विद्यापीठे, परिसंस्था व संघटना यांच्याशी सहयोग करणे ;
(ग) विद्यापीठाचा अभिलेख जतन करणे ;
(घ) ज्याकरिता विनियमांद्वारे तरतूद करावयाची आहे किंवा करता येईल अशा सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी हा अधिनियम, परिनियम किंवा आदेशाद्वारे किंवा त्यान्वये तरतूद करणे ;
(ङ) व्यवस्थापन मंडळाच्या मते, या अधिनियमाच्या, परिनियमांच्या किंवा आदेशांच्या प्रयोजनार्थ, ज्यासाठी तरतुदी करणे आवश्यक आहे, अशा सर्व अशैक्षणिक बाबी.
(२) या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये विहित केलेल्या तरतुदींना अधीन राहून, विद्यापरिषदेला, या अधिनियमाशी, परिनियमांशी व आदेशांशी सुसंगत असलेल्या विद्याविषयक बाबींशी संबंधित असणारे विनियम करता येतील.
(३) प्रशालेचा अधिष्ठाता, पोट-कलमे (१) व (२) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या बाबींची आणि हा अधिनियम, परिनियम किंवा आदेश याद्वारे किंवा त्यान्वये ज्या बाबींसाठी विनियमाद्वारे तरतूद करावयाची आहे किंवा तरतूद करता येईल अशा सर्व किंवा कोणत्याही बाबींची तरतूद करणाया विनियमांचा मसुदा तयार करील आणि तो, व्यवस्थापन मंडळाच्या किंवा, यथास्थिति, विद्यापरिषदेच्या मान्यतेसाठी ठेवील.
प्रकरण सहा
अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या तक्रारींचे निवारण.
तक्रार निवारण समिती.
५०. (१) विद्यापीठांचे अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या तसेच, राज्य शासन व त्यांचे अधिकारी यांच्या विरुद्धच्या तक्रारींखेरीज, ज्या विद्यापीठ न्यायाधिकरणाच्या आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत अशा, इतर सर्व प्रकारच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठामध्ये, एक तक्रार निवारण समिती असेल.
(२) विद्यापीठ, तक्रार निवारण समितीला प्रशासकीय सहाय्य करण्यासाठी सहायक कुलसचिवापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा विद्यापीठाच्या अधिकायाच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करील.
(३) तक्रार निवारण समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरुने नामनिर्देशित केलेला, जिल्हा न्यायाधीशाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा सेवानिवृत न्यायाधीश, अध्यक्ष ;
(ख) कुलगुरुने नामनिर्देशित केलेला एक प्रशालेचा अधिष्ठाता ;
(ग) व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला व्यवस्थापन मंडळाचा एक सदस्य ;
(घ) कुलसचिव, सदस्य-सचिव ;
(ङ) व्यवस्थापन मंडळाने नामनिर्देशित केलेला, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्गातील विद्यापीठाचा एक अध्यापक आणि एक अध्यापकेतर कर्मचारी ;
(च) व्यवस्थापन मंडळाने नामनिर्देशित केलेला, एक विधि सलागार, किंवा समुपदेशी :
परंतु, एक सदस्य महिला असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५१(४) तक्रार निवारण समितीचा अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त झालेल्या न्यायाधीशाचे आणि सदस्य म्हणून प्रशालेच्या अधिष्ठात्याचे नामनिर्देशन हे, कुलगुरू, प्रत्येक प्रकरणी वेळोवेळी ठरवील अशा, एकूण तीन वषार्ंपेक्षा अधिक नसेल अशा कालावधीसाठी करण्यात येईल.
(५) तक्रार निवारण समितीचा अध्यक्ष, विद्यापीठाकडून निर्धारित करण्यात येईल असे पारिश्रमिक व वाहनभत्ता मिळण्यास हक्कदार असेल.
(६) तक्रार निवारण समिती, व्यवहार्य असेल तेथवर, तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत, कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी, समझोता करील व त्यावर निर्णय देईल.
(७) दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, विद्यापीठाच्या व महाविद्यालय न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या कर्मचायांच्या सेवेसंबंधीची गाहाणी किंवा तक्रारी विचारार्थ स्वीकारणे व त्यावर निर्णय देणे हे, तक्रार निवारण समितीसाठी कायदेशीर असेल.
(८) विद्याथ्यार्ंच्या गाहाण्यांचे निवारण करण्यासाठी आणि अशा तक्रारी कमी करण्यासाठी आणि त्यास अटकाव करण्यासाठी उच्चतर प्राधिकरणांना उपाय सुचविण्यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष असेल. विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाची कामकाजविषयक कार्यकारी यंत्रणा ही, विद्यापीठ अनुदान आयोग (तक्रार निवारण) विनियम, २०१२ किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेले इतर कोणतेही विनियम यांच्या तरतुदींनुसार तयार केलेल्या परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे असेल.
न्यायाधिकरण.
२०१७ चा महा. ६.
५१. (१) संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती करिता स्थापन केलेले न्यायाधिकरण हे, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याच्या कलम ८१ च्या पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या बाबींच्या संबधातील विद्यापीठ व विद्यापीठाचे कर्मचारी यांच्यामधील विवादांचा अभिनिर्णय करण्याकरिता या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ न्यायाधिकरण असेल.
(२) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ याची कलमे ८०, ८१, ८२, ८३, ८४ व ८५ यांमध्ये तरतूद केलेला अन्य तपशील व कार्यपद्धती, योग्य त्या फेरफारांसह, विद्यापीठास लागू होतील.
२०१७ चा महा. ६.
प्रकरण सात
प्रवेश, परीक्षा, मूल्यमापन व विद्याथ्यार्ंशी संबंधित असणाया इतर बाबी.
प्रवेश.
५२. शैक्षणिक परिसंस्थांमधील प्रवेशासाठी असलेल्या राज्य शासनाच्या, सर्व आरक्षण धोरणास अधीन राहून, विद्यापीठ प्रशाला, विभाग, केंद्रे व उप-केंद्रे किंवा प्रादेशिक केंद्रे यांमधील सर्व पाठयक्रमांना राज्य शासनाने, वेळोवेळी, काढलेल्या अधिसूचना किंवा आदेश किंवा केलेले नियम यांनुसार स्पर्धात्मक गुणांच्या आधारावर विद्यापीठाकडून प्रवेश देण्यात येतील, आणि शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आधी विद्यापीठाकडून त्यांस प्रसिद्धी देण्यात येईल :
परंतु, शिस्तीचे पालन करण्याच्या दृष्टीने, संबंधित प्राधिकरणास, कोणत्याही शैक्षणिक अध्ययनक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी असेल त्याखेरीज, एखाद्या विद्याथ्र्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल.
५३. विद्यापीठ प्रशाला, विभाग व उप-केंद्रे किंवा प्रादेशिक केंद्रे यांसह केंद्रे यांमधील प्रवेशांसंबंधीचे सर्व विवाद हे, प्रवेशांसंबंधीचे विवाद.
कलम ५० च्या पोट-कलम (८) नुसार विद्यापीठ विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकडून अभिनिर्णीत करण्यात येतील.
परीक्षा व मूल्यमापन.
५४. प्रत्येक शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, विद्यापीठाकडून घेण्यात येणाया पुढील शैक्षणिक वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक आणि जेथे लागू असेल तेथे, अशा प्रत्येक पाठयक्रमाच्या मूल्यमापनाच्या पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीचे वेळापत्रक तयार करील आणि ते प्रसिद्ध करील आणि त्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करील. त्यात निष्फळ ठरल्यास, विद्यापीठाच्या संबंधित प्राधिकरणास किंवा अधिकायास, तीस दिवसांच्या आत त्याबाबतचा सकारण अहवाल व्यवस्थापन मंडळाला सादर करावा लागेल आणि यासंबंधातील व्यवस्थापन मंडळाचे निदेश किंवा निर्णय, अंतिम व बंधनकारक असतील :
परंतु, विद्यापीठाला, त्याच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे व परिस्थितीमुळे उक्त वेळापत्रकाचे पालन करणे शक्य झाले नाही तर, ते, प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचे पालन न करण्याची तपशीलवार कारणे समाविष्ट असणारा अहवाल, व्यवहार्य असेल तितक्या लवकर, कुलपतीला व राज्य शासनाला सादर करील.
५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५स्पष्टीकरण.---'' परीक्षांचे वेळापत्रक '' याचा अर्थ, परीक्षांच्या योजनेचा भाग असलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेची वेळ, दिवस व दिनांक यांचा तपशील देणारा तक्ता, असा आहे आणि त्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षांच्या तपशिलाचा देखील समावेश असेल.
निकाल जाहीर करणे.
५५. विद्यापीठ, त्याने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेचा निकाल, त्या विशिष्ट पाठयक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयत्न करील आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्या अखेरच्या दिनांकापासून उशिरात उशिरा तीस दिवसांच्या आत तो, घोषित करील :
परंतु, जर कोणत्याही कारणाने पूर्वोक्त तीस दिवसांच्या कालावधीच्या आत कोणत्याही परीक्षेचा व मूल्यमापनाचा निकाल अंतिमत: घोषित करणे विद्यापीठाला शक्य झाले नाही तर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा संचालक, अशा विलंबाची कारणे समाविष्ट असणारा एक तपशीलवार अहवाल तयार करील आणि तो कुलगुरुमार्फत कुलपतीला, व्यवस्थापन मंडळाला आणि राज्य शासनाला सादर करील आणि त्या संबंधातील कुलपतीचा निदेश अंतिम व बंधनकारक असेल.
५६. विद्यापीठाने वेळापत्रकाचे पालन केले नाही केवळ या कारणांवरून कोणतीही परीक्षा किंवा मूल्यमापन किंवा परीक्षेचा किंवा मूल्यमापनाचा निकाल अविधिग्रा ठरणार नाही.
वेळापत्रकाचे पालन न केल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन अविधिग्रा न ठरणे.
क्रीडा व अभ्यासक्रमाबाहेरील कार्यक्रम.
५७. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व यथास्थिति, इतर अभ्यासक्रमाबाहेरील कार्यक्रम यांसाठी आपापल्या वगार्ंचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या विद्याथ्यार्ंची निवड, खुल्या स्पर्धेमधून सर्वस्वी गुणवत्तेच्या आधारावरच केली जात आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी, विद्यापीठाची प्राधिकरणे यथोचित परिनियम, आदेश व विनियम तयार करतील.
प्रकरण आठ
परिषदा व समित्या.
५८. या अधिनियमान्वये पुढील समित्या व परिषदा घटित करण्यात येतील :---
परिषदा व समित्या.
(एक) विद्यार्थी परिषद ;
(दोन) वित्त व लेखा समिती ;
(तीन) इमारत व बांधकाम समिती ;
(चार) खरेदी व विक्री समिती ;
(पाच) ज्ञान संसाधन समिती ;
(सहा) शुल्क निश्चिती समिती ;
(सात) निवड व नियुक्ती समिती ;
(आठ) अंतर्गत गुणवत्ता हमी समिती.
विद्यार्थी परिषद. ५९. (१) विद्याथ्यार्ंच्या कल्याणाकडे लक्ष देण्यासाठी आणि अधिक चांगल्या सामुदायिक जीवनासाठी विविध विद्यार्थी संघांच्या अभ्यासक्रमाबाहेरील कार्यक्रमांचे प्रचालन करण्यासाठी व त्याबाबतीत समन्वय साधण्यासाठी एक विद्यार्थी परिषद असेल. विद्यार्थी परिषद, कोणत्याही राजकीय चळवळींमध्ये भाग घेणार नाही.
