RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक ८] शनिवार, मार्च १६, २०२४/फाल्गुन २६, शके १९४५ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४.-----महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. . . . . . . . .
पृष्ठे १-३ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२४.
MAHARASHTRA ORDINANCE No. IV OF 2024.
AN ORDINANCE
TO AMEND THE MAHARASHTRA STATE SKILLS UNIVERSITY ACT, 2021.
सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ४.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
(१)
भाग चार-२१---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १६, २०२४/फाल्गुन २६, शके १९४५ २०२१ चा महा. ७.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ यात सुधारणा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----
१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२४, असे म्हणावे.
संक्षिप्त नाव व प्रारंभ.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " २०२१ चा महा. ७.
असा केला आहे) याच्या कलम १२ मध्ये, पोट-कलम (३) मधील,----
सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ याच्या कलम १२ ची सुधारणा.
(१) खंड (क) मध्ये,----
(क) " समिती " या मजकुराऐवजी, " शोध-नि-निवड समिती " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) उप-खंड (एक) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येईल :----
" (एक) कुलपतीने नामनिर्देशित केलेला एक सदस्य असेल, जो उच्च शिक्षण क्षेत्रातील एक ख्यातनाम व्यक्त्ती असेल आणि तो, एकतर, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय कीर्तीचा ख्यातनाम विद्याव्यासंगी किंवा पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्त्ती असेल ;";
(ग) उप-खंड (तीन) नंतर, पुढील उप-खंड समाविष्ट करण्यात येईल :-----
" (चार) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाने नामनिर्देशित केलेला सदस्य.";
(२) खंड (च) मध्ये,------
(क) " समितीद्वारे " या मजकुराऐवजी, " शोध-नि-निवड समितीद्वारे " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) उप-खंड (एक) व (दोन) ऐवजी, पुढील उप-खंड दाखल करण्यात येतील :----
" (एक) उच्च दर्जाची क्षमता, सचोटी, नैतिकता व संस्थात्मक बांधिलकी असलेली व्यक्त्ती असेल ;
(दोन) डॉक्टरेट पदवी धारण करणारा, कौशल्य शिक्षण किंवा शिक्षणावर आधारित रोजगारभिमुखता किंवा उपक्रम प्रवर्तन यातील अनुभव असलेला ख्यातनाम व प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि उच्च दर्जाचा प्रशासक असेल ;
(दोन-क) कोणत्याही विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून किमान दहा वषार्ंचा अनुभव किंवा शैक्षणिक नेतृत्व सिद्ध केल्याच्या पुराव्यासह नामांकित संशोधन किंवा शैक्षणिक प्रशासकीय संघटनेतील दहा वषार्ंचा अनुभव असेल ;";
(ग) उप-खंड (चार) मधील, " शैक्षणिक अर्हता " या मजकुराऐवजी, " अतिरिक्त्त शैक्षणिक अर्हता " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
३. मुख्य अधिनियमाच्या कलम ८१ मधील, " दोन वषार्ंच्या कालावधीकरिता, किंवा अधिनियमानुसार विद्यापीठाच्या अधिकायांची नवीन नियुक्त्ती केली जाईपयर्ंत " या मजकुराऐवजी, " तीन वषार्ंच्या कालावधीकरिता, किंवा अधिनियमानुसार विद्यापीठाच्या अधिकायांची नवीन नियुक्त्ती केली जाईपयर्ंत, यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत " हा मजकूर दाखल करण्यात येईल.
सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ याच्या कलम ८१ ची सुधारणा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १६, २०२४/फाल्गुन २६, शके १९४५ ३निवेदन
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ (२०२१ चा महा. ७) याच्या कलम १२ मध्ये, कुलगुरूच्या पात्रता निकषांची आणि कुलगुरूच्या नियुक्त्तीसाठी कुलपतीला सुयोग्य नावांची शिफारस करण्यासाठी समिती घटित करण्याची तरतूद केलेली आहे.
२. विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (१९५६ चा ३) अन्वये तयार केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यापीठांमधील व महाविद्यालयांमधील अध्यापकांची व इतर विद्याविषयक कर्मचायांची नियुक्त्ती करण्याच्या किमान अर्हता आणि उच्च शिक्षणातील दर्जा राखण्याच्या अन्य उपाययोजना) विनियम, २०१८ द्वारे, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून, कुलगुरूच्या पात्रता निकषांच्या आणि कुलगुरूच्या नियुक्त्तीसाठी कुलपतीला सुयोग्य नावांची शिफारस करण्यासाठी समिती घटित करण्याच्या तरतुदींमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.
३. सर्वोच्च न्यायालयाने, अलीकडेच, गंभीरदन के गढवी विरुद्ध गुजरात राज्य व इतर (रिट याचिका (दिवाणी) क्र. २०१९ ची १५२५) आणि प्राध्यापक (डॉ.) श्रीजीथ पी. एस. विरुद्ध डॉ. राजश्री एम. एस. व इतर (दिवाणी अपील क्र. २०२२ चे ७६३४-७६३५) या प्रकरणांमध्ये, असा निर्णय दिला आहे की, कुलगुरूचे पात्रता निकष आणि नियुक्त्तीची प्रक्रिया, नेहमीच संबंधित विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांनुसार असेल आणि जर राज्य अधिनियम, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी सुसंगत नसेल तर, तो, लागू असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी सुसंगत करण्यासाठी त्यात सुधारणा केली पाहिजे आणि तोपयर्ंत, उक्त्त विद्यापीठ अनुदान आयोग विनियम अधिभावी असतील.
४. शासनाने नामनिर्देशित केलेल्या विद्यापीठाच्या प्रथम अधिकायांचा पदावधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम,२०१४ (२०१४ चा महा. २९) याच्या तत्सम तरतुदींच्या धर्तीवर, दोन वषार्ंच्या ऐवजी, तीन वषार्ंपयर्ंत वाढविणे इष्ट आहे असे देखील वाटते.
५. वरील प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम,२०२१ च्या कलमे १२ व ८१ मध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट आहे असे वाटते.
६. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ (२०२१ चा महा. ७) यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई, दिनांक १६ मार्च २०२४.
रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ओम प्रकाश गुप्ता, शासनाचे अपर मुख्य सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.