Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग पाच, असा. क्रमंक १४, सन २०२५ चे विधानरपिषद विधेयक क्रमांक ३. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक. बुधवार, १९ मार्च २०२५.

Published 19 March 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part 5 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ १ RNI No. MAHBIL /2009/40124

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक ५(२)] बुधवार, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ [पृष्ठे ५, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक १९ मार्च, २०२५ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक, महाराष्ट्र विधानपरिषद नियम १११ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :–

L. C. BILL No. III OF 2025.

A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1969.

सन २०२५ चे विधानपरिषद विधेयक क्रमांक ३.

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,

१९६९ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

१९६९ चा महा. ३०.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ यामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-----

(१)भाग पाच----१४-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) अधिनियम, २०२५, असे म्हणावे.

१९६९ चा महा. ३०.

२. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (यात यापुढे ज्याचा निर्देश, " मुख्य अधिनियम " असा केला आहे) याचे दीर्घ शीर्ष, प्रस्तावना व संक्षिप्त नाव यांसह या संपूर्ण अधिनियमामध्ये, " श्रमजीवी कामगार " हा मजकूर, ज्या ज्या ठिकाणी आला असेल त्या त्या ठिकाणी, " अंगमेहनतीचे काम करणारे कामगार " हा मजकूर, त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह, दाखल करण्यात येईल.

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० मधील, " श्रमजीवी कामगार " या मजकुराऐवजी, " अंगमेहनतीचे काम करणारे कामगार " हा मजकूर दाखल करणे.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम २ मध्ये,-----

(१) खंड (२) मधील, " कोणतेही काम " या मजकुराऐवजी, " कोणतेही अंगमेहनतीचे काम " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(२) खंड (३) मधील, " कामावर ठेवलेल्या " या मजकुराआधी, " कोणतेही अंगमेहनतीचे काम सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम २ ची सुधारणा.

करण्यासाठी " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(३) खंड (६) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :-----

" (६अ) " अंगमेहनतीचे काम " म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या यंत्रांच्या कोणत्याही मदतीशिवाय किंवा आधाराशिवाय किंवा सहाय्याशिवाय मानवाने केलेले कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रमाचे काम, आणि त्यामध्ये, अनुसूचित नोक-यांमधील माल चढविण्याचे, उतरविण्याचे, रचण्याचे, त्याची ने-आण करण्याचे, त्याचे वजन व मापन करण्याचे अंगमेहनतीचे काम यांचा समावेश होतो ; " ;

(४) खंड (७) मधील, " असंरक्षित कामगारांना " या मजकुराआधी, " कोणतेही अंगमेहनतीचे काम करण्यासाठी " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(५) खंड (११) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-----

" (११) " असंरक्षित कामगार " म्हणजे, ज्याला कोणत्याही अनुसूचित नोकरीतील अंगमेहनतीचे काम करण्यासाठी कामावर ठेवले असेल, किंवा कामावर ठेवावयाचे असेल ; आणि असा अठरा वर्षे व त्यावरील वयाचा, आणि पासष्ट वषार्ंपयर्ंत वय असलेला,---- आणि त्यानंतर, जर शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यक व्यवसायीने असे काम करण्यासाठी तो शारीरिकदृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणित केले असेल तर, त्या वयाचा माथाडी, हमाल किंवा इतर अंगमेहनतीचे काम करणारा कामगार, परंतु, त्यात,----

(अ) कोणत्याही आस्थापनेचे, उद्योगाचे किंवा कारखान्याचे वस्तूर्िनमिती प्रक्रिया क्षेत्र किंवा संचय व साठवणूक क्षेत्र येथे, अथवा जेथे कोणत्याही आस्थापनेमधील, उद्योगामधील, किंवा कारखान्यामधील यांत्रिक प्रक्रियेमार्फत किंवा यंत्रामार्फत किंवा स्वयं-चलित प्रक्रियेमार्फत प्रक्रिया केली जात असेल तेथे, मालकाने किंवा मूळ मालकाने कामावर ठेवलेल्या कोणत्याही कामगाराचा (अंगमेहनतीचे काम करण्यासाठी ज्याला कामावर ठेवले असेल किंवा कामावर ठेवावयाचे असेल त्याखेरीज) ;

(ब) मालकाच्या कुटुंबातील सदस्याचा,

समावेश होणार नाही ; " ;

(६) खंड (१२) मधील, " श्रमाचे काम " या मजकुराऐवजी, " अंगमेहनतीचे काम " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ ३

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ३ मध्ये, पोट-कलम (२) मधील, खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-----

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम ३ ची सुधारणा.

