RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक ४] गुरुवार, फेब्रुवारी १५, २०२४/माघ २६, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.-----मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी पृष्ठे १-३
. . . . . . . .
अध्यादेश.
नगरविकास विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४.
MAHARASHTRA ORDINANCE No. II OF 2024.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL
CORPORATION ACT.
सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २.
मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
१८८८ चा ३.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;
(१)
भाग चार १७---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी १५, २०२४/माघ २६, शके १९४५ त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :---
१. (१) या अध्यादेशास, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२४, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १५४ मध्ये, पोट-कलम (१ड) मधील, खंड (अ) १८८८ चा ३.
नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---
सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम १५४ ची सुधारणा.
" (अ-१) पोट-कलम (१क) मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी,---
(एक) पोट-कलम (१अ) अन्वये निश्चित केलेले कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, २०२३-२४ यावर्षी सुधारित करण्यात येणार नाही ;
(दोन) कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे मालमत्ता कर देयक, २०२२-२३ यावर्षी जे होते तेच २०२३-२४ या वर्षासाठी असेल ;
(तीन) पोेट-कलम (१अ) अन्वये निश्चित केलेले कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, जणू काही खंड (एक) हा, २०२३-२४ यावर्षी लागू नव्हता असे समजून, २०२४- २०२५ यावर्षी सुधारित करण्यात येईल.".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, फेब्रुवारी १५, २०२४/माघ २६, शके १९४५ ३निवेदन
मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम १३९ च्या खंड (१) मध्ये, मालमत्ता कर बसविण्यासंबंधी तरतूद आहे. उक्त अधिनियमाच्या कलम १५४ मध्ये, मालमत्ता कर आकारणीयोग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे पट्टीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य निश्चित करण्याची तरतूद आहे. उक्त कलम १५४ च्या पोट-कलम (१अ) मध्ये, त्याखाली नमूद केलेले घटक लक्षात घेऊन, आयुक्ताकडून मालमत्ता कर आकारणीयोग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, निश्चित करण्याची तरतूद आहे. त्याच्या पोट-कलम (१ब) मध्ये, पोट-कलम (१अ) अन्वये भांडवली मूल्य निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, त्या अन्वये विर्िनदिष्ट केलेल्या बाबींच्या संबंधात, स्थायी समितीच्या मान्यतेने, नियम करण्याचा अधिकार, आयुक्तास प्रदान केला आहे. त्याच्या पोट-कलम (१क) मध्ये अशी तरतूद आहे की, उक्त कलम १५४ च्या पोट-कलम (१अ) अन्वये निश्चित केलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य, दर पाच वषार्ंनी सुधारित करता येईल.
२. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताने, पोट-कलम (१अ) अन्वये भांडवली मूल्य निश्चित करावयाच्या प्रयोजनार्थ, पोट-कलम (१ब) अन्वये इमारतींच्या किंवा जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१० आणि इमारतींच्या किंवा जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१५ तयार केलेले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने, २०१९ च्या एस एल पी (सी) क्रमांक १७००९ यामध्ये, ७ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या आपल्या न्यायनिर्णयात, २०१० व २०१५ च्या उक्त भांडवली मूल्य नियमांचा नियम २० हा, उक्त अधिनियमाच्या कलम १५४ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) च्या तरतुदींच्या अधिकारबा असल्याने, रद्दबातल केला आहे.
३. ही वस्तुस्थिती विचारात घेता, २०२३-२४ मध्ये उक्त कलम १५४ च्या पोट-कलम (१अ) अन्वये भांडवली मूल्य निश्चित करणे आणि भांडवली मूल्य सुधारित करणे शक्य नाही. म्हणून, २०२३-२४ यावर्षी, कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य सुधारित करण्यात येणार नाही आणि कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे मालमत्ता कर देयक, २०२२-२३ यावर्षी जे होते तेच २०२३-२४ या वर्षासाठी असेल आणि ते २०२४-२५ यावर्षी सुधारित करण्यात येईल, अशी तरतूद करण्याकरिता, उक्त अधिनियमाच्या कलम १५४ च्या पोट-कलम (१ड) मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट वाटते.
४. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी, तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२४.
रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. के. एच. गोविंद राज,
शासनाचे प्रधान सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.