Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part V, Ext. No. 11, L. A. BILL No. XXI OF 2025. A BILL to provide for settlement of certain arrears of Tax, Interest, Penalty or late fee which were levied, imposed or payable under various Acts imnplemented by the Department of Goods and Services Tax, Government of Maharashtra and for matters connected therewith or incidental thereto. Monday, 17th March 2025.

Published 17 March 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ १ RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक ३] सोमवार, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ [पृष्ठे १६, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १७ मार्च, २०२५ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :–

L. A. BILL No. XXI OF 2025.

A BILL

TO PROVIDE FOR SETTLEMENT OF CERTAIN ARREARS OF TAX, INTEREST, PENALTY OR LATE FEE WHICH WERE LEVIED, IMPOSED OR PAYABLE, UNDER VARIOUS ACTS IMPLEMENTED BY THE DEPARTMENT OF GOODS AND SERVICES TAX, GOVERNMENT OF MAHARASHTRA AND FOR MATTERS CONNECTED THEREWITH OR INCIDENTAL THERETO.

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक २१.

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून अंमलबजावणी केल्या जाणा-या विविध

अधिनियमांखाली जो आकारण्यात आला होता, लादण्यात आला होता किंवा प्रदेय होता तो कर,

व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या विवक्षित थकबाकीची तडजोड करण्यासाठी आणि तत्संबंधित

किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता विधेयक.

ज्याअर्थी, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६, मुंबई मोटार स्पिरीट विक्री कराधान अधिनियम, १९५८, मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९, महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम, १९६२, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५, महाराष्ट्र कोणताही माल कोणत्याही प्रयोजनार्थ वापरण्याच्या हक्काच्या हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५, महाराष्ट्र ऐषआराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७, १९५६ चा ७४. १९५८ चा मुंबई ६६. १९५९ चा मुंबई ५१. १९६२ चा महा. ९. १९७५चा महा. १६.

(१)

भाग पाच----११-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रामध्ये मोटार वाहने आणण्यावरील कर अधिनियम, १९८७, महाराष्ट्र कार्य-कंत्राटांच्या अंमलबजावणीत अंतभर्ूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुनर्अधिनियमित) अधिनियम, १९८९, महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर अधिनियम, २००२ आणि महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ या अन्वये जो आकारण्यात आला होता, लादण्यात आला होता किंवा प्रदेय होता अशा कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या विवक्षित थकबाकीची तडजोड करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----

१९८५ चा महा. १८. १९८७ चा महा. ४१. १९८७ चा महा. ४२. १९८९ चा महा. ३६. २००३ चा महा. ४. २००५ चा महा. ९.

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यानी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, २०२५, असे म्हणावे.

व्याख्या. २. (१) या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,---

(क) " जोडपत्र " याचा अर्थ, या अधिनियमास जोडलेले जोडपत्र, असा आहे ;

(ख) " अपील प्राधिकारी " याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेला अपील प्राधिकारी, असा आहे ;

(ग) " अर्जदार " याचा अर्थ, या अधिनियमाखालील शतर्ींचे पालन करून त्याद्वारे तडजोडीचा लाभ घेण्यासाठी जी इच्छुक असेल अशी, संबद्ध अधिनियमान्वये आकारलेला किंवा आकारणीयोग्य असलेला कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीचे प्रदान करण्यास जबाबदार असलेली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी, असा आहे.

स्पष्टीकरण.-- "सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी " या संज्ञेचा अर्थ, कंपनी अधिनियम, २०१३ अन्वये २०१३ चा १८.

सरकारी कंपनी म्हणून नांेदणी केलेली कोणतीही कंपनी, असा आहे ;

(घ) " थकबाकी " याचा अर्थ,----

(एक) संबद्ध अधिनियमाखालील कोणत्याही वैधानिक आदेशानुसार करपात्र व्यक्तीकडून प्रदेय असलेली ;

किंवा

(दोन) संबद्ध अधिनियमान्वये दाखल केलेल्या विवरणानुसार, किंवा यथास्थिति, सुधारित विवरणानुसार मान्य केलेली आणि पूर्णत: अथवा अंशत: प्रदान न केलेली ; किंवा

(तीन) मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ६१ नुसार सादर केलेल्या लेखापरीक्षा अहवालात, लेखापरीक्षकाने निर्धारित केलेली व प्रदेय असल्याचे शिफारस केलेली,----मग मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३२ किंवा ३२क अन्वये नोटीस काढण्यात आलेली असो किंवा नसो,-----

कर, व्याज, शास्ती किंवा, यथास्थिति, विलंब शुल्क यांची अदत्त रक्कम आणि विर्िनदिष्ट कालावधीशी संबंधित असलेली कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांची थकबाकी, असा आहे आणि त्यात, विर्िनदिष्ट कालावधीसाठी संबद्ध अधिनियमान्वये मान्य केलेल्या करावरील व कराच्या थकबाकीवरील प्रदेय असलेल्या व्याजाचा देखील समावेश आहे ;

(ङ) " आयुक्त " याचा अर्थ, वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (क) अन्वये राज्य कर आयुक्त म्हणून नियुक्त केलेला अधिकारी, असा आहे आणि त्यामध्ये, मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये नियुक्त केलेल्या विक्रीकर आयुक्ताचा समावेश होतो ;

(च) " पदनिर्देशित प्राधिकारी " याचा अर्थ, या अधिनियमाच्या कलम ३ अन्वये नियुक्त केलेला प्राधिकारी, असा आहे ;

(छ) " विवादित कर " याचा अर्थ, खंड (थ) मध्ये व्याख्या केलेल्या अविवादित कराव्यतिरिक्त इतर कर, असा आहे ;

(ज) " वस्तू व सेवा कर अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७, असा आहे ; २०१७ चा महा. ४३.

