Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V (Ex.6) (Dated 28-2-2024) L. C. BILL No. I OF 2024. A BILL TO AMEND THE MAHARASHTRA PRIVATE UNIVERSITIES (ESTABLISHMENT AND REGULATION) ACT, 2023.

Published 28 February 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२४/फाल्गुन ९, शके १९४५ १

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष १०, अंक ४] बुधवार, फेब्रुवारी २८, २०२४/फाल्गुन ९, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक, महाराष्ट्र विधानपरिषद नियम १११ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :----

L. C. BILL No. I OF 2024.

A BILL TO AMEND THE MAHARASHTRA PRIVATE UNIVERSITIES (ESTABLISHMENT AND REGULATION) ACT, 2023.

सन २०२४ चे विधान परिषद विधेयक क्रमांक १.

महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ यात सुधारणा

करण्यासाठी विधेयक.

२०२४ चा महा. ८.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ यामध्ये सुधारणा करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :------

संक्षिप्त नाव.

१. या अधिनियमास, महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२४, असे म्हणावे.

२०२४ चा महा. ८.

२. महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ६ मधील, पोट-कलम (१) मध्ये, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :-----

सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ यांच्या कलम ६ ची सुधारणा.

(१)

भाग पाच---६---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२४/फाल्गुन ९, शके १९४५ " परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास, अनुसूचीच्या भाग दोन मध्ये विर्िनदिष्ट केलेली विद्यापीठे, त्या दिनांकास स्थापन करण्यात आली असल्याचे मानण्यात येतील.".

३. मुख्य अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमधील, भाग दोन मधील, नोंद २ नंतर, पुढील नोंदी जादा दाखल करण्यात येतील :—

सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ याच्या अनुसूचीची सुधारणा.

जिल्हा अहमदनगर --४२३ ६०१.

"३. संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव, संजीवनी ग्रामीण शिक्षण सोसायटी, मुख्यालय, संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव, कोपरगाव, तालुका कोपरगाव, गट क्रमांक २४ व २५, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर --४२३ ६०१.

४. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पुणे, मुख्यालय डॉ. डी. वाय. पाटील फ्लॅट क्रमांक १०१, श्री. मोतीसागर अपार्टमेंट, ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पुणे, संत तुकाराम सव्र्हे क्रमांक ४७३ ए, जी. जी. ठक्कर रोड, नगर, पिंपरी-चिंचवड, सव्र्हे क्रमांक १८०/२/१ पुणे --४११ ००१.". व १८०/२/२, तालुका हवेली, पुणे --४११ ०१८ आणि तसेच ताथवडे, पुणे, सव्र्हे क्रमांक ८७/१, ८८, १३८/१अ, १३८/१ब, १३८/२ब व ६२/४/३.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, फेब्रुवारी २८, २०२४/फाल्गुन ९, शके १९४५ ३

उद्देश व कारणे यांचे निवेदन

महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ (२०२४ चा महा. ८) यामध्ये, महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्याकरिता राज्यात स्वयं-अर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठांची स्थापना, विधिसंस्थापन व विनियमन करण्याची तरतूद केली आहे.

२. उक्त अधिनियमाच्या कलम ६ मध्ये अशी तरतूद केली आहे की, शासन, कलम ५ च्या पोट-कलम (४) अन्वये पडताळणी समितीने सादर केलेला अहवाल विचारात घेतल्यानंतर, प्रायोजक मंडळाने कलम ५ मधील तरतुदींचे अनुपालन केले आहे याबाबत खात्री पटली असेल तर, खाजगी विद्यापीठाचे व त्याच्या प्रायोजक मंडळाचे नाव, ठिकाण व मुख्यालय, राज्य विधानमंडळाद्वारे कायदा अधिनियमित करून केलेल्या सुधारणेद्वारे अनुसूचीच्या भाग दोनमध्ये समाविष्ट करून, खाजगी विद्यापीठ स्थापन करण्यास परवानगी देईल.

३. कलम ५ च्या पोट-कलम (४) अन्वये पडताळणी समितीने सादर केलेला अहवाल विचारात घेतल्यानंतर, शासनाची अशी खात्री पटली आहे की, अनुक्रमे, " संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव " आणि " डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पुणे " या नावांनी खाजगी विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी, संजीवनी ग्रामीण शिक्षण सोसायटी, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर --४२३ ६०१ आणि डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, फ्लॅट क्रमांक १०१, श्री. मोतीसागर अपार्टमेंट, सव्र्हे क्रमांक ४७३ ए, जी. जी. ठक्कर रोड, पुणे --४११ ००१ या प्रायोजक मंडळांनी कलम ५ मधील तरतुदींचे अनुपालन केले आहे.

४. म्हणून, कायदा अधिनियमित करून त्याद्वारे, प्रस्तावित केलेल्या उक्त खाजगी विद्यापीठांची स्थापना करण्यास परवानगी देण्यासाठी आणि त्यामध्ये, संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव आणि डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पुणे आणि त्यांची प्रायोजक मंडळे यांची नावे, ठिकाणे व मुख्यालये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२३ यास जोडलेल्या अनुसूचीच्या भाग दोनमध्ये सुधारणा करणे इष्ट आहे असे महाराष्ट्र शासनास वाटते.

५. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४.

चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.

विधान भवन : मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४.

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-02-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.