महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३४ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद ५, शके १९४७ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
---------------------------
अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
१-२
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-३
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी --------------------- नाही.
--------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ---------------------
भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७३६.
जिल्हाधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम १९(१) अन्वये खालील अधिसूचना.
क्रमांक-स. म. अ-उ. जि.-भूसं-उ. व. प्र- कावि-६४७-२०२५.----
ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या वर्धा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक ११ च्या पोट कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, अधिसूचना क्रमांक ११ राजपत्र दिनांक १० एप्रिल, ते दिनांक १६ एप्रिल, २०२५ अन्वये पान क्रमांक ०४ ते ०५, अ. क्र. ३६६ वर प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे. की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन ना.-एक-१ (१६५९).
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद-५, शके १९४७ २ केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे,
आणि ज्याअर्थी, वर्धा (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे,
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनस्र्थापना योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;
आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या क लम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उध्र्व वर्धा प्रकल्प, वर्धा यास, पदनिर्देशित करित आहे.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१-एलएक्यू-४७-२०२४-२०२५, मौजा-नांदोरा (डफरे), तालुका- देवळी, जिल्हा वर्धा.
अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र
(१)
(२)
(३)
हे. आर
१ १६९/२ ० ०४
-------------
एकूण . . ० ०४
-------------
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
: निम्न वर्धा प्रकल्प.
सिंचन योजना प्रकल्प कार्याचे वर्णन : नांदोरा ल. का. क्र. ३ चे मातीकाम व बांधकामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ (र्आथिक, रोजगार : या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठा सिंचन होणार असल्यामुळे त्या पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत इतर : परिसरातील शेतकयांना त्यांच बरोबर ग्रामिण भागातील कष्टकरी शेतकरी, शेतमजुर जिवनमानात लाभासंबंधात)
सुधारणा होणार आहे
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
---- निरंक ----
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑगस्ट २१-२७, २०२५/श्रावण ३०-भाद्रपद-५, शके १९४७ ३अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
---- निरंक ----
टीप----उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादीत जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उध्र्व वर्धा प्रकल्प, वर्धा या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
वर्धा :
वान्मथी सी., दिनांक ३१ जुलै, २०२५.
जिल्हाधिकारी, वर्धा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.