(२) विद्यार्थी परिषदेमध्ये, पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) संचालक, विद्यार्थी विकास मंडळ-अध्यक्ष ;
(ख) विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींनी त्यांच्यामधून निवडून दिलेला सरचिटणीस सदस्य-सचिव ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५३(ग) जिमखाना सचिव ;
(घ) कुलगुरूने नामनिर्देशित केलेली, एक महिला विद्यार्थी प्रतिनिधी ;
(ङ) विहित केल्याप्रमाणे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा यांच्या शिफारशींवरून कुलगुरूने, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासप्रवर्ग यांच्यामधून आळीपाळीने, नामनिर्देशित केलेला एक विद्यार्थी प्रतिनिधी ;
(च) विहित केल्याप्रमाणे, अनुक्रमे,
(एक) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) किंवा राष्ट्रीय छात्र सेना, (एनसीसी);
(दोन) क्रीडा; आणि
(तीन) सांस्कृतिक कार्ये,
यांमध्ये सहभागी असलेल्या, विद्यापीठ विभागांच्या विद्याथ्यार्ंमधून, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ यांनी नामनिर्देशित केलेला, प्रत्येकी एक विद्यार्थी.
(३) विद्यार्थी परिषदेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु असेल आणि त्याला योग्य वाटतील असे इतर अधिकारी त्या बैठकीस उपस्थित असतील.
(४) विद्यार्थी, जर त्याची पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून नावनोंदणी केली असेल तरच केवळ, विद्यार्थी परिषदेचा सदस्य होण्यास किंवा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असेल.
(५) विद्यार्थी परिषदेचा अर्थसंकल्प, बैठकीची वारंवारता, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
(६) विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचे नामनिर्देशन, किंवा यथास्थिति, निवडणूक ही, प्रत्येक वर्षी, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर, विहित करण्यात येईल अशा दिनांकास घेण्यात येईल. विद्यार्थी सदस्यांचा पदावधी हा, दरम्यानच्या कालावधीत या अधिनियमाद्वारे किंवा त्यान्वये विर्िनदिष्ट केलेल्या निरर्हतेंपैकी कोणत्याही निरर्हतेस पात्र झाला नसेल तर, नामनिर्देशनाच्या किंवा निवडणुकीच्या दिनांकापासून सुरू होऊन शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापयर्ंत असेल, आणि त्यानंतर तो समाप्त होईल.
(७) विद्यार्थी परिषदेच्या एक तृतीयांश सदस्यांनी मिळून गणपूर्ती होईल. बैठकीचे कामकाज चालविण्याची कार्यपद्धती आणि अशा इतर बाबी, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील. प्रत्येक तीन महिन्यांतून किमान एकदा परिषदेची बैठक घेण्यात येईल.
(८) नामनिर्देशनाची किंवा निवडणुकीची प्रक्रिया, अधिकार व कर्तव्ये, निवडणूक घेणारे प्राधिकरण, अशा निवडणुका घेणारी यंत्रणा, उमेदवार व निवडणूक प्रशासक यांच्यासाठी आचारसंहिता आणि अशा निवडणुकीच्या संबंधातील गाहाण्यांचे निवारण करणारी यंत्रणा ही, व्यवस्थापन मंडळाकडून आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
(९) या कलमाच्या तरतुदी, व्यवस्थापन मंडळाने विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे पोट-कलम (८) अन्वये आदेश काढल्यानंतर, अशा आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील.
वित्त व लेखा समिती.
६०. (१) विद्यापीठाच्या र्आथिक व्यवहारांचे नियोजन, समन्वय व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक वित्त व लेखा समिती असेल. उपलब्ध तरतुदी लक्षात घेऊन ही समिती, लेख्यांची, वाढत्या खर्चाची व नवीन खर्चाचा समावेश असणाया नवीन प्रस्तावांची तपासणी करील.
(२) वित्त व लेखा समितीमध्ये, पुढील सदस्यांचा समावेश असेल :---
(क) कुलगुरू, अध्यक्ष ; (ख) लेखा व कोषागारे संचालक किंवा लेखा व कोषागारे सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला त्याचा प्रतिनिधी ;
(ग) व्यवस्थापन मंडळातील कुलपतीची नामनिर्देशित व्यक्ती ;
(घ) कुलगुरुने नामनिर्देशित केलेली विद्या परिषदेतील एक व्यक्ती ;
५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ङ) व्यवस्थापन मंडळाने नामनिर्देशित केलेले दोन तज्ज्ञ, त्यापैकी एक व्यक्ती ही, लेखांकन व लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ असणारी सनदी लेखापाल असेल आणि दुसरी व्यक्ती ही वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ असेल ;
(च) विद्यापीठाने नियुक्त केलेला लेखापरीक्षक ; (छ) कुलसचिव ; (ज) वित्त व लेखा अधिकारी, सदस्य-सचिव.
(३) समितीच्या बैठकीची गणपूर्ती, पाच सदस्यांनी मिळून होईल. (४) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त समितीचे इतर सर्व सदस्य, पाच वषार्ंच्या मुदतीकरिता पद धारण करतील आणि ते, पुनर्नामनिर्देशनासाठी पात्र असणार नाहीत.
(५) समितीची वर्षातून किमान चार वेळा बैठक घेण्यात येईल. (६) वित्त व लेखा समिती,---
(क) वित्त व लेखा अधिकायाने सादर करावयाचे वर्ाषिक लेखा विवरणपत्र, लेखापरीक्षा केलेल्या लेख्यांचे अंतिम विवरणपत्र आणि लेखापरीक्षा अहवाल व त्याचा अनुपालन अहवाल, आणि वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रक यांची तपासणी करील व त्यावर विचार करील आणि मान्यतेसाठी त्याची व्यवस्थापन मंडळास शिफारस करील ;
(ख) उपलब्ध तरतुदी विचारात घेऊन, वाढत्या खर्चाची व नवीन खर्चाचा समावेश असणाया सर्व नवीन प्रस्तावांची तपासणी करील ;
(ग) उत्पादक कामासाठी कर्जातून मिळणाया उत्पन्नासह, विद्यापीठाचे उत्पन्न व साधनसंपत्ती यांवर आधारित असलेल्या, वर्षाच्या एकूण आवर्ती व अनावर्ती खर्चाच्या मर्यादांची व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करील ;
(घ) विद्यापीठाची मत्ता व साधनसंपत्तीची उत्पादक गुंतवणूक व व्यवस्थापन यांबाबत व्यवस्थापन मंडळास शिफारस करील ;
(ङ) विद्यापीठाच्या विकासासाठी साधनसंपत्ती आणखी वाढवण्याच्या संभाव्यतांचा शोध घेईल ; (च) व्यवस्थापन मंडळाने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांकडून विद्यापीठाच्या लेख्यांची लेखापरीक्षा करून घेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करील ;
(छ) विद्यापीठाच्या मालमत्तेच्या व निधीच्या प्रशासनाशी संबंधित असलेल्या बाबींवर व्यवस्थापन मंडळाला सल्ला देईल ;
(ज) राज्य शासनाकडून मिळालेला निधी, मत्ता आणि इतर साधनसंपत्ती यांच्या बाबतीत, राज्य शासनाने, वेळोवेळी काढलेल्या आदेशांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात असल्याबद्दल सुनिश्चिती करील ;
(झ) व्यवस्थापन मंडळाने, विद्या परिषदेने किंवा विद्यापीठाच्या इतर कोणत्याही प्राधिकरणाने, मंडळाने किंवा समितीने अथवा कोणत्याही अधिकायाने तिच्याकडून र्िनदिष्ट केलेल्या वित्तीय बाबीसंबंधात सल्ला देईल ;
(ञ्ा) तिच्या निदर्शनास येईल अशी, वित्तीय बाबीसंबंधातील कोणतीही चूक किंवा अनियमितता कुलगुरुला कळवील, जेणेकरून कुलगुरूला, त्या बाबीच्या गांभीर्यतेचे निर्धारण केल्यानंतर तत्परतेने सुयोग्य कारवाई करता येईल किंवा ती बाब, व्यवस्थापन मंडळाकडे र्िनदिष्ट करता येईल ;
(ट) व्यवस्थापन मंडळाने नेमलेल्या लेखापरीक्षकांकडून व राज्य शासनाने नेमलेल्या सांविधिक लेखापरीक्षकांकडून केल्या जाणाया लेखापरीक्षेसाठी विद्यापीठाचे वर्ाषिक लेखे खुले केले जात असल्याची सुनिश्चिती करील ;
(ठ) वित्तीय स्रोतांचे व्यवस्थापन, लेखे ठेवणे आणि लेखे ठेवण्याची कार्यक्षमता आणि लेखापरीक्षेच्या कार्यपद्धती उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता विविध सुधारणांचा अभ्यास करील ; (ड) विद्यापीठ प्राधिकरणांकडून नेमून देण्यात येतील अशी वित्त व लेख्यांशी संबंधित असलेली इतर कोणतीही कार्ये व कामे पार पाडील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५५६१. (१) विद्यापीठाची लहान व मोठी पायाभूत सुविधांची विकास कामे कार्यक्षमतेने व कालबद्ध इमारत व बांधकाम समिती.
रीतीने पार पाडण्यासाठी एक इमारत व बांधकाम समिती असेल.
(२) इमारत व बांधकाम समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :----
(क) कुलगुरू, अध्यक्ष ;
(ख) व्यवस्थापन मंडळातील कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती ; (ग) विद्यापीठ ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशाचा प्रभार असणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता किंवा कार्यकारी अभियंत्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली त्या प्रदेशातील त्याची नामनिर्देशित व्यक्ती ;
(घ) कुलगुरूने, खाजगी क्षेत्रातून नामनिर्देशित केलेला एक प्रख्यात अभियंता ; (ङ) कुलगुरूने खाजगी क्षेत्रातून नामनिर्देशित केलेला एक प्रख्यात वास्तुविशारद ;
(च) एक वरिष्ठ स्थापत्य अभियंता, अधिमानत: अमरावती महानगरपालिकेचा शहर अभियंता ;
(छ) पर्यावरणपूरक (हरित) इमारतींचे व आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान नवीकरण व पुनर्रचना यांचे ज्ञान असलेला एक पर्यावरण विषयक स्थापत्य अभियंता ;
(ज) नियोजन व वास्तुविशारद विभागाचा प्रमुख, कोणताही असल्यास ;
(झ) वित्त व लेखा अधिकारी ; (ञ्ा) कुलसचिव, सदस्य-सचिव.
(३) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त, समितीचे सर्व सदस्य, तीन वषार्ंच्या मुदतीसाठी पद धारण करतील आणि ते पुनर्नामनिर्देशनासाठी पात्र असणार नाहीत.
(४) जर एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाले असेल तर, ते पद, कुलपतीकडून किंवा, यथास्थिति, कुलगुरूकडून एक महिन्याच्या आत भरण्यात येईल.
