Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

उपसचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पुणे महानगर प्रदेश क्षेत्राची सुधारित हद्दवाढ घोषित करणेबाबत अधिसूचना.

Published 13 February 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-13.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १५, अंक - ०२ ] शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७ [ पृष्ठे ०६

असाधारण क्रमांक ०२

प्राधिकृत प्रकाशन

नगर विकास विभाग

चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ११ ेब्रुवारी २०२६

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८२१/११६७/प्र.क्र.९८/२०२१/नवि-१३.----ज्याअर्थी, भारतीय संविधानाच्या अनुच्ेद २४३-त मधील खंड (ग) आणि महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९९ चे कलम २ (ग) मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९९/११९१/प्र.क्र.८०/९९/नवि-१३, दिनांक २३ जुलै १९९९ अन्वये, पुणे शहराच्या सभोवतालचे काही क्षेत्र भारतीय संविधानाच्या भाग-९-अ च्या प्रयोजनार्थ पुणे महानगर प्रदेश म्हणून घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/१२०४/१३/प्र.क्र.८७/१५/नवि-१३, दिनांक ३१ मार्च २०१५ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) चे कलम ४२-क, ४२-ग व ४२-च अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून पुणे महानगर क्षेत्रास, पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र म्हणून उक्त अधिनियमाचे कलम ४२-क नुसार घोषित करून कलम ४२-ग नुसार या घोषित क्षेत्रासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त क्षेत्र विकास प्राधिकरण असा करण्यात आला आहे) गठित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ डिसेंबर २०१५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, पुणे महानगर प्रदेश क्षेत्राची हद्द वाढवून सुधारित हद्दवाढ घोषित केली आहे, तसेच दिनांक १० ेब्रुवारी २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, पुणे महानगर प्रदेश क्षेत्राची आणखी हद्द वाढवून सुधारित हद्दवाढ घोषित केली आहे (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त महानगर क्षेत्र असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतुदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २ च्या खंड (क) अन्वये महानगर क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या विवक्षित क्षेत्रांच्या उचित, सुव्यवस्थित व शीघ विकासाचे समन्वयन व पर्यवेक्षण करण्याच्या आणि अशा विकासाच्या योजना, प्रकल्प व परियोजना यांची अंमलबजावणी करण्याच्या प्रयोजनार्थ, अशा प्रदेशातील क्षेत्राकरिता प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबीसाठी तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेश, २०१६ (सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११) दिनांक १३ जून २०१६ (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अध्यादेश असा करण्यात आला आहे) प्रख्यापित केला असून यानंतर तो महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३) मध्ये परिवर्तित झाला आहे ;

(१)

