महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३६] गुरुवार ते बुधवार, सप्टेंेबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे
नाही.
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-५
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. २३५.
जिल्हाधिकारी, यांजकडून
प्रारूप अधिसूचना
क्रमांक म.सहा-राजस्व-४-कावि-२१२-२०२५.----
शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टि. एल. सी.-१०७६-६३२३-म-६, दिनांक ०१ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ (१)) च्या परंतुकान्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि कलम ४ च्या पोट-कलम (४) व्दारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिध्दी नंतर मी, विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्हा व्दारे दिनांक २२ ऑगस्ट, २०२५ पासून यवतमाळ तालुक्यातील मौजा लोहारा (ग्रामीण) या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या व यवतमाळ जिल्ह्यच्या यवतमाळ तालुक्यातील लोहारा (ग्रामीण) या नावाने ओळखण्यात येणाया गावात रुपांतर करीत आहे.;
अ.-एक-१ (१६८४).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ गट नं.
गावाचे नाव
अनुसूची अ. गावांचे नांव एकूण एकूण क्षेत्र रूपांतरीत तालुका जिल्हा क्र. (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर. १ मुळगाव मौजा ११९ २०४३.०७
लोहारा
मौजा लोहारा यवतमाळ यवतमाळ २ नविन गाव मौजा २६ ३५६.५५ (ग्रामीण)
लोहारा (ग्रामीण)
महसुली दर्जा
एकूण शिल्लक . . ९३ १६८६.५२
यवतमाळ : दिनांक २२ ऑगस्ट, २०२५.
विकास मीना (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, यवतमाळ.
-----------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ, क्र. २३६.
BY COLLECTOR
DRAFT NOTIFICATION
No. Jr. cl.-WS-212-Rajaswa-4-2025.-
In exercise of the powers of State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) Delegated to me by Govt. Notification Revenue and Forest Department No. TLC-1076-63923-M-6- Dated 01st July, 1976 and after previous Publications as required by sub-section (4). I, Vikas Meena, Collector, Yavatmal District hereby with effect from Date 22nd August, 2025 constitute the Lohara (Rural) in the Yavatmal Taluka of the Yavatmal to be village to be called as Lohara (Rural) in the taluka of the Yavatmal District, having the limits specified in the Schedule here to appended.
SCHEDULE
Sr. Village Total Total New Resettled Taluka District No. Name Gat No. Area Village Name (1) (2) (3) (4) (5) (6) (7)
H. A.
1 Mauja 119 2043.07
Lohara Old Gat No.
Lohara Yavatmal Yavatmal (Rural)
2 Mauja 26 356.55 Mahsuli
Lohara (Rural) Darja
New Gat No.
Total Balance . . 93 1686.52
Area
Yavatmal :
VIKAS MEENA (I.A.S.), Dated the 22nd August, 2025.
Collector, Yavatmal.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ३भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३७.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा सदस्य सचिव, यांजकडून
वाचा :-- (१) शासन निर्णय महसूल व वनविभाग क्र.-संकीर्ण-०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२, दिनांक १२ मे, २०१५.
(२) शासन निर्णय महसूल व वनविभाग क्र.-संकीर्ण-०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२, दिनांक ३० सप्टेंबर, २०१५.
(३) म. शा. महसूल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र. एलक्युएन-०१-२०१७-प्र. क्र. १२-भाग-अ-२- मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक २५ जानेवारी, २०२५.
खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेणेबाबत.
जाहीर नोटीस
क्र. मं. अ.-विभूसंअ. (अवप्र)क्र.४-कावि-४८१-२०२५.---
ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांनी मौजा सालेपुर, ता. अचलपुर येथील सपन नदी प्रकल्पाच्या मौ. सालेपूर लघु कालव्याच्या कामाकरीता या प्रयोजनाकरीता शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. ०३-२०१५-प्र.अ. ३४-अ-२, दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ मधील तरतुदीस अनुसरुन खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे पत्र जा. क्र.१०००-अमप्रवि-रेचिशा-सपन प्रकल्प-भूसंपादन-२०२३, दिनांक ३१ मार्च, २०२३ नुसार भूसंपादन प्रस्ताव ०४-४७-२०२२-२३, मौजा सालेपुर, ता. अचलपुर, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ०.१३ हे. आर चा प्रस्ताव जिल्हाधिकारी, अमरावती यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश क्र. २४६-२०२३, दिनांक १८ एप्रिल, २०२३ अन्वये कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती त्यांचे पत्र जा. क्र. ९९९-अमप्रवि-रेचिशा-सपन प्रकल्प-भूसंपादन-२०२३, दिनांक १८ एप्रिल,२०२३ नुसार संपादन क्षेत्राबाबत सरळ खरेदीने मूल्य निश्चितीबाबत उक्त प्रस्तावा संबंधी शासन निर्णय दिनांक १२ मे, २०१५ व दिनांक ३० मे, २०१५ आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय तसेच शासन परिपत्रक महसूल व वनविभाग क्र. एलक्युएन ०१-२०१७-प्र. क्र.१२-अ-२, दिनांक २५ जानेवारी, २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत ;
त्याअर्थी, आता, उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अवप्र. क्र. ४ अमरावती तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती, अमरावती याव्दारे-
अनुसूची (एक)
खाजगी क्षेत्रातील जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहे.
