Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1747 Extra Ord. Part 1-A Nagpur (07-10-2025) Publication regarding Reservation for the Post of Panchayat Samiti Chairperson in is Panchayat Samitis in Chandrapur District by Collector, Chandrapur. Extra Ord. No.51., Sr. No. 553.

Published 07 October 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ७, २०२५/आशि्वन १५, शके १९४७ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ५१ ] मंगळवार, ऑक्टोबर ७, २०२५/आशि्वन १५, शके १९४७ [ पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५५३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

वाचा.-----(१) ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडील अधिसूचना क्र. जिपनि-२०२५-प्र.क्र.१२-पं.रा.-२, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२५.

(२) ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेकडील पत्र क्र. जिपरि-२०२५-प्र.क्र.१२-पं.रा.-२, दिनांक १७ सप्टेंबर, २०२५.

आदेश

क्रमांक साशा-कार्या-१२-टे-२-निवड.-१७२-२०२५.----

ज्याअर्थी, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, अधिसूचना क्र. जिपनि-२०२५-प्र.क्र-१२-पं.रा.-२, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२५ अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ च्या नियम २ फ (२) (६) मधील तरतुदीनुसार अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलासह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदाचे चंद्रपूर जिल्ह्यंत वाटप करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त नियम, २ (फ) पोटनियम (२) अ व ब (३) मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची पदे अशा जाती किंवा जमातीच्या लोकसंख्येची पंचायत समितीच्या एकूण लोकसंख्येची टक्केवारी सर्वात अधिक असेल (सन २००२ ते २०१९ यावर्षी आरक्षित झालेल्या पंचायत समिती वगळून) पंचायत समितीपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने आरक्षण वितरीत करण्यात आले.

आणि ज्याअर्थी, उक्त नियम २ फ अ व ब मधील तरतुदीनुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवावयाची पदे (सन २००२ ते २०१९ यावर्षी आरक्षित झालेल्या पंचायत समिती वगळून) जिल्ह्यंतील पंचायत समित्यामध्ये सोडत काढून वितरीत करण्यात आले. तसेच, उक्त नियम २ फ पोटनियम (५) अ व ब मधील तरतुदीनुसार महिलासाठी राखून ठेवावयाची पदे (यापूर्वी सन २००२ ते २०१९ वर्षाचे आरक्षण वगळून) सोडत काढून वितरीत करण्यात आले. त्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदाचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ चे नियम २ फ मधील पोटनियम २ (अ), ३ (अ), ४ (अ) व ५ (अ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, चंद्रपूर याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यतील पंचायत समितीच्या सभापतीची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) अराखीव/अनारक्षित आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांचा (१) ना.-एक-अ-१ (१७४७). २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ७, २०२५/आशि्वन १५, शके १९४७ मागासवर्ग प्रवर्ग यामधील महिलासह) अनुसूचीच्या स्तंभ (२) समोर दर्शविलेल्या पदाचे स्तंभ (३) मधील पंचायत समितीकरिता राखीव पदे म्हणून अधिसूचित करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाचा प्रवर्ग पंचायत समितीचे नाव

(१)

(२)

(३)

१ अनुसूचित जाती

१. गोंडपिपरी

२ अनुसूचित जाती (महिला)

१. जिवती

३ अनुसूचित जमाती

१. राजुरा

४ अनुसूचित जमाती (महिला)

१. वरोरा २. बल्लारपूर

५ नागरिकांचा मागास प्रवर्ग

१. चंद्रपूर

(विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) २. कोरपना

६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १. पोंभुर्णा (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) २. भद्रावती

७ सर्वसाधारण (महिला)

१. मुल २. सिंदेवाही ३. चिमुर

८ सर्वसाधारण

१. नागभिड २. सावली ३. ब्रम्हपुरी

ग्राम विकास महाराष्ट्र शासन, अधिसूचना क्र. जिपनि-२०२५-प्र.क्र.१२-पं.रा.-२, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२५ अन्वये अधिसूचित पंचायत समितीच्या बाबतीत सभापती पदाचे आरक्षण पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरू होणाया अडीच वर्षाच्या कालावधीकरीता लागू राहील.

चंद्रपूर :

विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, दिनांक १ ऑक्टोबर, २०२५.

चंद्रपूर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.