(झ) " शासन " किंवा " राज्य शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे ;

(ञ) " तडजोडीचा आदेश " याचा अर्थ, कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीबद्दल या अधिनियमान्वये काढलेला आदेश, असा आहे ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ ३

(ट) " संबद्ध अधिनियम " याचा अर्थ, पुढील पैकी कोणताही अधिनियम, म्हणजे :---

(एक) केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ ;

(दोन) मुंबई मोटार स्पिरीट विक्री कराधान अधिनियम, १९५८ ;

(तीन) मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ ;

(चार) महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम, १९६२ ;

(पाच) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ ;

१९५६ चा ७४. १९५८ चा मुंबई ६६. १९५९ चा मुंबई ५१. १९६२ चा महा. ९. १९७५ चा महा. १६.

(सहा) महाराष्ट्र कोणताही माल कोणत्याही प्रयोजनार्थ वापरण्याच्या हक्काच्या हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५ ;

१९८५ चा महा. १८.

(सात) महाराष्ट्र ऐषआराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७ ;

१९८७ चा महा. ४१.

(आठ) महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रामध्ये मोटार वाहने आणण्यावरील कर अधिनियम, १९८७ ;

१९८७ चा महा. ४२.

(नऊ) महाराष्ट्र कार्य-कंत्राटांच्या अंमलबजावणीत अंतभर्ूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुनर्अधिनियमित) अधिनियम, १९८९ ;

(दहा) महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर अधिनियम, २००२;

१९८९ चा महा. ३६. २००३ चा महा. ४.

(अकरा) महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ ;

२००५ चा महा. ९.

असा आहे, आणि त्यामध्ये, त्याखाली केलेले नियम किंवा काढलेल्या अधिसूचना यांचा देखील समावेश आहे ;

(ठ) " आवश्यक रक्कम " याचा अर्थ, या अधिनियमाची कलमे ८ व ९ या अन्वये निर्धारित केल्याप्रमाणे आणि या अधिनियमास जोडलेल्या जोडपत्र-क किंवा जोडपत्र-ख यामध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे,---

(एक) अविवादित कराची रक्कम, आणि

(दोन) विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्क याची रक्कम,--- मग ती आकारलेली असो किंवा नसो,--

यासाठी, या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीत या अधिनियमान्वये अर्जदाराने प्रदान करणे आवश्यक असलेली रक्कम, असा आहे ;

(ड) " विवरणानुसार असलेली देणी " याचा अर्थ, विर्िनदिष्ट कालावधीच्या बाबतीत संबद्ध अधिनियमान्वये दाखल केलेल्या विवरणानुसार किंवा सुधारित विवरणानुसार मान्य केलेली, परंतु, या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक रकमेचे प्रदान करण्याच्या शेवटच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी पूर्णत: किंवा अंशत: प्रदान न केलेला कर, व्याज किंवा विलंब शुल्क यांची रक्कम, असा आहे ;

(ढ) " विर्िनदिष्ट कालावधी " याचा अर्थ, दिनांक ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणारा कोणताही कालावधी, असा आहे ;

(ण) " वैधानिक आदेश " याचा अर्थ, अर्जदाराकडून प्रदेय असलेला कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांची मागणी करणारा संबद्ध अधिनियमान्वये पारित केलेला कोणताही आदेश, असा आहे ;

(त) " प्रवेशावरील कर अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर २००३ चा महा. ४.

अधिनियम, २००२, असा आहे ;

(थ) " अविवादित कर " याचा अर्थ,---

(एक) संबद्ध अधिनियमान्वये स्वतंत्रपणे गोळा केलेला कर ; किंवा (दोन) संबद्ध अधिनियमान्वये विवरणामध्ये किंवा सुधारित विवरणामध्ये प्रदेय असल्याचे दर्शविलेला कर ; किंवा

भाग पाच----११-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ (तीन) मूल्यर्वधित कर नियमाच्या नियम ५७ नुसार किंवा अन्य संबद्ध अधिनियमाखालील तत्सम नियमांनुसार वजाती म्हणून व्यापा-याने दावा केलेली रक्कम ; किंवा

(चार) वैधानिक आदेशान्वये जप्त केलेली किंवा संबद्ध अधिनियमान्वये सादर केलेल्या विवरणात, सुधारित विवरणात किंवा, यथास्थिति, लेखापरीक्षा अहवालात दर्शविलेली गोळा केलेली अधिकची कराची रक्कम ; किंवा

(पाच) मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ६१ नुसार सादर केलेल्या लेखापरीक्षा अहवालात, लेखापरीक्षकाने निर्धारित केलेली व प्रदेय असल्याचे शिफारस केलेली आणि करपात्र व्यक्तीने, एकतर पूर्णत: किंवा अंशत:, स्वीकारलेली कराची कोणतीही रक्कम; किंवा

(सहा) मूल्यर्वधित कर अधिनियमाखाली नियोक्त्याने मूळ स्रोतातून वजा केलेला कर (टीडीएस) ; किंवा (सात) मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम ३१क अन्वये गोळा केलेला कर ; किंवा

(आठ) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ १९७५ चा महा. १६.

यान्वये नावनोंदणी प्रमाणपत्र धारकाद्वारे प्रदेय असलेला कर ; किंवा

(नऊ) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ १९७५ चा महा. १६.

यान्वये नियोक्त्याने वजा केलेला कर ; किंवा

(दहा) जी नंतरच्या कालावधीत दावा करण्यास पात्र आहे अशी मूल्यर्वधित कर नियमांच्या नियम ५२क किंवा ५२ख यान्वये मान्य न केलेली वजावटीची रक्कम,

असा आहे ; आणि त्यामध्ये, संबद्ध अधिनियमाखालील कोणत्याही वैधानिक आदेशाद्वारे चुकीने किंवा अधिक प्रमाणात दिलेल्या कोणत्याही परताव्याचा आणि त्यावर दिलेल्या व्याजाचा देखील अंतर्भाव होईल ;

(द) " मूल्यर्वधित कर अधिनियम " याचा अर्थ, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२, असा आहे ; २००५ चा महा. ९.

(ध) " मूल्यर्वधित कर नियम " याचा अर्थ, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियमाखाली केलेले महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५, असा आहे.

(२) या अधिनियमात वापरलेले, परंतु, यात व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, संबद्ध अधिनियमान्वये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले असतील, तेच अर्थ असतील.