आणि ;
अनुसूची (दोन)
प्रकल्पासाठी जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने संपादित करताना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम २६ ते ३० च्या शेडयुल १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी परिगणीत होणाया एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.
अनुसूची (तीन)
संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलीत धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीने कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे नावे खरेदी करुन देण्यास स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णत: अंतिमरित्या स्िवकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.
(२) संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचेकडे दाखल करावीत.
(३) संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
(४) सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखडयाची प्रत कार्यकारी अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प विभाग, अमरावती यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधित व्यींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७अनुसूची (चार)
भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक ०४-४७-२०२२-२३, मौजा सालेपुर, तालुका अचलपुर, जिल्हा अमरावती सपन नदी प्रकल्पाच्या मो. सालेपूर लघु कालवाच्या कामाकरीता या प्रयोजनाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील.
अ. क्र. भूधारकांचे नाव मौजा गट/सव्र्हे क्र. भूधारणा नमुना ७/१२ प्रमाणे खरेदी करावयाचे
प्रकार एकूण क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
हे. आर हे. आर १ दसया बोंदया धुदाळे सालेपूर १०३ २ १ २० ० ०९ २ सुधाम आत्माराम खंडारे,
कल्पना जितेंद्र इंगळे, सालेपूर १०४ २ १ २० ० ०४ दीपाली प्रभू पांडे
------------
एकूण . . ० १३
------------
अमरावती :
दिनांक १८ ऑगस्ट, २०२५.
प्रसन्नजीत प्रतिभा प्रकाश चव्हाण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अ. व. प्र. क्र. ४, अमरावती तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, अमरावती.
---------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३८.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९ ची अधिसूचना
क्रमांक उविअ-भूसंपादन-कावि-४०६-२०२५.----
ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्यचे जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ ( २०१३ चा ३० ) ( यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसूचना क्रमांक भाग १ (अ. वि.पु.) म. शा. रा. अ क्र. ७८९, दिनांक १९ ते २५ डिसेंबर, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलावर वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे.
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याव्दारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ५आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची-तीनमध्ये पुर्नवसाहत क्षेत्राचे व अनुसूची-चारमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे;
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन हे जिल्हाधिकारी आहे.
अनुसूची-एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
भूसंपादन प्रकरण क्रमांक एल.एक्यु-४७-डाबकी-१६-२०२४-२५, गांव-डाबकी, तालुका-अकोला, जिल्हा-अकोला.
अ. क्र. भूमापन क्र. भूधारणा ७/१२ प्रमाणे एकूण संपादित गाव-नमुना ७/१२ नुसार गट नं./सव्र्हे नं. पद्धती क्षेत्र करावयाचे क्षेत्र भूधारकाचे नाव (१) (२) (३) (४) (५) (६)
हे. आर हे. आर
१) श्रीकांत भगवानदास पटेल १ १२५ वर्ग-१
० ६१ २) खुशबु भगवानदास पटेल
१.६८+०.६२ पोटखराब
एकूण क्षेत्र - २ ३०
३) कश्यप कामेन्द्रकुमार पाठक
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
:- अकोला - शेगांव पालखी मार्गाचे बांधकाम करणेसाठी भूसंपादन.
प्रकल्प कार्याचे वर्णन :- अकोला - शेगांव पालखी मार्गाचे रस्ता बांधकाम करणेसाठी भूसंपादन.
समाजाला मिळणारे लाभ :- अकोला - शेगांव मार्गावरील वाहतूक (पायदळ यात्रा) सुरळीत होवु शकेल.
अनुसूची - तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
विस्थापन होत नसल्यामुळे माहिती - निरंक -
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
अनुसूची - पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
विस्थापन होत नसल्यामुळे व प्रशासकाची नेमणूक झालेली नसल्यामुळे माहिती : - निरंक -
अकोला :
दिनांक १२ ऑगस्ट, २०२५.
डॉ. शरद ज्ञानेश्वर जावळे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अकोला.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.