महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
१ RNI No. MAHBIL/2009/35529 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष १०, अंक १७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६ [पृष्ठे ८ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
BY THE PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE, SINDHUDURG
Order
No. Admn/960/2024.— Smt. K. K. Patil, Civil Judge (J.D.) & J.M.F.C., Vengurla, is granted Earned Leave for 2 days on 15th April 2024 and 16th April 2024 with permission to prifix holidays on 13th April 2024 and 14th April 2024 and suffix holiday on 17th April 2024 and permission to Leave Head Quarters from 12th April 2024 A.O.H. to 18th April 2024 B.O.H.
No locum tenens is necessary
On return from leave Smt. K. K. Patil, is reposted as Civil Judge (J.D.) & J.M.F.C., Vengurla,
Certified that, under note 2 below Rule 39 of M.C.S (Pay) Rule 1981 Smt. K. K. Patil, would have been continued to an officiate as Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla, had she not proceeded on leave as above.
During the abovesaid leave period, the charge of the Court of the Civil Judge (J.D.) & J.M.F.C., Vengurla from 12th April 2024 A.O.H. to 15th April 2024 B.O.H., shall remain with Smt. D. P. Pujari, Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi and from 15th April 2024 O.H. till 18th April 2024 B.O.H. shall remain with Shri D. Y. Rairikar, Joint Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla.
The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla is directed to hand over the charge of her Court to the Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Sawantwadi. The Civil Judge (J.D.) and J.M.F.C., Vengurla, is directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.
Contents of this order be communicated to the officers concerned.
HEMANT B. GAIKWAD,
Sindhurdurg,
Principal District and Sessions Judge,
dated 10th April 2024.
Sindhudurg.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांजकडून
संदर्भ.--(१) भारत निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक १६ मार्च २०२४ रोजीचे प्रेस नोटनुसार.
आदेश
क्रमांक विशा/लोकसभा निवडणुक/मनाई आदेश/६/२०२४.— ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार भारत निवडणूक आयोगाने, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहीर केलेला असून दिनांक १६ मार्च २०२४ रोजीपासून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये २३-भिवंडी, २४-कल्याण व २५-ठाणे असे ०३ लोकसभा मतदार संघ येतात. सदर मतदारसंंघात दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान व दिनांक ४ जून २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
लोकसभा निवडणूकीचे अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सुरू होणार असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ रोजी पावेतो आहे. दिनांक ४ मे २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम दिनांक ६ मे २०२४ रोजी पावेतो आहे.
अशावेळी नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याच्या ठिकाणी निवडणूक संबंधाने राजकीय पक्ष आपआपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस मोठया प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणांच्या प्रांगणात निवडणुक संबंधाने कॉर्नर मिटींग, सभा पत्रकार परिषद इ. सारखे कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन सदर ठिकाणी शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे, अशी माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी ' सचिन गोरे ' पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर आम्हास पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार त्यांनी कार्यालयीन आदेश पोउपआ/वि.शा./१३२/ २०२३, दिनांक २७ डिसेंबर २०२३ अन्वये आम्हांस प्रदान केले असल्याने, त्या अधिकारांचा वापर करून असे निर्देश देतो की, अशा ठिकाणांच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहुबाजुकडील परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी/संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते आणि प्रतिनिधी यांनी निवडणुक संबंधाने सभा/बैठक/पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेऊ नये. त्याचप्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल करणा-या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व त्याच्या सोबत ४ व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणा-या उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहुबाजुकडील परिसरामध्ये फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असून तीन पेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.
वरील आदेशाचे कोणीही व्यक्तीने उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरूद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदर आदेश दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी ००-०१ पासून दिनांक ६ मे २०२४ रोजी २४-० वा. पयर्ंत अंमलात राहील.
सदरचा आदेश शासकीय कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच शासकीय/निमशासकीय, निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना लागू होणार नाही.
सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी ठाणे येथे जारी करण्यात आला आहे.
सचिन गोरे,
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
वाचले.-- (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३).
(२) मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जा.क्र. जिविशा/मनाई आदेश/२१३१/२०२४,
दिनांक १ एप्रिल २०२४ रोजीचे पत्र.
मनाई आदेश
क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२४/४६२६.— मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जावक क्रमांक जिविशा/मनाई आदेश/२१३१/२०२४, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. दिनांक १२ मार्च २०२४ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत मुस्लिम धर्मीयांचा रमजान सण तसेच दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमी हे सण साजरे हेणार आहेत.
दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. तसेच विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यत राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकत्यार्ंच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे.
या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी ००-०१ वाजता पासून ते दिनांक १७ एप्रिल २०२४ चे २४-०० वा. पयर्ंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस कायद्याने कलम ३७(१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होऊन आदेश मिळणेस विनंती केली आहे.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यत कोणत्याही प्रसंगी शुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ००-०१ वाजले पासून ते दिनांक १८ एप्रिल २०२४ चे २४-०० वा. पयर्ंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे :----
(अ) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.
(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. (क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. (ड) सभ्यता अगर निती याविरूद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे.
(इ) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. (फ) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. (ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विनापरवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
मी, असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत.---
(१) अंत्ययात्रा. (२) धर्ामिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी. (३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी. (४) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे, रंगमंच इत्यादी.
प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी दिला.
चंद्रकांत सुर्यवंशी, अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांजकडून
वाचावे.--(१) मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११२ मधील तरतुदी.
(२) अधिसूचना क्र. एम.व्ही.ए. ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० आणि महाराष्ट्र
शासन राजपत्रामधील प्रसिद्ध करण्यात आलेले असाधारण, भाग चार-अ, परिशिष्ट, दिनांक ३० सप्टेंबर
२००२.
(३) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय नवी दिल्ली अधिसूचना नं. १३७७, दिनांक ६ एप्रिल २०१८.
(४) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची अधिसूचना क्र. अपोमस(वा)/४५/
नियो/३१०५/२०१९, दिनांक २५ ऑक्टोबर २०१९.
(५) पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांचे जा.क्र./पो.अ./म.सु.प./रायगड परिक्षेत्र/
वेगमर्यादा आढावा/४०८/२०२४, दिनांक १४ एप्रिल २०२४.
(६) पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस, पनवेल विभाग यांचे जा.क्र. ७६/२०२४, दिनांक १४ एप्रिल २०२४.
(७) प्रभारी अधिकारी म.पो. केंद्र बोरघाट यांचे जा.क्र. ३३३/२०२४, दिनांक १३ एप्रिल २०२४.
(८) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे जा.क्र. अपोमस(वा)/४५/नियो/
मुंबई-पुणे घाट विभाग वेग मर्यादा निश्चिती/११९७/२०२४, दिनांक १५ एप्रिल २०२४.
अधिसूचना
क्रमांक अपोमस(वा)/४५/नियो/१२६८/२०२४.— १. ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी प्रस्ताव सादर केला आहे की, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग (मुंबई-पुणे महामार्ग) हा एकूण ९४ कि.मी. चा असून या महामार्गावर कि.मी. ३५.५०० ते कि.मी. ५२.००० पयर्ंत घाट भाग (बोरघाट) आहे. सद्यस्थितीत या द्रुतगती महामार्गावरील समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा १०० कि.मी. प्रति तास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा ५० कि.मी. प्रति तास आहे. व्यवहारिक दृष्टया घाट भागातील नमूद वेग मर्यादा हलक्या वाहनांसाठी अत्यंत कमी असून पुणे ते मुंबई वाहिनीवर अति तीा उतार असल्याने, नमुद ठिकाणी वाहनांना समतल भागातून १०० कि.मी. प्रति तास याप्रमाणे प्रवास केल्यानंतर घाट भागात आल्यावर वाहनांची वेग मर्यादा ५० कि.मी. वर आणताना वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात तसेच त्या दरम्यान वाहन चालकाने वाहनांचा वेग जलद गतीने कमी केल्याने अपघातांचे प्रमाण देखिल अधिक असल्याचे दिसून आले आहे.
२. ज्याअर्थी, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचे रस्त्याचे डिझाईन व घाट सेक्शनमध्ये झालेल्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एमएसआरडीसी (MSRDC) कार्यालय, पुणे, परिवहन विभाग, आयआरबी इंन्फ्रा डेव्हलपमेंट कार्यालय, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस पनवेल विभाग, प्रभारी पोलीस निरीक्षक, म.पो. केंद्र बोरघाट, प्रमुख आरेखक वाहतूक अभियांत्रिकी पथक यांची दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील बोरघाटातील वेगमर्यादेविषयीचे अभिप्राय विचारात घेता सर्वानुमते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात हलक्या वाहनांची वेगमर्यादेत बदल करणे आवश्यक आहे अशी आमची खात्री झाली आहे.
