Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

HB-2152-BILL No. XXXI-(17-12-2024)L. A. BILL No. XXXII OF 2024. A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT Part V (Marathi) Ex. Ord. No. 39 No. 14(2).

Published 17 December 2024

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष १०, अंक १४(२)] मंगळवार, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ [पृष्ठे ७, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११७ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—

L. A. BILL No. XXXI OF 2024.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.

सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९५८ चा ६०.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४, रोजी महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अध्यादेश, २०२४, हा प्रख्यापित केला होता ;

२०२४ चा महा. अध्या. १२.

(१)

भाग पाच ३९-------१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ;

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अधिनियम, २०२४, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(२) तो, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

२. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश, "मुख्य अधिनियम" असा केला आहे) १९५८ चा ६०.

यास जोडलेल्या अनुसूची एक मध्ये,------

(१) अनुच्छेद ४ मध्ये, स्तंभ (२) मधील, "शंभर रुपये" या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

सन १९५८ चा अधिनियम क्रमांक ६० याच्या अनुसूची एक ची सुधारणा.

(२) अनुच्छेद ५ मध्ये, खंड (ह) मधील, उप-खंड (ब) मध्ये, स्तंभ (२) मधील, "शंभर रुपये" या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) अनुच्छेद ८ मध्ये, स्तंभ (२) मधील, "शंभर रुपये" या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(४) अनुच्छेद ९ मध्ये, स्तंभ (२) मधील, "शंभर रुपये" या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(५) अनुच्छेद १० मध्ये, स्तंभ (२) मधील, "५०,००,००० रुपयांच्या कमाल मर्यादेच्या अधीनतेने, भाग भांडवलावर किंवा, यथास्थिती, वाढीव भाग भांडवलावर ०.२ टक्के " या मजकुराऐवजी, "एक कोटी रुपयांच्या कमाल मर्यादेच्या अधीनतेने, भाग भांडवलावर किंवा, यथास्थिती, वाढीव भाग भांडवलावर ०.३ टक्के " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(६) अनुच्छेद १२ ऐवजी, पुढील अनुच्छेद दाखल करण्यात येईल :----- " १२. निवाडा, म्हणजे, दावा चालू असताना, न्यायालयाच्या आदेशाव्यतिरिक्त अन्यथा केलेल्या निर्देशावर, विद्यमान किंवा भावी विवाद लवादाकडे सादर करण्या- विषयीच्या लेखी करारनाम्याच्या परिणामी दिलेला निवाडा असणारा, परंतु, वाटणीचा निदेश देणारा निवाडा नसणारा,---

(अ) स्थावर मालमत्तेशी संबंधित असणारा ; अनुच्छेद २५ च्या खंड (ब) अन्वये

अभिहस्तांतरणपत्रावर जे आकारण्यायोग्य असेल तितके शुल्क.

(ब) (एक) जेव्हा, निवाडयामध्ये दिलेली निवाडयामध्ये दिलेल्या रकमेच्या ०.७५ टक्के.

रक्कम, पन्नास लाख रुपयांपेक्षा

अधिक नसेल त्याबाबतीत;

(दोन) जेव्हा, निवाडयामध्ये दिलेली रुपये सदतीस हजार पाचशे +ÊvÉEò निवाडयामध्ये रक्कम, पन्नास लाख रुपयांपेक्षा दिलेल्या रकमेच्या ०.५ टक्के. अधिक असेल परंतु, पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक नसेल

त्याबाबतीत ; (तीन) जेव्हा, निवाडयामध्ये दिलेली रुपये दोन लाख बासष्ट हजार पाचशे +ÊvÉEò रक्कम, पाच कोटी रुपयांपेक्षा निवाडयामध्ये दिलेल्या रकमेच्या ०.२५ टक्के.";

