Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 (18-12-2023) Publication of names of the candidates as the meritorious workers welfare awardees have been appointed for the post of Special Executive Officers by collector & District Magistrate, Nagpur. Extra-ordinary No.20, Sr. No. 41.

Published 18 December 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ९, अंक २०] सोमवार, डिसेंेबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

---------------------------

भाग १ (असा.) (ना.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. ४१.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

संदर्भ :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, विकाअ-क्र.१११५-प्र.क्र.८८-का. ५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ अन्वये.

क्रमांक सामान्य-कक्ष-९-कावि-८३५-२०२३.----

संदर्भाकित शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. विपिन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: हा निर्णय निर्गमित केलेच्या तारखेपासून ५ वर्ष किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे किंवा पुढील आदेशापयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच, राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी पदाकरीता प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे तात्काळ जमा करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यात सक्षम राहतील. ---

(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट ५ मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीवर न चुकता दिनांकासहीत साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रावर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर " सत्यप्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामाकरीता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो / ती विशेष कार्यकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(२) उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकायांना नसतील.

ना.-एक-१ (१८०५).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ (३) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का संबंधित तहसील कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षांकित केलेल्या कागदपत्राची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी. व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस आयुक्त/अधीक्षक/जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

(४) या शासन निर्णयाव्दारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकतेनुसार त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती/शांतता समितीवर पोलीस आयुक्त /जिल्हाधिकारी/पोलीस अधीक्षक यांनी नियुक्ती करावी.

(५) या शासन निर्णयाव्दारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या " मानसेवा " असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(६) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

परिशिष्ट

नागपूर जिल्ह्यतील गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करीता पात्र १२ उमेदवारांची यादी

अ. संबंधित व्यक्तींचे नाव संबंधित व्यक्तींचा पत्ता पुरस्काराचे पोलीस शैक्षणिक गुन्हा दाखल जिल्हाधिकारी क्र.

नांव स्टेशन पात्रता आहे किंवा यांचा शेरा

नाही (१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) १ श्री. शाम वामनराव साठे रा. अभ्यंकर स्मारक रोड, गुणवंत कामगार गणेशपेठ बी. कॉम नाही पात्र गणेशपेठ, नागपूर

२ श्री. रुपकिशोर लल्लु कनोजीया रा. श्री दत्त मंदिर चे आंत, गुणवंत कामगार कोतवाली १० वी नाही पात्र दसरा रोड, महाल, नागपूर

३ श्री. चंद्रकांत निळकंठराव नाखले रा. ४, राहतेकर वाडी गुणवंत कामगार कोतवाली १० वी नाही पात्र ले आऊट, दसरा रोड, नागपूर

४ श्री. रमेश पुडलिराव वैराळे रा. न्यु पांजरा, कोराडी, गुणवंत कामगार कोराडी १२ वी नाही पात्र ता. कामठी आय.टी.आय

५ श्रीमती डॉ. कमला श्रीदास मोहता रा. ८१, अथर्व रिजेंशी, गुणवंत कामगार बजाजनगर बी. ए. नाही पात्र ४ था माळा, लक्ष्मीनगर, नागपूर

६ श्री. अनिल मधुकरराव मून रा.महात्मा फुले कॉलोनी, गुणवंत कामगार अजनी एम.कॉम नाही पात्र हनुमान मंदिर जवळ, रामेश्वरी रींग रोड, नागपूर

७ डॉ. प्रदिप नारायण येळणे रा. ५०, साईकृपा, गुणवंत कामगार राणा प्रताप एम.ए. नाही पात्र एस. ई रेल्वे कॉलनी, २ नगर राणाप्रताप नगर, नागपूर

८ श्री. अरविंद मनोहरराव देशमुख रा. प्लॉट नं १४, गुणवंत कामगार एम. आय. १० वी नाही पात्र रुक्मीनी कॉम्पलेक्स महिन्द्रा, डी.सी. जयताळा, नागपूरमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर १८, २०२३/अग्रहायण २७, शके १९४५ ३

परिशिष्ट----चालू

(१) (२)

(३) (४) (५) (६) (७) (८) ९ श्रीमती प्रमिला गुलाबराव राऊत रा. प्लॉट नं ५२, दिवान गुणवंत कामगार हुडकेश्वर बी.ए. नाही पात्र ले आऊट, बेसा रोड, मानेवाडा, नागपूर

१० श्री. चंदनलाल मनीराम प्रजापती रा. रंजन बिछायत केंद्र, गुणवंत कामगार तहसील १० वी नाही पात्र हंसापुरी, नागपूर आय. टी. आय

११ श्री. गुलाम करीम फतेह मोहम्मद रा. दिवान शाह तकीया, गुणवंत कामगार तहसील १० वी नाही पात्र मोमीनपुरा, नागपूर

१२ श्री. प्रकाश मोतीराम हेडाऊ रा. काटेकर दवाखान्याच्या गुणवंत कामगार खापरखेडा पदवी नाही पात्र मागे, कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर

नागपूर :

डॉ. विपीन, दिनांक १८ डिसेंबर, २०२३.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 December 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-12-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-12-18.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.