Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1770 Extra Ord. Part 1-A Nagpur (11-10-2025) Publication regarding Reservation of Post of Chairman for Wardha Zilla Parishad & 8 Panchayat Samitis under it by Collector, Wardha. Extra Ord. No.54, Sr. No.660.

Published 11 October 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-11.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ११, २०२५/आशि्वन १९, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ५४ ] शनिवार, ऑक्टोबर ११, २०२५/आशि्वन १९, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ--नागपूर विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी

लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६६०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

वाचा.----(१) महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना ग्रामविकास विभाग क्रमांक जिपंनि-२०२५-प्र.क्र.१२-पंरा.२, दिनांक ९ सप्टेंबर, २०२५.

(२) महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम,१९६२.

अधिसूचना

क्र मांक स.म.अ.-जिपपंस-कावि-३९०-२०२५.----

मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६-२०२१ प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ६ मे, २०२५ रोजी पारित आदेशास अनुसरून ग्रामविकास विभाग, शासन अधिसूचना क्रमांक जिपनि-२०२१-प्र.क्र.११८-पं.रा.२, दिनांक ४ ऑक्टोबर, २०२२ अन्वये निश्चित केलेल्या आरक्षणाचा, ज्या जिल्ह्यतील पंचायत समित्यांनी लाभ घेतलेला नाही अशा जिल्ह्यंच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्यांचे आरक्षण रद्द करून, महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिसूचना ग्रामविकास विभाग क्रमांक जिपंनि-२०२५-प्र.क्र.१२-पंरा.२, दिनांक ९ सप्टेंबर, २०२५ अन्वये वर्धा जिल्ह्यतील ८ पंचायत समिती सभापती पदासाठी जागा निश्चित करून दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२ मधील नियम २ फ यातील तरतुदीनुसार जिल्ह्यचे अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरू होणाया अडीच वर्षाच्या कालावधीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती वभटक्या जमातींसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलासह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथील सभागृह मध्ये मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती निहाय आरक्षण निश्चित करण्याकरिता सभा घेण्यात आली. सदरहू सभेला राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. ना.-एक-अ-१ (१७७०). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ११, २०२५/आशि्वन १९, शके १९४७ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करीता लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने व चक्रानुक्रम पद्धतीने तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण यातील महिलासह पंचायत समिती सभापती पदे खालीलप्रमाणे राखून ठेवण्यात आली. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.----

तपशील

अनुक्रमांक जिल्हा पंचायत समितीचे नांव प्रथम अडीच वर्षासाठी पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षणाचा

तपशील

(१) (२) (३)

(४)

१ वर्धा समुद्रपूर अनुसूचित जाती (महिला)

२ आष्टी अनुसूचित जमाती

३ हिंगणघाट

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

४ कारंजा

नागरिकांचा मागास प्रवर्ग

५ देवळी

सर्वसाधारण

६

वर्धा

सर्वसाधारण

७ आर्वी

सर्वसाधारण महिला

८ सेलू

सर्वसाधारण महिला

वान्मथी सी, वर्धा :

जिल्हाधिकारी, वर्धा.

दिनांक १ ऑक्टोबर, २०२५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-11.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-11.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.