Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

महानगर आयुक्त, ना.म.प्र.वि.प्रा., नाशिक यांजकडील कलम-५३ (८) व कलम १५२ (४) अन्वये पारित केलेली अधिसूचना.

Published 18 September 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १८ - २४, २०२५ / भा २७ - आश्विन २, शके १९४७ [ पृष्ठ ०१

प्राधिकृत प्रकाशन

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

संदर्भ : महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक यांचे आदेश क्रमांक नामप्रविप्रा/कलम-५३,५४/९१६/२५, दिनांक १२ सप्टेंबर २०२५.

अधिसूचना

क्रमांक नामप्रक्षेविप्रा/अधिसूचना/प्रसिद्धीकरण/९१७/२०२५.--- ज्याअर्थी, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ मधील कलम ४३ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष नियोजन प्राधिकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ (८) व कलम १५२ (४) नुसार संबंधित अधिकायास त्याच्या कार्यक्षेत्राकरिता पदनिदशित अधिकारी म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे ;

त्याअर्थी, आता वरील सर्व तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, डॉ. माणिक गुरसळ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील समाविष्ट ६ तालुक्यांमधील क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम ५३ व ५४ अन्वये आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करणेसाठी प्राधिकरणाच्या संबंधित पदाचा पदभार सांभाळणारे तहसीलदार अनधिकृत बांधकाम व प्राधिकरणाच्या क्षेत्रात समाविष्ट तालुक्याचे संबंधित तहसीलदार यांना "पदनिदशित अधिकारी" म्हणून घोषित करण्यात येत आहे.

डॉ. माणिक गुरसळ, भा.प्र.से.,

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा

महानगर आयुक्त, नाशिक महानगर

प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.

नाशिक, १२ सप्टेंबर, २०२५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

भाग १-अ (ना.वि.पु.) एच- २००
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 September 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.