Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1 A, A-1627 (06-09-2024) Publication of Maharashtra Municipal Corporation Act, 1949 under section 224 & 225 by Commissioner & Administrator, Nagpur Municipal Corporation, Nagpur Ex. Ord. No., 20 Sr. No. 60.

Published 06 September 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ६, २०२४/भाद्रपद १५, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २० ] शुक्रवार, सप्टेंबर ६, २०२४/भाद्रपद १५, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६०.

आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २२४ व २२५ नुसार सदर रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करणेबाबत

प्रारूप सूचना

क्रमांक मनपाना-नरवि-९५३-२०२४.----

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारीत विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासन, अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३०० (अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी, २००० अन्वये भागश: मंजूर झाली असून ती दिनांक १ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे. तसेच, वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस-२४००-१६२८-सी.आर. २००-नवि-, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली असून, ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्र. टिपीएस २४०१-८८५-प्र.क्र. ७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २०१९ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्राअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर शहराकरिता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले होते. तथापी, शासनाकडील नगर विकास विभागीची अधिसूचना क्र. टिपीएस २४१९-१४१९-प्र.क्र. १५४-२०१९-नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या सात योजनेकरिता सुध्दा नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे. परंतु, शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१९-१४१९-प्र.क्र.१५४ (भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ९ एप्रिल, २०२१ अन्वये नागपूर महानगरपलिकेकडील असलेल्या ७ योनजेसाठी नियोजन प्राधिकरणाचे अधिकार पुनश्च: नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांना प्रदान करण्यात आले आहे ;

आणि ज्याअर्थी, नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत मौजा चिंचभूवन, खसरा क्र. २१९, २२०, २२१, शिट क्र. ७६६/६३, ७६१/५२, नगर भूमापन क्र. ३९०, ३९३, ३९४ मधील जागेतून झोन कार्यालयाने रस्त्याचा विकास केल्याने ना.ज.क.धा. अधिनियमाच्या कलम २०(१)(अ) अन्वये तळेगाव दाभाडे योजनेंर्गत मंजूर केलेल्या सचिन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या अभिन्यासातील भूखंड क्र. १६, १७, २४, २५, ३०, Open Space मधील क्षेत्र उक्त रस्त्याचा विकासाने बाधित होत आहे सदर भाग नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखडयानुसार (आरक्षण क्र. S-२६३) हॉस्पीटल अंतर्गत येत असून, आरक्षणामधून नाला असून सदर नाल्याच्या उत्तर हद्दीलगत कुंपणभिंत असून, महानगरपालिकेने आरक्षणाच्या भागश: भागात ना.-एक-अ-१ (१६२७). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ६, २०२४/भाद्रपद १५, शके १९४६

दवाखान्याचे बांधकाम केलेले असून, सदर दवाखान्याचा वापर सुरू आहे. तसेच, नाल्यास Retaining Wall असून झोन कार्यालयाने नाल्याचा उत्तर हद्दीलगत ९.०० मी रूंद रस्त्याचा विकास केलेला आहे. मौजा चिंचभूवन, खसरा क्र. २१९, २२०, २२१, शिट क्र. ७६६/६३, ७६१/५२, नगर भूमापन क्र. ३९०, ३९३, ३९४ मधील अभिन्यासातील भूखंडे बाधीत होत असल्याने उक्त विकसीत केलेला रस्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २२४ व २२५ नुसार सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करणे आवश्यक असून, या क्षेत्राकरिता नागपूर महानगरपालिका हे नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील मौजा चिंचभूवन, खसरा क्र. २१९, २२०, २२१ मधील नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखडयानुसार (आरक्षण क्र. S-२६३) हॉस्पीटल यास्तव नामनिर्देशित असलेल्या जागेतून झोन कार्यालयाने नाल्याचा उत्तर हद्दीलगत रस्त्याचा विकास केल्याने सदर रस्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २२४ व २२५ नुसार सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याचे महानगरपालिकेने ठरविले आहे व त्यासाठी उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रदत्त अधिकारानुसार आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नागपूर यांनी दिनांक १० एप्रिल, २०२४ रोजी कार्यवाही करणेस तवत: मान्यता प्रदान केली आहे.

त्याअर्थी, उपरोक्त रस्ता हा सावर्जनिक रस्ता म्हणून घोषित करणेच्या अनुषंगाने त्याबाबतचा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४० ००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व कार्यालयीन दिवशी कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्यांचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त रस्ता हा सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करणेसंबधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील, त्यावर महानगरपालिकेकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर सदर रस्ता हा सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करणेसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

नागपूर : दिनांक ४ सप्टेंबर, २०२४.

डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपलिका, नागपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-09-06.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.