३. (१) राज्यकर आयुक्त हा, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, आयुक्त असेल.

पदनिर्देशित प्राधिकारी.

(२) मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम १० च्या पोट-कलम (२) मध्ये किंवा, यथास्थिति, वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ३ अन्वये विर्िनदिष्ट केलेले अधिकारी हे, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, पदनिर्देशित प्राधिकारी असतील. उक्त पदनिर्देशित प्राधिका-यांची दुय्यमता ही, मूल्यर्वधित कर नियमांच्या नियम ५ अनुसार असेल.

(३) आयुक्तास, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, पोट-कलम (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे पदनिर्देशित प्राधिका-यांकडे त्याचे अधिकार सोपवता येतील आणि असे प्राधिकारी, वेळोवेळी, मूल्यर्वधित कर अधिनियमाच्या कलम १० अन्वये किंवा, यथास्थिति, वस्तू व सेवा कर अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (२) व कलम ५ यांन्वये अधिसूचित केल्याप्रमाणे, अशा त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अशा क्षेत्रावर किंवा क्षेत्रांवर, अधिकारांचा वापर करतील.

तडजोडीसाठी पात्रता.

४. (१) या अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून, अर्जदार,--मग त्याची संबद्ध अधिनियमान्वये नोंदणी केलेली असो किंवा नसो,---विर्िनदिष्ट कालावधीच्या बाबतीत कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या रकमेची,--- मग अशी थकबाकी संबद्ध अधिनियमाखालील अपिलात विवादित केलेली असो किंवा नसो,- तडजोड करण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.

(२) ज्या अर्जदाराने, कोणत्याही शासन निर्णयान्वये किंवा महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम, २०१६ यान्वये किंवा महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, २०१९ किंवा महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, २०२२ किंवा महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत

२०१६ चा महा. १६. २०१९ चा महा. १५. २०२२ चा महा. २९.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ ५

२०२३ चा महा. १८.

अधिनियम, २०२३ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " तडजोड अधिनियम, २०२३ " असा केला आहे) यान्वये शासनाने घोषित केलेल्या कोणत्याही माफी योजनेखालील लाभ घेतले असतील असा अर्जदार देखील या अधिनियमान्वये अर्ज करण्यास पात्र असेल.

(३) या अधिनियमाखालील तडजोडीसाठी, या अधिनियमाच्या कलम ११ मध्ये नमूद केलेल्या शतर्ींचे आणि इतर तरतुदींचे अनुपालन करण्यात येईल.

राज्याने विवादित केलेली प्रकरणे देखील तडजोडीसाठी पात्र असणे.

५. जेव्हा वस्तू व सेवा कर विभागाने महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणामध्ये किंवा न्यायालयांमध्ये संदर्भ किंवा अपील दाखल केले असेल त्याबाबतीत, कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांसह उक्त्त विभागाच्या विवादित मागण्या, अर्जदाराकडून थकबाकीच्या तडजोडीसाठी विचारात घेता येतील आणि त्यानुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करता येईल. अशा प्रकरणांमध्ये, उक्त्त विभागाने एकदा का या अधिनियमान्वये विवादित रकमेची तडजोड केली असेल त्यानंतर, या अधिनियमान्वये अशा प्रकारे प्रदान केलेली रक्कम परत करण्यात येणार नाही किंवा समायोजित केली जाणार नाही किंवा अगोदरच माफ केलेल्या रकमेची वसुली करण्यात येणार नाही.

६. (१) संबद्ध अधिनियमामध्ये किंवा या अधिनियमामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी,---

(क) या अधिनियमाच्या प्रारंभी किंवा त्यापूर्वी, वैधानिक आदेशाच्या बाबतीत, एकतर अपिलात किंवा अन्यथा, प्रदान केलेली कोणतीही रक्कम ही, प्रथमत: अविवादित करासाठी व त्यानंतर विवादित करासाठी, त्यानंतर व्याजासाठी आणि समायोजित न केलेली उर्वरित शिल्लक रक्कम त्यानंतर, अनुक्रमे, शास्ती व विलंब शुल्क या पोटी समायोजित करण्यात येईल ;

तडजोडीसाठी पात्र असलेला, कोणताही असल्यास, कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीचे समायोजन व निर्धारण.

(ख) आवश्यक रकमेच्या प्रदानाच्या दिनांकास जी असमायोजित राहिलेली आहे, अशी, कोणताही सांविधिक आदेश किंवा अपील आदेश किंवा न्यायालयीन आदेश याच्या बाबतीत अर्जदारास देय असलेली परताव्याची कोणतीही रक्कम, कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क यासाठी पुढीलप्रमाणे समायोजित करण्यात येईल :---

(एक) असा परतावा, त्याच अधिनियमान्वये इतर कालावधीसाठी अदत्त असलेल्या कोणत्याही थकबाकीपोटी अंर्तनिहित कालावधीच्या कालक्रमानुसार प्रथम समायोजित करण्यात येईल आणि त्या अधिनियमान्वये सर्व थकबाकींची परतफेड केल्यानंतर, या अधिनियमाच्या कलम २ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ट) मध्ये विर्िनदिष्ट केल्यानुसार, अनुक्रमे उर्वरित अधिनियमाच्या थकबाकीपोटी समायोजन करण्यात येईल ;

(दोन) उप-खंड (एक) च्या तरतुदीस अधीन राहून, असा परतावा, अनुक्रमे, प्रथमत: अविवादित कराच्या रकमेपोटी व त्यानंतर विवादित कराच्या, त्यानंतर, व्याजाच्या पोटी समायोजित करण्यात येईल, आणि समायोेजित न केलेली शिल्लक रक्कम, शास्ती व विलंब शुल्क या पोटी समायोजित करण्यात येईल.

(२) असे समायोजन अंमलात आणणारा आवश्यक समायोजन आदेश, तडजोड आदेशासह पदनिर्देशित प्राधिका-याद्वारे काढता येऊ शकेल.

