महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक १(२)] बुधवार, जानेवारी ३, २०२४/पौष १३, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २.---महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा
पृष्ठे १-३ करण्यासाठी अधिनियम.
दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे :---
सतिश वाघोले, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;
२०१७ चा महा. ६.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२३ प्रख्यापित केला होता ;
२०२३ चा महा. अध्या. ८.
(१)
भाग चार-२---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ३, २०२४/पौष १३, शके १९४५ आणि ज्याअर्थी, उक्त्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ;
त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :------
१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (यात त्यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" २०१७ चा महा. ६.
असा केला आहे) याच्या कलम १०९ मध्ये,---
(१) पोट-कलम (३) मधील, खंड (छ) मध्ये, दुसरे परंतुक व तक्ता याऐवजी, पुढील परंतुक व तक्ता दाखल करण्यात येईल :---
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम १०९ ची सुधारणा.
""परंतु आणखी असे की, २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यासाठी इरादा पत्र मागण्याकरिता अर्ज करण्याचे, अधिष्ठाता मंडळाद्वारे अर्जाची छाननी करण्याचे व ते राज्य शासनाकडे पाठविण्याचे आणि राज्य शासनाकडून इरादापत्र देण्याचे दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (३) च्या खंड (क), (ग) व (घ) यामध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस किंवा दिनांक हे, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येतील :----
तक्ता
खंड विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद केलेला २०२४-२५ या शैक्षणिक दिवस किंवा दिनांक वर्षासाठी तरतूद केलेला (१) (२)
दिवस किंवा दिनांक (३)
(क) ज्या वर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या १५ नोव्हेंबर २०२३ रोजी अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या किंवा त्यापूर्वी ; दिवसापूर्वी
(ग) ज्या वर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल ३१ डिसेंबर २०२३ रोजी त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी किंवा त्यापूर्वी ;
(घ) विद्यापीठाच्या शिफारशीनंतर, लगतनंतरच्या वर्षाच्या १५ फेब्रुवारी २०२४
३१ जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी रोजी किंवा त्यापूर्वी."";
(२) पोट-कलम (४) मधील, खंड (घ) मध्ये, दुसरे परंतुक व तक्ता याऐवजी, पुढील परंतुक व तक्ता दाखल करण्यात येईल :----
""परंतु आणखी असे की, २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी, नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडया किंवा सॅटेलाईट केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी मागण्याकरिता राज्य शासनाकडे अर्ज करण्याचा दिनांक वाढविण्याच्या दृष्टीने, खाली दिलेल्या तक्त्याच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, पोट-कलम (४) च्या खंड (क) मध्ये र्िनदिष्ट केलेला दिवस हा, उक्त तक्त्याच्या स्तंभ (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे वाचण्यात येईल :----
तक्ता
खंड विद्यमान तरतुदीमध्ये तरतूद २०२४-२५ या शैक्षणिक
केलेला दिवस
(१) (२)
वर्षासाठी तरतूद केलेला दिनांक (३)
(क) ज्या वर्षी परवानगी मागितली असेल त्या वर्षाच्या १५ नोव्हेंबर २०२३ रोजी अगोदरच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या किंवा त्यापूर्वी."". दिवसापूर्वीमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी ३, २०२४/पौष १३, शके १९४५ ३ ३. मुख्य अधिनियमास जोडलेल्या अनुसूची क मधील भाग एक मध्ये, अनुक्रमांक ४ येथील नोंदीमध्ये,---
(१) स्तंभ (१) मधील, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद"" या मजकुराऐवजी, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ यास जोडलेल्या अनुसूची क ची सुधारणा.
(२) स्तंभ (२) मधील,---
(एक) नोंद (१) मधील, ""औरंगाबाद"" या मजकुराऐवजी, ""छत्रपती संभाजीनगर"" हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(दोन) नोंद (४) मधील, ""उस्मानाबाद"" या मजकुराऐवजी, ""धाराशिव"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
४. (१) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२३ हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
२०२३ चा महा. अध्या. ८.
सन २०२३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ याचे निरसन व व्यावृत्ती.
(२) असे निरसन झाले असले तरी, उक्त्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही (काढलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या, मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.