(५) इमारत व बांधकाम समिती,----
(क) व्यवस्थापन मंडळाचे निदेशन व संपूर्ण अधीक्षण याखाली, खाजगी अभिकरण किंवा कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांमार्फत करावयाच्या मोठया बांधकामांसह, सर्व प्रकारची बांधकामे करून घेण्यासाठी जबाबदार असेल ;
(ख) अर्थसंकल्पातील निधीच्या उपलब्धतेच्या अधीन राहून, परिरक्षण कामांना प्रशासकीय मान्यता व वित्तीय मंजुरी देईल ;
(ग) सर्व लहान आणि मोठया बांधकामांच्या बाबतीत, व्यवस्थापन मंडळाला शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास त्याची मंजुरी मिळवील ;
(घ) परिरक्षण कामे, लहान बांधकामे व मोठी बांधकामे स्वतंत्रपणे विर्िनदिष्ट करून, आगामी वर्षात करावयाच्या बांधकामाच्या कार्यक्रमाची वित्त व लेखा समितीमार्फत व्यवस्थापन मंडळाला शिफारस करील ;
(ङ) विद्यापीठाच्या कामांसाठी अनुभवसिद्ध व गुणवत्ता असलेल्या अशा तीन वास्तुविशारदांची आणि इतर विशेषीकृत सल्लागारांची एक नामिका तयार करील आणि त्यास व्यवस्थापन मंडळाकडून मान्यता घेईल ;
(च) लहान व मोठया बांधकामांना व्यवस्थापन मंडळाची प्रशासकीय मान्यता व खर्चास मंजुरी मिळाल्यावर, विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखाकडून किंवा विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या नामिकेमधून प्रकल्पासाठी निवडलेल्या वास्तुविशारदाकडून अशा बांधकामांचे नकाशे व अंदाजपत्रके तयार करून घेईल ;
(छ) कंत्राटदारांची परिरक्षणाची कामे व लहान बांधकामे करण्याचा तांत्रिक अनुभव आणि र्आथिक क्षमता या आधारावर मान्यताप्राप्त कत्रांटदारांची एक यादी ठेवील ;
५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ज) तिला आवश्यक वाटेल अशी तांत्रिक छाननी करण्यासाठी जबाबदार असेल ; (झ) काळजीपूर्वक छाननी केल्यानंतर, परिरक्षणाच्या कामांसाठी व मोठया बांधकामांसाठी प्राप्त झालेल्या निविदा स्वीकारण्यासाठी जबाबदार असेल ;
(ञ्ा) विद्यापीठाच्या तांत्रिक कर्मचायांच्या कामावर सर्वसाधारण देखरेख ठेवील ; आणि विशेष करून, अभिलेख व माहिती अद्ययावत ठेवली जात असल्याची आणि नाकारण्यात आलेल्या निविदा वाजवी कालावधीसाठी ठेवल्या जात असल्याची खातरजमा करील ;
(ट) परिरक्षणाची कामे व लहान बांधकामे या बाबतीत, जर वास्तुविशारद नियुक्त केला असेल तर, त्याने अंतिमत: मान्यता दिलेल्या संकल्पचित्रांनुसार, विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखाने किंवा त्याच्या अनुपस्थितीत, स्थापत्य अभियांत्रिकीच्या अध्यापक सदस्याने काम पूर्ण झाल्याचे प्रमाणित केले असल्याची खातरजमा करील ;
(ठ) जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा, सल्ला देणाया वास्तुविशारदांशी सहयोग करील व त्यांच्याशी विचारविमर्श करील ;
(ड) निविदेत समाविष्ट नसलेले दर ठरवील आणि मान्यता मिळालेली मोठी बांधकामे, लहान बांधकामे व परिरक्षणाची कामे यांबाबतीत कंत्राटदाराशी असलेले दावे व विवाद मिटवील :
परंतु, जर कोणतेही दावे किंवा विवाद यांच्या संबंधातील बांधकामाच्या मान्यता दिलेल्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता असेल तर, अशा अधिक खर्चाच्या रकमेस व्यवस्थापन मंडळाची पूर्व मंजुरी घेण्यात येईल ;
(ढ) परिनियमांद्वारे तिला प्रदान करण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करील व अशी इतर कर्तव्ये पार पाडील. (६) समितीच्या अध्यक्षाला, मोठी बांधकामे, लहान बांधकामे व परिरक्षणाची कामे यांच्या बाबतीत, बांधकामाच्या मासिक चालू लेखा देयकांच्या प्रदानास, वास्तुविशारदाची नियुक्ती केली असेल तेव्हा, अशी देयके, वास्तुविशारदाने तपासली आहेत, आणि विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखाने किंवा त्याच्या अनुपस्थितीत, स्थापत्य अभियांत्रिकीच्या अध्यापक सदस्याने ते प्रदानासाठी योग्य असे प्रमाणित केले आहे, यांच्या अधीन राहून, मंजुरी देण्याचा अधिकार असेल. अशा प्रकारे प्रदान केलेली देयके समितीच्या पुढच्या बैठकीत समितीच्या मान्यतेसाठी मांडण्यात येतील.
(७) तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी आकस्मिक निकड असल्याबद्दल विश्वास ठेवण्यास समितीच्या अध्यक्षास वाजवी कारणे असतील तर, त्याला, समितीच्या अधिकारांचा वापर करता येईल. अध्यक्षाकडून अशी प्रकरणे समितीच्या पुढच्या बैठकीत कळविण्यात येतील.
(८) विद्यापीठातील सर्व प्रकारची बांधकामे करण्याची कार्यपद्धती आणि समितीच्या बैठकींमध्ये कामकाज चालविण्याची कार्यपद्धती, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
खरेदी व विक्री समिती.
६२. (१) ज्यामध्ये प्रत्येक बाबीचे स्वतंत्र मूल्य, एका वेळी दहा लाखांहून अधिक असेल अशा बाबींच्या संबंधात, विद्यापीठाच्या सर्व खरेदी व विक्रीशी संबंधित असणाया सर्व बाबी हाताळण्यासाठी एक खरेदी व विक्री समिती असेल.
(२) खरेदी व विक्री समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :-----
(क) कुलगुरू, अध्यक्ष ; (ख) कुलगुरूने नामनिर्देशित केलेला, व्यवस्थापन मंडळाचा एक सदस्य ; (ग) कुलगुरूने, प्राधान्याने उद्योगसमूहातील साहित्य व्यवस्थापन क्षेत्रातील नामनिर्देशित केलेला एक तज्ज्ञ ;
(घ) कुलसचिव ; (ङ) वित्त व लेखा अधिकारी, सदस्य-सचिव.
(३) वित्त व लेखा अधिकायाच्या अनुपस्थितीत, कुलसचिव, खरेदी व विक्री समितीचा सचिव म्हणून काम करील.
(४) खरेदी व विक्री समिती, ज्यांच्यासाठी खरेदी करावयाची आहे त्या विभागाच्या प्रमुखाला किंवा केंद्राच्या प्रमुखाला निमंत्रित करील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५७(५) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त समितीचे इतर सर्व सदस्य, तीन वषार्ंच्या मुदतीकरिता पद धारण करतील आणि विद्यापीठात ते सलग दुसया मुदतीसाठी पद धारण करण्यास पात्र नसतील.
(६) जेथे प्रत्येक बाबींचा स्वतंत्र खर्च एका वेळी दहा लाखांपेक्षा अधिक नसेल तेथे अशा बाबींच्या बाबतीत, विद्यापीठाच्या सर्व खरेदीशी संबंधित असणाया सर्व बाबी, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील.
(७) खरेदी व विक्री समितीचे अधिकार व कर्तव्ये आणि तिच्या बैठकींंची कार्यपद्धती, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
(८) जर सदस्याचे कोणतेही पद रिक्त झाले तर, ते पद, कुलपतीकडून, किंवा यथास्थिति, कुलगुरूकडून एक महिन्याच्या आत भरण्यात येईल.
६३. (१) ज्ञान संसाधन केंद्र, मुद्रण व इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि विद्यापीठाच्या संबंधित सेवा यांचे ज्ञान संसाधन समिती.
प्रशासन, रचना व देखभाल करण्यासाठी एक ज्ञान संसाधन समिती असेल.
(२) ज्ञान संसाधन समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :-----
(क) कुलगुरू, अध्यक्ष ;
(ख) प्रशालांचे सर्व अधिष्ठाते ;
(ग) कुलगुरूने नामनिर्देशित केलेले दोन सदस्य, त्यांपैकी एक सदस्य हा उद्योग क्षेत्रातील असेल आणि दुसरा सदस्य हा राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतील ग्रंथपाल असेल ;
(घ) कुलसचिव ;
(ङ) वित्त व लेखा अधिकारी ;
(च) संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, सदस्य----सचिव.
(३) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त, ज्ञान संसाधन समितीचे सर्व नामनिर्देशित सदस्य हे, तीन वषार्ंच्या कालावधीसाठी पद धारण करतील आणि ते पुननर्ामनिर्देशनासाठी पात्र असणार नाहीत.
(४) ज्ञान संसाधन समितीची वर्षातून किमान तीन वेळा बैठक घेण्यात येईल.
(५) ज्ञान संसाधन समिती,-----
(क) ज्ञान संसाधन केंद्राच्या कामकाजासाठी, दस्तऐवजीकरण सेवा आणि अॅनॉलॉग व डिजिटल स्वरूपातील अभिलेख ठेवण्यासाठी योग्य रचना व सहाय्य करण्याची तरतूद करील ;
(ख) ज्ञान संसाधन केंद्राचे आणि दस्तऐवजीकरण सेवांचे अॅनॉलॉग व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपातील आधुनिकीकरण व सुधारणा करण्यासाठी सुगम व कार्यात्मक योजनेची तरतूद करील ;
(ग) ज्ञान संसाधन केंद्राच्या सेवांसाठी आणि त्यांच्या वापरासाठी विद्यार्थी व इतरांकडून आकारावयाचे शुल्क व इतर आकार यांची विद्यापरिषदेला शिफारस करील ;
(घ) वित्त व लेखा समितीमार्फत व्यवस्थापन मंडळाच्या मान्यतेसाठी, ज्ञान संसाधन केंद्राच्या विकासाचे वर्ाषिक अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तयार करील ;
(ङ) ज्ञान संसाधन केंद्राच्या कार्याबाबतचा वर्ाषिक अहवाल कुलगुरूमार्फत व्यवस्थापन मंडळाला सादर करील ;
(च) प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथालये व माहिती केंद्रे यांच्याबरोबर संपर्क जाळे प्रस्थापित करील ;
(छ) विद्यापीठाची सर्व प्रशासकीय, नियामक, शैक्षणिक व इतर दस्तऐवज यांच्याशी संबंधित असणारी माहिती आणि विद्यापीठ प्रशाला, विद्यापीठाचे विभाग व प्रशासकीय कार्यालये यांच्या कामकाजाशी संबंधित असणारी आधारसामग्री आणि विद्यापीठाच्या मूल्यनिर्धारणाशी व अधिस्वीकृतीशी संबंधित असलेली माहिती धारण करील ;
भाग पाच-७२-८. एचबी-१७६४-8.
५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ज) ज्ञान संसाधन केंद्राची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी कुलगुरू व विद्यापीठ प्राधिकरणे यांच्याकडून नेमून देण्यात येईल असे इतर कोणतेही काम हाती घेईल.
(६) जर सदस्याचे कोणतेही पद रिक्त झाल्यास, ते पद, कुलगुरूकडून एक महिन्याच्या आत भरण्यात येईल.
६४. (१) विद्यापीठाकडून चालविण्यात येणाया प्रत्येक पदवीपूर्व व पदव्युत्तर पाठयक्रम किंवा शुल्क निश्चिती
समिती. अध्ययनक्रम देण्याचा वास्तव खर्च ठरविण्यासाठी एक शुल्क निश्चिती समिती असेल.