एच-४०४, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- ०२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७ आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे कलम ३ चे उपकलम (१) आणि उक्त अधिनियमाचे कलम ४२-क, ४२-ग, ४२-च अन्वये प्रदान अधिकारांचा वापर करून शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक पीआरडी-३३१६/प्र.क्र.५४/नवि-७, दिनांक ११ जुलै २०१६ अन्वये उक्त महानगर क्षेत्रासाठी, विशेष करून त्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्राकरिता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त प्रदेश विकास प्राधिकरण असा करण्यात आला आहे) आणि उपरोक्त दिनांक ३१ मार्च २०१५, दिनांक ४ डिसेंबर २०१५ व दिनांक १० ेब्रुवारी २०१६ रोजीच्या अधिसूचना विखंडीत करण्यात आल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगर क्षेत्राचा उचित, सुव्यवस्थित विकास होण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) (घ) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त इतर अधिकारांचा वापर करून शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/प्र.क्र.१७३/१७/नवि-१३, दिनांक १८ जानेवारी २०१८ अन्वये, त्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता अधिसूचित क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आले असून या अधिसूचित क्षेत्रासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची, त्याच्या स्थापनेपासून म्हणजेच दिनांक ३१ मार्च २०१५ पासून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक पीएमसी-२०२०/ प्र.क्र.३२२/नवि-२२, दिनांक ३० जून २०२१ अन्वये, त्यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये नमूद एकूण २३ महसुली गावांचा (यात यापुढे ज्यांचा उल्लेख उक्त २३ गावे असा करण्यात आला आहे) पुणे महानगरपालिका हद्दीत समावेश करून पुणे महानगरपालिकेची हद्द सुधारित करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८२१/११६७/प्र.क्र.९८/२०२१/नवि-१३, दिनांक १४ जुलै २०२१ अन्वये, उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार, प्रादेशिक योजना क्षेत्रामध्ये समाविष्ट पुणे महानगरपालिका हद्दीतील उक्त २३ गावांचे अविकसित क्षेत्र अधिसूचित करून त्याकरिता उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाने अधिसूचना क्रमांक पीएमआरडीए/नि.वि./प्र.क्र.७०५/२०२५, महाराष्ट्र शासन राजपत्रात भाग-एक असाधारण, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली असून त्याद्वारे, उक्त २३ गावांसह उक्त महानगर क्षेत्रासाठी तयार केलेल्या प्रारूप विकास योजना आराखडाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३, २६ व २८ अंतर्गतची (यात यापुढे उक्त अधिनियम असा उल्लेख करण्यात आला आहे) सर्व कार्यवाही रद्द करून सदर प्रारूप विकास योजना आराखडाची प्रक्रिया मागे घेतलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावांकरिता उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास योजना आराखडा रद्द झाल्याने पुणे महानगरपालिकेने पत्र क्रमांक डीपीसेल/१६४, दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये उक्त अधिसूचित क्षेत्र उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाचे विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातून वगळण्यात येऊन, नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत शासनास विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावांतील क्षेत्र हे स:स्थितीत अविकसित स्वरूपात असल्याने, सदर गावांचा पुणे महानगरपालिका क्षेत्राशी योग्य समन्वय होऊन नियोजनबद्ध विकास होण्याच्या ष्टीने सदर गावांकरिता पुणे महानगरपालिकेर्मात नव्याने प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी उक्त २३ गावांकरिता नियोजन प्राधिकरण पुणे महानगरपालिकेस नियुक्त करणे व उक्त २३ गावांकरिता उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून केलेली नियुक्ती मागे घेणे आवश्यक आहे, अशी शासनाची खात्री झाली आहे.

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) व कलम ४० (१) (घ) अन्वये प्राप्त अधिकारांचा उपयोग करून राज्य शासन याद्वारे असे घोषित करीत आहे की :--

अ) सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद २३ गावांकरिता उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) (घ) नुसारचे अधिसूचित क्षेत्र म्हणून रद्द करण्यात येत आहे. तसेच,

ब) उक्त २३ गावांच्या अधिसूचित क्षेत्राकरिता उक्त प्रदेश विकास प्राधिकरणाची दिनांक १४ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) (घ) नुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत आहे.

क) स्पष्टता करण्यात येते की, उक्त अधिनियमाचे कलम २ (१५) () नुसार उक्त २३ गावांचे क्षेत्र स्थानिक प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने, उक्त अधिनियमाच्या कलम २ (१९) नुसार यापुढे पुणे महानगरपालिका उक्त २३ गावांचे क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहील.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७

शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८२१/११६७/प्र.क्र.९८/२०२१/नवि-१३,

दिनांक ११ ेब्रुवारी २०२६ सोबतचे सहपत्र.

परिशिष्ट - अ

अ.क्र. गावाचे नाव

क्षेत्र

१ २ ३

१. म्हाळुंगे संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

२. सूस संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

३. बावधन (बु.) संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

४. किरकिटवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

५. पिसोळी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

६. कोंढवे-धावडे संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

७. कोपरे संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

८. नांदेड संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

९. खडकवासला संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१०. मांजरी बुक संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

११. नहे संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१२. होळकरवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१३. औताडे-हांडेवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१४. वडाचीवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१५. शेवाळेवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१६. नांदोशी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१७. सणसनगर संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१८. मांगडेवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

१९. भिलारेवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

२०. गुजर निंबाळकरवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

२१. जांभुळवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

२२. कोळेवाडी संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

२३. वाघोली संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र

प्रस्तुत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रणव कप,

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

-----------------------------------

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk,

4th Floor, Main Building,

Mantralaya, Mumbai-400 032.

