Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1716 Part 1 Nagpur (02-10-2025 to 08-10-2025) Publication of L.A. Act, 2013 under Section 19(1) by Collector, Bhandara., Maharashtra Land Revenue Act, 1966 under Section 21 by S.D.O. Mouda. Ord. No. 40., Sr. No. 784-785.

Published 02 October 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ४०] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ३०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी

---------------------------

अनुक्रमणिका

पृष्ठे

पृष्ठे

१-२८

नाही.

भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ नागपूर १-४

भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ----------------------- नाही. ----------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी -----------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९(१) खालील अधिसूचना

क्रमांक अ.का.- भूसंपादन-सामान्य-२-कावि-७०७-२०२५.---

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक २४५, दिनांक ०१ आक्टोबर, २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढण्यात आलेली आहे. आणि त्याद्वारे असे सूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्िदष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

ना.-एक-१ (१७१६).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ आणि ज्याअर्थी, भंडारा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटलेली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य-२, भंडारा यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादीत करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १६-एलक्युएन-२०२४-२०२५, मौजा-विहीरगाव, ता. मोहाडी, जिल्हा भंडारा.

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक संपादनाखालील क्षेत्र

(१) (२)

(३)

हे. आर

१ २७३ ० ०१

२ २८३ ० ०३

३ २६२ ० ००५

४ २६३ ० ००५

----------- एकूण संपादित क्षेत्र . . ० ०५ -----------

कामाचे नाव :- बावनथडी प्रकल्पाच्या विहीरगाव पुच्छ कालवा बांधकामासाठी.

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- बावनथडी प्रकल्प.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- बावनथडी प्रकल्पाच्या विहीरगाव पुच्छ कालवा बांधकामासाठी.

समाजाला मिळणारे लाभ :---- २३४.५५ हे. आर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकयांची र्आथिक

स्थिती सुधारण्या बरोबरच रोजगारातही वाढ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची----तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापीत होत नाही..

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया प्राधिकरणाने दिलेला ) :- भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२), अनुषंगाने प्रकल्पाने प्रकल्पाचे पर्यावरणीय प्रभाव निर्धारण झाले असल्याकारणाने एस.आय.ए. (सामाजिक प्रभाव निर्धारण) लागू नाही.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७ ३

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे नाव, पदनाम :- -निरंक-

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

:- -निरंक-

(क) ज्या अधिसूचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे,

:- -निरंक-

त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

टीप : - उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सामान्य-२, भंडारा यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

सावन कुमार (भा.प्र.से.), भंडारा :

जिल्हाधिकारी, दिनांक १६ सप्टेंबर, २०२५.

भंडारा.

---------------------

भाग १ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८५.

उपविभागीय अधिकारी, यांजकडून

संदर्भ :- (१) महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. जमीन २०२५-प्र. क्र. २३६-ज,-१ दिनांक ०१.०८.२०२५.

(२) मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे आदेश ११. ०९. २०२५.

(३.) तहसिलदार कामठी यांचे प्रस्ताव क्र. प्रस्तु-४-तह. कामठी-कावि-१८५-२०२५, (दि. ०८-०९-२०२५.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २१ अन्वये

अधिसूचना

क्रमांक प्रस्तु-१-उविअ-मौदा-कावि-६९८-२०२५.---

ज्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २१ अन्वये " राज्य शासनाची मालमत्ता किंवा त्याचा भाग असलेला कोणताही सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग (ज्याचा यापुढे या कलमात " सरकारी रस्ता "असा उल्लेख केलेला आहे) जनतेच्या वापराकरीता आवश्यक नाही असे जिल्हाधिकायास जेव्हा-जेव्हा वाटेल तेव्हा-तेव्हा त्यास राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे तशा आशयाची घोषणा करता येईल आणि अशा घोषणेत, अशा सरकारी रस्त्यांमधील व रस्त्यावरील (शक्य तेथवर त्याचे स्थान व हद्दी र्िनदिष्ट करण्यात येतील) लोकांचे हक्क, कोणतेही विद्यमान खाजगी हक्क असल्यास त्यास अधीन राहून नष्ट करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

त्याअर्थी, संदर्भ क्र. (०२) अन्वये प्राप्त अधिनियमानुसार उपविभागीय अधिकारी, मौदा यांचे कार्यालयाद्वारे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते की, संदर्भ क्र (०३) नुसार तहसिलदार, कामठी यांचेकडून प्राप्त झालेले असून सदर प्रकरणात मौजा - गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावर ९१ घराचे अतिक्रमण असून सदर गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावरील निस्तार नोंद कमी करण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय, गुमथळा यांचे दिनांक २९ ऑगस्ट, २०२५ रोजीचा ग्रामसभा ठरावासह प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.