(२) शुल्क निश्चिती समिती, विद्यापरिषदेने शिफारस केलेले विविध पाठयक्रम किंवा अध्ययनक्रम यांचे शिकवणी शुल्क, विकास शुल्क, इतर शुल्क व आकार ठरवील, आणि त्यांची, मान्यतेकरिता व्यवस्थापन मंडळाकडे शिफारस करील.
(३) शुल्क निश्चिती समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :----
(क) सेवानिवृत्त कुलगुरु किंवा विद्यापीठाशी संबंधित नसेल असा, शिक्षणाच्या क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेला प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, अध्यक्ष ;
(ख) प्रशालांचे सर्व अधिष्ठाते ;
(ग) कुलगुरुने नामनिर्देशित केलेला, विद्यापीठाशी संबंधित नसलेला एक वित्तीय तज्ज्ञ, प्राधान्याने, सनदी लेखापाल ;
(घ) विद्यापीठाशी संबंधित नसलेला आणि व्यवस्थापन मंडळाने नियुक्त केलेला एक विधि सल्लागार ;
(ङ) कुलसचिव, सदस्य-सचिव.
(४) समितीच्या बैठकीची गणपूर्ती, सात सदस्यांनी मिळून होईल.
(५) पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त समितीचे सर्व सदस्य, पाच वषार्ंच्या मुदतीकरिता पद धारण करतील आणि ते, पुनर्नामनिर्देशनासाठी पात्र असणार नाहीत.
(६) सर्वसाधारणपणे, विविध पाठयक्रमांसाठी किंवा अध्ययनक्रमांकरिता शुल्क निश्चिती समितीने शिफारस केलेले आणि व्यवस्थापन मंडळाने अंतिमरीत्या मान्यता दिलेले शिकवणी शुल्क, विकास शुल्क, इतर शुल्क आणि आकार लागू असतील :
परंतु, या शुल्कांमुळे या संबंधातील राज्य शासनाच्या धोरणांचे उल्लंघन होणार नाही.
(७) आदेशांमध्ये विहित केलेल्या मानकांच्या आधारे शुल्क निश्चितीच्या प्रस्तावांची तपासणी करण्याकरिता व त्यावर विचार करण्याकरिता समितीची वर्षातून किमान दोनदा बैठक होईल आणि समिती, आवश्यक असतील तितक्या बैठकी घेईल. समिती, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी किमान सहा महिने अगोदर विविध पाठयक्रमांचे किंवा अध्ययनक्रमांचे शिकवणी शुल्क, विकास शुल्क, इतर शुल्क व आकार ठरवील.
(८) जर सदस्याचे कोणतेही पद रिक्त झाले तर, ते पद, कुलपतीकडून किंवा, यथास्थिति, कुलगुरूकडून एक महिन्याच्या आत भरण्यात येईल.
६५. (१) या अधिनियमाच्या, परिनियमांच्या आणि आदेशांच्या तरतुदींना अधीन राहून, कुलगुरू, गुणवत्ताक्रमानुसार आणि निवड समितीने केलेल्या शिफारशींनुसार, विद्यापीठ अध्यापकाची नियुक्ती करील.
(२) विद्यापीठ अध्यापकांच्या आणि ज्ञान संसाधन केंद्राच्या संचालकाच्या नियुक्तीची शिफारस करणाया विद्यापीठ अध्यापकांची निवड व नियुक्ती.
निवड समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :----
(क) कुलगुरू, अध्यक्ष ;
(ख) कुलपतीने नामनिर्देशित केलेली, प्राध्यापकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, एक व्यक्ती ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ५९(ग) सदस्य - सचिव म्हणून संबंधित प्रशालेचा अधिष्ठाता ; (घ) कुलगुरूने नामनिर्देशित केलेला संबंधित विद्यापीठ विभागाचा, केंद्र प्रमुख ; (ङ) ज्या विषयासाठी अध्यापकाची निवड करावयाची असेल अशा विषयाचे विशेष ज्ञान असलेल्या, विद्यापरिषदेने शिफारस केलेल्या व विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या, सहापेक्षा कमी नसतील अशा तज्ज्ञांच्या नामिकेमधून व्यवस्थापन मंडळाने नामनिर्देशित केलेले तीन पेक्षा कमी नसतील इतके तज्ज्ञ ;
(च) कुलगुरूने नामनिर्देशित केलेली, प्राध्यापकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांमधील एक व्यक्ती ;
(छ) प्राध्यापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली व्यवस्थापन मंडळाची एक नामनिर्देशित व्यक्ती;
(झ) सह संचालक, उच्च शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, शासनाची एक नामनिर्देशित व्यक्ती :
परंतु, जो सहयोगी प्राध्यापक आहे असा खंड (घ) मध्ये र्िनदिष्ट केलेला प्रमुख हा, सहयोगी प्राध्यापकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या प्राध्यापकाची निवड करण्याकरिता असलेल्या निवड समितीचा सदस्य असेल :
परंतु आणखी असे की, निवड समितीची सदस्य म्हणून नामनिर्देशित करावयाची एक व्यक्ती ही, महिला असेल.
(३) विद्यापीठाने निर्माण केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या, निवडीद्वारे भरावयाच्या, विद्यापीठ अध्यापकाच्या प्रत्येक रिक्त पदाची, नियामक मंडळाच्या शिफारशीवरून कुलगुरूने निर्धारित करावयाची, परिनियमांद्वारे विहित केल्याप्रमाणे, किमान अर्हता व अतिरिक्त अर्हता, वित्तलब्धी व भरावयाच्या पदांची संख्या, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांमधील सदस्यांकरिता राखीव असतील अशा पदांची संख्या यांच्या तपशीलांसह कुलगुरूने मान्यता दिलेल्या मसुद्यानुसार यथोचितरीत्या व व्यापक प्रमाणावर जाहिरात देण्यात येईल आणि जाहिरातीला अनुसरून अर्जदारांना ज्या मुदतीत आपले अर्ज सादर करता येतील, ती वाजवी मुदत देण्यात येईल.
(४) प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, वर्षभरात ज्या व्यक्ती सेवानिवृत्त होणार असतील त्या सर्व व्यक्तींची यादी करण्यात येईल आणि संभाव्य रिक्त पदांची यादी, रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या मान्यतेकरिता पाठविण्यासाठी व्यवस्थापन मंडळाला सादर करण्यात येईल. कुलसचिव, कारवाई सुरू करील आणि पदधारक सेवानिवृत्त होण्यापूर्वी, पदे भरण्यात येतील आणि त्याच्या निवृत्तीनंतर तात्काळ नवीन नियुक्ती करण्यात येत असल्याची सुनिश्चिती करील.
(५) प्रत्येक सदस्याला अशा बैठकीच्या पूर्वी किमान पंधरा दिवस आधी नोटीस देता येईल अशा रीतीने प्रत्येक निवड समितीच्या बैठकीचा दिनांक, निश्चित करण्यात येईल ; आणि प्रत्येक उमेदवाराचा तपशील, निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला बैठकीच्या दिनांकाच्या किमान सात दिवस आधी मिळू शकेल अशा रीतीने, त्याच्याकडे पाठविण्यात येईल.
(६) प्रत्येक निवड समितीच्या बैठकीची सात सदस्यांनी मिळून गणपूर्ती होईल, त्यापैकी किमान दोन सदस्य हे, पोट-कलम (२) च्या खंड (ङ) अन्वये नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असतील.
(७) जर, प्रत्यक्षपणे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंतीअर्जावरून किंवा स्वाधिकारे, कुलपतीने, आवश्यक असेल किंवा आवश्यक ठरली असेल अशी, चौकशी करून किंवा चौकशी केल्यानंतर किंवा ज्या अध्यापकांच्या नियुक्त्यांना बाधा पोचण्याची शक्यता असेल अशा अध्यापकांकडील खुलाशांसह, असे खुलासे घेऊन किंवा ते घेतल्यानंतर, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने किंवा अधिकायाने कोणत्याही वेळी केलेल्या अशा नियुक्त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार नव्हत्या याची खात्री पटली तर, कुलपती, अशा अध्यापकांच्या सेवाशर्ती संबंधीच्या संविदेत काहीही अंतभर्ूत असले तरी, अशा अध्यापकांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर, किंवा अशा नोटिशीऐवजी एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर, त्यांची नियुक्ती समाप्त करण्याचा निदेश, आदेशाद्वारे, कुलगुरूला देऊ शकेल, आणि कुलगुरू, त्या निदेशाचे तात्काळ पालन करील आणि नवीन निवड करण्यासाठी उपाययोजना करील. अशा रीतीने जिची नियुक्ती समाप्त करण्यात आली असेल अशी व्यक्ती, त्या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(८) लगतपूर्ववर्ती पोट-कलमान्वये, कुलपतीने दिलेला कोणताही आदेश हा, अंतिम असेल आणि त्या आदेशाची एक प्रत, तो मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत, कुलगुरूकडून संबंधित अध्यापकावर बजावण्यात येईल.
(९) कोणत्याही व्यक्तीच्या सेवासमाप्तीनंतरच्या कोणत्याही कालावधीसाठी कोणत्याही व्यक्तीला विद्यापीठ निधीमधून वेतनाच्या किंवा भयाच्या मार्गाने कोणतेही प्रदान केले जात नसल्याची सुनिश्चिती करणे हे कुलगुरूचे कर्तव्य असेल, आणि असे कोणतेही प्रदान करण्यास प्राधिकृत करणारा किंवा देणारा कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी अशा प्रदान केलेल्या रकमेची विद्यापीठाला प्रतिपूर्ती करण्यास जबाबदार असेल.
अंतर्गत गुणवत्ता हमी समिती.
६६. (१) विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक व प्रशासनिक उपक्रमांतील गुणवत्ता हमी व गुणवत्ता वृद्धीची योजना, मार्गदर्शन व संनियंत्रण करण्याकरिता विद्यापीठात एक अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (आयक्यूएसी) असेल.
(२) विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी समिती ही, परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल त्याप्रमाणे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने, अधिस्वीकृती अभिकरणांनी, राज्य शासनाने व कोणत्याही विनियामक प्राधिकरणाने वेळोवेळी काढलेल्या मार्गदर्शक तवांनुसार, घटित करण्यात येईल आणि कार्य करील.
(३) अंतर्गत गुणवत्ता हमी समितीकडून (आयक्यूएसी) वर्ाषिक गुणवत्ता हमी अहवाल तयार करण्यात येईल आणि तो, व्यवस्थापन मंडळापुढे त्याच्या मान्यतेसाठी आणि पाठपुराव्याची कारवाई करण्यासाठी आणि आवश्यक असलेल्या गुणवत्तावृद्धी उपाययोजना करण्यासाठी ठेवण्यात येईल. विद्यापीठ, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडे किंवा इतर अधिस्वीकृती मंडळांकडे, वर्ाषिक गुणवत्ता हमी अहवाल नियमितपणे सादर करील.
(४) अंतर्गत गुणवत्ता हमी समिती, राज्यस्तरीय गुणवत्ता हमी मंडळे, कोणतीही असल्यास, यांच्याबरोबर निकटपणे कार्य करील.
विद्यापीठ अध्यापकांची तात्पुरती रिक्त पदे भरणे.
६७. राजीनामा, रजा किंवा कोणतेही कारण यांपैकी ज्या कोणत्याही कारणाने तात्पुरत्या रिक्त होणाया विद्यापीठ अध्यापकाच्या पदावर नियुक्ती करावयाची असेल त्याबाबतीत, जर रकित पद एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल तर, कलम ६५ च्या तरतुदींनुसार निवड समितीच्या शिफारशीवरून, त्यावर नियुक्ती करण्यात येईल. निवड समितीची गणपूर्ती सात सदस्यांनी मिळून होईल.
