RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - ०२ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १८ - २४, २०२४ / पौष २८ ते माघ ०४, शके १९४५ [ पृष्ठे ०३
प्राधिकृत प्रकाशन
मुख्याधिकारी यांजकडून
तळेगाव दाभाडे नगरपरिषद
वाचावे :- (१) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. कडोमपा-१००६/प्र.क्र.१९२/२००६/नवि-२८, दिनांक २ मार्च २००९.
(२) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. टीपीव्ही-१९०८/प्र.क्र.१/०९/नवि-२७, मंत्रालय, मुंबई, दिनांक २८ जानेवारी २०१०.
(३) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. एमसीओ-२०१८/प्र.क्र.१३९/नवि-१४, दिनांक १२ ेब्रुवारी २०१८.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पदनिदशित अधिकारी नियुक्ती आदेश
आदेश
क्रमांक तळेगाव दाभाडे न.प./२०२/२०२४.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-एक, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५५ आणि ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरिता पदनिदशित अधिकारी म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. कडोंमपा-१००६/प्र.क्र.१९२/२००६/नवि-२८, दिनांक २ मार्च २००९, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) मधील तरतुदींनुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ७७ (२) नुसार नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, निंगण्णा कल्लाण्णा पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या खालील पदांवरील कर्मचायांची खालील नमूद तक्त्यातील तपशिलाप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६, कलम ५५ व ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी पदनिदशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. पदनाम १ २
पदनिदशित अधिकारी ३
१ अतिक्रमण विभाग प्रमुख नगर अभियंता तथा बांधकाम विभाग प्रमुख २. अनधिकृत नियंत्रण अधिकारी तथा नगर रचनाकार / रचना सहायक तथा पडताळणी अधिकारी. नगर रचना विभाग प्रमुख. ३. पर्यवेक्षक कर विभाग, वरिष्ठ लिपिक / लिपिक
४. बिट निरीक्षक / बिट मुकादम संबंधित वसुली भाग लिपिक / प्रभारी लिपिक
(१)
एच-४४७, भाग एक-अ (पु.वि.पु.)----०२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १८ - २४, २०२४ / पौष २८ ते माघ ०४, शके १९४५
कामाचे स्वरूप व कार्यपद्धती :--
(१) बिट निरीक्षक / बिट मुकादम - नगरपरिषद मुख्यालय स्तरावर बिट निहाय नोंदवही ठेवण्यात यावी आणि आपापल्या कार्य क्षेत्रामध्ये पाहणी करून अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम, अनधिकृत होडग्स, ेरीवाले, पथारीवाले व त्याचप्रमाणे रस्त्यावर टाकण्यात आलेले निरुपयोगी बांधकाम साहित्य राडारोडा इत्यादी नागरी गुन्ह्याशी संबंधित घटनांची नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी. बिटमध्ये अतिक्रमण / अनधिकृत बांधकामाची एकही घटना निदर्शनास न आल्यास त्यांचीही सुस्पष्ट नोंद घ्यावी. बिट रजिस्टरमध्ये दैनंदिन नोंद करण्याची जबाबदारी बिट निरीक्षकाची राहील. बिटमध्ये चालू असलेल्या बांधकाम परवानगीचे कागदपत्र, होडग्ज लावण्यासाठी परवानगी ेरीवाला अनुाप्ती किंवा नोंदणीपत्र इत्यादींची तपासणी करून आवश्यक परवानगी नसेल अशा प्रकरणांचा लेखी अहवाल दर सोमवारी पर्यवेक्षक यांच्याकडे सादर करावा. तसे न केल्यास संबंधित बिट निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल.
(२) पर्यवेक्षक - बिट निरीक्षक यांचेकडून प्राप्त अहवालानुसार अभिलेखांची तपासणी करून अनधिकृत बांधकाम / जाहिरात / अतिक्रमण इत्यादी बाबींना नियमानुसार परवानगी आहे / नाही याची शहानिशा करावी. परवानगी नाही हे निश्चित झाल्यावर पडताळणी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन संबंधित बिट निरीक्षकासमवेत स्थळ पंचनामा करून आवश्यकता असेल तर ोटो काढून घेऊन संबंधितांकडून कोणत्या नियमाचा भंग झाला आहे याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल पडताळणी अधिकारी यांचेकडे सादर करावा, तसेच प्रकरणी नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास पडताळणी अधिकारी यांच्या तांत्रिक सल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी.
(३) पडताळणी अधिकारी - नगर रचना विभागाकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील बांधकाम कामांबाबत देण्यात येणारा बांधकाम परवाना, नकाशा प्रत, भोगवटा प्रमाणपत्र व तत्सम माहिती कर विभागास वेळोवेळी देण्यात यावी. बिटमध्ये चालू असलेल्या बांधकामांबाबत पर्यवेक्षक यांचेकडून प्राप्त होणाया कागदपत्रांची तांत्रिक तपासणी करणे. पर्यवेक्षक यांचा अहवाल प्राप्त होताच संबंधित पडताळणी अधिकारी यांनी सबंधित बांधकाम, जाहिरातलक, ेरीवाले इत्यादींना नियमानुसार परवानगी दिली आहे अथवा नाही याची खात्री संबंधित विभागाकडून प्राप्त करून घ्यावी. प्राप्त होणाया कागदपत्रांची तांत्रिक तपासणी करावी व नियमानुसार संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार रीतसर नोटिस ावी. उपरोक्त नोटिसीमध्ये अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कालमर्यादा नमूद करावी. अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ (१) ची नोटिस देणेपूर्वी आवश्यकता वाटल्यास सक्षम न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करावे. संबंधित जागामालकाने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणे नोटिसीच्या मुदतीमध्ये काढली नाही अथवा संबंधित व्यक्ती विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करू न शकल्यास त्या खटल्याबाबत पुढील कार्यवाही नियमानुसार करावी, तसेच संबंधित अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण काढणेकरिता प्रकरण मुख्याधिकारी यांचेकडून मंजूर करून घेऊन ते काढणेकरिता अतिक्रमण विभाग प्रमुख यांचेकडे पाठवावे.
