महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९ - २५, २०२४ / अग्रहायण २८ ते पौष ४, शके १९४६ [ पृष्ठ ०१
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
जिल्हा परिषद, अहिल्यानगर
अधिसूचना
क्रमांक साप्रवि-१/प्रशासन-१/७७८/२०२४.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ नुसार व महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, सचिवालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना दिनांक ४ सप्टेंबर १९६४ च्या नियम (५) मधील तरतुदीनुसार अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सन २०२३-२०२४ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक २४१ अन्वये मंजुरी दिलेली असून महाराष्ट्र शासन, ग्रामविकास, सचिवालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना दिनांक ४ सप्टेंबर १९६४ मधील नियम (९) (वार्षिक प्रशासन अहवालाची अधिसूचना प्रसिद्ध करणे) अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करीत आहे.
आशिष येरेकर,
भा.प्र.से.,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, अहिल्यानगर.
अहिल्यानगर, २९ नोव्हेंबर २०२४.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.