RNI No. MAHBIL /2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष १२, अंक १५(३)] बुधवार, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ [पृष्ठे १०, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
-----------------------------------
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २५ मार्च, २०२६ रोजी पुर:स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :---
L. A. BILL No. XXXI OF 2026.
A BILL
FURTHER TO AMEND THE MUMBAI MUNICIPAL CORPORATION ACT AND TO RE-ENACT CERTAIN RULES RELATING TO FIXATION OF CAPITAL VALUE, LEVY AND COLLECTION OF PROPERTY TAX WITH RETROSPECTIVE EFFECT.
सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३१.
भूतलक्षी प्रभावाने, मुंबई महानगरपालिका अधिनियम यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता
आणि भांडवली मूल्य निश्चित करणे, मालमत्ता कर बसविणे व गोळा करणे यांच्याशी
संबंधित असणारे विवक्षित नियम पुनर्अधिनियमित करण्याकरिता विधेयक.
१८८८ चा ३.
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, भूतलक्षी प्रभावाने, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करणे आणि उक्त अधिनियमाच्या कलम १५४ अन्वये केलेले भांडवली मूल्य निश्चित करणे,
(१)
भाग पाच ३४---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ मालमत्ता कर बसविणे व गोळा करणे यांच्याशी संबंधित असणारे विवक्षित नियम पुनर्अधिनियमित करणे आणि त्याच्या विवक्षित तरतुदींचे विधिग्राीकरण करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सयाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणा, भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्राीकरण) अधिनियम, २०२६, असे म्हणावे.
१८८८ चा ३.
२. मुंबई महानगरपालिका अधिनियम (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""मुख्य अधिनियम"" असा केला आहे) याच्या कलम १५४ मधील, पोट-कलमे (१अ) व (१ब) यांऐवजी, पुढील पोट-कलमे दाखल करण्यात येतील आणि ती, १ एप्रिल २०१० पासून दाखल करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल :----
१८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम १५४ ची सुधारणा.
""(१अ) मालमत्ता कर आकारला जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य निश्चित करण्याच्या दृष्टीने, आयुक्त, अशा जमिनीचे किंवा इमारतीचे पुढीलप्रमाणेे, विर्िनदिष्ट केलेले मूल्य व घटक विचारात घेईल :----
(१) जमिनीचे किंवा इमारतीचे मूल्य.----
१९५८ चा ६०.
(अ) जमिनीच्या बाबतीत, आधारभूत मूल्य म्हणून, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदींन्वये केलेल्या, महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ अन्वये प्रसिद्ध केलेल्या, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""दरांचे वर्ाषिक विवरणपत्र"" असा केला आहे), दर्शविलेला कोणत्याही जमिनीचा सरासरी दर ; आणि
(ब) इमारतीच्या बाबतीत, आधारभूत मूल्य म्हणून, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये दर्शविलेला कोणत्याही इमारतीचा सरासरी दर :
परंतु, जेव्हा दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रात, ज्या जमिनीच्या किंवा इमारतीच्या बाबतीत भांडवली मूल्य निर्धारित करावयाचे आहे ती जमीन किंवा इमारत ज्या क्षेत्रामध्ये स्थित आहे त्या कोणत्याही विशिष्ट क्षेत्रामधील कोणत्याही मालमत्तेचे मूल्य दर्शविण्यात आलेले नसेल, अथवा असे दरांचे वर्ाषिक विवरणपत्र तयार केलेले नसेल किंवा ते उपलब्ध नसेल तर, आयुक्त, या पोट-कलमाच्या तरतुदींनुसार, अशा जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य निश्चित करण्याच्या दृष्टीने, आधारभूत मूल्य म्हणून, दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रातील जमिनीच्या किंवा इमारतीच्या सरासरी दरांच्या जागी, अशा जमिनीचे किंवा इमारतीचे बाजारमूल्य विचारात घेईल ; आणि
(२) घटक.----
(अ) जमिनीच्या बाबतीत,----
(एक) जमिनीचे स्वरूप व प्रकार ;
(दोन) जमिनीचे क्षेत्रफळ ;
