महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १०, अंक ७] सोमवार, मार्च ११, २०२४/फाल्गुन २१ , शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११.
जिल्हाधिकारी, यांजकडून
वाचा :----(१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विकाअ १११५-प्र.क्र.८८-५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.
(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विकाअ १११५-प्र.क्र.८८-५, दिनांक २४ मे, २०२३.
आदेश
क्रमांक-एमएजी-कार्या-८-टे.३-सां.ले.४१४-२०२४.-----
संदर्भाधीन, शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर खालील अनुसूचिमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या एकूण ३ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
सदर नियुक्ती हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाकरीता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत अस्तित्वात राहिल. तसेच, राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची हि नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी, केव्हाही कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्याकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे/ तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.
(१) विशेष कार्यकारी अधिकारी हे खालील प्रमाणे कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील :----
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, मार्च ११, २०२४/फाल्गुन २१, शके १९४५ (क) ओळखपरेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहू नये.(२) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकायांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, साक्षांकीत केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहित न चुकता नमूद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
(३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या " मानसेवी " असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
(४) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सवार्ंना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाया व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.
(५) खाली दर्शविलेल्या अनुसूचिप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यतील एकूण ०३ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
अनुसूची
क्रमांक व्यक्तींचे नाव गाव व संपूर्ण पत्ता
नोंदणी क्रमांक
(१) (२)
(३)
(४)
चंद्रपूर
१ राकेश सुधाकर बोमनवार जलनगर वार्ड, सपना टॉकीज मागे, चंद्रपूर २०२४/१३/६२३९७९८५१६४८/२७२ २ वर्षा प्रमोद सोमलवार इंदिरा नगर, मुलरोड, चंद्रपूर २०२४/१३/७९५९२५५६२६७१/२७३ ३ श्याम शांताराम चक्रदेव लालपेठ, मातानगर चौक, दुर्गा मंदिर जवळ, २०२४/१३/७३२०२१७७९४२१/२७४
चंद्रपूर
चंद्रपूर : दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४.
विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर.