महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ४७ ] सोमवार, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १९४७ [पृष्ठ १, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६२५.
विभागीय आयुक्त, यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-१९-जिप-पंस-ग्रापनि-कावि-४६१-२०२५.----
१. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम १४५ (१-अ) नुसार ग्रामपंचायत थार, ता. तेल्हारा, जि. अकोला चे विघटन करण्यात येत आहे.
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांनी विघटीत ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी, पंचायत समिती तेल्हारा, जि. अकोला यांची नेमणूक करावी.
सदर आदेश आज दिनांक १० नोव्हेंबर, २०२५ रोजी पारित करण्यात येत असून माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.
डॉ. श्वेता सिंघल (भा.प्र.से.), अमरावती :
विभागीय आयुक्त, दिनांक १० नोव्हेंबर, २०२५.
अमरावती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.