(३) एकतर, या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीमध्ये, विर्िनदिष्ट कालावधीसाठी पारित केलेल्या सांविधिक आदेशानुसार कोणतीही मागणी, लागू असल्याप्रमाणे पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या रकमेने कपात केल्याप्रमाणे, आवश्यक रक्कम प्रदान करण्यापूर्वी कोणत्याही वेळी किंवा त्या वेळी, या अधिनियमाखालील तडजोडीच्या प्रयोजनार्थ कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांची थकबाकी असल्याचे समजण्यात येईल.

(४) प्रदान केलेल्या रकमेच्या किंवा देय असलेल्या कोणत्याही परताव्याच्या समायोजनाच्या आणि थकबाकीच्या निर्धारणाच्या बाबतीत, पूर्ववर्ती खंडाच्या तरतुदी, विवरणानुसार असलेल्या देणींना, किंवा यथास्थिति, लेखापरीक्षकाने कर, व्याज किंवा विलंब शुल्क याबाबत लेखापरीक्षा अहवालात केलेल्या शिफारशींनुसार असलेल्या देणींना, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६

विवक्षित रकमांच्या बाबतीत निर्लेखन करणे.

७. संबद्ध अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्काची थकबाकी; अर्जदाराच्या प्रकरणात जे आकारणीयोग्य आहे परंतु जे आकारण्यात आलेले नाही असे निर्धारणोत्तर व्याज किंवा शास्ती यांसह, जर लागू असेल तर, निर्धारणोत्तर व्याज किंवा, यथास्थिति, निर्धारणोत्तर शास्ती, जेव्हा विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीशी संबंधित असणा-या कोणत्याही सांविधिक आदेशानुसार देय असलेला कर, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी कोणत्याही वेळी प्रदान करण्यात आलेला असेल त्या बाबतीत, माफ केल्याप्रमाणे असेल.

आवश्यक रकमेचे निर्धारण व माफीची मर्यादा.

८. (१) जेव्हा अदत्त थकबाकीमध्ये, व्याज किंवा शास्ती अथवा निर्धारणोत्तर व्याज किंवा शास्ती अथवा विलंब शुल्क यांसह कराचा समावेश असेल त्याबाबतीत, कलम ६ अन्वये निर्धारित केल्यानुसार थकबाकीच्या तडजोडीपोटी प्रदेय असलेली आवश्यक रक्कम, जोडपत्र-क, किंवा यथास्थिति, जोडपत्र-ख मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असेल.

(२) या कलमान्वये निर्धारित केलेल्या आवश्यक रकमेचे प्रदान, संबद्ध अधिनियमान्वये विहित केलेल्या चलनाच्या नमुन्यात, किंवा यथास्थिति, मूल्यर्वधित कर नियमांन्वये विहित केलेल्या नमुना-एमटीआर-६ मध्ये करण्यात येईल, आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सुरु होणा-या आणि या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यात विर्िनदिष्ट केलेल्या शेवटच्या दिवशी संपणा-या कालावधीमध्ये करण्यात येईल.

(३) (क) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी अथवा या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शेवटच्या दिनांकानंतर केलेले कोणतेही प्रदान, आवश्यक रकमेपोटी केलेले प्रदान म्हणून विचारात घेण्यात येणार नाही.

(ख) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी अथवा या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यातील आवश्यक रकमेच्या प्रदानासाठी विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीमध्ये कोणत्याही थकबाकीकरिता समायोजित केलेली किंवा समायोजित केल्याचे मानण्यात आलेली कोणत्याही परताव्याची रक्कम, आवश्यक रकमेपोटी केलेले प्रदान म्हणून समजण्यात येणार नाही.

(४) कोणत्याही परिस्थितीत, अर्जदार, अविवादित कराच्या बाबतीत कोणतीही माफी मिळण्यास हक्कदार असणार नाही.

(५) या अधिनियमाच्या इतर तरतुदींस अधीन राहून, अर्जदार, जोडपत्र-क, किंवा यथास्थिति, जोडपत्र-ख यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या मर्यादेपयर्ंत विवादित कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांची माफी मिळण्यास हक्कदार असेल.

(६) जेव्हा अर्जदाराने, जे या कलमान्वये निर्धारित केलेल्या आवश्यक रकमेपेक्षा कमी असेल असे प्रदान केले असेल तेव्हा, पदनिर्देशित प्राधिकारी, अर्जदाराने प्रदान केलेल्या आवश्यक रकमेच्या प्रमाणात, अनुज्ञेय असलेल्या माफीच्या प्रमाणशीर रकमेची संगणना करील :

परंतु, अशा प्रकारे प्रदान केलेली रक्कम, प्रथमत: अविवादित करासाठी समायोजित करण्यात येईल आणि अशा समायोजनानंतर असलेली उर्वरित रक्कम, कोणतीही असल्यास, विवादित कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांपोटी प्रमाणशीरपणे समायोजित करण्यात येईल.

(७) या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीमध्ये अर्जदाराने केलेले प्रदान हे, आवश्यक रकमेपेक्षा कमी आहे केवळ एवढयाच कारणावरून कोणताही अर्ज नाकारण्यात येणार नाही.

९. अर्जदार, वैधानिक आदेशामध्ये निर्धारित केल्याप्रमाणे प्रवेशावरील कर अधिनियमान्वये प्रवेश कर प्रदान करण्यास पात्र असेल तेव्हा, या अधिनियमाखालील तडजोडीच्या प्रयोजनासाठी, या अधिनियमात किंवा संबद्ध अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी,----

प्रवेशावरील कर अधिनियमान्वये आवश्यक रकमेचे निर्धारण व माफीची मर्यादा.

