Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV Ext. 3 (Maharashtra Act No. III of 2025) Siddhivinayak Temple Marathi

Published 01 January 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी १, २०२५/पौष ११, शके १९४६ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ११, अंक १(३)] बुधवार, जानेवारी १, २०२५/पौष ११, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३.-----श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) पृष्ठे १-२ अधिनियम, १९८० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर '' महाराष्ट्र शासन राजपत्रात '' दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९८१ चा महा. ६. आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८० यात आणखी सुधारणा करण्यासाठी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) अध्यादेश, २०२४, हा प्रख्यापित केला होता ; २०२४ चा महा. अध्या. १५. भाग चार ३---१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, जानेवारी १, २०२५/पौष ११, शके १९४६ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

१. (१) या अधिनियमास, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) अधिनियम, संक्षिप्त नाव व प्रारंभ.

२०२४, असे म्हणावे.

१९८१ चा महा. ६.

(२) तो, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल. २. श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८० (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ५ मधील, पोट-कलम (३) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :-----

सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ५ ची सुधारणा.

" (३) राज्य शासन, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, एक सभापती, एक कोषाध्यक्ष आणि पंधरापेक्षा अधिक नसतील असे इतर सदस्य यांची मिळून बनणारी एक समिती नियुक्त करील. ".

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ७ मध्ये, पोट-कलम (१) मधील, " तीन वषार्ंसाठी " या मजकुराऐवजी, " पाच वषार्ंसाठी " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम ७ ची सुधारणा.

शंका दूर करणे.

२०२५ चा महा. ३.

४. शंका निरसनार्थ, याद्वारे असे घोषित करण्यात येते की, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) अधिनियम, २०२४ याद्वारे, समितीच्या सदस्यांचा पदावधी वाढविण्याच्या संबंधात केलेली सुधारणा, उक्त अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी नियुक्त केलेल्या, सभापती व कोषाध्यक्ष यांच्यासह, सर्व सदस्यांना लागू असेल.

५. (१) श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) (सुधारणा) अध्यादेश, २०२४, हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२४ चा महा. अध्या. १५.

सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ याचे निरसन व व्यावृत्ती.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमान्वये सुधारणा करण्यात आलेल्या, मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 January 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-01-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-01-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.