६८. (१) कुलसचिव आणि वित्त व लेखा अधिकारी पदांच्या नियुक्तीसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी करण्यासाठी पुढील सदस्यांचा समावेश असलेली एक निवड समिती असेल :--
(क) कुलगुरू, अध्यक्ष ;
विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवड समिती.
(ख) व्यवस्थापन मंडळातील कुलपतीची नामनिर्देशित व्यक्ती ;
(ग) विद्यापीठाशी संबंधित नसलेले व भरावयाच्या पदाशी संबंधित असलेल्या क्षेत्रातील विशेष ज्ञान असणारे कुलगुरूने नामनिर्देशित केलेले दोन तज्ज्ञ ;
(घ) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्ग यांमधील, प्राचार्य किंवा प्राध्यापक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, कुलगुरूने नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती ;
(ङ) प्राध्यापकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, कुलगुरूने नामनिर्देशित केलेली एक महिला प्रतिनिधी ;
(च) संचालक, तंत्र शिक्षण किंवा सह संचालक, तंत्र शिक्षण याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेली, संचालकाची नामनिर्देशित व्यक्ती ;
(छ) कुलसचिव, सदस्य-सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ६१(२) पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या पदांची यथोचितरीत्या व व्यापक प्रमाणावर जाहिरात देण्यात येईल.
(३) प्रत्येक सदस्यास त्यासंबंधी किमान पंधरा दिवसांची पूर्व नोटीस देता येईल अशा रीतीने, प्रत्येक निवड समितीच्या बैठकीचा दिनांक, निश्चित करण्यात येईल ; आणि प्रत्येक सदस्याला बैठकीच्या दिनांकापूर्वी किमान सात दिवस आधी मिळू शकेल अशा रीतीने प्रत्येक उमेदवाराचा तपशील, त्याच्याकडे पाठविण्यात येईल.
(४) पोट-कलम (१) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या पदावरील नियुक्तीच्या बाबतीत, जर, प्रत्यक्षपणे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंती अर्जावरून किंवा स्वाधिकारे, कुलपतीने, आवश्यक असेल किंवा आवश्यक ठरली असेल अशी चौकशी करून किंवा चौकशी केल्यानंतर किंवा ज्या व्यक्तीच्या नियुक्तीस बाधा पोहोचण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीकडील खुलाशांसह असे खुलासे घेऊन किंवा ते घेतल्यानंतर, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणानेे किंवा अधिकायाने कोणत्याही वेळी केलेली अशी नियुक्ती, त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार नव्हती याची खात्री पटली तर, कुलपती, अशा व्यक्तीच्या सेवा शर्तीसंबंधीच्या संविदेत काहीही अंतभर्ूत असले तरी, अशा व्यक्तीला एक महिन्याची पूर्व नोटीस दिल्यानंतर किंवा अशा नोटिशीऐवजी एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर, तिची नियुुक्ती समाप्त करण्याचा निदेश, आदेशाद्वारे, कुलगुरूला देऊ शकेल आणि कुलगुरू, त्या निदेशाचे तात्काळ अनुपालन करील आणि नवीन निवड करण्यासाठी उपाययोजना करील. अशा रीतीने जिची नियुुक्ती समाप्त करण्यात आली असेल अशी व्यक्ती, त्या पदासाठी पुन्हा अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
(५) लगतपूर्ववर्ती पोट-कलमान्वये कुलपतीने दिलेला कोणताही आदेश हा, अंतिम असेल आणि त्या आदेशाची एक प्रत, तो मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत, कुलगुरूकडून संबंधित व्यक्तीवर बजावण्यात येईल.
(६) कोणत्याही व्यक्तीला, तिच्या सेवा समाप्तीनंतरच्या कोणत्याही कालावधीसाठी, विद्यापीठाच्या निधीतून वेतनाच्या किंवा भयाच्या मार्गाने कोणतेही प्रदान केले जात नसल्याची सुनिश्चिती करणे हे, कुलगुरूचे कर्तव्य असेल आणि असे कोणतेही प्रदान करण्यास प्राधिकृत करणारा किंवा देणारा कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, अशा प्रदान केलेल्या रकमेची विद्यापीठाला प्रतिपूर्ती करण्यास जबाबदार असेल.
(७) विद्यापीठाची निवड समिती आणि अन्य अधिकायांच्या नियुक्तीची किंवा नामनिर्देशनाची पद्धत, प्रमाण संहितेमध्ये विहित केल्याप्रमाणे असेल.
इतर समित्या.
६९. या अधिनियमान्वये घटित केलेल्या समित्यांशिवाय , विद्यापीठाच्या प्राधिकरणांना, कोणत्याही विशिष्ट कामाकरिता योग्य अटी व निर्देश यांसह समिती नियुक्त करता येईल आणि अशा समितीमध्ये, अशी समिती घटित करणाया त्या प्राधिकरणाचे सदस्य आणि तसेच ते प्राधिकरण नामनिर्देशित करील अशा अन्य व्यक्ती यांचा समावेश असेल.
प्रकरण नऊ
नावनोंदणी, पदव्या व दीक्षांत समारंभ.
७०. सर्व शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण, संशोधन, संशोधन सहयोग व भागीदारी, परिनियमांद्वारे विहित अध्यापन व संशोधन.
करण्यात येईल अशा रीतीने सर्वसाधारणपणे विद्यापीठामध्ये, करण्यात येईल.
७१. विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करावयाची व्यक्ती, आदेशांद्वारे विहित करण्यात येतील विद्याथ्यार्ंची नाव- नोंदणी.
अशा अर्हता धारण करील आणि आदेशांद्वारे विहित करण्यात येतील अशा शतर्ींची पूर्तता करील.
७२. (१) विद्यापीठ प्रशाला व विभाग यांच्या विद्याथ्यार्ंच्या संबंधातील शिस्त व शिस्तभंगाची कारवाई यांच्याशी संबंधित असणारे सर्व अधिकार, कुलगुरूकडे निहित असतील.
(२) कुलगुरूस, आदेशाद्वारे, पोट-कलम (१) खालील त्याला योग्य वाटतील असे, त्याचे सर्व किंवा त्यापैकी
शिस्तभंगविषयक अधिकार व विद्याथ्यार्ंमधील शिस्त.
कोणतेही अधिकार, याबाबतीत तो नामनिर्देशित करील अशा, इतर अधिकायास सोपविता येतील.
६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(३) कुलगुरूस, आपल्या अधिकारांचा वापर करताना, आदेशाद्वारे, कोणत्याही विद्याथ्र्याची किंवा विद्याथ्यार्ंची विर्िनदिष्ट कालावधीसाठी हकालपट्टी करण्यात यावी किंवा त्यांना काढून टाकण्यात यावे अथवा विद्यापीठातील अभ्यास पाठयक्रमासाठी किंवा पाठयक्रमांसाठी विर्िनदिष्ट कालावधीकरिता त्यांना प्रवेश देऊ नये अथवा विद्यापीठाकडून परिनियमांद्वारे विहित करण्यात येईल इतकी द्रव्यदंडाची शिक्षा करण्यात यावी किंवा विद्यापीठाकडून घेण्यात येणाया परीक्षेस किंवा मूल्यमापनास बसण्यास पाच वषार्ंहून अधिक नसेल एवढया विर्िनदिष्ट कालावधीसाठी मनाई करण्यात यावी, अथवा तो किंवा ते विद्यार्थी ज्या परीक्षेला किंवा परीक्षांना बसला असेल किंवा बसले असतील, त्या परीक्षेचा किंवा परीक्षांचा संबंधित विद्याथ्र्याचा किंवा विद्याथ्यार्ंचा निकाल रद्द करण्यात यावा, असा निदेश देता येईल :
परंतु, कुलगुरू, जर हकालपट्टी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेली असेल तर, संबंधित विद्याथ्र्याला त्याची बाजू मांडण्याची वाजवी संधी देईल.
(४) कुलगुरूच्या आणि विभाग प्रमुखांच्या व विद्यापीठाच्या केंद्रांच्या अधिकारांना बाध येऊ न देता, त्यांच्या संबंधित प्रभाराखालील विद्याथ्यार्ंवर योग्य ती शिस्त राखण्यासाठी आवश्यक असतील अशा सर्व अधिकारांचा वापर करण्याचा प्राधिकार असेल.
(५) विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंची शिस्त व योग्य वर्तणूक आणि शिस्त भंग केल्याबद्दल किंवा गैरवर्तणुकीबद्दल त्यांच्याविरुद्ध करावयाची कार्यवाही यासंबंधातील तरतुदी, परिनियमांद्वारे विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील आणि त्या, विद्यापीठाच्या सर्व विद्याथ्यार्ंना लागू होतील.
(६) विद्याथ्यार्ंची शिस्त व योग्य वर्तणूक यांसंबंधातील परिनियम, आणि शिस्तीचा भंग किंवा गैरवर्तणूक केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध करावयाची कारवाई, माहिती पुस्तिकेमध्ये आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानुसार ती प्रत्येक विद्याथ्र्याला अवगत करण्यात येईल.
(७) प्रवेशाच्या वेळी, प्रत्येक विद्यार्थी, तो स्वत: विद्यापीठाच्या कुलगुरूच्या आणि विद्यापीठाचे इतर अधिकारी आणि प्राधिकरणे अथवा मंडळे यांच्या शिस्तविषयक अधिकारितेच्या अधीन असेल आणि त्याबाबतीत केलेल्या परिनियमांचे पालन करील व ते त्याला बंधनकारक राहतील अशा आशयाच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करील.
७३. (१) व्यवस्थापन मंडळास, विद्यापरिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाध्या सुरू करता येतील आणि प्रदान करता येतील.
पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाध्या. (२) व्यवस्थापन मंडळास, विद्यापरिषदेकडून शिफारस करण्यात येईल अशी विज्ञान वाचस्पती (डी. एससी.) व साहित्य वाचस्पती (डी. लिट.) यांसारख्या संशोधनावर आधारित विद्यावाचस्पती पदव्युत्तर (पोस्ट-डॉक्टोरल) पदव्या सुरू करता येतील आणि त्या प्रदान करता येतील.
