Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1742 Part 1 A (Extra Ordinary) (22-01-2025) Publication of MRTP Act, 1966 under section 37 by Chairman, Nagpur Improvement Trust, Nagpur Extra Ord. No. 2 Sr. No. 2-3

Published 22 January 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-01-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक २ ] बुधवार, जानेवारी २२, २०२५/माघ २, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी

----------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २.

सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल

सूचना

क्रमांक-नासुप्र-उसंनर-कलम-३७-५--२०२४.---

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे तरतूदीनूसार नागपूर शहराकरीता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-सी. आर.-३००(ए)-९७-युडी-९, दिनांक ७ जानेवारी, २००० नुसार भागशः मंजूर व क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी.आर.-२००-२०००-युडी-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ नुसार अंतिमता: मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८५५-सी.आर.-७६-युडी-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये ७ योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यासला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले होते व विषयांकित जागा या ७ योजनेपैकी " ग्रिन बेल्ट कंट्रोल स्किम " अंतर्गत समाविष्ट होती. तद्नंतर शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४१९-१४१९-प्र.क्र.१५४(भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ९ एप्रिल, २०२१ अन्वये ७ योजनांकरिता केवळ स्मार्ट सिटी अंतर्गत शासनाने मंजूर केलेल्या " नगर रचना परियोजना " मधील मौजा पारडी-भरतवाडा-पुनापूर-भांडेवाडी येथील क्षेत्र वगळून नागपूर सुधार प्रन्यासला " नियोजन प्राधिकरण " म्हणून घोषित केलेले आहे व विषयांकित खसरा क्रमांक ८२-९५(भाग), मौजा खामला ही जागा या ७ योजनेअंतर्गत समाविष्ट असून " ग्रीन बेल्ट कंट्रोल स्कीम " अंतर्गत येत असून या जागेकरीता " नियोजन प्राधिकरण " म्हणून नागपूर सुधार प्रन्यास आहे.

ना. एक-अ-१७४२).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २२, २०२५/माघ २, शके १९४६ नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम-३७ नुसार खाली नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासने ठरविले आहे व उक्त प्रस्तावासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मंडळाने ठराव क्रमांक १३-१२२२(तहकूब)-दिनांक ११ डिसेंबर, २०२४-डीडीटीपी अन्वये फेरबदलाची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकास योजनेत सुचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे,--

तक्ता

अनुक्रमांक खसरा क्रमांक/मौजा अंदाजे क्षेत्र मंजूर सुधारित विकास म.प्रा.नि.व न.र. अधिनियम, १९६६ योजनेप्रमाणे उपयोग चे कलम - ३७.

नुसार प्रस्तावित उपयोग (१) (२) (३) (४) (५) हे. आर

१ ८२-९५ (भाग) खामला ० ३२ " गार्डन " (एस. डब्लू-१२१) निवासी ० ७७६ " पार्किंग " (एस. डब्लू-१२०)

० १९ " प्रायमरी शाळा " (एस. डब्लू-११९)

० १४ " १२.०० मी. रूंद रस्ता " उपरोक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर सुधार प्रन्यासच्या उपसंचालक, नगर रचना (रचना) विभागात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरीकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या लेखी सूचना किंवा हरकती उपसंचालक, नगर रचना, नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त होतील त्यावर नागपूर सुधार प्रन्यासकडून विचार होऊन नंतर फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

संजय मीणा, सभापती, नागपूर : दिनांक १५ जानेवारी, २०२५.

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

-------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३.

BY CHAIRMAN, NAGPUR IMPROVEMENT TRUST

Modification U/s 37 of Maharashtra Regional & Town Planning Act,1966

NOTICE

No.-NIT-DDTP-Sec-37- 5-2024.–

The Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 have been sanctioned by Government vide Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)97-UD-9, dated the 7th January, 2000 and finally sanc- tioned by Government vide Notification No. TPS-2400-1628-CR-2000-UD-9, dated the 10th Sepetmber, 2001.

Also Nagpur Improvement Trust has been declared as " Planning Authority " for the seven Improvement Schemes being implemented by the Nagpur Improvement Trust vide Government Notification No. TPS - 2401-855-CR-76-UD-9, dated 27th February, 2002. The said land falls in " Green Belt Control Scheme " within 7 schemes mentioned above. Later Nagpur Improvement Trust has been declared as "Planning Authority "३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी २२, २०२५/माघ २, शके १९४६ for the seven Improvement Schemes except Smart City Mission Under Mouje Pardi, Bharatwada, Punapur, Bhandewadi Town Planing Scheme being implemented by the Nagpur Improvement Trust vide Government Notification No. TPS-2419-1419-CR-154(Part)-2019-UD-9 dated 09th April, 2021. The land bearing Kh. No. 82-95(P), Mouza Khamla falls under " Green Belt Control Scheme " out of 7 schemes and the jurisdiction is Nagpur Improvement Trust.

In the said Revised Sanctioned Devlopment Plan, the Nagpur Improvement Trust is desirous of mak- ing some modification under section-37of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly Nagpur Improvement Trust vide its Board Resolution No.13-1222(तहकूब), dated 11th December, 2024-DDTP has consented to make the aforesaid modification in Development Plan of Nagpur. The aforesaid modifica- tion proposed is as under,–

TABLE

Sr. No. Kh. No./ Mouza Approximate User as per sanctioned Proposed Change Area M.R.D.P. under section 37 of

M.R. & T.P. Act, 1966 (1) (2)

(3)

(4)

(5) H. A.

1. 82-95(P) Khamla 0.32 " Garden " (SW-121) Residential 0.776 " Parking " (SW-120)

0.19 " Primary School " (SW-119)

0.14 " 12.00 mtr. Wide Road "

The Part Plan of Revised Development Plan of Nagpur showing the proposed modification is displayed in the Office of the Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust, North Ambazari Road, Nagpur during office hours on all working days. The suggestions and objections (in writing) which may be received by Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust in respect of the said modification to the Revised Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Official Gazette will be considered. After hearing and final decision on objections, the said modification proposal will be submitted to the Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Chairman,

Dated the 15th January, 2025. Nagpur Improvement Trust, Nagpur.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 January 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-01-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-01-22.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.