RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष १२, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ डिसेंबर २०२५.
अधिसूचना
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.
क्रमांक रासंस्मा-२०२५/प्र.क्र. १२५/सां.का. ३.------ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक (यात यापुढे ज्याचा " असे स्मारक " असा निर्देश करण्यात आला आहे) हे संरक्षित स्मारक असावे असे शासनाचे मत आहे.
ज्याअर्थी, सोबतच्या वर्णन केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असावे असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे ;
त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (१९६१ चा महाराष्ट्र अधिनयम १२) याचे कलम ४, पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त स्मारक संरक्षित असल्याचे जाहीर करण्याच्या आपल्या इराद्याची दोन महिन्यांची नोटीस याद्वारे देत आहे ;
उक्त स्मारकात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही शासन अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत उक्त स्मारक हे संरक्षित असल्याच्या घोषणेस हरकत घेता येईल आणि पूर्वाेक्त मुदत संपण्यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही हरकत सचिव (सांस्कृतिक कार्य), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांचेकडे येईल तिचा शासन विचार करील.
अनुसूची
स्थान : शुक्लतीर्थ लिंबगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड
गट क्रमांक : २६५
स्मारकाचे नाव : श्री महाविष्णू मंदिर
मालकी
: गावठाण मालमत्ता क्र. २६५ (विष्णू मंदिर)
तपशील
: शुक्लतीर्थ लिंबगाव, ता. माजलगाव, येथील महाविष्णू मंदिर हे इ.स. १२ व्या शतकातील कल्याणी चालुक्यकालीन मंदिर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिरातील रंगशिळेचे आठही स्तंभ अलंकृत आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टक असून दक्षिणेकडील कोष्टकात सरस्वती व उत्तरेकडील कोष्टकात नागदेवेतेची प्रतिमा आहे. सदर मंदिराचे स्थापत्य व शिल्पकला चालुक्यकालीन कला व स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
(१)
भाग चार ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७ संरक्षित करावयाच्या स्मारकाचे : लांबी ३०.०० मीटर × रुंदी ११.४९८ = ३४४.८४ चौ.मी. (मंदिराचे) क्षेत्र
: ५१७.८२ चौरस मीटर
संरक्षित करावयाचे
एकूण क्षेत्रफळ (स्मारकासह)
संरक्षित करावयाच्या स्मारकाच्या : पूर्व - १०.४६ मीटर : पश्चिम - ०.७.०० मीटर सभोवतालचे क्षेत्रफळ
: उत्तर - ०८.०० मीटर
: दक्षिण - ०५.०० मीटर
संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा : पूर्व : रस्ता
पश्चिम : गावठाण उत्तर : जि.प.प्रा. शाळा शुक्लतीर्थ लिंबगाव दक्षिण : जि.प.प्रा. शाळा शुक्लतीर्थ लिंबगाव
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नंदा राऊत, शासनाच्या उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ १, शके १९४७TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated 29th December 2025.
NOTIFICATION
MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.
No. Rasansma 2025/C.R. 125/Sanka-3.—Whereas the Government of Maharashtra is of the opinion that the ancient and historical Monument described in the Schedule hereto (hereinafter referred to as " the said Monument "), should be a protected Monument.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961), the Government of Maharashtra hereby gives two months' notice of the intention to declare the said Monument to be a Protected Monument.
Any person interested in the said Monument may, within two months from the date of publication of this notification in the Official Gazette, object to the declaration of the said Monument to be a Protected Monument.
Any such objections which may be received by the Secretary (Cultural Affairs), Government of Maharashtra, Mantralaya, Mumbai 400 032, before the expiry of the aforesaid period of two months will be considered by the Government.
Schedule
Locality Shuklatirtha Limbgaon, Taluka Majalgaon, District Beed
Gat No.
: 265
Name of the monument to : Shree Mahavishnu Temple be Protected
Ownership Particulars : Public (265, Vishnu Temple)
: Mahavishnu Temple at Shuklatirtha Limbgaon, Taluka
Majalgaon is a Chalukya-Kalyani period temple belonging to 12th C.C.E. This temple is structurally arranged in the pattern of Mukhamandapa, Sabhamandapa, Antaral and Garbhagruha. The eight pillars of Rangshila are ornate. There two are Devakoshtaka in Sabhamandapa, having the image of Saraswati in the North and Nagdevata in the South, respectively. This temple is an excellent specimen of the Chalukyan period's art and architecture.
Area of the Monument : 30 Metre × 11.498 Metre = 344.84 Square Metre. (Temple) to be Protected.
Total Protected Area. : 517.82 Square Metre. (including the Monuments) Total Area around to : East : 10.46 Metres
Monument to be Protected : West : 07.00 Metres
North : 08.00 Metres
South : 05.00 Metres
Total Boundaries of the Area : East : Street
in Protected : West : Area of the Village.
North : Z.P. Primary School, Shuklatirtha Limbgoan.
South : Z.P. Primary School, Shuklatirtha Limbgoan.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NANDA RAUT, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.