(क) आवश्यक रक्कम ही, वैधानिक आदेशात निर्धारित केलेल्या प्रवेश कराची रक्कम, किंवामहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ ७ मूल्यर्वधित कर नियमांखालील, अनुक्रमे, नियम ५३ किंवा ५४ अन्वये, किंवा यथास्थिति, मुंबई विक्रीकर नियम, १९५९ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे प्रवेश कराच्या वजावटीच्या रकमेने कमी केलेली किंवा नाकारलेली रक्कम, यापैकी जी कमी असेल, इतकी असेल ;

(ख) उक्त अर्जदाराने, खंड (क) अन्वये निर्धारित केलेली रक्कम ही, या अधिनियमाच्या कलम १० च्या पोट-कलम (२) मध्ये दिलेल्या तक्यामध्ये विर्िनदिष्ट केलेल्या शेवटच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी प्रदान केलेली असेल तर, प्रदेय असलेली उर्वरित कराची शिल्लक रक्कम, या अधिनियमाखाली आदेश पारित करून त्याद्वारे माफ करण्यात येईल आणि उक्त अर्जदार, मूल्यर्वधित कर नियम, किंवा यथास्थिति, मुंबई विक्रीकर नियम, १९५९ यान्वये या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेस किंवा त्यापूर्वी प्रदान केलेल्या रकमेसह कोणत्याही रकमेच्या वजावटीचा दावा करण्यास हक्कदार असणार नाही ;

(ग) कोणत्याही वैधानिक आदेशानुसार असलेले व्याज हे, जोडपत्र-क, किंवा, यथास्थिति, जोडपत्र-ख अनुसार आवश्यक रक्कम व माफीची रक्कम, निर्धारित करण्यासाठी विचारात घेण्यात येईल ;

(घ) कोणत्याही वैधानिक आदेशानुसार लादलेली शास्ती जोडपत्र-क किंवा, यथास्थिति, जोडपत्र-ख अनुसार आवश्यक रक्कम व माफीची रकम, निर्धारित करण्यासाठी विचारात घेण्यात येईल ;

(ङ) कलम ८ ची पोट-कलमे (२), (३), (६) व (७) यांच्या तरतुदी, योग्य त्या फेरफारांसह, या कलमाला लागू होतील.

१०. या अधिनियमान्वये आवश्यक रकमेचे प्रदान करण्याचा कालावधी, खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे असेल :-----

आवश्यक रकमेचे प्रदान करण्याचा कालावधी.

तक्ता

अ. क्र. तपशील

प्रारंभाचा दिनांक शेवटचा दिनांक

(१) (२) (३)

(४)

(१) अर्जदाराने ज्या कालावधीत आवश्यक या अधिनियमाच्या प्रारंभाचा ३१ डिसेंबर २०२५.

रक्कम प्रदान करावयाची आहे तो दिनांक कालावधी.

तडजोडीच्या शर्ती.

११. (१) संबद्ध अधिनियमाच्या तरतुदींमध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, संबद्ध अधिनियमान्वये अपील प्राधिका-यासमोर किंवा न्यायाधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर प्रलंबित असलेले अपील, कोणतेही असल्यास, अर्जदाराकडून पूर्णपणे व विनाशर्त मागे घेण्यात येईल.

१९५९ चा मुंबई ५१.

१९५६ चा ७४. १९५९ चा मुंबई ५१.

(२) जेव्हा मूल्यर्वधित कर अधिनियमाखालील, किंवा यथास्थिति, मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ खालील अधिकची वजावट किंवा परतावा, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ किंवा प्रवेशावरील कर अधिनियम या खालील दायित्वापोटी समायोजित करण्यात आला असेल तेव्हा आणि जेव्हा अशा प्रकारे समायोजित केलेली वजावट किंवा परतावा, मूल्यर्वधित कर अधिनियम, किंवा यथास्थिति, मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ याखालील मूल्यनिर्धारणात कमी करण्यात किंवा नाकारण्यात आला असेल तेव्हा, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ किंवा प्रवेशावरील कर अधिनियम याखालील देय रकमांची तडजोड करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ किंवा, यथास्थिति, प्रवेशावरील कर अधिनियम या खालील अपीलासोबतच मूल्यर्वधित कर अधिनियम, किंवा यथास्थिति, मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ याअन्वये दाखल केलेले अपील देखील पूर्णपणे व विनाशर्त मागे घेणे गरजेचे आहे.

१९५६ चा ७४. १९५६ चा ७४. १९५९ चा मुंबई ५१.

(३) पदनिर्देशित प्राधिका-याकडे तडजोडीच्या अर्जासोबतच अपील मागे घेण्याच्या अर्जाची पोचपावती सादर करणे हा, उक्त अपील मागे घेण्याबाबतचा पुरेसा पुरावा असल्याचे समजण्यात येईल.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६

थकबाकीच्या तडजोडीचा अर्ज.

१२. (१) अर्जदार, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकानंतरच्या परंतु, कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यात विर्िनदिष्ट केलेल्या शेवटच्या दिनांकापासून तीस दिवसांनंतरच्या नसेल अशा कोणत्याही वेळी, कलम २ च्या पोट- कलम (१) च्या खंड (घ) मध्ये दिलेल्या थकबाकीच्या प्रत्येक वगार्ंकरिता संबद्ध अधिनियमान्वये, प्रत्येक वित्तीय वर्षासाठी स्वतंत्रपणे अर्ज करील :

परंतु, अर्जदाराने, या अधिनियमाच्या कलम १० मध्ये दिलेल्या तक्त्यात विर्िनदिष्ट केलेल्या वेळेच्या आत, आवश्यक रक्कम प्रदान केली असेल, परंतु, तो, नियत वेळेत अर्ज करू शकला नसेल तर, अशा विलंबाची कारणे नोंदविल्यानंतर, पर्दनिर्देशित प्राधिका-यास तीस दिवसांपयर्ंतचा विलंब क्षमापित करता येईल.

(२) असा अर्ज, आयुक्ताच्या आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने, पदनिर्देशित प्राधिका-याकडे करण्यात येईल.

(३) या अधिनियमाच्या इतर तरतुदींच्या अधीन राहून, जेव्हा अर्जदाराची, विर्िनदिष्ट कालावधीच्या बाबतीत, संबद्ध अधिनियमाखालील विवरणानुसार असलेल्या देण्यांच्या थकबाकीची तडजोड करण्याची इच्छा असेल तेव्हा, तो, प्रत्येक संबद्ध अधिनियमाखालील अशा प्रत्येक विवरणासाठी किंवा सुधारित विवरणासाठी स्वतंत्र अर्ज सादर करील :

परंतु, जेव्हा अर्जदाराची, एखाद्या वित्तीय वर्षाशी संबंधित असणा-या एकापेक्षा अधिक विवरणांच्या किंवा सुधारित विवरणांच्या बाबतीतील विवरणानुसार असलेल्या देण्यांची तडजोड करण्याची इच्छा असेल त्याबाबतीत, तो, केवळ एकच अर्ज करू शकेल.

