Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (को.वि.पु.) असा. क्र.६१, दिनांक २७ एप्रिल २०२४, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांजकडून, अधिसूचना, क्रमांक गृह/का.१/टे.४/विकाअ/वशी-ईओ-१६०१२(२६)/५/२०२३.

Published 27 April 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-04-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २७, २०२४/वैशाक ७, शके १९४६ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ३०] शनिवार, एप्रिल २७, २०२४/वैशाख ७, शके १९४६ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ६१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांजकडून

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

अधिसूचना

क्रमांक गृह/का.१/टे.४/विकाअ/वशी-ईओ-१६०१२(२६)/५/२०२३.— जिल्हाधिकारी, पालघर, जिल्हा पालघर ह्य निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या पालघर जिल्ह्यतील, पालघर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक, २०२० मध्ये निवडून आलेल्या खालील सदस्य यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वषार्ंकरिता अथवा पुढील आदेश होईपयर्ंत यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास/जिल्हाधिकारी पालघर यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापुर्वी केव्हाही, कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

१. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :----

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/ वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्यप्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामाकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्िंतनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वत:च्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. (चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्िंतनी " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये. (१) भाग एक (को.वि.पु.)----६१--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २७, २०२४/वैशाक ७, शके १९४६ (पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देऊ नये.

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य संबंधित तहसिलदार यांचेकडे तात्काळ परत करावे, अन्यथा ते पुर्ननियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबा कृती केल्यास किंवा त्यांचे विरुद्ध गुन्ह्यची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

अ.क्र. व्यक्तीचे नाव (१) (२)

जिल्हा परिषद/पंचायत समिती (३)

१ श्री. मंगेश दयानंद भोईर

सदस्य, जिल्हा परिषद, पालघर

पालघर, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४.

गोविंद मारुती बोडके, जिल्हाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GO VE RNMENT PRIN TIN G, STATI ON ERY AN D PUB LIC ATION , PRI NTE D AND PU BLISHED BY DI REC TO R, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 April 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-04-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-04-27.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.