(तीन) वापरकर्ता प्रवर्ग, जसे की, (एक) औद्योगिक, (दोन) निवासी, (तीन) वाणिज्यिक, आणि वरीलपैकी कोणत्याही प्रवर्गामध्ये समाविष्ट नसलेले वापरकत्यार्ंचे अन्य कोणतेही प्रवर्ग ; किंवा
(चार) पोट-कलम (१ब) अन्वये केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येतील
असे अन्य कोणतेही घटक.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ ३(ब) इमारतीच्या बाबतीत,----
(एक) इमारतीचे स्वरूप, प्रकार व संरचना ;
(दोन) १ एप्रिल २०१० पासून सुरू होणा-या ते ३१ मार्च २०१५ या कालावधीसाठी इमारतीचे बांधीव क्षेत्र आणि १ एप्रिल २०१५ पासून इमारतीचे चटई क्षेत्र ;
(तीन) वापरकर्ता प्रवर्ग जसे की, (एक) निवासी, (दोन) वाणिज्यिक (दुकाने किंवा तत्सम), (तीन) कार्यालये, (चार) हॉटेल (४ तारांकितपयर्ंत), (पाच) हॉटेल (४ तारांकितपेक्षा अधिक), (सहा) बँका, (सात) उद्योग व कारखाने, (आठ) शाळा व महाविद्यालयीन इमारती किंवा शैक्षणिक प्रयोजनांसाठी वापरण्यात येणारी इमारत, (नऊ) मॉल्स, आणि (दहा) वरीलपैकी कोणत्याही प्रवगार्ंमध्ये मोडत नसलेल्या इमारतीच्या वापरकत्यार्ंचे अन्य कोणतेही प्रवर्ग ;
(चार) इमारतीचे वय ; किंवा
(पाच) पोट-कलम (१ब) अन्वये केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येतील असे अन्य कोणतेही घटक.
(१ब) आयुक्त, पोट-कलम (१अ) अन्वये भांडवली मूल्य निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, स्थायी समितीच्या मान्यतेने, जमिनीचे किंवा इमारतीचे प्रवर्ग, अथवा जमिनीचे किंवा इमारतीचे इतर कोणतेही घटक यांचे तपशील, अशा विविध घटकांसाठी नेमून द्यावयाचे बहुविध भारांक (weightage by multiplication), जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य निश्चित करण्याचे सूत्र व इतर कोणत्याही बाबी, विहित करण्यासाठी असे नियम, एकतर भविष्यलक्षी किंवा भूतलक्षी प्रभावाने, तयार करील."".
भुतलक्षी प्रभावाने, भांडवली मूल्य नियम, २०१० याची सुधारणा आणि त्याचा नियम २१ पुनर्अधिनियमित करणे.
३. (१) कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात, हुकूमनाम्यात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, इमारतींच्या आणि जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१० (यात यापुढे ज्यांचा निर्देश, ""भांडवली मूल्य नियम, २०१०"" असा केला आहे) हे, १ एप्रिल, २०१० पासून भूतलक्षी प्रभावाने यथोचितरीत्या व वैधपणे करण्यात आले असल्याचे मानण्यात येतील आणि या अधिनियमाद्वारे सुधारणा केल्याप्रमाणे, मुख्य अधिनियमाच्या कलम १५४ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) अन्वये आयुक्ताद्वारे, जणू काही ते, कायद्यानुसार करण्यात आलेले आहेत असे समजून, सर्व महवाच्या वेळी, अंमलात असल्याचे मानण्यात येतील.
(२) भांडवली मूल्य नियम, २०१० यात, पुढीलप्रमाणे, सुधारणा करण्यात येतील आणि त्या सुधारणा, १ एप्रिल २०१० पासून करण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल :----
(क) भांडवली मूल्य नियम, २०१० याच्या नियम २ मध्ये,----
(एक) खंड (क) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---
१९५८ चा ६०.
""(क-१) ""दरांचे वर्ाषिक विवरणपत्र"" याचा अर्थ, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदींन्वये केलेले, महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ अन्वये प्रसिद्ध केलेले व त्या त्या वेळी अंमलात असलेले दरांचे वर्ाषिक विवरणपत्र, असा आहे;"";
(दोन) खंड (ज) वगळण्यात येईल ;
(तीन) खंड (झ) मधील, ""सिद्ध गणकामध्ये"" या मजकुराऐवजी, ""दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
भाग पाच ३४-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ (ख) भांडवली मूल्य नियम, २०१० याच्या नियम १३ मधील, ""सिद्ध गणकामध्ये"" या मजकुराऐवजी, ""दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(ग) भांडवली मूल्य नियम, २०१० याच्या नियम १८ मधील, ""सिद्ध गणक"" हा मजकूर ज्या दोन ठिकाणी आला आहे त्या दोन्ही ठिकाणी, त्या मजकुराऐवजी, ""दराचे वर्ाषिक विवरणपत्र"" हा मजकूर, त्याच्या व्याकरणिक फेरफारांसह दाखल करण्यात येईल.
