RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष १०, अंक ६(३)] शुक्रवार, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १ मार्च २०२४ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—
L. A. BILL No. X OF 2024.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA LABOUR WELFARE FUND ACT.
सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक १०.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.
१९५३ चा ४०.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियमात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :---
संक्षिप्त नाव.
१. या अधिनियमास, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (सुधारणा) अधिनियम, २०२४, असे म्हणावे. (१)
भाग पाच----११-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५ २. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियमाच्या कलम ६बब मध्ये, पोट-कलम (२) ऐवजी, पुढील १९५३ चा ४०.
पोट-कलम दाखल करण्यात येईल :---
"(२) प्रत्येक नोकराच्या बाबतीत, आणि अशा प्रत्येक नोकरासाठी मालकाच्या बाबतीत, प्रत्येक सन १९५३ चा अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ६बब ची सुधारणा.
सहा महिन्यांनी प्रदेय असलेल्या अंशदानाची रक्कम, पुढील दराने असेल :--
(अ) ज्या नोकराचे नाव, अनुक्रमे, दिनांक ३० जून व ३१ डिसेंबर रोजी, आस्थापनेच्या नोंदवहीत आहे अशा नोकराच्या बाबतीत, पंचवीस रुपये इतका दर असेल :
परंतु, राज्य शासन, मंडळाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नोकराच्या अंशदानाच्या दरात, प्रत्येक तीन वषार्ंतून एकदा वाढ करील, तथापि, असे की, अशी वाढ, अंशदानाच्या दराच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही ;
(ब) खंड (अ) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या प्रत्येक नोकरासाठी, मालकाच्या बाबतीत, नोकराने प्रदेय असलेल्या रकमेच्या तीनपट. " .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५ ३उद्देश व कारणे यांचे निवेदन
महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या कल्याणास प्रोत्साहन देण्याच्या कायार्ंना र्आथिक सहाय्य देण्यासाठी आणि अशी कल्याणकारी कार्ये करण्यासाठी कल्याण निधी घटित करण्याची तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम (१९५३ चा ४०) अधिनियमित केला आहे.
२. नोकरांनी, मालकांनी तसेच राज्य शासनाने, दर सहा महिन्यांनी, निधीत करावयाच्या अंशदानासाठी, उक्त अधिनियमाच्या कलम ६बब च्या पोट-कलम (२) मध्ये तरतूद केली आहे. कामगारांसाठी आणि त्यांच्या अवलंबितांसाठी कल्याणकारी कायार्ंना प्रोत्साहन देण्याकरिता, उक्त त्रिपक्षीय अंशदान हे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.
३. मंडळाने केलेल्या कल्याणकारी कायार्ंमध्ये आणि कल्याणकारी कायार्ंचा लाभ घेणा-या कामगारांच्या व त्यांच्या अवलंबितांच्या संख्येत देखील गेल्या दशकांमध्ये भरीव प्रमाणात वाढ झाली आहे आणि तसेच वेतन व भयांच्या रुपाने कर्मचा-यांच्या खर्चात देखील भरीव प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, सन २००३ पासून निधीतील अंशदानाच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
याशिवाय, मंडळाने, नवीन कल्याणकारी योजना, उपक्रम व कार्यक्रम सुरू करण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. मंडळाने, कामगार व त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचे आणि क्रीडा स्पर्धा व शिबिरे आयोजित करण्याचे देखील योजिले आहे. म्हणून, अशा कामगार कल्याणकारी कायार्ंना अर्थसहाय्य करणे आणि प्रशासकीय खर्चाचे प्रमाण राखणे मंडळाला शक्य व्हावे या दृष्टीने, नोकरांनी, मालकांनी तसेच राज्य शासनाने दर सहा महिन्यांनी उक्त निधीस प्रदेय असलेल्या अंशदानाच्या दरात वाढ करणे इष्ट वाटते.
४. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक २९ फेब्रुवारी २०२४.
सुरेश खाडे, कामगार मंत्री.
भाग पाच--११-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५
वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन
या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहे :---
खंड २.---या खंडान्वये शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नोकराने प्रदेय असलेला अंशदानाचा दर, प्रत्येक तीन वषार्ंतून एकदा अशा रकमेने वाढवण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे, तथापि, असे की, अशी वाढ, अंशदानाच्या प्रचलित दराच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा वर नमूद केलेला प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचा आहे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५ ५वित्तीय ज्ञापन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून कल्याणकारी कायार्ंमध्ये वाढ करण्यासाठी आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी नियमांच्या नियम १९अ अन्वये तरतूद केलेल्या त्याच्या मर्यादेपयर्ंत मंडळाच्या प्रशासकीय खर्चाचे प्रमाण राखण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम (१९५३ चा ४०) अन्वये कामगार कल्याण निधीतील त्रिपक्षीय अंशदानाच्या दरांमध्ये वाढ करणे हा, या विधेयकातील तरतुदींचा उद्देश आहे. नोकरांकडून, मालकांकडून व राज्य शासनाकडून कामगार कल्याण निधीला दर वर्षी प्रदेय असलेले एकूण त्रिपक्षीय अंशदान, सुमारे १६८,५४,००,००० इतके असल्याचे अंदाजित केले असून त्यापैकी, शासनाचे अंशदान, राज्याच्या एकत्रित निधीतील आवर्ती खर्च म्हणून, दर वर्षी, अंदाजे रुपये ५६,१८,००,००० इतके असेल.
२. तथापि, या तीन पक्षांपैकी, प्रत्येक पक्षाचे निश्चित अंशदान, अधिनियमाच्या कक्षेत येणा-या नोकरांच्या संख्येतील फरकानुसार वर्षनिहाय बदलेल.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस
(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (३) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (सुधारणा) विधेयक, २०२४ विचारात घेण्याबाबत राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांना शिफारस करीत आहेत.
विधान भवन : मुंबई, दिनांक १ मार्च २०२४.
जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.