(३) कुलपतीस, जर नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असणाया कोणत्याही अपराधाबद्दल न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषसिद्ध ठरविले असेल किंवा तिने कोणत्याही पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र पाठयक्रमाला कपटपूर्ण मार्गाने प्रवेश मिळविला असल्याचे आढळून आले असेल, किंवा तिने अशी पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र किंवा अन्य कोणतीही विद्याविषयक विशेषोपाधी कपटपूर्ण मार्गाने मिळवली असल्याचे आढळून आले असेल तर, अशा प्रत्येक प्राधिकरणाच्या बैठकीत हजर असणाया सदस्यांच्या दोन-तृतीयांशापेक्षा कमी नसेल इतक्या सदस्यांच्या, आणि अशा बहुमतास अशा प्रत्येक प्राधिकरणाच्या सदस्यांच्या निम्म्यापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांचा अंतर्भाव असणाया बहुमताने पुष्टी दिल्यावर, व्यवस्थापन मंडळाच्या व विद्यापरिषदेच्या शिफारशीवरून, ती पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र अथवा इतर कोणतीही विद्याविषयक विशेषोपाधी कायमस्वरूपी किंवा कुलपतीला योग्य वाटेल अशा मुदतीसाठी काढून घेता येईल. संबंधित व्यक्तीस, स्वत:चे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय या कलमान्वये अशी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
मानद पदवी. ७४. विद्यापरिषदेस, कोणत्याही व्यक्तीला, कोणतीही चाचणी किंवा परीक्षा किंवा मूल्यमापन परीक्षा देण्यास भाग न पाडता, तिचे श्रेष्ठ स्थान किंवा कोणत्याही क्षेत्राशी संबंधित नैपुण्य यामुळे मानद पदवी किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधी मिळण्यास ती पात्र व योग्य व्यक्ती आहे केवळ याच कारणांवरून त्या व्यक्तीला अशी मानद पदवी किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधी प्रदान करण्याबाबत तिचा विचार करता येईल आणि त्याबाबत व्यवस्थापन मंडळाला शिफारस करता येईल, आणि व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीला हजर असणाया सदस्यांच्या दोन-तृतीयांशापेक्षा कमी नसेल इतक्या, त्याच्या एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा कमी नसतील इतक्यामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ६३ सदस्यांच्या बहुमताने पुष्टी मिळाली तर, अशी शिफारस यथोचितरीत्या संमत करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल :
परंतु, कुलगुरूने कुलपतीची पूर्वमान्यता मिळवलेली असल्याखेरीज, अशी पदवी किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधी प्रदान करण्यात येणार नाही :
परंतु, आणखी असे की, विद्यापीठाच्या स्थापनेच्या पहिल्या पाच वषार्ंच्या आत, अशी कोणतीही मानद
दीक्षांत समारंभ.
पदवी किंवा विद्याविषयक विशेषोपाधी प्रदान करण्यात येणार नाही. ७५. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा, पदव्या, पदविकोत्तर पदविका, पदव्युत्तर पदविका प्रदान करण्याकरिता किंवा इतर कोणत्याही प्रयोजनांकरिता परिनियमांद्वारे विहित केलेल्या रीतीने, शैक्षणिक वर्षातून किमान एकदा आयोजित करण्यात येईल.
प्रकरण दहा विद्यापीठ निधी, लेखे व लेखापरीक्षा.
वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रक.
७६. (१) आगामी वित्तीय वर्षाकरिता विद्यापीठाचे वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रक (अर्थसंकल्प) वित्तीय वर्ष सुरू होण्यापूर्वी किमान दोन महिने आधी वित्त व लेखा समितीच्या निदेशाअन्वये वित्त व लेखा अधिकायांकडून तयार करण्यात येईल.
(२) त्यानंतर, वित्त व लेखा अधिकारी, वर्ाषिक वित्तीय अंदाजपत्रकाच्या (अर्थसंकल्पाच्या) प्रती, व्यवस्थापन मंडळाकडे, त्याच्या मान्यतेसाठी पाठवील आणि त्यानंतर, त्या प्रती, कुलपती व राज्य शासनाकडे पाठवील.
(३) राज्य शासनाचे जे वित्तीय वर्ष असेल तेच विद्यापीठाचे वित्तीय वर्ष असेल. ७७. (१) विद्यापीठ पुढील निधी स्थापन करील :---
विद्यापीठ निधी.
(क) सर्वसाधारण निधी ; (ख) (एक) राज्य शासनाने निर्माण केलेल्या व मान्यता दिलेल्या सर्व अध्यापक व अध्यापकेतर पदांकरिता ;
(दोन) विद्यापीठाने स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या सर्व अध्यापक व अध्यापकेतर पदांकरिता वेतन निधी ;
(ग) विश्वस्त निधी ; (घ) विकास व कार्यक्रम निधी ; (ङ) आकस्मिकता निधी ; (च) विद्यापीठाच्या मते, जो स्थापन करणे आवश्यक असल्याचे मानण्यात आले आहे असा इतर कोणताही निधी. (२) पुढील रकमा सर्वसाधारण निधीचा भाग असतील, किंवा त्यामध्ये त्यांचा भरणा करण्यात येईल :---
(क) राज्य शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून किंवा इतर कोणत्याही केंद्र किंवा राज्य प्राधिकरणाकडून किंवा केंद्र किंवा राज्य मंडळाकडून प्राप्त झालेले वेतनेतर अंशदान किंवा अनुदान ;
(ख) शुल्क, इतर शुल्क व आकार यांमधून मिळणाया उत्पन्नासह, अन्य कोणत्याही मार्गाने विद्यापीठाला मिळणारे सर्व उत्पन्न ;
(ग) व्यवस्थापन मंडळाच्या परवानगीने बँकांकडून किंवा अन्य कोणत्याही अभिकरणाकडून कर्जाऊ घेतलेल्या कोणत्याही रकमा ;
(घ) अन्य कोणत्याही स्रोतातून किंवा अभिकरणाकडून मिळालेल्या रकमा.
(३) पोट-कलम (१) च्या खंड (ख) च्या उपखंड (एक) मध्ये नमूद केलेल्या वेतन निधीमध्ये, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी या दोन्हींच्या, केंद्र सरकार किंवा विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), किंवा इतर कोणतेही केंद्र किंवा राज्य प्राधिकरण किंवा केंद्र किंवा राज्य मंडळ यांच्या सर्व मंजूर पदांकरिता, वेतन व भत्ते यांच्या पूर्णत: किंवा अंशत: प्रदानापोटी राज्य शासनाकडून मिळालेल्या सर्व रकमांचा समावेश होईल. पोट-कलम (१) च्या खंड (ख) च्या उपखंड (एक) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनासाठीच केवळ या निधीमधील रकमेचा वापर करण्यात येईल.
६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(४) पोट-कलम (१) च्या खंड (ख) च्या उपखंड (दोन) मध्ये नमूद केलेल्या वेतन निधीमध्ये, विद्यापीठाने स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या सर्व अध्यापक व अध्यापकेतर पदांकरिता वेतन व भत्ते यांच्या पूर्णत: किंवा अंशत: प्रदानापोटी, विद्यापीठाने त्याच्या स्वत:च्या स्रोतांमधून विनियोजित केलेल्या सर्व रकमांचा समावेश होईल. पोट-कलम (१) च्या खंड (ख) च्या उपखंड (दोन) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनासाठीच केवळ या निधीमधील रकमेचा वापर करण्यात येईल.
(५) विश्वस्त व्यवस्था, संस्था, मृत्युपत्रित दान, देणग्या, निगम सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर), दान निधी, रोख अर्थसहाय्ये व तत्सम अनुदाने यांपासून मिळणारी सर्व अंशदाने, उत्पन्न किंवा पैसा यांचा मिळून विश्वस्त निधी बनेल.
(६) (क) विद्यापीठाच्या विकास व कार्यक्रम निधीमध्ये, राज्य शासनाकडून मिळालेली सर्व पायाभूत विकास अनुदाने, विकास व संशोधन यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेली सर्व अंशदाने आणि केंद्र सरकारची इतर निधी पुरवठा करणारी अभिकरणे, संयुक्त राष्ट्रे व त्यांच्या संलग्न संस्था, इतर आंतरराष्ट्रीय अभिकरणे, उद्योग, बँका व वित्त संस्था किंवा इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून मिळालेली संशोधन अनुदाने यांचा समावेश होईल ;
(ख) या निधीमधील कोणत्याही रकमेचे, विद्यापीठाच्या इतर कोणत्याही निधीसाठी विनियोजन करण्यात येणार नाही किंवा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी ती खर्च करण्यात येणार नाही ;
(ग) विकास व कार्यक्रम निधीचा, कार्यक्रमांच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेल अशा रीतीने आणि व्यवस्थापन मंडळाने मंजूर करावयाचा व मान्यता द्यावयाचा खर्च व लेखापरीक्षा यांबाबतच्या मार्गदर्शक तवानुसार वापर करण्यात येईल.
(७) विद्यापीठाचा, विद्यापीठ लेख्याच्या स्वतंत्र शीर्षाखाली एक आकस्मिकता निधी असेल आणि ते, तो ठेवील, अकल्पित खर्च भागविण्याच्या प्रयोजनासाठीच केवळ त्याचा वापर करण्यात येईल.
(८) उपरोक्त प्रयोजनांसाठी जिचा तात्काळ किंवा नजीकच्या दिनांकाला वापर करता येणार नसेल अशी, या निधीच्या जमाखाती असलेली अतिरिक्त रक्कम, त्यातून उपर्ाजित होणाया रकमांसह वेळोवेळी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्यात येईल.
वर्ाषिक लेखे व लेखापरीक्षा.
७८. (१) विद्यापीठाचे लेखे, दुबार नोंद लेखांकन पद्धतीच्या व तवांच्या आधारे ठेवण्यात येतील आणि अनुसरावयाची लेखांकन पद्धती, राज्य शासनाने विहित केलेल्या लेखा संहितेचे अनुपालन करणारी व्यापारी लेखांकन पद्धती असेल.
(२) विद्यापीठांच्या लेख्यांची दरवर्षी, किमान एकदा आणि कोणत्याही परिस्थितीत वित्तीय वर्ष संपल्यानंतर चार महिन्यांच्या आत, व्यवस्थापन मंडळाने, विद्यापीठाची कोणतीही प्राधिकरणे किंवा त्यांचे व्यवहार यांमध्ये ज्यांच्या भागीदारांचा कोणताही हितसंबंध असणार नाही अशा सनदी लेखापालांच्या भागीदारी संस्थांमधून नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षा करण्यात येईल. विद्यापीठ, असा लेखापरीक्षा अहवाल, मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत, लेखापरीक्षा अहवालात नमूद केलेल्या अभिप्रायांचे अनुपालन करील.
(३) लेखापरीक्षा झालेले लेखे विद्यापीठाद्वारे प्रसिद्ध केले जातील व त्यांची एक प्रत लेखापरीक्षकांच्या अहवालासह व अनुपालन अहवालासह, कुलपतीस व राज्य शासनास सादर करण्यात येईल आणि वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत, कोणत्याही परिस्थितीत, ती, व्यवस्थापन मंडळासमोर मान्यतेसाठी देखील सादर करण्यात येईल.
(४) राज्य शासन, त्यास प्राप्त झालेले विद्यापीठाचे लेखापरीक्षित वर्ाषिक लेखे, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहांपुढे मांडण्याची व्यवस्था करील.
१९३० चा २५.
(५) राज्य शासन, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांकडून नियमित कालांतरांने, विद्यापीठाच्या लेख्यांची, चाचणी दाखल लेखापरीक्षा किंवा पूर्ण लेखापरीक्षा करण्याकरिता तरतूद करील, ही लेखापरीक्षा, महाराष्ट्र स्थानिक निधी अधिनियमाच्या तरतुदींनुसार करण्यात येईल. आणि विद्यापीठ प्राधिकरणे त्याकरिता सुविधा पुरविण्यास बांधील असतील, त्यात कसूर केल्यास, त्या अधिनियमाच्या कलम ७ च्या तरतुदी लागू होतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ६५वर्ाषिक अहवाल.
७९. (१) विद्याविषयक परिषद, अधिष्ठाता यांच्या मदतीने, प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाचा प्रशासनिक, विद्याविषयक, संशोधन व विकासविषयक व अन्य कार्यक्रम समाविष्ट असलेला वर्ाषिक अहवाल तयार करील आणि तो मान्यतेसाठी व्यवस्थापन मंडळाला सादर करील. व्यवस्थापन मंडळाने मान्य केलेला असा अहवाल, कुलपती व राज्य शासन यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एका वर्षाच्या आत, सादर करण्यात येईल.
(२) राज्य शासन, वर्ाषिक अहवाल, प्राप्त झाल्याबरोबर, तो लवकरात लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे मांडण्याची व्यवस्था करील.
