Reg. No. NP CITY/236/2018-20.
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४२ ] गुरुवार,सप्टेंबर२५,२०२५/आश्िवन३,शके१९४७ [पृष्ठे३,किंमत:रुपये१८.००
स्वतंत्रसंकलनम्हणूनफाईलकरण्यासाठीप्रत्येकविभागाच्यापुरवणीलावेगळेपृष्ठक्रमांकदिलेआहेत.
भागएक-अ--नागपूरविभागीयपुरवणी
----------------
(भागचार-बमध्येप्रसिद्धकरण्यातआलेलेआहेतत्यांव्यतिरिक्त)केवळनागपूरविभागाशीसंबंधितअसलेलेमहाराष्ट्रजिल्हा
परिषदावपंचायतसमित्या,ग्रामपंचायती,नगरपालिकाबरो,जिल्हानगरपालिका,प्राथमिकशिक्षणवस्थानिकनिधी
लेखापरीक्षाअधिनियमयाअन्वयेकाढण्यातआलेलेआदेशवअधिसूचना.
----------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२६.
आयुक्ततथाप्रशासक,महानगरपालिका,यांजकडून
महाराष्ट्रप्रादेशिकनियोजनवनगररचनाअधिनियम,१९६६चेकलम३७अन्वयेफेरबदल
सूचना
क्रमांक मनपाना-नरवि-१४१४.---
नागपूर शहराची सुधारीत विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये शासन, अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवी-९, दिनांक ०७ जानेवारी, २००० अन्वये भागश: मंजूर झाली असून ती दिनांक ०१ मार्च, २००० पासून अंमलात आली आहे तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्र. टिपीएस- २४००-१६२८ सी. आर.-२००-नवि- ९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजुर झाली असून ती दिनांक २१ सप्टेंबर, २००१ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाचे अधिसूचना क्रमांक टिपीएस- २४०१-८८५-प्र.क्र.-७६-नवि-९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासच्या क्षेत्रांअंतर्गत सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरीत नागपूर शहराकरीता नागपूर महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे.
तथापि, शासनाकडील नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१९-१४१९- प्र.क्र. १५४-२०१९-नवि-९, दिनांक २७ ऑगस्ट, २०१९ अन्वये संपुर्ण क्षेत्राकरीता नागपूर महानगरपालिका नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले होते. तद्नंतर शासनाकडील शासन निर्णय क्रमांक टिपीएस - २४१९/प्र.क्र.-१५४ (भाग-१)-२०१९ नवि-९, दिनांक ०९ एप्रिल, २०२१ अन्वये ७ योजनेतील स्मार्ट सिटी अंतर्गत नगर रचना योजनेतील क्षेत्र वगळून पुन्हा त्या क्षेत्राकरीता नागपूर सुधार प्रन्यासला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केलेले आहे.
ना.-एक-अ-१-(१७११).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०२५/आश्िवन ३, शके १९४७ आणि ज्याअर्थी, मौजा- सोमलवाडा, खसरा क्रमांक ३९, ४०, ४१ मधील जागेवर परिसरातील नागरीकांना वाहतुकीच्या अनुषंगाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी साधारण ३०० मी. लांब व १५ मी. रूंद रस्ता प्रस्तावित करण्याचे प्रयोजिले आहे. सदर रस्ता वायरलेस स्टेशन, टॉऊन हॉल, खेळाचे मैदान, अंतर्गत रस्ते व निवासी या उपयोगाने/आरक्षणाने प्रस्तावित आहे.
मौजा- सोमलवाडा येथील खसरा क. ३९, ४०, ४१ मध्ये पावनभुमी मैदान ते वर्धा रोड दरम्यान १५.०० मी. रूंद रस्ता प्रस्तावित करणेकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याबाबत ठरविले आहे व यासाठी नागपुर महानगरपालिकेने ठराव क. ४० / मनपा/ प्रशासक, दिनांक १२.०८.२०२५ नुसार उपरोक्त फेरबदलाची कार्यवाही करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.
त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारीत विकास योजनेचा भाग नकाशा महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, बी व सी विंग, तिसरा माळा, महानगरपालिका मार्ग, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ या कार्यालयात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन कामकाजाचे वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरीकांना सुचित करण्यात येते की, ही सूचना प्रकाशीत झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती महानगरपालिकेकडे प्राप्त होतील त्यावर महानगरपालिकेकडून सूनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेकडून शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.
नागपूर: दिनांक २४ सप्टेंबर, २०२५.
डॉ.अभिजितचौधरी, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नागपूर,
---------------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४२७.
BY COMMISSIONER AND ADMINISTRATOR, MUNICIPAL CORPORATION Modification under Section 37 of MaharaShtra regional and town Planning act, 1966
NOTICE
No. NMC-TPD-1414.–
The revised Development Plan of Nagpur city has been Partially Sanctioned by the Government under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, vide Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)-97-UD-9, dated 7th January, 2000, and it has come into force from 1st March, 2000. The Development Plan for the excluded area has been sanctioned vide Govt. Notification No. TPS-2400-1628-C.R.-200-2000-UD9, dated 10th September, 2001 and it has come into force from 21st September, 2001. Additionally, vide Urban Development Department No- tification No. TPS-2401-885-C.R.- 76/UD-9, dated 27th February, 2002 Nagpur Municipal Corpora- tion has been declared as the Planning Authority for the rest of Nagpur city, excluding the areas of seven schemes under the Nagpur Improvement Trust.
However, vide Notification No. TPS-2419-1419-C.R. 154-2019-UD-9, dated 27th August, 2019 Nagpur Municipal Corporation was declared as the Planning Authority for the entire area. There- after, vide Government Notification No. TPS 2419/C.R.-154 (Part-1)-2019-UD9, dated 9th April, 2021, Nagpur Improvement Trust has been declared as the Planning Authority for that area again, excluding the areas of the Smart City under the Urban Development Plan under the 7 schemes.
Whereas, in order to provide an alternative route for the citizens of the area in the Somalwada region (Mouza- Somalwada, Khasra No. 39, 40, 41 it is proposed to develop a road approximately 300 meters in length and 15 meters in width. The said road is proposed for various use/reservations, including Wireless Station, Town Hall, Playground, Internal Roads, and Residential. It has been decided to make changes under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, to propose a 15-meter-wide road between Pavanbhumi Maidan and Wardha Road in Khasra३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर २५, २०२५/आश्िवन ३, शके १९४७ No. 39, 40, 41 of Somalwada. For this, Nagpur Municipal Corporation has given approval to take action on the above changes through Resolution No. 40/मनपा/प्रशासक, dated 12th August, 2025.
Accordingly, the map of the revised Development Plan of Nagpur city showing the above changes has been kept open for public inspection at the office of the Municipal Corporation, Town Planning Department, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, B & C Wing, 3rd Floor, Municipal Corporation Road, Civil Lines, Nagpur 440001, on all working days during office hours. However, citizens are informed that suggestions or objections received by the Municipal Corporation regarding the above changes in the Development Plan within a period of one month from the date of publication of the notification will be heard by the Municipal Corpora- tion. Thereafter, the proposed changes will be submitted by the Nagpur Municipal Corporation to the Government for approval.
Dr. ABHIJIT CHAUDHARY, Nagpur :
Commissioner and Administrator, Dated the 24th September, 2025. Municipal Corporation, Nagpur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.