३. त्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे पोट-कलम ११२ (२) सोबत अधिसूचना क्र. एम. व्ही. ए. ०५८९/सीआर-१०६१- टीआरए-२, दिनांक १९ मे १९९० आणि महाराष्ट्र शासन राजपत्रामधील प्रसिद्ध करण्यात आलेले असाधारण, भाग चार-अ, परिशिष्ट, दिनांक ३० सप्टेंबर २००२ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मी सुखविंदर सिंह, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग (मुंबई-पुणे महामार्ग) या रस्त्याकरिता व घाट भाग कि.मी. ३५.५०० ते कि.मी. ५२.००० याकरिता वाहनांच्या वर्गानुरुप महत्तम वेगमर्यादा सोबतच्या तक्त्याप्रमाणे निश्चित करीत आहे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
| यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग (मुंबई-पुणे महामार्ग) या रस्त्याकरिता व कि.मी. ३५.५०० ते कि.मी. ५२.००० दरम्यानच्या घाट भागाकरिता अनिवार्य करण्यात आलेली वेगमर्यादा कि.मी./प्रती तास | |||
| अ.क्र. | वाहनांचा प्रकार | वेग मर्यादा | |
| समतल भाग | घाट भाग | ||
| १ | प्रवासी मोटार वाहने ज्यांचा उपयोग वाहन चालकासह ८ प्रवासी यांचे वाहतुकीसाठी केला जातो. (एम-१ श्रेणीतील वाहने) | १०० कि.मी./प्रति तास | ६० कि.मी./प्रति तास |
| २ | प्रवासी मोटार वाहने ज्यांचा उपयोग वाहन चालकासह ९ किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी यांचे वाहतुकीसाठी केला जातो. (एम-२ व एम-३ श्रेणीतील वाहने) | ८० कि.मी./प्रति तास | ४० कि.मी./प्रति तास |
| ३ | मोटार वाहने ज्यांचा उपयोग माल/सामान वाहतुकीसाठी केला जातो. (सर्व एन श्रेणीतील वाहने) | ८० कि.मी./प्रति तास | ४० कि.मी./प्रति तास |
| ४ | द -चाकी मोटार वाहने ू | परवानगी नाही | परवानगी नाही |
| ५ | चारचाकी मोटार रिक्षा | परवानगी नाही | परवानगी नाही |
| ६ | तीन चाकी मोटार वाहने/रिक्षा | परवानगी नाही | परवानगी नाही |
४. सदरची अधिसूचना आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.
सुखविंदर सिंह,
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक),
महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
OFFICE OF THE ADDITIONAL DIRECTOR GENERAL
OF POLICE, (TRAFFIC), MAHARASHTRA STATE, MUMBAI
Read.— (1) Section 112 of Motor Vehicle Act, 1988.
(2) Notification No. MVA 0589/CR 1061/TRA-2, dated 19th May 1990 And
Addendum dated 30th September 2002, published in Maharashtra Govt. Gazette.
Part IV-, (Extraordinary) on 30th September 2002.
(3) Ministry of Road Transport & Highways Notification No.1377, dated 6th April 2018.
(4) Notification No. ADG(Tr.)/45/Planning/3105/2019, dated 25th October 2019 Additional Director General of Police (Traffic), State of Maharashtra, Mumbai.
(5) SP hsp Raigad letter No. ow 408/2024, dated 14th April 2024.
(6) PI Panvel hsp letter No. ow 76/2024, dated 14th April 2024.
(7) Incharge of Borghat Tap hsp letter No. ow 333/2024, dated 13th April 2024.
(8) Letter No. ADG(Tr.)/45/Planning/1197/2024, dated 15th April 2024,
Additional Director General of Police (Traffic), State of Maharashtra, Mumbai.
NOTIFICATION
O.W. No. ADGP(T)/45/Planning/1268/2024.—1. Whereas, The Superintendent of Police, Highway Safety Petrol, Raigad Range has submitted a proposal on 14.04.2024 that Yashwantrao Chavan Expressway (Mumbai-Pune Highway) having a total length of 94 km. and on this stretch km. 35.500 Up to km. 52.000 is the ghat area (Borghat). Presently, the speed limit on this expressway is 100 kmph for the flat section and within the ghat area the speed limit is 50 kmph. Practically, the mentioned speed limit within the ghat area is very low for light vehicles and due to the steep gradient on the Pune to Mumbai channel while travelling at a speed of 100 kmph from the flat area while entering the Ghat stretch lowering the vehicle speed as low as 50 kmph for the Light Motor Vehicles causes undue hardship to vehicle drivers which is inter alia reason for increase in number of accidents within the stretch.
