महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक ९(६)] सोमवार, मार्च १८, २०२४/फाल्गुन २८, शके १९४५ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३.-----महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा पृष्ठे १-२ करण्यासाठी अधिनियम . . . . .
दिनांक १६ मार्च २०२४ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे :––
सतिश वाघोले,
सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३.
(राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर '' महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक १८ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.
१९४९ चा महा. ५९.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:----
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १८, २०२४/फाल्गुन २८, शके १९४५ २. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ मध्ये, पोट-कलम (३) मधील, पहिल्या परंतुकाऐवजी, १९४९ चा महा. ५९.पुढील परंतुक दाखल करण्यात येईल :---
सन १९४९ चा अधिनियम क्रमांक ५९ याच्या कलम ५ ची सुधारणा.
""परंतु, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०२४ याच्या प्रारंभानंतर, महानगरपालिकांच्या २०२४ चा महा. २३.
सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून, शक्य असेल तेथवर, चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, आणि या अधिनियमामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, प्रत्येक मतदाराला, त्याच्या प्रभागातील निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल :"".