Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Nagpur Part 1A (A-1653) (09-10-2024) Publication of MRTP Act 1966 under Section 37 (1) By Chief Executive Municipal Council, Wardha. Extra Ordinary No. 23. Sr. No. 68.

Published 09 October 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-10-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक २३ ] बुधवार, ऑक्टोबर ९, २०२४/आशि्वन १७, शके १९४६. [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी

----------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६८.

मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.---

जाहीर सूचना

क्रमांक जिपव-ग्रा.पं-अनु. शाखा-वशि-६६३--२०२४.---

ज्याअर्थी, सेवाग्राम विकास योजनेच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत वरुड, तह. जिल्हा वर्धा येथील श्री. बलराम वामनराव अंबुलकर, रा. वरुड, तह. जिल्हा वर्धा यांचे मालकीचे शेत सव्र्हे क्र. १४/१ एकूण आराजी १.४४ हे. आर. कृषी क्षेत्रामध्ये समाविष्ठ जमिनीचे (कृषी क्षेत्र) मधुन काढून रहिवासी क्षेत्रामध्ये बदल करणेबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.

ग्रामपंचायत वरुड मधील जिल्हा परिषद, वर्धा कक्षेतील शेत सव्र्हे क्र. १४/१ मध्ये विषयांकीत बदल करण्याकरीता चा प्रस्ताव शासनाकडे सादर करावयाचा असल्याने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १४ जून १९९० चे क्रमांक वियो-सेवाग्राम (बिनप)-टिपीव्ही-६-७६९१-नुसार वर्धा जिल्हा परिषदने संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य पुणे यांची अधिसूचना क्रमांक डिपी-सेवाग्राम अडमिन-२, दिनांक १८ मे, १९७७ द्वारे सेवाग्राम, नांदोरा, कामठवाडा, वरुड आणि बरबडी ह्य ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार वापरण्याची परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभाग निर्णय क्रमांक टीपीव्ही १०८६-३७९१-सीआर-१०३-१-८७ नवि-१७ दिनांक ५ जानेवारी, १९८७ अन्वये ब व क वर्ग नगरपरिषदतसेच बिगर नगर परिषद शहरांच्या विकास योजनांना उक्त अधिनियमाच्या कलम ३१ नुसार अंतिम मंजुरी देण्याबाबतचे अधिकार संचालक, भाग एक-अ- ना.-(असा)-१६५३). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ९, २०२४/आशि्वन १७, शके १९४६ नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे द्वारे दिनांक ३१ मार्च, १९९० या दिनांकापासुन विकास योजना अंमलात आली. करीता सेवाग्राम विकास योजनेनुसार मौजा वरुड गावाचा विकास करण्याचे दृष्टिने वरील मंजुर विकास योजनेमध्ये खालीलप्रमाणे किरकोळ फेरबदल करणे आवश्यक आहे.---

मंजुर विकास योजनेतील मंजुर अभिन्यास मौजा वरुड, तह. जिल्हा वर्धा येथील श्री. बलराम वामनराव अंबुलकर, रा. वरुड, तह. जिल्हा वर्धा यांचे मालकीचे शेत सव्र्हे क्र. १४/१ एकूण आराजी १.४४ हे. आर आहे. त्यांनी सदरचे क्षेत्राचा वापर निवासी प्रयोजनाकरीता करण्याचे ठरविले आहे.

त्या करीता त्यांनी जिल्हा परिषदकडे दिनांक ०८ ऑगस्ट, २०२३ ला कागदपत्रांचे पुर्ततेसह प्रस्ताव सादर करुन क्षेत्र बदल करण्याची विनंती केलेली आहे.

सोबत (१) ग्रामपंचायत वरुड यांचे पत्र जा.क्र.२४५/२०२३, दिनांक ३ जुलै, २०२३ व मासिक सभा ठराव क्रमांक १३, दिनांक १९ जून, २०२३ च्या सभेचे ठराव अन्वये सदरचे क्षेत्र बदल करण्यास मंजुरी दिलेली आहे. (२) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांचे पत्र क्रमांक DHO/UIP/Site Insp./८०९.२२०/२३, दिनांक २० एप्रिल, २०२३ अन्वये शेत सव्र्हे क्रमांक १४/१ एकुण आराजी १.४४ हेक्टर आर. हे रहिवासी करण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा विषय क्रमांक ७ व ठराव क्रमांक ६ दिनांक २८ जून, २०२४अन्वये उक्त कृषी क्षेत्रात समाविष्ट जमिनीचे रहिवासी क्षेत्रात बदल करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, तेव्हा सदरचा प्रस्तावाबाबत सुचित करण्यात येते की, ज्या कुणाला वरील फेरबदलाबाबात काही आक्षेप अथवा सुचना पाठवावयाच्या असतील त्यांची ही सुचना वृत्तपत्रात तसेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांचे कडे लेखी स्वरुपात आक्षेप सादर करावेत. विहीत मुदतीत आक्षेप प्राप्त झाल्यास त्यांचा विचार करण्यात येईल. सदहर्ु किरकोळ फेरबदल दर्शविणारा सेवाग्राम विकास योजनेचा नकाशा कार्यालयीन वेळात सर्व दिवशी अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.

जितीन रहमान, (भा.प्र.से.), वर्धा:

मुख्य कार्यकारी अधिकारी, दिनांक ९ ऑक्टोबर, २०२४

जिल्हा परिषद, वर्धा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 October 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-10-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-10-09.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.