महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ८] गुरूवार, फेब्रुवारी २७, २०२५/फाल्गुन ८, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश
---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९(१) अन्वये ची अधिसूचना
क्रमांक मं.अ.-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-९८-२०२५.-----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) आणि (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्र.मं.अ-उजि(भू)-वि.पा.वि.म.-कावि-४३- २०२४, दिनांक १२ मार्च, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या गावठाणामधील जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, नागपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणाची जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे ;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त गावठाणच्या जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७, २०२५/फाल्गुन ८, शके १९४६ अनुसूची - एकजमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक २८-अ-६५-२०२३-२४, प.ह.नं. ५८, गाव चापेघाट (रिठी), तालुका कुही, जिल्हा नागपूर.
अ. क्र. सव्र्हे क्रमांक संपादनाखालील क्षेत्र
(१) (२)
(३) हे. आर
१ ५१/१ ० २३ २ ५१/२ ० २० ३ ५५ ० ०१ ४ ६५/१ ० ०५ ५ ६५/२ ० २२ ६ ६५/३ ० १८ ७ ९८ ० ०८ ८ ९७ ० ०८ ९ १० ० ०६ १० ६२/१ ० १० ११ ६२/३ ० ०२ ----------- एकूण . . १ २३ -----------
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : चिचघाट उपसा सिंचन योजना.
प्रकल्पकार्याचे वर्णन : चिचघाट उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह, स्विचयार्ड व उध्र्वनलिका तसेच लगतच्या रस्त्याच्या कामाकरिता.
समाजाला मिळणारे लाभ : चिचघाट उपसा सिंचन योजना.
चिचघाट उपसा सिंचन योजनेचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा उद्योगधंदे व शेतजमिनीला होणार आहे.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्त्िंाचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
---- विस्थापित होत नाही ----
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. एलएसी-कार्या-२५-कावि ७९-२०२३, दिनांक १७ जुलै, २०२३.
टीप :---उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.