2. Whereas, taking into account the submissions and feedbacks during the meeting held on 15th April 2024 at office of the Addl. Director General of Police (Traffic). MS, Mumbai of officials from MSRDC office Pune, Transport Department, IRB INFRA Development Office, Superintendent of Police, Highway Police Raigad Zone, Police Inspector, Highway Police Panvel Division, In-charge Police Inspector Borghat TAP, Chief Draftsman Transport Engineering Department on speed limit at Borghat considering the Yashwantrao Chavan Expressway Road, design and widening of roads in ghat section it has been unanimously decided to amend speed limitations in Borghat section of the Yashwantrao Chavan Expressway for Light Motor Vehicles.
3. Therefore, in exercise of the powers conferred by sub section (2) of Section 112 of the Motor Vehicle Act, 1988 r/w Notification No. MVA 0589/CR-1061, TRA-2, dated 19th May 1990 and Addendum dated 30th September 2002. published in Maharashtra Govt. Gazette, Part IV-A .
(Extraordinary) on 30th September 2002. I, Sukhwinder Singh, Addl. Director General of Police.
(Traffic), Maharashtra State, Mumbai hereby fixes the speed limits on Yashwantrao Chavan Expressway (Mumbai-Pune Highway) and Ghat section km. 35.500 to km. 52.000 according to the classes of Motor Vehicles as specified in the attached schedule.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
| Maximum Speed Per Hour in Kilometers on Yashwantrao Chavan Expressway (Mumbai-Pune Highway) and Ghat Section km. 35.500 to Km. 52.000 | |||
| Sr. No. | Class of Vehicles | Speed Limits | |
| Plane Terrain | Ghat Terrain | ||
| 01 | Passenger Motor Vehicles with 8 passengers including the driver. (M-l Category Vehicles) | 100 K.M./Per Hour | 60 KM/Per Hour |
| 02 | Passenger Motor Vehicles with 9 or more passengers including the driver. (M-2 and M-3 Category Vehicles) | 80 K.M./Per Hour | 40 KM/Per Hour |
| 03 | Motor Vehicles used for transporting goods/goods. (All ' N ' Category Vehicles) | 80 K.M./Per Hour | 40 K.M./Per Hour |
| 04 | Two-Wheeler Motor Vehicles | Not allowed | Not allowed |
| 05 | Four Wheeler Motor Rickshaw (Quadricycle) | Not allowed | Not showed |
| 06 | Three Wheeler Motor Vehicles/ Rickshaws | Not allowed | Not allowed |
SUKHWINDER SINGH,
Additional Director General of Police (Traffic),
Maharashtra State, Mumbai.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०२४/वैशाख ५-११, शके १९४६
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
संदर्भ.---(१) जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांचा म.जा.क्र.ब. २/१९२६/२०२४, दिनांक २७ मार्च २०२४, रोजीचा कार्यालयीन
आदेश.
(२) श्री. एन. जी. गोसावी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांचा दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीच्या मंजूर र्अजित रजेस जोडून रजेच्यामागे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजीची एक दिवसांची र्अजित रजा जोडून मिळणेबाबतचा दिनांक २८ मार्च २०२४ रोजीचा अर्ज.
आदेश
क्रमांक बी-२/१९७३/सन २०२४.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर र्अजित रजेस जोडून मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला आहे.
अ. क्र. न्यायिक अधिका-यांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा मुख्यालय सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम
रजा
(१) (२) (३) (४)
(५) (६)
१ श्री. एन. जी. गोसावी, २४३ दिनांक १ एप्रिल २०२४ --------------- श्रीमती एस. एस. वनकोरे, सचिव, जिल्हा विधी दिवस रोजीची एक दिवस दिनांक १ एप्रिल २०२४ २ रे सह दिवाणी सेवा प्राधिकरण, र्अजित र्अजित रजा. रोजीचे कार्या. वेळेपासून न्यायाधीश, व. स्तर व रत्नागिरी. रजा. (दिनांक २ एप्रिल २०२४ ते दिनांक १ एप्रिल २०२४ अति. मुख्य
ते दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजीचे कार्या. वेळेनंतरपयर्ंत. न्यायदंडाधिकारी, चे रजेला जोडून)
रत्नागिरी यांचेकडे
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका-यांचेे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ३० मार्च २०२४.
एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.