RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष १०, अंक १६] गुरुवार, ऑगस्ट २९, २०२४/भाद्रपद ७, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-३ सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६.-----महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ ऑगस्ट २०२४.
MAHARASHTRA ORDINANCE No. VI OF 2024.
AN ORDINANCE FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA GOVERNMENT SERVANTS REGULATION OF TRANSFERS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES ACT, 2005.
सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६.
महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया
विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही ;
(१)
भाग चार-४१---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑगस्ट २९, २०२४/भाद्रपद ७, शके १९४६ २००६ चा महा. २१.
आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे ;
त्याअर्थी, आता, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत :----
१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये संक्षिप्त नाव व प्रारंभ. पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अध्यादेश, २०२४, असे म्हणावे.
(२) तो, तात्काळ अंमलात येईल.
२००६ चा महा. २१.
२. महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ४ मध्ये, पोट-कलम (४) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :-----
सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ४ ची सुधारणा.
"(४क) कलम (४) मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ यासाठीच्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे, ज्या प्रकरणांमध्ये बदली करण्यात आलेली नाही, अशा प्रकरणांमध्ये, ३१ ऑगस्ट २०२४ पयर्ंत बदली करण्यात येईल.".
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑगस्ट २९, २०२४/भाद्रपद ७, शके १९४६ ३निवेदन
महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (२००६ चा महा. २१) (यात यापुढे ज्याचा निर्देश, " उक्त्त अधिनियम " असा करण्यात आला आहे), हा शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरिता अधिनियमित करण्यात आला आहे. उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ मध्ये पदस्थापनेचा पदावधी ज्यात, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ, ब आणि क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वषार्ंचा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. उक्त्त अधिनियमाच्या कलम ४ मध्ये बदलीच्या पदावधीची तरतूद केली असून त्यातील पोट-कलम (४) मध्ये, शासकीय कर्मचायांच्या बदल्या, सामान्यपणे, वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे.
२. भारतीय निवडणूक आयोगाने, सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ यासाठी १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू केली होती आणि ती ४ जून २०२४ पयर्ंत अंमलात होती.
३. उक्त्त आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे शासकीय कर्मचायांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे, उक्त्त अधिनियमाच्या कलम ४ मध्ये सुयोग्य सुधारणा करून, सर्वसाधारण बदलीसाठीचा उक्त्त कालावधी ३१ ऑगस्ट २०२४ पयर्ंत वाढवणे इष्ट वाटते.
४. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र शासकीय कर्मचायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून, हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
मुंबई,
सी. पी. राधाकृष्णन,
दिनांक २९ ऑगस्ट २०२४.
महाराष्ट्राचे राज्यपाल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
व्ही. राधा,
शासनाच्या अपर मुख्य सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.