प्रकरण अकरा
संकीर्ण.
८०. (१) विद्यापीठाच्या हिताचे यथोचित रक्षण करण्यात येत आहे याची खात्री करणे हे, विद्यापीठाच्या कर्मचायांसहित त्याच्या प्रत्येक प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे आणि अधिकायाचे कर्तव्य असेल.
नुकसानीबद्दल प्राधिकरणे आणि अधिकारी जबाबदार असणे.
(२) विद्यापीठाच्या कर्मचायांसह त्याच्या कोणत्याही प्राधिकरणाने किंवा मंडळाने किंवा अधिकायाने, सद्भावनेने केलेली असेल त्या खेरीज इतर कोणतीही कारवाई ही, हा अधिनियम, परिनियम, आदेश किंवा विनियम यांच्या तरतुदींशी सुसंगत नसेल अशा कोणत्याही कृतीमुळे, अथवा त्याने हेतुपुरस्सर हयगय किंवा कसूर करून त्या तरतुदींशी सुसंगत अशी कृती न केल्यामुळे विद्यापीठाचे कोणतेही नुकसान किंवा हानी झाल्याचे आढळून आले तर, परिनियमांद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार, असे नुकसान किंवा हानी त्या प्राधिकरणाकडून किंवा मंडळाकडून अथवा त्याच्या संबंधित सदस्यांकडून संयुक्तपणे किंवा पृथकपणे किंवा, यथास्थिति, संबंधित अधिकायाकडून वसूल केली जाण्यास पात्र असेल.
विद्यापीठाचा अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचारी निरर्ह न ठरणे.
८१. (१) विद्यापीठाचा अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचारी, त्यास राज्य विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा अथवा संसदेचा सदस्य म्हणून निवडून देण्यात किंवा नामनिर्देशित करण्यात आलेला आहे केवळ याच कारणावरून असा अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचारी असण्याचे चालू राहण्यासाठी निरर्ह ठरणार नाही.
(२) राज्य विधानसभेचा किंवा विधानपरिषदेचा अथवा संसदेचा सदस्य म्हणून निवडून देण्यात किंवा नामनिर्देशित करण्यात आलेला विद्यापीठाचा अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचारी हा, त्याचा विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या अथवा संसदेच्या सदस्यत्वाचा कालावधी बिनपगारी आणि बिनभत्ता रजा म्हणून मानला जाण्यास हक्कदार असेल.
(३) पोट-कलम (२) मध्ये र्िनदिष्ट केलेला अध्यापक किंवा अध्यापकेतर कर्मचारी, त्याच्या विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या अथवा संसदेच्या सदस्यत्वाचा कालावधी, निवृत्तिवेतन, सेवाज्येष्ठता व वेतनवाढी यांच्या प्रयोजनांसाठी हिशेबात घेतला जाण्यास देखील हक्कदार असेल.
अन्वयार्थ लावण्या- संबंधातील प्रश्न व विद्यापीठ प्राधिकरण किंवा मंडळ, इत्यादींच्या रचनेसंबंधातील विवाद.
८२. हा अधिनियम किंवा कोणताही परिनियम, आदेश, किंवा विनियम किंवा नियम यांच्या कोणत्याही तरतुदीचा अन्वयार्थ लावण्याच्या संबंधात किंवा विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण किंवा मंडळ याचा सदस्य म्हणून एखादी व्यक्ती यथोचितरीत्या निवडून आली आहे किंवा तिची नेमणूक करण्यात आली आहे किंवा तिला नामनिर्देशित किंवा स्वीकृत करण्यात आले आहे अथवा सदस्य असण्यास ती हक्कदार आहे किंवा कसे यासंबंधात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास, कुलगुरू, प्रत्यक्ष बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा मंडळाने विनंती अर्ज केल्यावरून, किंवा स्वाधिकारे, व्यवस्थापन मंडळामार्फत ती बाब कुलपतीकडे विचारार्थ पाठवील आणि कुलपती, त्याला आवश्यक वाटेल असा सल्ला त्यावर घेतल्यानंतर, त्या प्रश्नांचा निर्णय करील आणि त्याचा निर्णय अंतिम असेल :
परंतु, व्यवस्थापन मंडळाच्या एक-चतुथार्ंशपेक्षा कमी नसतील एवढया सदस्यांनी सहीनिशी मागणी केल्यानंतर, कुलगुरुकडून असा निर्देश देण्यात येईल.
भाग पाच-७२-९. एचबी-१७६४-9.
६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५कृती व आदेश यांचे संरक्षण.
८३. विद्यापीठाने किंवा त्याच्या कोणत्याही अधिकायांनी, प्राधिकरणांनी किंवा मंडळांनी सद्भावनापूर्वक केलेल्या सर्व कृती व काढलेले सर्व आदेश, या अधिनियमाच्या इतर तरतुदींस अधीन राहून, अंतिम असतील ; आणि त्यानुसार सद्भावनापूर्वक केलेल्या आणि हा अधिनियम व परिनियम, आदेश व विनियम यांच्या तरतुदींस अनुसरून केलेल्या किंवा संमत केलेल्या अथवा करण्यात आले असल्याचे किंवा संमत करण्यात आले असल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल, विद्यापीठाविरूद्ध किंवा त्याच्या अधिकायांविरूद्ध, प्राधिकरणांविरूद्ध किंवा मंडळांविरूद्ध कोणताही दावा किंवा इतर कायदेशीर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही किंवा चालविण्यात येणार नाही किंवा त्याच्याकडून कोणत्याही नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार नाही.
अधिकार सोपवणे. ८४. या अधिनियमाच्या आणि परिनियमांच्या तरतुदींस अधीन राहून, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकायास किंवा प्राधिकरणास, परिनियम, आदेश व विनियम करण्याच्या अधिकाराखेरीज, त्यांचे किंवा त्याचे अन्य अधिकार, त्यांच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील इतर कोणत्याही अधिकायास किंवा प्राधिकरणास आदेशाद्वारे प्रदान करता येतील, आणि अशा रीतीने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्याची अंतिम जबाबदारी ही, उक्त अधिकार प्रदान करण्याया अधिकायाकडे किंवा प्राधिकरणाकडे नियमितपणे निहित असेल या शर्तीस अधीन राहून, प्रदान करण्यात येतील.
८५. व्यवस्थापन मंडळाची किंवा विद्याविषयक परिषदेची किंवा विद्यापीठाच्या इतर कोणत्याही प्राधिकरणाची किंवा मंडळाची किंवा समितीची, कोणतीही कृती किंवा कार्यवाही ही,---
कृती व कार्यवाही ही, रचनेतील दोष, रिक्त पदे, कार्यपद्धतीतील नियमबाता, इत्यादी कारणांवरूनच केवळ विधिअग्रा नसणे.
(क) अशा कोणत्याही प्राधिकरणाच्या, मंडळाच्या किंवा समितीच्या सदस्यांपैकी कोणतेही सदस्य हे, निवड, नियुक्त किंवा नामनिर्देशित केलेले नाहीत अथवा इतर कोणत्याही कारणास्तव रचनेच्या वेळी पद धारण करण्यास किंवा त्यांच्या कोणत्याही सभेस उपस्थित राहण्यास उपलब्ध नाहीत किंवा कोणतीही व्यक्ती एकापेक्षा अधिक क्षमतेत सदस्य आहे अथवा त्यांच्या रचनेमध्ये इतर काही दोष आहे, किंवा त्यांच्या सदस्य पदाच्या एक किंवा अधिक जागा रिक्त आहेत केवळ या कारणांवरून विधिअग्रा असल्याचे मानण्यात येणार नाही.
(ख) अशा कोणत्याही प्राधिकरणाच्या, मंडळाच्या किंवा समितीच्या कार्यपद्धतीमध्ये, विचारार्थ कोणत्याही बाबीच्या गुणावगुणांना बाधक न ठरणारी अशी कोणतीही अनियमितता आहे केवळ या कारणांवरून विधिअग्रा असल्याचे मानण्यात येणार नाही, आणि केवळ अशाच कोणत्याही कारणावरून कोणत्याही न्यायालयात अथवा कोणत्याही प्राधिकरणापुढे किंवा अधिकायापुढे त्या कृतीच्या किंवा कार्यवाहीच्या विधिग्रातेवर हरकत घेण्यात येणार नाही.
८६. (१) शासनास, कोणत्याही वेळी, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर, शासन नियुक्त करील असा अध्यक्ष व पाचपेक्षा अधिक असणार नाहीत असे अन्य सदस्य यांचा समावेश असलेला आयोग, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, घटित करता येईल, आणि शासन, अशा आदेशात, आयोगाने अनुसरण करावयाची कार्यपद्धती देखील विर्िनदिष्ट करील.
(२) पोट-कलम (१) अन्वये घटित केलेला आयोग,---
(क) अध्ययन व शिक्षण पाठयक्रमांच्या दर्जाच्या व संबद्धतेच्या विशेष संदर्भातील विद्यापीठाचे विद्यापीठाशी संबंधित असलेल्या विवक्षित बाबींच्या संबंधातील चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचे राज्य शासनाचे अधिकार.
कामकाज ;
(ख) विद्यापीठाची र्आथिक स्थिती ;
(ग) विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने या अधिनियमाच्या किंवा परिनियमांच्या, विनियमांच्या, आदेशांच्या व नियमांच्या तरतुदींची सुयोग्यता ; आणिमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ६७ (घ) शासनाद्वारे त्याच्याकडे र्िनदिष्ट करण्यात येतील अशा इतर बाबी,
यांबाबत चौकशी करील आणि अहवाल तयार करील आणि त्याला योग्य वाटतील अशा शिफारशी शासनास करील.
(३) राज्य शासन, अशा प्रत्येक बाबतीत, चौकशी करवून घेण्याचा आपला इरादा असल्याबद्दल विद्यापीठाला नोटीस देईल आणि अशा चौकशीत अभिवेदन करण्याचा विद्यापीठाला हक्क असेल.
(४) राज्य शासन, अशा चौकशीच्या निष्कर्षाच्या संदर्भातील आपली मते, विद्यापीठाला कळवील आणि त्यावरील विद्यापीठाचे मत जाणून घेतल्यानंतर त्यासंबंधात हाती घ्यावयाच्या कारवाईच्या संबंधात विद्यापीठाला सल्ला देईल व अशी कारवाई करण्याची कालमर्यादा निश्चित करील.
(५) विद्यापीठ, अशा प्रकारे निश्चित केलेल्या कालमर्यादेत, राज्य शासनाने त्यास दिलेल्या आदेशाच्या बाबतीत त्याने हाती घेतलेल्या किंवा हाती घेण्याचे योजिलेल्या कारवाईच्या संबंधात राज्य शासनाला कळवील.
(६) जर विद्यापीठाने, पोट-कलम (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालमर्यादेत कोणतीही कारवाई केली नाही तर किंवा जर विद्यापीठाने केलेली कारवाई राज्य शासनाच्या मते, समाधानकारक नसेल तर, राज्य शासनास, विद्यापीठाने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण किंवा केलेले अभिवेदन विचारात घेतल्यानंतर, त्यास योग्य वाटतील असे निदेश देता येतील व विद्यापीठ अशा निदेशांचे पालन करील.
प्रकरण बारा
संक्रमणकालीन तरतुदी.
विद्यापीठाच्या प्रथम अधिकायांची नियुक्ती.