(घ) भांडवली मूल्य नियम, २०१० याचे नियम २० व २२ वगळण्यात येतील.
(३) कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात, हुकूमनाम्यात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, भांडवली मूल्य नियम, २०१० याचा नियम २१ हा, विवक्षित फेरबदलांसह यथोचितरीत्या व वैधरीत्या पुनर्अधिनियमित करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल, आणि तो, अंमलात असण्याचे कधीही बंद झालेलेे नव्हते असे मानण्यात येईल, आणि तो, १ एप्रिल २०१० पासून पुढीलप्रमाणे अंमलात असण्याचे चालू राहील :---- ""भांडवली मूल्य नियम, २०१० याच्या नियम २१ ऐवजी, पुढील नियम दाखल करण्यात येईल :---- ""२१. खुल्या जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य.---- खुल्या जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य, अधिनियमाच्या कलम १५४ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) यांच्या तरतुदी आणि हे नियम या अन्वये, पुढील रीतीने निश्चित करण्यात येतील :----
(१) खुल्या जमिनीचे भांडवली मूल्य (सीव्ही).---- दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रानुसार खुल्या जमिनीचा सरासरी दर (आधारभूत दर-बीआर) × वापरकत्र्याच्या प्रवर्गानुसार (युसी) बहुविध भारांक (अनुसूची "अ" चा भाग एक) × जमिनीचे क्षेत्रफळ (एएल).
सीव्ही = बीआर × युसी × एएल. (२) इमारतीचे भांडवली मूल्य (सीव्ही).---- दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रानुसार इमारतीचा सरासरी दर (आधारभूत दर-बीआर) × वापर- कत्र्याच्या प्रवर्गानुसार (युसी) बहुविध भारांक (अनुसूची "अ" चा भाग दोन, तीन, किंवा यथास्थिति, भाग चार) × इमारतीचे स्वरूप व प्रकार (एनटीबी) यानुसार बहुविध भारांक (अनुसूची "ब") × इमारतीच्या वयानुसार (एएफ) बहुविध भारांक (अनुसूची "क") × मजल्या नुसार (एफएफ) बहुविध भारांक (अनुसूची "ड") × बांधीव क्षेत्र (बीए).
सीव्ही = बीआर × युसी × एनटीबी × एएफ × एफएफ × बीए""."".
४. (१) कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात, हुकूमनाम्यात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, इमारतींच्या किंवा जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""भांडवली मूल्य नियम, २०१५"" असा केला आहे) यात, पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येतील आणि त्या सुधारणा, १ एप्रिल २०१५ पासून सुधारणा करण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल :----
भूतलक्षी प्रभावाने, भांडवली मूल्य नियम, २०१५ याची सुधारणा आणि त्याचा नियम २१ पुनर्अधिनियमित करणे.
(क) भांडवली मूल्य नियम, २०१५ याच्या नियम २ मध्ये,----
(एक) खंड (क) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :---
१९५८ चा ६०.
""(क-१) ""दरांचे वर्ाषिक विवरणपत्र"" याचा अर्थ, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदींन्वये केलेले महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ अन्वये प्रसिद्ध केलेले व त्या त्या वेळी अंमलात असलेले दरांचे वर्ाषिक विवरणपत्र, असा आहे;"";
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ ५(दोन) खंड (ज) वगळण्यात येईल ;
(तीन) खंड (झ) मध्ये, ""सिद्ध गणकामध्ये"" या मजकुराऐवजी, ""दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ख) भांडवली मूल्य नियम, २०१५ याच्या नियम १३ मधील, ""सिद्ध गणकामध्ये"" या मजकुराऐवजी, ""दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रामध्ये"" हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
(ग) भांडवली मूल्य नियम, २०१५ याचे नियम २० व २२ वगळण्यात येतील.