अधिक असेल त्याबाबतीत,

जंगम मालमत्तेशी संबंधित असणारा,

लवादाने किंवा पंचाने दिलेला कोणताही लेखी निर्णय, होय,महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ ३ (७) अनुच्छेद २७ मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपयांच्या " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपयांच्या" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(८) अनुच्छेद ३० मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(९) अनुच्छेद ३८ मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१०) अनुच्छेद ४४ मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(११) अनुच्छेद ४७ मध्ये, खंड (१) मधील, उपखंड (ब) मध्ये, स्तंभ (२) मधील, " पंधरा हजार " या मजकुराऐवजी, " पन्नास हजार " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१२) अनुच्छेद ४९ मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१३) अनुच्छेद ५० मध्ये, स्तंभ (२) मधील, " शंभर रुपये " या मजकुराऐवजी, "पाचशे रुपये" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१४) अनुच्छेद ५२ मध्ये, खंड (अ) मधील, स्तंभ (२) मध्ये, " दोनशे रुपये " या मजकुराऐवजी, " पाचशे रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१५) अनुच्छेद ५८ मध्ये, खंड (अ) मधील, स्तंभ (२) मध्ये, " दोनशे रुपये " या मजकुराऐवजी, " पाचशे रुपये " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(१६) अनुच्छेद ६३ मध्ये,---

(एक) खंड (अ) मधील, स्तंभ (१) मध्ये, " दहा लाख " या मजकुराऐवजी, "पाच लाख" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(दोन) खंड (ब) मधील,----

(क) स्तंभ (१) मध्ये, " दहा लाख " या मजकुराऐवजी, " पाच लाख " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(ख) स्तंभ (२) मध्ये, " दहा लाख रुपयांवरील रकमेच्या ०.१ टक्के " या मजकुराऐवजी, " पाच लाख रुपयांवरील रकमेच्या ०.३ टक्के " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

भाग पाच ३९-------१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ ३. (१) महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अध्यादेश, २०२४, हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे. २०२४ चा महा. अध्या. १२.

सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १२ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) अशाप्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ ५

उद्देश व कारणे यांचे निवेदन

मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरुपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) यास जोडलेल्या अनुसूची एक च्या विवक्षित अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते.

२. उक्त अधिनियमातील सुधारणांची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत :---

(एक) अनुच्छेद ४,५,८,९,२७,३०,३८,४४,४९,५०,५२, व ५८ यांमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या विवक्षित संलेखांवरील शंभर रुपये किंवा दोनशे रुपये इतक्या नाममात्र रकमेतील दीर्घ काळापूर्वी निश्चित केलेल्या मुद्रांक शुल्कांच्या दरात पाचशे रुपयेइतकी वाढ करणे ;

(दोन) अनुच्छेद १० मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कंपनी संस्थापन नियमावलीच्या संलेखावरील मुद्रांक शुल्काच्या दरात व मुद्रांक शुल्काच्या दराच्या कमाल मर्यादेत वाढ करणे ;

(तीन) अनुच्छेद १२ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या लवादाने दिलेल्या निवाडयाच्या संलेखावरील मुद्रांक शुल्कांच्या दरात वाढ करणे ;

(चार) जेव्हा अनुच्छेद ४७ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या रोख रकमेच्या स्वरुपात आणलेला अंशदानाचा हिस्सा, ५०,००० रुपयांहून अधिक असेल त्याबाबतीत, भागीदारीच्या संलेखावरील मुद्रांक शुल्कांच्या दराच्या कमाल मर्यादेत वाढ करणे ;

(पाच) अनुच्छेद ६३ मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कार्यकंत्राटाच्या संलेखावरील मुद्रांक शुल्काच्या दरात व मुद्रांक शुल्काच्या दराच्या कमाल मर्यादेत वाढ करणे.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे, जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटली होती, आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (२०२४ चा महा. अध्या. १२), हा प्रख्यापित केला होता.

४. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

नागपूर, दिनांक १५ डिसेंबर, २०२४.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६

वित्तीय ज्ञापन

मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरुपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (१९५८ चा ६०) यास जोडलेल्या अनुसूची एक च्या अनुच्छेदांमध्ये विवक्षित सुधारणा केल्या आहेत.

हे विधेयक राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून अधिनियमित झाल्यावर, त्यात राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च अथवा अनावर्ती खर्च अंतभर्ूत असेल अशी कोणतीही तरतूद या विधेयकात करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, डिसेंबर १७, २०२४/अग्रहायण २६, शके १९४६ ७

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस

(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (१) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२४ पुर:स्थापनार्थ घेण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत शिफारस करीत आहेत.

विधान भवन, नागपूर, दिनांक १७ डिसेंबर, २०२४.

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 December 2024. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2024-12-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.