Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम, 1961 अन्वये उद्घोषणा.

Published 29 October 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-29.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०६ ] बुधवार, ऑक्टोबर २९, २०२५ / कार्तिक ७, शके १९४७ [ पृष्ठे ०१

असाधारण क्रमांक ०६

प्राधिकृत प्रकाशन

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ चे कलम २७ (१) अन्वये

उदघोषणा

क्रमांक मह./कुका/सिलिंग/कावि-११७२/२०२५.---- कुळवहिवाट/टी-१/उदघोषणा/मौजे दरे खुर्द, जि.सातारा/२०२१, मौजे दरे खुर्द, तालुका जिल्हा सातारा येथील गट नंबर ४४ ही जमीन उपरोक्त अधिनियमान्वये अतिरिक्त जाहीर केलेली आहे. या जमिनीसंदर्भात या कार्यालयार्मात शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. शासन पत्र क्रमांक आयसीएच-२०२४/प्र.क्र.९२/ल-७, दिनांक १४ ऑगस्ट २०२५ अन्वये उपरोक्त जमीन वहितीयोग्य आहे किंवा नाही हे तपासून अशी जमीन वहितीयोग्य नसल्यास महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ चे कलम २७ (१) अन्वये उदघोषणा निर्गमित करून शासनास अहवालाने कळविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विषयांकित जमिनीची तहसीलदार, सातारा यांचेर्मात पाहणी केली असता सदर जागा लागवडीस अयोग्य असल्याचे अभिप्राय तहसीलदार, सातारा यांनी सादर केले आहेत.

यामुळे महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ चे कलम २७ (१) अन्वये मौजे दरे खुर्द, तालुका जिल्हा सातारा येथील गट नंबर ४४, क्षेत्र १२ हे. ३० आर व ५ हे. ९२ आर पो.ख. असे एकूण १८ हे. २२ आर पैकी गोसंवर्धन (गो शाळा) साठी अध्यक्ष, पंचपाळी हौद, दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा यांनी मागणी केलेले ० हे. ४० आर ही जमीन लागवडीस अयोग्य असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

मल्लिकार्जुन माने,

सातारा, १६ ऑक्टोबर २०२५.

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(१) एच-२४३, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०६
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-29.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-29.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.