Dated : 11th February 2026

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. TPS-1821/1167/CR-98/2021/UD-13.–- Whereas, in exercise of the powers conferred by Clause (c) of the Article 243-P of the Constitution of India and by Clause (c) of Section 2 of the Maharashtra Metropolitan Planning Committee (Constitution and Functions) Act, 1999, the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-1899/1191/CR-80/99/UD-13, dated 23rd July 1999, declared some area around Pune City, as the "Pune Metropolitan Area" for the purpose of Part IX-A of the Constitution of India ;

and whereas, in exercise of the powers conferred by Sections 42-A, 42-C and 42-F of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra vide Notification No. TPS-1815/1204/13/CR-87/15/UD-13, dated 31st March 2015 declared the Pune Metropolitan Area as a "Pune Metropolitan Region Development Area", under Section 42-A of the said Act and thereof constituted "Pune Metropolitan Area Region Development Authority" (hereinafter referred to as "the said Area Development Authority") for this declared area ;

and whereas, Government of Maharashtra vide Notification dated 4th December 2015 has extended the limits and revised the limits of Pune Metropolitan Region Area. Also, vide Notification dated 10th February 2016, Government has further extended the limits and revised the limits of Pune Metropolitan Region Area (hereinafter referred to as "the said Metropolitan Area") ;

and whereas, the Governor of Maharashtra has promulgated the Maharashtra Metropolitan Region Development Authority Ordinance, 2016 (Mah. Ord. XI of 2016) (hereinafter referred to as "the said Ordinance") on dated 13th June 2016, to provide for establishment of the Authorities for certain areas declared as Metropolitan Areas under Clause (c) of Section 2 of the Maharashtra Metropolitan Planning Committees (Constitute and Functions) (Continuation of Provisions) Act, 1999 (Mah. V of 2000), for the purpose of co-ordinating and supervising the proper orderly and rapid development of the said area in such regions and of executing projects and schemes for such development, and to provide for connected therewith or incidental thereto ; which is thereafter converted into the Maharashtra Metropolitan Region Development Authority Act, 2016 (Mah. Act 3 of 2017) ;

and whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 3 of the said Ordinance and Section 42-A, 42-C, 42-F of the said Act, vide Government in Urban Development Department Notification No. PRD-3316/CR-54/UD-7, dated 11th July 2016, Pune Metropolitan Region Development Authority has been established for the said Metropolitan Area, more specifically described in the Schedule appended thereto (hereinafter referred to as "the said Region Development Authority") and above mentioned notifications dated 31st March 2015, dated 4th December 2015 and dated 10th February 2016 has been rescinded ;

and whereas, for proper and well planned development of the said Metropolitan Area, in exercise of the powers conferred by Section-40 (1) (d) of the said Act, the Government in Urban Development Department, vide Notification No. TPS-1817/CR-173/17/UD-13, dated 18th January 2018, has specified the area, more specifically described in the Schedule appended thereto, to be the "Notified Area" for Pune Metropolitan Region Development Authority and appointed Pune Metropolitan Region Development Authority as Special Planning Authority for such notified area from the date of its establishment i.e. dated 31st March 2015 ;

and whereas, the Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. PMC-2020/C.R.322/UD-22, dated 30th June 2021 has altered the limits of Pune Municipal Corporation by including the 23 villages (hereinafter referred to as "the said 23 villages") as mentioned in the Schedule-1 appended therein ;