(४) अतिक्रमण विभाग प्रमुख - पडताळणी अधिकारी यांचेकडून अहवाल प्राप्त होताच आवश्यक मनुष्यबळ, पोलीस संरक्षण, व्हिडिओ शुटिंग, वाहने, आवश्यक साहित्य इत्यादी बाबींची तयारी करून संबंधित अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढून घ्यावे. याकामी बिट निरीक्षक, पर्यवेक्षक, पडताळणी अधिकारी, अतिक्रमण पथक, नगर रचना विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, मिळकत विभाग, कर विभाग, पाणीपुरवठा विभाग, विुत विभाग, उान विभाग यांची मदत घेता येईल. मुख्याधिकारी यांची मंजुरी घेऊन संबंधितांना तशी आगाऊ सूचना देऊन उपस्थित राहणेबाबत सूचना ाव्यात.
वेळोवेळी मुख्याधिकारी यांनी निर्गमित केलेल्या विवक्षित आदेशामध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्रासाठी नियुक्ती कर्मचारी / अधिकारी यांच्यानियुक्तीच्या कालावधीत या अधिसूचनेनुसार पदनिदशित अधिकारी समजण्यात येईल. अनधिकृत बांधकामे व त्यावर करावयाची कार्यवाही खाली विषद केल्याप्रमाणे असेल ---
१. आतापयत प्राप्त झालेल्या सर्व अनधिकृत बांधकामविषयक तक्रारींची पाहणी करून उचित कार्यवाही करणे.
२. अनधिकृत बांधकामे थांबविण्याबरोबरच नगर रचना कायातील आवश्यक त्या परवानगीशिवाय केलेली बांधकामे यांच्यावर कार्यवाही करणे.
३. घेतलेल्या परवानगीशी सुसंगत नसलेले किंवा परवानगी देताना घातलेल्या अटींचा भंग करून केलेले काम यांच्यावर कार्यवाही करणे.
४. मंजूर तळपृष्ठ निदशांकापेक्षा जादा केलेली बांधकामे () यांच्यावर कार्यवाही करणे.
५. परवानगीचा कालावधी संपल्यानंतर केलेले काम, यांच्यावर कार्यवाही करणे.
६. परवानगीच्या विरोधात जाऊन केलेले काम, जसे जमिनीच्या वापरात विनापरवाना बदल वगैरे.
उक्त बांधकामांना अनधिकृत बांधकाम समजण्यात यावे व त्यावर पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी ---
(३) अशा बांधकामास जबाबदार असणाया व्यक्तींवर खटला भरणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १८ - २४, २०२४ / पौष २८ ते माघ ०४, शके १९४५ ३(४) घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या बांधकामामुळे लगतच्या इतर इमारतीत वायूविजन, प्रकाश, इत्यादी मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारी बांधकाम किंवा परिसरात हानी पोहोचविण्यास जबाबदार असणाया व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करणे.
(५) कोणत्याही इमारतीचे उभारणीचे काम अथवा बांधकाम उक्त अधिनियमांच्या किंवा उपविधीच्या तरतुदीचा भंग करीत असल्याचे पदनिदशित अधिकायांचे निदर्शनास आणून दिले असेल आणि जर असा पदनिदशित अधिकारी पुरेशा कारणाशिवाय कलम ५३, ५४, ५५ किंवा ५६ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कार्यवाही करणेस कसूर करीत असेल तर त्यास दोषाविधीनंतर ३ महिन्यांपयत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा रुपये २०,००० पयत असू शकेल इतक्या व्यदंडाची शिक्षा होईल अथवा दोन्ही शिक्षा करण्याची तरतूद आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
(६) वरील नियुक्त अधिकारी / कर्मचारी यापैकी बिट निरीक्षक / बिट मुकादम हे अतांत्रिक कर्मचारी असल्यामुळे त्यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करणेपूर्वी पडताळणी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊनच कार्यवाही करावयाची असून पडताळणी अधिकारी यांनी सर्व नियुक्त बिट निरीक्षक / बिट मुकादम यांचेवर नियंत्रण ठेवावयाचे आहे, तसेच वरीलप्रमाणे नियुक्त पदनिदशित अधिकारी यांचा साप्ताहिक अहवाल संकलित करून घेऊन मासिक अहवाल उपमुख्याधिकारी यांचेर्मात मा. मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.
वरील नमूद बिट निरीक्षक / बिट मुकादम, पर्यवेक्षक, पडताळणी अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख यांच्यामध्ये बदल झाल्यास नवीन नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांना हा आदेश जसाच्या तसा लागू राहील.
निंगण्णा कल्लाण्णा पाटील,
तळेगाव दाभाडे, १० जानेवारी २०२४.
मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, जिल्हा पुणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.