८७. पहिला कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, संचालक, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन व विद्यापीठाची उद्दिष्टे साध्य केल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले इतर कोणतेही अधिकारी यांची, शासनाकडून एक वषार्ंच्या कालावधीकरिता किंवा अधिनियमानुसार विद्यापीठाच्या अधिकायांची नवीन नियुक्ती करण्यात येईपयर्ंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत, नियुक्ती करण्यात येईल.
६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५८८. (१) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत, व्यवस्थापन मंडळ व इतर प्राधिकरणे घटित करण्यासाठी व्यवस्था करणे हे, प्रथम कुलगुरूचे कर्तव्य असेल.
प्रथम कुलगुरुंचे संक्रमणकालीन अधिकार.
(२) या अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, कुलगुरुस, कुलपतींच्या पूर्वमान्यतेने आणि निधीच्या उपलब्धतेच्या अधीनतेने, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्याच्या प्रयोजनार्थ, विद्यापीठाची सर्व किंवा त्यापैकी कोणतीही कार्ये पार पाडता येतील आणि त्या प्रयोजनार्थ, या अधिनियमाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे, विद्यापीठाची अशी प्राधिकरणे अस्तित्वात येईपयर्ंत, या अधिनियमाद्वारे विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने वापर करावयाच्या कोणत्याही अधिकारांचा वापर करता येईल किंवा पार पाडावयाची कोणतीही कर्तव्ये पार पाडता येतील.
अडचणी दूर करणे. ८९. (१) या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुसार उद्भवेल त्याप्रमाणे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनार्थ, त्यास आवश्यक किंवा इष्ट असल्याचे दिसून येईल अशी, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट, शासकीय राजपत्रातील आदेशाद्वारे, करता येईल :
परंतु, असा कोणताही आदेश, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर काढण्यात येणार नाही.
(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर, शक्य होईल तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ६९उद्देश व कारणे यांचे निवेदन
मराठी भाषा ही, महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी शासनाने, विविध उपाययोजना केलेल्या आहेत. अध्ययनाच्या विविध शाखांचे सखोल आकलन होण्याच्या दृष्टीने, शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा शिक्षणातील वापर वाढविणे आवश्यक आहे. राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींकडून, व्यक्तींकडून व विविध संस्थांकडून अनेक वषार्ंपासून मागणी केली जात होती. विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी आणि मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी शासनाला शिफारस करण्याकरिता, शासनाने, दिनांक ११-०७-२०२३ च्या शासन निर्णयाद्वारे प्रख्यात शिक्षणतज्ञ, डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. प्रस्तावित विद्यापीठाचे स्थान, त्याचे कार्यक्षेत्र, संरचना, घटना, विविध विभाग व प्राधिकरणे, कामकाज, उद्दिष्टे, अधिकार व कार्ये, विद्याशाखा, रोजगाराभिमुख उच्च शैक्षणिक अभ्यास पाठयक्रम आणि त्यांचा अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये मराठी भाषेचे संवर्धन व वापर यांसारख्या विविध पैलूंचा व इतर आनुषंगिक बाबींचा अभ्यास करणे ही, उक्त समितीची कार्यकक्षा होती.
२. उक्त समितीच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर, मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी, आणि मराठीमध्ये रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या उपयोजकांमध्ये मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींकरिता मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना व विधिसंस्थापन करण्यासाठी नवीन कायदा करणे इष्ट आहे असे महाराष्ट्र शासनास वाटते.
३. प्रस्तावित कायद्याची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत, म्हणजे :--
(क) '' मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती '' या नावाचे असंलग्न एकात्म विद्यापीठ स्थापन करणे, ते, एक निगम निकाय असेल;
(ख) विद्यापीठाच्या विविध उद्दिष्टांसाठी तरतूद करणे, जसे की, --
(एक) अध्यापनाद्वारे ज्ञान व समज यांचा प्रसार करणे, त्यांची र्िनमिती व जतन करणे ;
(दोन) मराठी भाषा व साहित्य यामध्ये, संशोधन व विकास करणे, कौशल्य विकास करणे, प्रशिक्षण व शिक्षण देणे, विस्तार व सेवा पुरविणे ;
(तीन) मराठी भाषा, मराठी साहित्य व संस्कृती यांमध्ये, उच्चस्तरीय संशोधन केंद्र म्हणून काम करणे ;
(चार) राज्यभरातील मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे ;
(पाच) भविष्यातील संभाव्य वैज्ञानिक विकास विचारात घेऊन, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक मराठी साहित्यावरील संशोधनाची तरतूद करणे;
(सहा) आधुनिक ज्ञान भाषा व शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा विकास करणे ;
(सात) वरील उद्दिष्टे आणि केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा नियामक प्राधिकरणांनी दिलेले निदेश व केलेले विनियम यांची पूर्तता करण्यासाठी व त्यास चालना देण्यासाठी आवश्यक असतील असे इतर उपक्रम हाती घेणे, इत्यादी ;
(ग) मराठी भाषेची व मराठी साहित्याची जोपासना व संवर्धन करण्याकरिता ज्ञानाच्या अभिवृद्धीसाठी व प्रसारासाठी अध्यापनाच्या विविध शाखांमध्ये आणि त्यांच्या बहुविध-विद्याशाखीय व आंतर-विद्याशाखीय क्षेत्रांमध्ये संशोधन करणे ;
(घ) अध्यापन, अध्ययन, प्रशिक्षण, संशोधन व विकास किंवा विस्तार करण्यासाठी विद्यापीठ प्रशाला, विभाग, केंद्रे, प्रादेशिक केंद्रे किंवा उपकेंद्रे, प्रयोगशाळा, ज्ञान संसाधन केंद्रे, अध्ययन संसाधन केंद्रे, ग्रंथालये, इत्यादींची स्थापन करणे, रचना करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे ;
७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५(ङ) मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करणे ;
(च) राज्य शासनाने, विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि इतर नियामक प्राधिकरणांनी, याबाबत वेळोवेळी, दिलेले निदेश, केलेले नियम, विनियम आणि काढलेल्या अधिसूचना यांनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० याच्याशी अनुरूप असलेल्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, भारतातील किंवा परदेशातील इतर संस्था किंवा विद्यापीठे यांच्याबरोबर बहु-परिसर अध्यापनास व संशोधनास परवानगी देऊन, संयुक्त पदव्या किंवा दुहेरी पदव्या प्रदान करणे आणि श्रेयांकाचे हस्तांतरण करणे ;
(छ) स्वतंत्र स्वरूपात अथवा इतर राज्य किंवा राष्ट्रीय किंवा जागतिक विद्यापीठांबरोबर संयुक्त स्वरूपात विशिष्ट पदव्या, पदविका किंवा प्रमाणपत्रे देण्यासाठी विविध परीक्षांकरिता पसंतीवर-आधारित श्रेयांक प्रणालीमध्ये, शिक्षण देण्याच्या पारंपरिक, समकालीन व भविष्यकालीन पद्धतीमध्ये, शिक्षणाचे व अभ्यासाचे पाठयक्रम विहित करणे ;
(ज) व्यवस्थापन मंडळाच्या, राज्य शासनाच्या व केंद्र सरकारच्या संबंधित परवानगीने, राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर व परदेशात प्रादेशिक केंद्रे किंवा उपकेंद्रे स्थापन करणे ;
(झ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरासह ' सहयोगदायी व सहभागकारक ' अध्ययनाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी, इ-अध्ययन व इ-प्रशासन सेवा, या दोन्हींसाठी सर्वसमावेशक डिजिटल विद्यापीठ संरचना निर्माण करणे.
४. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
नागपूर, दिनांक १४ डिसेंबर, २०२३.
चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ७१वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन
या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहेत : --
खंड १(२).-- या खंडान्वये, राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास, हा अधिनियम अंमलात आणण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ७(३). -- या खंडान्वये, विद्यापीठाचे अधिकारी, अध्यापक व इतर कर्मचारीवर्ग यांचे वर्गीकरण, त्यांच्या निवडीची रीत व पद्धती, नियुक्ती, पदस्थापना व प्रगत प्रशिक्षण, क्षेत्र अनुभव, प्रतिनियुक्ती आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग, र्आथिकदृष्टया दुर्बल घटक (इडब्लूएस) यांमधील व्यक्तींसाठी पदे राखून ठेवणे; त्यांची कर्तव्ये, कामाचा भार, वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ, इतर लाभ, वर्तणूक व शिस्तभंग विषयक बाबी आणि त्यांच्या सेवेच्या इतर शर्ती यांबाबत तरतूद करणारी प्रमाण संहिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विहित करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड १०(३)(च)(पाच). -- या खंडान्वये, कुलपतीशी विचारविनिमय करून, कुलगुरूच्या नियुक्तीसाठी, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता व अनुभव, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ४६(१). -- या खंडान्वये, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी परिनियम तयार करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा किंवा ते निरसित करण्याचा अधिकार, व्यवस्थापन मंडळाकडे घेण्यात आला आहे.
खंड ४८ (१).-- या खंडान्वये, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असतील असे आदेश तयार करण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा किंवा ते निरसित करण्याचा अधिकार, व्यवस्थापन मंडळाकडे घेण्यात आला आहे.
खंड ४९ (१).-- या खंडान्वये, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी आवश्यक असतील असे विनियम तयार करण्याचा अधिकार, नियामक मंडळाकडे घेण्यात आला आहे.
खंड ८४.-- या खंडान्वये, या अधिनियमाच्या व परिनियमांच्या तरतुदींस अधीन राहून, विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकायास किंवा प्राधिकरणास, परिनियम, आदेश व विनियम करण्याच्या अधिकाराखेरीज, त्यांचे किंवा त्याचे अन्य अधिकार, त्यांच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील इतर कोणत्याही अधिकायास किंवा प्राधिकरणास आदेशाद्वारे प्रदान करण्याचा अधिकार, विद्यापीठाकडे घेण्यात आला आहे.
खंड ८६.-- या खंडान्वये, या अधिनियमाच्या प्रारंभापासून पाच वर्षे संपल्यावर आणि त्यानंतर, प्रत्येक पाच वर्षे संपल्यावर, आयोग घटित करण्याची आणि उक्त आयोगाने अनुसरण करावयाच्या कार्यपद्धतीची, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, तरतूद करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
खंड ८९.-- या खंडान्वये, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, ती अडचण दूर करण्यासाठी शासकीय राजपत्रामध्ये प्रसिध्द केलेला आदेश काढण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे वर नमूद केलेले प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचे आहेत.
७२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५वित्तीय ज्ञापन
या विधेयकात, महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा व साहित्य यांची शैक्षणिक स्वायत्तता व उत्कृष्टता, परिवर्तन, सक्षमीकरण व संवर्धन यांकरिता तरतूद करण्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ म्हणून रिद्धपूर, अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचे व विधिसंस्थापित करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे विधेयक, राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून अधिनियमित झाल्यावर, राज्याच्या एकत्रित निधीतून प्रत्येक वर्षी करावयाच्या अंदाजे रुपये सात कोटी पन्नास लाख इतक्या आवर्ती खर्चाचा आणि रुपये दोनशे पाच कोटी इतक्या अनावर्ती खर्चाचा या विधेयकात अंतर्भाव असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ७३भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस (महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, आदेशाची प्रत)
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (३) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन, ते महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक, २०२३ विचारात घेण्याबाबत राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांना शिफारस करीत आहेत.
विधान भवन : नागपूर, दिनांक : १८ डिसेंबर, २०२३.
जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
भाग पाच-७२-१०. एचबी-१७६४-10.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND B00K DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.