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७

and whereas, by Notification No. TPS-1821/1167/C.R.98/2021/UD-13, dated 14th July 2021, the Government of Maharashtra, Urban Development Department, in accordance with the proposal of the said Regional Development Authority, has notified the undeveloped areas of the said 23 villages from the Regional Plan area, falls within the limits of the Pune Municipal Corporation and has appointed the said Regional Development Authority as the Special Planning Authority for the said Area ;

and whereas, the said Regional Development Authority has published Notification No. PMRDA/NI.VI./ CR705/2025 in the Government Gazette, Part One-Extraordinary--Pune Divisional Supplement, dated 27th September 2025 and thereby has cancelled all proceedings under Sections 23, 26, and 28 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as 'the said Act') in respect of the Draft Development Plan prepared for the said metropolitan area including the said 23 villages, and has withdrawn the process of the said Draft Development Plan ;

and whereas, since the Draft Development Plan published by the said Regional Development Authority for the 23 newly included villages within the limits of the Pune Municipal Corporation has been cancelled, the Pune Municipal Corporation, by its letter No. D.P. Cell/164, dated 3rd September 2025, has requested the Government that the said notified area be excluded from the "Special Planning Authority" jurisdiction of the said Regional Development Authority and be included within the jurisdiction of the Pune Municipal Corporation as the Planning Authority ;

and whereas, the area under 23 newly included villages within the limits of the Pune Municipal Corporation is presently in an undeveloped state, and with a view to ensuring their proper integration with the Pune Municipal Corporation area and their planned development, the Government is of the opinion that it has become necessary, to appoint the Pune Municipal Corporation as the Planning Authority for the said 23 villages in order to prepare a fresh Draft Development Plan for them through the Pune Municipal Corporation and to withdraw the appointment of the said Regional Development Authority as the "Special Planning Authority" for the said 23 villages.

Now therefore, in exercise of the powers conferred by Section 40 (1) and Section 40 (1) (d) of the said Act, the Government of Maharashtra hereby declares that :–

a) Cancels the area of 23 Villages to be the Notified Area under Section 40 (1) (d) as per the Appendix - A appended hereto.

b) Withdraws an appointment of the said Regional Development Authority by the Notification dated 14th July 2021 as a Special Planning Authority under Section 40 (1) (c) for the said notified area under 23 Villages.

c) Clarifies that, since the said area of 23 villages falls within the jurisdiction of Pune Municipal Corporation as a Local Authority within the meaning of Section of 2 (15) (a), henceforth the Pune Corporation shall act as a Planning Authority for the area of said 23 Villages under Section 2 (19) of the said Act.

Accompaniment to the Government in Urban Development Department

Notification No. TPS-1821/1167/CR.98/2021/UD-13, dated 11th February 2026

APPENDIX - A

Sr. No. Name of Village Area

1 2 3

1. Mhalugne Entire area of revenue village

2. Sus Entire area of revenue village

3. Bawdhan Budruk Entire area of revenue village

4. Kirkitwadi Entire area of revenue village 5. Pisoli Entire area of revenue village 6. Kondve-Dhawade Entire area of revenue village ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, शुक्रवार, ेब्रुवारी १३, २०२६ / माघ २४, शके १९४७

APPENDIX - A-contd.

1 2 3

7. Kopare Entire area of revenue village

8. Nanded Entire area of revenue village

9. Khadakwasala Entire area of revenue village

10. Manjari Budruk Entire area of revenue village

11. Narhe Entire area of revenue village

12. Holkarwadi Entire area of revenue village

13. Autade - Handewadi Entire area of revenue village

14. Wadachiwadi Entire area of revenue village

15. Shewalewadi Entire area of revenue village

16. Nandoshi Entire area of revenue village

17. Sanasnagar Entire area of revenue village

18. Mangdewadi Entire area of revenue village

19. Bhilarewadi Entire area of revenue village

20. Gujar Nimbalkarwadi Entire area of revenue village

21. Jambhulwadi Entire area of revenue village

22. Kolewadi Entire area of revenue village

23. Wagholi Entire area of revenue village

This Notification be also made available on the Government of Maharashtra website www.maharashtra.gov.in (Acts / Rules).

By Order and in the name of the Governor of Maharashtra,

PRANAV KARPE,

Deputy Secretary, Government of Maharashtra.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 February 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-02-13.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-02-13.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.