तसेच, प्रकरणात तहसिलदार, कामठी यांनी मौका चौकशी अहवाल मागीतला असता, सदर प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सादर केलेला मौका चौकशी नुसार गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावर क्षेत्र ९०.४०० चौ. फुट जागेवर अतिक्रमण धारकानी घराचे अतिक्रमण करुन घरे बांधल्याचे दिसून येते. सबब, मौजा गुमथळा येथील गुमथळा ते उमरी या पांदन रस्त्याबाबत खालील बाबी आढळून आल्या.

(१) मौजा गुमथळा येथील गुमथळा ते उमरी या पांदन रस्त्यावर अंदाजे क्षेत्र ९०.४०० चौ. फुट जागेवर घराचे अतिक्रमण केल्याचे दिसून येते.

(२) ग्रामपंचायत कार्यालय गुमथळा यांनी दिनांक २९ ऑगस्ट, २०२५ रोजीचा ग्रामसभा ठरावानुसार गुमथळा ते उमरी या पांदन रस्त्यावरुन रहदारीचे हक्क निरस्त करण्याबाबत ग्रामसभेने मंजुरी दिलेली आहे.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २-८, २०२५/आशि्वन १०-१६, शके १९४७

(३) तसेच उपरोक्त पांदन रस्त्याच्या रहदारीचे हक्क निरस्त करण्याबाबत जाहीरनामा प्रकाशीत केल्यानंतर कोणतेही व्यक्ती किंवा संस्था यांनी आक्षेप घेतलेला नाही.

(४) उपरोक्त गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावरील अतिक्रमीत क्षेत्रावरील रस्त्याचे रहदारीचे हक्क निरस्त केल्यानंतर आज रोजी मौक्यावर अंदाजे २० फुट रस्ता रहदारीस खुला असल्याचे दिसून येते.

(५) मौजा गुमथळा येथील गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावरील अतिक्रमण नियमाकुल केल्यास ईतर सोईचे मार्ग उपलब्ध असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे तहसिलदार, कामठी यांनी अहवाल सादर केला. प्रकरणात तहसिलदार, कामठी यांचा अहवाल, मंडळ अधिकारी व तलाठी मौजा - गुमथळा यांचा अहवाल व ग्राम पंचायत गुमथळा यांचा ठराव या सर्व बाबीचे अवलोकन केले असता मौजा - गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावर ९१ घराचे अतिक्रमण असुन सदर गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावरील निस्तार नोंद कमी करण्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, १९६६ चे नियम २१ नुसार राज्य शासनाची मालमत्ता किंवा त्याचा भाग असलेला कोणताही सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग (ज्याचा यापुढे या कलमात " सरकारी रस्ता " असा उल्लेख केलेला आहे) जनतेच्या वापराकरीता आवश्यक नाही असे जिल्हाधिकायास जेव्हा-जेव्हा वाटेल तेव्हा-तेव्हा त्यास राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे तशा आशयाची घोषणा करता येईल आणि अशा घोषणेत, अशा सरकारी रस्त्यांमधील व रस्त्यावरील (शक्य तेथवर त्याचे स्थान व हद्दी र्िनदिष्ट करण्यात येतील) लोकांचे हक्क, कोणतेही विद्यमान खाजगी हक्क असल्यास त्यास अधीन राहून, मौजा - गुमथळा येथील सर्वे क्र. २९४ ला लागुन असलेला गुमथळा ते उमरी पांदन रस्त्यावरील रस्तावहीवाटीचे हक्क नष्ट करण्याचे योजीले आहे.

मौदा :

दिनांक २४ सप्टेंबर, २०२५.

संदीप भस्के, उपविभागीय अधिकारी, मौदा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-02.Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1.