"(क) असंरक्षित कामगारांची भरती करणे व त्यांना योजनेत प्रवेश देणे, आणि असंरक्षित कामगारांची नोंदणी पुस्तके व प्रतीक्षा यादी ठेवणे, नोंदणी पुस्तकांतील व प्रतीक्षा यादीतील त्यांची नावे, एकतर तात्पुरती किंवा कायमची काढून टाकणे, आणि नोंदणीसाठी फी लादणे यांसह असंरक्षित कामगारांची व मालकांची नोंदणी करणे व नोंदणी रद्द करणे यांचे नियमन करणे ; ".

५. मुख्य अधिनियमाच्या कलम ४ मधील, पोट-कलम (१) मध्ये, दुस-या परंतुकामधील, खंड (ब) मध्ये, " कामगार " हा मजकूर ज्या दोन ठिकाणी आला आहे त्या दोन्ही ठिकाणी, " असंरक्षित कामगार " हा मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह दाखल करण्यात येईल.

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम ४ ची सुधारणा.

६. मुख्य अधिनियमाच्या कलम १३ मध्ये,----

(१) पोट-कलम (१) मधील, " कामगाराकडून " या मजकुराऐवजी, " असंरक्षित कामगाराकडून " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

(२) पोट-कलम (३) मध्ये, " कर्मचा-यास " या मजकुराऐवजी, " असंरक्षित कामगार " हा

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम १३ ची सुधारणा.

मजकूर दाखल करण्यात येईल ;

(३) समास टिपेमधील, " कामगार " या मजकुराऐवजी, " असंरक्षित कामगार " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

७. मुख्य अधिनियमाच्या कलम १४ मध्ये,----

(१) पोट-कलम (१) नंतर, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम १४ ची सुधारणा.

" (१अ) या अधिनियमामध्ये काहीही अंतभर्ूत असले तरी, जर कोणत्याही कारणास्तव सल्लागार समिती कार्यरत नसेल तर, राज्य शासनास, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी, सल्लागार समितीच्या सल्ल्याशिवाय किंवा तिच्याशी विचारविनिमय केल्याशिवाय, अधिसूचना काढता येईल किंवा निर्णय घेता येईल.";

(२) पोट-कलम (६) ऐवजी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :----

" (६) (अ) राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या सदस्यांव्यतिरिक्त, सल्लागार समितीच्या सदस्यांचा पदावधी, त्यांच्या नावांची अधिसूचना, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षे इतका असेल. असे सदस्य, शासनाची मर्जी असेपयर्ंत, पद धारण करतील.

(ब) राज्य शासन, राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्यांची रिक्त पदे, लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत, असे पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून सहा महिने समाप्त होण्यापूर्वी भरील.".

८. मुख्य अधिनियमाच्या कलम १६ मध्ये, स्पष्टीकरणामधील, " चौदा " या मजकुराऐवजी, " अठरा " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम १६ ची सुधारणा.

भाग पाच----१४-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६

उद्देश व कारणे यांचे निवेदन

महाराष्ट्र राज्यातील विवक्षित नोक-यांमध्ये कामावर ठेवलेल्या असंरक्षित श्रमजीवी कामगारांच्या नोेकरीचे नियमन करण्यासाठी, अशा नोक-यांमध्ये त्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा आणि त्यांचा यथोचित व पूर्णपणे उपयोग व्हावा यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या बाबींसाठी तरतूद करण्याकरिता, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) अधिनियमित केला आहे.

२. उक्त अधिनियमाची, राज्यामध्ये, अनेक वषार्ंपासून अंमलबजावणी केली जात आहे. उक्त अधिनियमाची अंमलबजावणी करताना, मालकांच्या संघटना व तसेच श्रमिक संघ यांना भेडसावणा-या विविध समस्या, शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. म्हणून, असंरक्षित कामगारांचे नियमन व त्यांचे कल्याण यासाठी उक्त अधिनियमाखालील कार्यपद्धती सुलभ करण्याच्या आणि उक्त अधिनियमाची व त्याखाली केलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमात विवक्षित सुधारणा करणे आवश्यक आहे असे शासनास वाटते.

३. उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (११) मध्ये, " असंरक्षित कामगार " या संज्ञेची व्याख्या, ज्याला, कोणत्याही अनुसूचित नोकरीतील श्रमजीवी कामगार, म्हणून कामावर ठेवलेले आहे किंवा कामावर ठेवावयाचे आहे, असा कामगार अशी केली आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (१२) मध्ये, " कामगार " या संज्ञेची व्याख्या, कोणत्याही अनुसूचित नोकरीतील श्रमाचे काम करण्यासाठी, प्रत्यक्षपणे किंवा कोणत्याही अभिकरणामार्फत, कामावर ठेवलेली किंवा कामावर ठेवण्यात येणारी व्यक्ती,---- मग तिला वेतनावर ठेवण्यात आलेले असो वा नसो,-- अशी केली आहे. तथापि, उक्त अधिनियमामध्ये " अंगमेहनतीचे काम " या संज्ञेची व्याख्या केलेली नसल्यामुळे, अनुसूचित नोकरीतील कामाच्या प्रकारांसाठी उक्त अधिनियम लागू करण्यामध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. म्हणून, या अधिनियमात, " अंगमेहनतीचे काम " या संज्ञेची व्याख्या जादा दाखल करणे आणि " असंरक्षित कामगार " या संज्ञेच्या व्याख्येऐवजी नवीन व्याख्या दाखल करणे देखील आवश्यक आहे, असे शासनास वाटते.

४. उक्त अधिनियमाच्या कलम १४ मध्ये अशी तरतूद केली आहे की, राज्य शासनास, उक्त अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीमधून उद्भवणा-या, राज्य शासनाकडून सल्ल्यासाठी तिच्याकडे पाठविण्यात येतील अशा बाबींवर सल्ला देण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करता येईल. सल्लागार समितीमध्ये, मालक, कामगार, राज्य विधानमंडळाचे सदस्य व राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांचा पदावधी, सामान्यपणे तीन वर्षे इतका आहे. सल्लागार समितीचे कामकाज सुलभपणे चालण्याच्या दृष्टीने, राज्य शासन, राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणा-या सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्यांच्या रिक्त जागा, लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत, अशा जागा रिक्त झाल्याच्या दिनांकापासून सहा महिने समाप्त होण्यापूर्वी भरील अशी तरतूद करण्यासाठी उक्त कलमात सुधारणा करणे इष्ट आहे असे शासनास वाटते.

जर कोणत्याही कारणास्तव काही कालावधीसाठी सल्लागार समिती कार्यरत नसेल तर, राज्य शासनास, सल्लागार समितीच्या सल्ल्याअभावी, उक्त अधिनियमाच्या विविध तरतुदींची अंमलबजावणी करता येऊ शकत नाही अथवा योजना करता येऊ शकत नाही किंवा त्यांमध्ये फेरबदल करता येऊ शकत नाही. म्हणून शासनाला, समिती कार्यरत होईपयर्ंत, अधिसूचना काढता येतील किंवा त्या अन्वये निर्णय घेता येतील अशी तरतूद करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाच्या कलम १४ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे शासनास वाटते.

म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १४ मध्ये सुयोग्य सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

५. उक्त अधिनियमाच्या कलम १६ मध्ये, कोणत्याही मुलास, म्हणजेच, ज्या व्यक्तीचे वय चौदा वर्षे पूर्ण झाले नसेल अशा व्यक्तीस, कोणत्याही अनुसूचित नोकरीत काम करण्यास मनाई करण्याची तरतूद केली आहे. बाल व किशोरवयीन मुले कामगार (प्रतिबंध व विनियमन) अधिनियम, १९८६ (१९८६ चा ६१)महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६ ५ यामध्ये किशोरवयीन मुलांना, म्हणजेच, ज्या व्यक्तीचे वय चौदा वर्षे पूर्ण झालेले आहे, परंतु, तिचे अठरा वर्षे वय पूर्ण झालेले नाही अशा व्यक्तीला, जोखीमकारक व्यवसायांमध्ये काम करण्यास मनाई केली आहे. विविध कामगार कायद्यांमध्ये, बालकामगारांची वयोमर्यादा अठरा वषार्ंपयर्ंत वाढविण्यात आली आहे. त्याच धर्तीवर, कोणत्याही अनुसूचित नोकरीत, अठरा वर्षे वयाखालील बालकांच्या रोजगारास मनाई करण्याच्या दृष्टीने, बालकांची उक्त वयोमर्यादा, चौदा वषार्ंवरून अठरा वषार्ंपयर्ंत वाढविणे इष्ट आहे असे शासनास वाटते.

६. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई, दिनांक १८ मार्च, २०२५.

आकाश फुंडकर, कामगार मंत्री.

विधान भवन : मुंबई, दिनांक १९ मार्च, २०२५.

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 March 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-03-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-5-Marathi-.