महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - १६ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २० - २६, २०२५ / कार्तिक २९ ते अग्रहायण ५, शके १९४७ [ पृष्ठे ०१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक साशा/नपा/(वडूज न.पं. अध्यक्ष नाव राजपत्रात प्रसिद्ध)/-३८/१७/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, वडूज नगरपंचायतीच्या अध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १
२
३
१. वडूज नगरपंचायत, वडूज सौ. गोडसे स्वप्नाली गणेश अध्यक्ष
सातारा, १२ नोव्हेंेबर २०२५.
संतोष चंकांत पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.
------------------------------------
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर
आदेश
क्रमांक कोजिप/साप्रवि/कावि-१०/प्रशासन अहवाल/२०२५.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२, पोट-कलम (४) व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम १९६४ मधील नियम ९ अन्वये मी, कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर याद्वारे जाहीर करतो की, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा वार्षिक प्रशासन अहवालास, जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ७९७, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ ने मंजुरी दिली असून सदर अहवाल दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणेत आला आहे.
कार्तिकेयन एस (भा.प्र.से.), कोल्हापूर, १४ नोव्हेंबर २०२५.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.