Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V (Ex.3) (Dated 26-2-2024) L. A. BILL No. III OF 2024. A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA POLICE ACT.

Published 26 February 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष १०, अंक २(२)] सोमवार, फेब्रुुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

-----------------------------------

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :---

L. A. BILL No. III OF 2024.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA POLICE ACT.

सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

१९५१ चा २२.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. या अधिनियमास, महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम, २०२४, असे म्हणावे. संक्षिप्त नाव.

(१)

भाग पाच ३---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ १९५१ चा २२.

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम २ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम २ मध्ये, खंड (१४अ-१) मधील, " महामार्ग वाहतूक " या मजकुरानंतर, " विभाग, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम २२जे-३ मध्ये, पोट-कलम (१) मधील, " महामार्ग वाहतूक " या मजकुरानंतर, " विभाग, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

सन १९५१ चा अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम २२जे-३ ची सुधारणा.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २६, २०२४/फाल्गुन ७, शके १९४५ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२जे-३ मध्ये, राज्य पोलीस दलाच्या विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावर पोलीस आस्थापना मंडळे घटित करण्याची तरतूद केली आहे. विशेषीकृत अभिकरणांमध्ये, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलीस दल, दहशतवाद विरोधी पथक, महामार्ग वाहतूक व प्रशिक्षण संचालनालय यांचा समावेश केला आहे, तथापि, त्यामध्ये, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग यांचा समावेश केलेला नाही.

२. म्हणून, विशेषीकृत अभिकरणांमध्ये, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग यांचा समावेश करणे इष्ट आहे असे शासनास वाटते. म्हणून, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम २ व कलम २२जे-३ मध्ये सुुयोग्य सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

३. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,

देवेंद्र फडणवीस,

दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

उप मुख्यमंत्री.

विधान भवन : मुंबई, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४.

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR :

DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.