(४) अशा प्रत्येक अर्जासोबत, कलमे ८ व ९ अन्वये निर्धारित केल्याप्रमाणे, संपूर्ण आवश्यक रक्कम प्रदान केल्याचा पुरावा आणि अर्जाच्या नमुन्यात नमूद केलेले दस्तऐवज सादर करण्यात येतील.

तडजोडीचा आदेश. १३. (१) जर अर्जदाराने कलमे ८ व ९ अनुसार निर्धारित केलेली आवश्यक रक्कम प्रदान केली असल्याबाबत पदनिर्देशित प्राधिका-याची खात्री पटली असेल तर, पदनिर्देशित प्राधिकारी, आदेश पारित करील आणि अर्जाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत, उक्त आदेशाची प्रत अर्जदाराला देईल, आणि त्यानंतर, संबद्ध अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, अशा अर्जदाराला, तडजोडीच्या आदेशात विर्िनदिष्ट केलेल्या माफीच्या रकमेच्या मर्यादेपयर्ंत त्याच्या दायित्वातून मुक्त करण्यात येईल.

(२) जेव्हा कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीचा अर्ज, या अधिनियमाच्या तरतुदींनुसार नसेल त्या बाबतीत, पदनिर्देशित प्राधिका-यास, अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर लेखी आदेशाद्वारे, अर्ज फेटाळता येईल. असा अर्ज फेटाळण्यात आल्यावर आणि जर तडजोडीसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदाराने अपील मागे घेतले असेल तर, संबद्ध अधिनियमाखालील उक्त्त मूळ अपील, या अधिनियमाच्या कलम १४ च्या तरतुदींना अधीन राहून, संबद्ध अधिनियमाखालील अपील प्राधिकरणाकडे याबाबतीत अर्ज केल्यावर पुन:स्थापित करण्यात येईल.

(३) पदनिर्देशित प्राधिका-यास, स्वत:हून किंवा अर्जदाराच्या अर्जावरून, अर्जदाराला तडजोड आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत, अभिलेखातून उघड झालेली कोणतीही चूक दुरुस्त करता येईल :

परंतु, अर्जदारास तडजोडीचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत, दुरुस्तीसाठी अर्ज करता येईल :

परंतु आणखी असे की, अर्जदाराला, त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात आल्याशिवाय, त्याच्यावर प्रतिकूल परिणाम करणारा कोणताही आदेश पारित करण्यात येणार नाही.

१४. (१) या अधिनियमाअन्वये पारित केलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्धचे अपील हे,---

(क) जर तो आदेश, त्याला दुय्यम असलेल्या प्राधिका-याने पारित केलेला असेल तर, संबंधित या अधिनियमान्वये पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपील. राज्यकर उप आयुक्त (प्रशासन किंवा नोडल) ;

(ख) जर तो आदेश, राज्यकर उप आयुक्ताने पारित केलेला असेल तर, संबंधित राज्यकर सह आयुक्त (प्रशासन किंवा नोडल) ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ ९

(ग) जर तो आदेश, राज्यकर सह आयुक्ताने पारित केलेला असेल तर, संबंधित अपर राज्यकर आयुक्त, यांच्याकडे दाखल करण्यात येईल.

(२) या अधिनियमान्वये पारित केलेला कोणताही आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत अपील दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर दाखल केलेले कोणतेही अपील, विचारात घेण्यात येणार नाही.

(३) या कलमाच्या पोट-कलम (१) मध्ये विर्िनदिष्ट केलेला अपील प्राधिकारी, आवश्यक असेल अशी आणखी चौकशी केल्यानंतर, त्यास उचित व योग्य वाटेल असा आदेश पारित करील.

(४) या कलमाच्या पोट-कलम (३) अन्वये पारित केलेल्या आदेशाविरुद्ध द्वितीय अपील करण्यात येणार नाही.

१५. (१) या अधिनियमान्वये पारित केलेला कोणताही आदेश, आयुक्त तो बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत, कोणत्याही वेळी, स्वत:हून पुर्नविलोकन करू शकेल.

या अधिनियमा- अन्वये पारित केलेल्या आदेशाचे पुर्नविलोकन.

(२) अशा आदेशामध्ये कोणतीही चूक आढळल्यास, जेथवर ती महसुलाच्या हितास बाधक ठरत असेल तेथवर, आयुक्त्त, अर्जदारावर नोटीस बजावू शकेल आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पोट-कलम (१) मध्ये विहित केलेल्या कालमर्यादेत त्याच्या सर्वोत्तम निर्णयशक्त्तीनुसार आदेश पारित करू शकेल.

(३) अर्जदारावर प्रतिकूल परिणाम करणारा कोणताही आदेश, त्यास आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय, पारित केला जाणार नाही.

संबद्ध अधिनियमान्वये तडजोड केलेली प्रकरणे पुन्हा उघडण्यावर रोध असणे.

१६. या अधिनियमाच्या इतर तरतुदींस अधीन राहून, या अधिनियमान्वये काढलेला तडजोडीचा आदेश हा, त्याआदेशात अंतभर्ूत असलेल्या थकबाकीच्या तडजोडीच्या संबंधात निर्णायक असेल, आणि तडजोडीच्या अशा आदेशात अंतभर्ूत असलेली कोणतीही बाब ही, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकाच्या विशिष्ट निरीक्षणांवरील कोणत्याही कार्यवाहीखेरीज, संबद्ध अधिनियमाखालील पुर्नविलोकनाच्या किंवा पुनरीक्षणाच्या कोणत्याही कार्यवाहीत अथवा इतर कोणत्याही कार्यवाहीत, पुन्हा उघडण्यात येणार नाही.

