Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

१. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील आदेश. २. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व सोलापूर जिल्हा परिषद यांजकडील वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्धीबाबत अधिसूचना.

Published 25 December 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-12-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/47985

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - १९ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २५ - ३१, २०२५ / पौष ४ - १०, शके १९४७ [ पृष्ठे ०३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक न.प.प्र.वि./नवि-६/कावि-६०४/२०२५.----- श्री. विजय बाजीराव देशमुख, अध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत (अर्जदार) श्री. विजय बाजीराव देशमुख, राहणार माळशिरस यांचा अर्ज दिनांक २२ डिसेंबर २०२२ अन्वये महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ चे कलम ३ (१) (अ), तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे नियम ६ अन्वये श्रीमती रेश्मा सूर्यकांत टेळे, तत्का. नगरसेविका, माळशिरस नगरपंचायत (सामनेवाले) यांचे नगरसेवकपद / सदस्यपद रद्द होऊन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

सदर प्रकरणी दोन्ही बाजूंना नोटिसा देण्यात आल्या. सदर प्रकरणी दोन्ही बाजूंना सुनावणीची संधी देण्यात आली आणि त्यानंतर मी, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केला.

(अ) अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.

(ब) सामनेवाले यांना या आदेशाच्या दिनांकापासून माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणून पुढील कालावधीसाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे.

(क) खर्चाबाबत आदेश नाहीत.

(ड) निकालाची समज सर्व संबंधितांना देण्यात यावी.

वरीलप्रमाणे आदेश दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), सोलापूर, १८ डिसेंबर २०२५.

जिल्हाधिकारी, सोलापूर.

------------------------------

BY COLLECTOR

ORDER

क्रमांक न.प.प्र.वि./नवि-६/कावि-६०४/२०२५.–- Shri. Vijay Bajirao Deshmukh, President, Malshiras Nagarpanchayat (Applicant) vide Application of Mr. Vijay Bajirao Deshmukh, R/o. Malshiras, dated 22nd December 2022 had filed a petition under Section 3 (1) (a) of the Maharashtra Local Authorities Members Disqualification Act, 1986 and under Rule 6 of the Maharashtra Local Authorities Members Disqualification Rules, 1987 for the disqualification of Smt. Reshma Suryakant Tele (Respondent) for being a Councillor of Malshiras Nagarpanchayat.

(१)

एच-३२१, भाग एक-अ (पु.वि.पु.)----१९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २५ - ३१, २०२५ / पौष ४ - १०, शके १९४७ Notices were issued to both parties in the said proceeding. Opportunity of hearing was given to both parties and thereafter I, passed detailed Order on dated 23rd September 2025 as follows :– a) The petition of the Applicant is allowed.

b) The Respondent is hereby disqualified for being a Councillor of Malshiras Nagarpanchayat for the remaining term with effect from the date of this order.

c) No order as to costs.

d) The order to be communicated to all concerned.

The above order was passed on dated 23rd September 2025 under my seal and signature.

KUMAR ASHIRWAD (I.A.S.), Collector, Solapur.

Solapur, 18th December 2025.

––––––––––––

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

सातारा जिल्हा परिषद, सातारा

अधिसूचना

क्रमांक सा.प्र.वि./नियो.-१/वा.प्र.अ./१८९५/२०२५.----- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२ चे आधारे महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास विभागाकडील क्रमांक झेडपीआर-४७६३/४०४८६/पी., दिनांक ४ सप्टेंबर १९६४ ने ठरवून दिलेल्या व पुन्हा क्रमांक झेडपीआर-४७६६/३२३९३/पी., दिनांक ३ नोव्हेंबर १९६६ ने सुधारणा करून अन्वये महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक एएआर-१०७९/६७६/२६, दिनांक १२ नोव्हेंबर १९८१ ने पुन्हा सुधारून ठरवून दिलेल्या नियमानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या सन २०२४- २०२५ सालचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून प्रसिद्ध करणेत येत आहे.

सातारा जिल्हा परिषद सन २०२४-२०२५ चा वार्षिक प्रशासन अहवाल नियमाप्रमाणे तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ठराव समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता. त्यास जिल्हा परिषद ठराव क्रमांक १५१६ अन्वये मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६४ च्या नियम ९ अन्वये सदर अहवाल प्रसिद्ध झाला, असे या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येत आहे.

सातारा, १५ डिसेंबर २०२५.

याशनी नागराजन (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा.

––––––––––––

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर

अधिसूचना

क्रमांक जि.प.सो./सा.प्र.वि.-१/कार्या-१६/१३०१/२०२५.----- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ मधील ६ नुसार (तसेच अधिसूचना क्र. २६, दिनांक ११ मार्च २०२२ प्रमाणे) सादर केलेल्या सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्यांना सन २०२४-२०२५ च्या वार्षिक प्रशासन अहवालास दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी ठराव क्र. ९६२ अन्वये मंजुरी दिलेली आहे.

कुलदीप जंगम (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर.

सोलापूर, २२ डिसेंबर २०२५.

––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २५ - ३१, २०२५ / पौष ४ - १०, शके १९४७ ३

BY CHIEF EXICUTIVE OFFICER

Solapur Zilla Parishad, Solapur

NOTIFICATION

क्रमांक जि.प.सो./सा.प्र.वि.-१/कार्या-१६/१३०१/२०२५.----- According to the provisions in Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti's (Publication of Annual Administrative Report) Rule, 1964 under Rule No. 6 and (Government Resolution No. 26, dated 11th March 2022) Administrator alias Chief Executive Officer, Solapur Zilla Parishad, Solapur has approved the Annual Administrative Report for the year of 2024-25 by Resolution No. 962, dated 14th October 2025.

KULDEEP JANGAM (I.A.S.), Chief Executive Officer, Solapur Zilla Parishad, Solapur.

Solapur, 22nd December 2025.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 December 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-12-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-12-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.