Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 (26-12-2023) Publication of Notification under section 21(1) of the Maharashtra Land Revenue Act, 1966 by Collector, Wardha. Extra Ordinary No. 22, Sr. No.44.

Published 26 December 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-26.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NPCITY/236/2018-20

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ९, अंक २२ ] मंगळवार, डिसेंबर २६, २०२३/पौष ५, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

----------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश. -----------------------------

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २१(१) अन्वये अधिसूचना

क्रमांक-अका-जमीन-कावि-३०१०-२०२३.-----

ज्याअर्थी, अधीक्षक अभियंता, सं.व.सु. मंडळ, म.रा.वि.वि.कं. मर्या., वर्धा यांनी मौजा सावंगी (रिठ), ता. हिंगणघाट येथील स.नं. २ आ. १७.०७ हे. आर पैकी १०.५२ हे. आर जागा मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेकरीता मागणी केलेली आहे ;

ज्याअर्थी, तहसीलदार, हिंगणघाट यांचे पत्र क्र. अका-कानुनगो-वलोप-कावि-११८४-२०२३, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अहवाल सादर केला आहे. सदर अहवालानुसार मंडळ अधिकारी, सिरसगांव व तलाठी आजनसरा यांनी सादर केलेल्या अहवालानुसार खालीलप्रमाणे अहवाल सादर केलेला आहे.---

(१) सदर शेत सव्र्हे क्र. २ आराजी १७.०७ हे. आर. या ७/१२ वर इतर अधिकारामध्ये सार्वजनिक रस्ता नि.प.प्र.स्थाई कच्ची सडक टाकळी कडे अशी नोंद असून सदरहू रस्त्यावर लोकांची ये-जा आहे.

(२) गाव नकाशानुसार सदर सव्र्हे क्र. २ मधून दोन रस्ते गेलेले दिसून येते, परंतु मौक्यावर एकच रस्ता असून तो सव्र्हे क्र. २ च्या उत्तर-दक्षिण धुया लगत असलेल्या शेत सव्र्हे क्र. १०, ११, १२ व १३ ला लागून आहे.

(३) मौक्यावर सदर रस्त्याचे बांधकाम पक्के नसल्याचे आढळून आलेले आहे.

(४) मौजा सोनेगांव (रा.) ते थाटेश्वर पांदन सव्र्हे क्र. २ च्या दक्षिणेकडील पूर्व-पश्चिम धुयाला लागून आहे.

(५) सदर सार्वजनिक रस्त्याचे निस्तार हक्क कमी करावयाचे असल्यास सदरहू रस्त्याव्यतिरिक्त मौजा टाकळी वरुन दुसरा रस्ता उपलब्ध नाही.

(६) सदर शेत सव्र्हे क्र. २ वरील मौजा टाकळी ते सावंगी (रिठ) दरम्यान असलेली रस्त्याखालील जागा सोडून इतर जागेवरील निस्तार हक्क कमी करण्यास हरकत नसल्याबाबत अहवालात नमूद केलेले आहे. (१) ना-एक-१ (१८१४). २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, डिसेंबर २६, २०२३/पौष ५, शके १९४५

त्याअर्थी,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २१ तसेच १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मी,राहुल र्कडिले, जिल्हाधिकारी, वर्धा मौजा सावंगी (रिठ), ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील सर्वे क्र. ०२ मधिल मौजा टाकळी ते सावंगी (रिठ) दरम्यान असलेली रस्त्याखालील जागा वगळून ७/१२ वरील ईतर निस्तार (चराई, रस्ता) असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २१ (१) तसेच १६३ नुसार नष्ट करण्याचे योजिले आहे.

सदर बाबतीत कुणाला उजर/आक्षेप असल्यास सदर अधिसूचना प्रसिध्दीचे दिनांकापासून ९० दिवसात उजर/आक्षेप उपविभागीय अधिकारी, वर्धा अथवा जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे सादर करावेत. सदर मुदतीनंतर आलेल्या आक्षेप/उजर यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

वर्धा :

दिनांक १८ डिसेंबर, २०२३.

राहुल र्कडिले (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, वर्धा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 December 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-12-26.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-12-26.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.