तडजोडीचा आदेश रद्द करणे.

१७. (१) कलम १६ मध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, जेव्हा पदनिर्देशित प्राधिका-यास, अर्जदाराने कोणतीही महवाची माहिती किंवा तपशील दडवून ठेवून अथवा कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती, कोणतीही असल्यास, सादर करून, तडजोडीचा लाभ मिळविला असल्याचे दिसून आले असेल त्या बाबतीत, अथवा संबद्ध अधिनियमान्वये झडती व जप्ती यासंबंधातील कार्यवाहीत महवाची तथ्ये दडवून ठेवलेली, कोणताही तपशील लपवून ठेवला असल्याचे आढळून आले असेल त्या बाबतीत, पदनिर्देशित प्राधिका-यास, कारणे लेखी नमूद करून व अर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, ज्या वित्तीय वर्षात तडजोडीचा आदेश बजावण्यात आला असेल त्या वित्तीय वर्षाच्या समाप्तीपासून दोन वषार्ंच्या कालावधीत, कलम १३ च्या पोट-कलम (१) अन्वये काढलेला उक्त आदेश रद्द करता येईल.

(२) जर पोट-कलम (१) अन्वये तडजोडीचा आदेश रद्द करण्यात आला असेल तर, अशा तडजोडीच्या आदेशात समाविष्ट असलेले संबद्ध अधिनियमाखालील निर्धारण, पुनर्िनर्धारण, दुरुस्ती, पुनरीक्षण, पुर्नविलोकन किंवा, यथास्थिति, अपील हे, कलमे ११ व १६ यांमध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, असे रद्द करण्यात आल्यावर, ताबडतोब पुनरूज्जीवित किंवा पुन:स्थापित होतील, आणि असे निर्धारण, पुनर्िनर्धारण, दुरुस्ती, पुनरीक्षण, पुर्नविलोकन किंवा, यथास्थिति, अपील यांवर, जणू काही कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीचा असा कोणताही आदेश, यापूर्वी कधीही देण्यात आला नव्हता असे समजून, संबद्ध अधिनियमाच्या तरतुदींनुसार निर्णय करण्यात येईल :

परंतु, जेव्हा संबद्ध अधिनियमाखालील निर्धारण, पुनर्िनर्धारण, दुरुस्ती, पुनरीक्षण किंवा पुर्नविलोकन यांची कालमर्यादा, रद्द केल्याच्या आदेशाच्या दिनांकापासून दोन वषार्ंच्या आत समाप्त झाली असेल त्या बाबतीत, संबद्ध अधिनियमात काहीही अंतभर्ूत असले तरी, संबंधित प्राधिका-यांकडून अशा रद्द केलेल्या आदेशाच्या दिनांकापासून दोन वषार्र्ंच्या आत, असे पुनर्िनर्धारण, दुरुस्ती, पुनरीक्षण किंवा पुर्नविलोकन करण्यात येईल : भाग पाच----११-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ परंतु आणखी असे की, संबद्ध अधिनियमाखालील मूळ अपील, या बाबतीत संबध्द अधिनियमान्वये अपील प्राधिका-याकडे अर्ज केल्यावर पुन:स्थापित करण्यात येईल.

१८. कोणत्याही परिस्थितीत, अर्जदार, या अधिनियमान्वये प्रदान केलेल्या कोणत्याही रकमेचा परतावा मिळण्यास हक्कदार असणार नाही :

या अधिनियमान्वये कोणताही परतावा न मिळणे.

परंतु, जर या अधिनियमाच्या तरतुदींन्वये तडजोडीचा आदेश रद्द करण्यात किंवा फेटाळण्यात आल्यास, या अधिनियमान्वये अर्जदाराने प्रदान केलेली रक्कम, संबद्ध अधिनियमान्वये प्रदान करण्यात आली असल्याचे समजण्यात येईल :

परंतु आणखी असे की, जर या अधिनियमाच्या कलम १५ अन्वये तडजोडीच्या आदेशाचे पुर्नविलोकन केले असेल आणि अर्जदाराने प्रदान केलेली रक्कम, पुर्नविलोकन प्राधिका-याने निर्धारित केलेल्या आवश्यक रकमेपेक्षा अधिक प्रदान केल्याचे आढळून आले असेल तर, अशी अधिक रक्कम, संबंधित अधिनियमान्वये प्रदान करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल.

१९. (१) आयुक्त्त, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, त्यास योग्य वाटतील असे अनुदेश व निर्देश वेळोवेळी पदनिर्देशित प्राधिका-यांना देऊ शकेल.

या अधिनियमाखालील आयुक्ताचे अधिकार.

(२) आयुक्तास, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी नमुने, आणि ज्या रीतीने नमुना सादर करण्यात येईल ती रीत, आदेशाद्वारे, विहित करता येईल.

अडचणी दूर करण्याचा अधिकार.

२०. (१) जर या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना, कोणतीही अडचण उद्भवली तर, शासनास, प्रसंगानुरुप, उद्भवेल त्याप्रमाणे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, करता येईल :

परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.

(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ ११

जोडपत्र-क

(कलमे ८ व ९ पहा)

(दिनांक १ एप्रिल २००५ रोजी व त्यानंतर सुरू होणा-या व

दिनांक ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणा-या कालावधीकरिता)

अ.क्र. रक्कम प्रदान करावयाची रक्कम माफीची रक्कम
(क) (ख) (ग) (घ)
(१) अविवादित कर. स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के. निरंक
(२) विवादित कर. स्तंभ (ख) मधील रकमेच्या पन्नास टक्के. स्तंभ (ख) मधील रकमेच्या पन्नास टक्के.
(३) संबद्ध अधिनियमान्वये प्रदेय असणारे व्याज किंवा कोणताही वैधानिक आदेश किंवा विवरणे किंवा सुधारित विवरणे यांनुसार प्रदेय असलेले व्याज. निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
(४) कोणत्याही वैधानिक आदेशानुसार शास्तीची अदत्त रक्कम. निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
(५) निर्धारणोत्तर व्याज किंवा शास्ती अथवा दोन्ही,--मग ते संबद्ध अधिनियमान्वये आकारलेले किंवा आकारण्यायोग्य असो किंवा नसो--- परंतु व्यापा-याने क लेल्या अर्जाच्या दिनांकापयर्ंत आकारलेले नाही. े निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
(६) या अधिनियमाच्या कलम १० मध्ये विर्िनदिष्ट क लेल्या प्रदानाच्या शेवटच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी े दाखल केलेल्या विवरणांच्याबाबतीत प्रदेय असलेले विलंब शुल्क. निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.

