Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part 1 A Amravati 21-12-2023 Publication of Maharashtra Zilla Parishad & Panchayat Samiti Act, 1961 under Section 9(2) by Collector, Akola. Ex. Ord No. 21. Sr. 52.

Published 21 December 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर २८, २०२३/ आशि्वन ६, शके १९४५ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ९, अंक २१] गुरूवार, डिसेंबर २१, २०२३/अग्रहायण ३०, शके १९४५ [पृष्ठे १, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ---अमरावती विभागीय पुरवणी

----------------------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. -----------------------------

भाग १ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५२.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-१९-प्रस-जिप-पंस-कावि-५००-२०२३.----

ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य याच्याकडील जिल्हा परिषद पोट-निवडणुकीच्या संबंधात अधिसूचना क्रमांक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ-जिपपंस-२०२३-प्र. क्र. ०१-का-७, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२३ व एसईसी १०९६-सिआर ३४-९६-पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९६ अन्वये निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे संबंधी तरतूद आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९(२) (अ) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा निवडणूक नियम, १९६२ मधील ६६(१) अन्वये निवडून आलेल्या सदस्याची नावे प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी त्यांची अधिसूचना क्रमांक एसईसी-१०९६-सीआर-३४-९६-पीआर, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहे. त्या अधिकाराचा वापर करुन मी, अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागाच्या दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील अनुसूचित दर्शविलेले उमेदवार त्यांचे समोर नमूद केलेल्या मतदार विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र. निवडणूक विभागाचा आरक्षण निवडून आलेल्या पक्ष कायमचा पत्ता क्रमांक व नांव

सदस्याचे नांव

(४) (५) (६) (१) (२) (३) १ १६-चोहोट्टा सर्वसाधारण श्री. वडाळ योगेश पंजाबराव वंचीत बहुजन आघाडी C/o. वार्ड नं. १,

हनुमान मंदीर जवळ, चोहोट्टा बाजार, ता. अकोट, जि. अकोला.

अकोला : दिनांक २० डिसेंबर, २०२३. अजित कुंभार (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, अकोला. अ.-एक-अ-१ (१८०८). (१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 December 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-12-21.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.