Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा. क्रमांक ८, उप विभागीय अधिकारी डहाणू, उप विभाग डहाणू, जिल्हा पालघर यांजकडून, अधिसूचना, क्रमांक प्रकरण डिपी/भूसंपादन-१/रेल्वे उड्डाणपूल/अधिसूचना ११/१/कावि-४०/२०२५. शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५.

Published 14 February 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-02-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ६] शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी डहाणू, उप विभाग डहाणू, जिल्हा पालघर यांजकडून

अधिसूचना

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

प्रकरण डिपी/भूसंपादन-१/रेल्वे उड्डाणपूल/अधिसूचना ११/१/कावि-४०/२०२५.------ शासन निर्णय क्रमांक पिएलएन-२०१६/सीआर-(६०२)/ नि-३, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ नुसार पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातील पश्चिम रेल्वे वरील रेल्वे फाटक रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र. ५५ कि.मी. १४३/३४७, ४७६ चिंचणी, वाणगांव आशागड आंबेसरी वर सा.क्र. ८/२०० मध्ये रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करणे (रामा-७५).

भूमीसंपदान, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम ३ च्या खंड (इ) च्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे. उक्त अधिनियमाचा कलम ३ खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा अधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते. ज्याचे स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे आणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमिसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्िंतचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ चा पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणत्याही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

(१)

भाग एक (को.वि.पु.)--८--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६ परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल अशी तरतूद आहे ;

परंतु, आणखी असेकी, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही ;

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (०५) नुसार जिल्हाधिकारी, भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देशी उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (०३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावती करण्याचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, डहाणू, उप विभाग डहाणू यांस पदनिर्देशित केले आहे.

परिशिष्ट-१

जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर क्षेत्रफळ (हे. आर. चौ.मी.)
पालघर डहाणू वाणगांव ३९/२/३ ३९/१/२ ८३/४६, ८३/४० ०.००.०८ ०.००.२० ०.००.४४ ०.००.४०
एकूण ०.०११२

परिशिष्ट-१

जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर क्षेत्रफळ (हे. आर. चौ.मी.)
पालघर डहाणू चिखले १३७/१० ०.०१४८
एकूण ०.०१४८

अनुसूची - २

प्रकल्पाचे नाव : डीएफसीसी रेल्वे उड्डाणपूल
प्रकल्पाचे वर्णन : डहाणू तालुक्याच्या हद्दीत मौजे वाणगांव, येथील एकूण अंदाजित संपादन क्षेत्र ०.०११२ चौ.मी. चा प्रकल्प आहे. मौजे चिखले, ता. डहाणू अंदाजित संपादन क्षेत्र ०.०१४८ चौ.मी. चा प्रकल्प आहे.
समाजाला मिळणारे लाभ : रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

१ प्रकल्पाचे बांधकाम २. प्रकल्पाचे परिचालन ३. प्रकल्पाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता आहे.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्याच्या अधिका-याने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

शासन निर्णय क्रमांक पिएलएन-२०१६/सीआर-(६०२)/नि-३, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ नुसार पालघर, जिल्हा डहाणू तालुक्यातील पश्चिम रेल्वे वरील रेल्वे फायटक रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र. ५५ कि.मी. १४३/३४७, ४७६ चिंचणी, वाणगांव, आशागड आंबेसरी वर सा.क्र. ८/२०० मध्ये रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करणे (रामा-७५) द्वारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) चा मध्ये कलम १०क समाविष्ट केले असून त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे. उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३०, दिनांक ३० जानेवारी २०२३ नुसार उक्त प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टीने लोक हितकारी प्रकल्प असल्याकारणे, प्रकरण दोन आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागूु करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ. प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू.
ब. प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता डहाणू आगरोड, कॉटेज हॉस्पिटलजवळ, आगर-डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर, पिन कोड ४०१ ६०१.
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील (M) मा. जिल्हाधिकारी पालघर (भूसंपादन शाखा) यांचेकडील पत्र जा.क्र. भूसंपादन/ कक्ष-१/टे-१/कावि-९०७/२०२२, दिनांक २० ऑक्टोबर २०२२ अन्वये, उप विभागीय अधिकारी डहाणू यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे.

सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे ११ चे उप कलम (०१) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारेखापासून ६० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, डहाणू विभाग, डहाणू यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.

डहाणू, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५.

सत्यभ गांधी, समक्ष प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, डहाणू विभाग, डहाणू.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 February 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-02-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-02-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.