Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1717 Nagpur Part 1 (02-01-2025 to 08-01-2025) Publication of Regarding road traffic for high bridge near village chikh lapar on state road No. 326 regarding diversion by district Magistrate, Nagpur. Ord. No 1 Sr. No 1.

Published 02 January 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २-८, २०२५/पौष १२-१८, शके १९४६ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २-८, २०२५/पौष १२-१८, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

नाही.

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-२

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी --------------------------- नाही. --------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.

जिल्हादंडाधिकारी, यांजकडून

संदर्भ:- १. मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५.

२. कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. ३, नागपूर यांचे पत्र क्र. जावक क्र. ३९६८-तावि-२०२४, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ प्राप्त दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४.

३. उपविभागीय अधिकारी, उमरेड यांचे पत्र क्रमांक प्रस्तू-१-उविअ-उम-कावि-१५६०-२०२४ दिनांक १३ डिसेंबर, २०२४.

राज्य मार्ग क्रमांक ३२६ वर चिखलापार गावाजवळ मोठया उंच पुलाच्या बांधकामासाठी मार्गावरील वाहतूक

इतर मार्गाकडे वळती करण्याबाबत

अधिसूचनाक्रमांक-अजिदं-गृह-अ.का.-२-अधिसूचना-कावि-४९१-२०२४.----- ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक ३, नागपूर यांनी राज्य मार्ग क्रमांक ३२६ वर चिखलापार गावाजवळ मोठया उंच पुलाचे बांधकामासाठी मार्गावरील वाहतूक इतर मार्गाकडे वळती करण्याबाबत या कार्यालयास प्रस्ताव सादर केला आहे. ना.-एक-१ (१७१७). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २-८, २०२५/पौष १२-१८, शके १९४६ ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, उमरेड यांनी चिखलापार ते मांगरूळ फाटा रा. मा. क्रमांक ३२६ मार्गावरील जड वाहतूक बंद करून चिखलापार (पांजरेपार फाटा ) नांद-भगवानपूर-जवळी फाटा एकूण लांबी २८.५ कि. मी. प्रस्तावित वळणमार्गावरून वळती करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.

ज्याअर्थी, वर्धा-समुद्रपूर-गिरड-महालगाव-उमरेड राज्य मार्ग ३२६ च्या कि.मी. ७५/२०० मध्ये चिखलापार गावाजवळ मोठया उंच पुलाचे बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३ नुसार प्रशासकीय मान्यता तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर यांनी दिनांक १५ जानेवारी, २०२४ नुसार तांत्रिक मंजुरी प्रदान केली आहे.

ज्याअर्थी, राज्य मार्ग क्रमांक ३२६ वर चिखलापार गावाजवळ पुलाचे बांधकाम करीत असतांना प्रस्तावित वळणमार्ग चिखलापार (पांजरेपार फाटा) नांद-भगवानपूर-जवळी फाटा चिचाळा ते मांगरूळ फाटा एकूण लांबी २८.५ कि. मी. मार्गावर वाहतूक वळती करणे असल्याची माझी खात्री झाल्याने मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार मी, डॉ. विपीन, जिल्हादंडाधिकारी, नागपूर अटी व शर्तीचा भंग होणार नाही या आधारावर वाहतूक वळती करण्याची परवानगी देत असून ही अधिसूचना दिनांक ३० जून, २०२५ पयर्ंत लागू राहील.

सदर अधिसूचना आज दिनांक २० डिसेंबर, २०२४ रोजी माझ्या स्वाक्षरी व शिक्कयानिशी प्रसिध्द करण्यात येत आहे.

नागपूर :

डॉ. विपीन जिल्हादंडाधिकारी, नागपूर.

दिनांक २० डिसेंबर, २०२४.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 January 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-01-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-01-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.