महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक १ ] मंगळवार, जानेवारी ९, २०२४/पौष १९, शके १९४५ [पृष्ठे १, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक कक्ष-८-म.स.-ग्रापंनि-कावि-२७४-२०२३.----
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ५७ अन्वये अमरावती जिल्ह्यतील चांदुर रेल्वे तालुक्यातील ९८-सातेफळ निर्वाचक गण आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ चे कलम ५९ अन्वये निवडणुकीत पंचायत समिती मधील निर्वाचक गणातून निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत.
त्याअर्थी, मी, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ५७(३) चे उपबंधास अधिन राहून, महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ चे कलम ६० अन्वये पंचायत समितीतील सदस्यांची नावे त्यांचे पदासह खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.----
अनुसूची
पंचायत समिती पोट-निवडणूक-२०२३
तालुक्याचे नाव निर्वाचक गण क्र. व नाव निवडून आलेल्या सदस्यांचे नाव सदस्याचा कायमचा पत्ता (१) (२)
(३)
(४)
चांदुर रेल्वे ९८-सातेफळ प्रीती प्रमोद तिजारे रा. सातेफळ, ता. चांदुर रेल्वे,
जि. अमरावती अमरावती :
सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.