भाग पाच----११-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६

जोडपत्र-ख

(कलमे ८ व ९ पहा)

(दिनांक ३१ मार्च, २००५ रोजी किंवा त्यापूर्वी संपणा-या कालावधीकरिता)

अ.क्र. रक्कम प्रदान करावयाची रक्कम माफीची रक्कम
(क) (ख) (ग) (घ)
(१) अविवादित कर. स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के. निरंक
(२) विवादित कर. स्तंभ (ख) मधील रकमेच्या तीस टक्के. स्तंभ (ख) मधील रकमेच्या सत्तर टक्के.
(३) संबद्ध अधिनियमान्वये प्रदेय असणारे व्याज किंवा कोणताही वैधानिक आदेश किंवा विवरणे किंवा सुधारित विवरणे यांनुसार प्रदेय असलेले व्याज. निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
(४) कोणत्याही वैधानिक आदेशानुसार अदत्त शास्ती. निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
(५) निर्धारणोत्तर व्याज किंवा शास्ती अथवा दोन्ही,--मग ते संबद्ध अधिनियमान्वये आकारलेले किंवा आकारण्यायोग्य असो किंवा नसो--- परंतु व्यापा-याने क लेल्या अर्जाच्या दिनांकापयर्ंत आकारलेले नाही. े निरंक स्तंभ (ख) मधील रकमेच्या शंभर टक्के.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ १३

उद्देश व कारणे यांचे निवेदन

सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अंतभर्ूत असलेले प्रस्ताव अंमलात आणण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून अंमलबजावणी केल्या जाणा-या विविध अधिनियमांखालील आकारलेल्या, लादलेल्या किंवा प्रदेय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांच्या कराच्या, व्याजाच्या, शास्तीच्या किंवा विलंब शुल्काच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी तरतूद करणे इष्ट आहे असे शासनास वाटते.

२. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) अंमलात येण्याआधी, राज्यात विविध कर अधिनियम अंमलात होते. या कर कायद्यांतर्गत वसुलीची मोठी रक्कम विवादांमध्ये अडकून पडलेली आहे. या शिवाय, वसुलीच्या मोठया रकमेच्या भागाबाबत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांद्वारे विवाद केला जात आहे.

३. म्हणून, अदत्त असणा-या देण्यांच्या रकमांचा अंतर्भाव असलेली रक्कम मुक्त करण्याच्या आणि जुने प्रलंबित विवाद कमी करण्याच्या दृष्टीने, थकबाकीचे प्रदान करून त्यांच्या थकबाकीची तडजोड करण्यास इच्छुक असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांच्या कराच्या, व्याजाच्या, शास्तीच्या किंवा विलंब शुल्काच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी आणि त्यांचे जुने प्रलंबित विवाद बंद करण्यासाठी एक रकमी प्रदानाच्या पर्यायाची तरतूद करण्यासाठी कायदा अधिनियमित करणे, इष्ट आहे असे शासनास वाटते.

४. प्रस्तावित कायदा, अविवादित कराच्या बाबतीतील महसुलाचे रक्षण करील आणि विवादित कराची आंशिक माफी देण्याच्या आणि व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यात संपूर्ण माफी देण्याच्या प्रोत्साहनाची तरतूद करील.

५. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,

अजित पवार,

दिनांक ११ मार्च २०२५.

उप मुख्यमंत्री (वित्त).

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६

वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन

या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहेत :—

खंड ३(३).—या खंडान्वये, पोट-कलम (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या पदनिर्देशित प्राधिका-यांकडे त्यांचे अधिकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्रदान करण्याचा अधिकार, आयुक्ताकडे घेण्यात आला आहे.

खंड १२(२).—या खंडान्वये, पदनिर्देशित प्राधिका-याकडे करावयाच्या अर्जाचा नमुना व तो करण्याची रीत, आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्याचा अधिकार, आयुक्ताकडे घेण्यात आला आहे.

खंड १९.—या खंडान्वये, त्यास योग्य वाटतील असे अनुदेश व निर्देश पदनिर्देशित प्राधिका-यांना देण्याचे, आणि या अधिनियमांच्या प्रयोजनासाठी नमुने आणि ज्या रीतीने नमुना सादर करण्यात येईल ती रीत विहित करण्याचे अधिकार, आयुक्ताकडे घेण्यात आला आहे.

खंड २०(१).—या खंडान्वये, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना, कोणतीही अडचण उद्भवल्यास, ती दूर करण्यासाठी, हा अधिनियम प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून एक वषार्ंच्या कालावधीच्या आत, शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेला आदेश काढण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.

२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे वर नमूद केलेले प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचे आहेत.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६ १५

वित्तीय ज्ञापन

वित्तीय वर्ष, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अंतभर्ूत असलेले प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून अंमलबजावणी केल्या जाणा-या विविध अधिनियामांखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी तरतूद करण्याकरिता विधेयक प्रस्तावित केले आहे. हे विधेयक, राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून अधिनियमित झाल्यावर, राज्याच्या एकत्रित निधीतून करावयाच्या आवर्ती किंवा अनावर्ती खर्चाचा अंतर्भाव होईल अशी कोणतीही तरतूद या विधेयकात नाही.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १७, २०२५/फाल्गुन २६, शके १९४६

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस

(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (१) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यानी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, २०२५ पुर:स्थापनार्थ घेण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेस शिफारस करीत आहेत.

विधान भवन : मुंबई, दिनांक १७ मार्च, २०२५.

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.