महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक १ ] गुरूवार, जानेवारी १६, २०२५/पौष २६, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी
--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १.
जिल्हाधिकारी, यांजकडून
अधिसूचना
क्रमांक सं.क्र.-जिकाभं.-अका-जिपपंसनि-२०२५-कावि -३२-२०२५.----
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई, यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना असाधारण क्र. ४१७ क्रमांक जिपनि, २०१८-प्र.क्र.२१८ (२)-पंरा-२, दिनांक २७,नोव्हेंबर,२०१९ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा अध्यक्ष,उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २ ई च्या तरतुदीनुसार अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासह) राज्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या राखून ठेवावयाच्या पदांची संख्या विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई, यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना असाधारण क्र. ४१७ क्रमांक जिपनि, २०१८-प्र.क्र.२१८ (२)-पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर, २०१९ अन्वये अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासह) उक्त नियमातील २ फ यातील तरतूदीनुसार पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदाचे अनुसूचितील अनुक्रमांक ३० नुसार भंडारा जिल्ह्यकरीता सभापती पदांची संख्या विर्िनदिष्ट करुन वाटप केले आहे.
तसेच, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई, यांचेकडील पत्र क्रमांक जिपनि, २०२२-प्र.क्र.३१अ-पंरा-२, दिनांक १२ एप्रिल,२०२२ नुसार २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी १६, २०२५/पौष २६, शके १९४६ त्याअर्थी, मी, डॉ.संजय कोलते, जिल्हाधिकारी, भंडारा उक्त नियमातील नियम २ फ च्या पोट नियम (२) ते (५) च्या तरतूदीनुसार जिल्ह्यतील ७ पंचायत समित्यांमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सभापतीच्या आरक्षित पदांचे आरक्षण आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी काढण्यात आलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे आरक्षित झाल्याचे याव्दारे खाली नमुदप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
तक्ता
अ. क्र. पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षित पदाचा प्रवर्ग
(१) (२)
(३)
१ तुमसर सर्वसाधारण (महिला)
२ मोहाडी सर्वसाधारण
३ साकोली सर्वसाधारण
४ लाखनी अनुसूचित जाती (महिला)
५ भंडारा सर्वसाधारण (महिला)
६ पवनी अनुसूचित जमाती
७ लाखांदुर सर्वसाधारण
भंडारा :
दिनांक १० जानेवारी, २०२५.
डॉ. संजय कोलते, जिल्हाधिकारी, भंडारा.