(२) कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात, हुकूमनाम्यात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, भांडवली मूल्य नियम, २०१५ याचा नियम २१ हा, विवक्षित फेरबदलांसह, यथोचितरीत्या व वैधरीत्या पुनर्अधिनियमित करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल, आणि तो, अंमलात असण्याचे कधीही बंद झालेले नव्हते असे मानण्यात येईल आणि तो, १ एप्रिल २०१५ पासून पुढीलप्रमाणे अंमलात असण्याचे चालू राहील :----
""भांडवली मूल्य नियम, २०१५ याच्या नियम २१ ऐवजी, पुढील नियम दाखल करण्यात येईल :---
""२१. खुल्या जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य.------ खुल्या जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य, अधिनियमाच्या कलम १५४ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) यांच्या तरतुदी आणि हे नियम या अन्वये पुढील रीतीने निश्चित करण्यात येईल :----
(१) खुल्या जमिनीचे भांडवली मूल्य (सीव्ही).----
दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रानुसार खुल्या जमिनीचा सरासरी दर (आधारभूत दर-बीआर) × वापरकत्र्याच्या प्रवर्गानुसार (युसी) बहुविध भारांक (अनुसूची "अ" चा भाग एक) × जमिनीचे क्षेत्रफळ (एएल).
सीव्ही = बीआर × युसी × एएल.
(२) इमारतीचे भांडवली मूल्य (सीव्ही).-----
दरांच्या वर्ाषिक विवरणपत्रानुसार, इमारतीचा सरासरी दर (आधारभूत दर-बीआर) × वापरकत्र्याच्या प्रवर्गानुसार (युसी) बहुविध भारांक (अनुसूची "अ" चा भाग दोन, तीन, किंवा यथास्थिति, भाग चार) × इमारतीचे स्वरूप व प्रकार (एनटीबी) या नुसार (अनुसूची "ब") बहुविध भारांक × इमारतीच्या वयानुसार (एएफ) बहुविध भारांक (अनुसूची "क") × मजल्या नुसार (एफएफ) बहुविध भारांक (अनुसूची "ड") × चटई क्षेत्र (सीए).
सीव्ही = बीआर × युसी × एनटीबी × एएफ × एफएफ × सीए.""."".
विधिग्राीकरण व व्यावृती.
२०२६ चा महा. ....
५. (१) मुख्य अधिनियम किंवा त्या खाली केलेल्या नियमांमध्ये अथवा कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयात, हुकूमनाम्यात किंवा आदेशात काहीही अंतभर्ूत असले तरी, १ एप्रिल २०१० रोजी पासून प्रारंभ होणा-या आणि मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणा, भांडवली मूल्य विषयक नियमांचे पुनर्अधिनियमन व विधिग्राीकरण) अधिनियम, २०२६ (यात यापुढे ज्याचा निर्देश, ""सुधारणा अधिनियम"" असा केला आहे) याच्या, प्रारंभाच्या दिनांकास समाप्त होणा-या कालावधीमध्ये, मुख्य अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या भांडवली मूल्य नियम, २०१० व भांडवली मूल्य नियम, २०१५ यांच्या तरतुदींअन्वये महानगरपालिकेने किंवा तिच्या कोणत्याही अधिका-यांनी किंवा प्राधिका-यांनी आकारलेला, बसवलेला, मागणी केलेला, गोळा केलेला किंवा पुर्नविलोकन केलेला जमिनीच्या किंवा इमारतीच्या किंवा तिच्या भागाच्या भांडवली मूल्यावरील कोणताही मालमत्ता कर किंवा शास्ती अथवा महानगरपालिकेनेे असा मालमत्ता कर किंवा शास्ती आकारण्यासाठी, बसवण्यासाठी, मागणी करण्यासाठी, गोळा करण्यासाठी, किंवा पुर्नविलोकन करण्यासाठी केलेली किंवा करण्याचेे अभिप्रेत असलेली किंवा केलेली कोणतीही कारवाई किंवा गोष्ट ही, सुधारणा अधिनियमाद्वारे सुधारित केल्याप्रमाणे मुख्य अधिनियमाच्या कलम १५४ भाग पाच ३४---२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) आणि उक्त नियमांच्या तरतुदी ह्य, जणूकाही त्या सर्व वेळी सातत्याने अंमलात होत्या असे समजून, कायद्यानुसार यथोचितरीत्या व वैधरीत्या करण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल आणि त्या नेहमीकरिता करण्यात आल्या असल्याचे मानण्यात येईल व त्या नुसार,----
(अ) असा मालमत्ता कर किंवा शास्ती आकारण्याच्या, बसविण्याच्या, मागणीच्या, गोळा करण्याच्या किंवा पुर्नविलोकन करण्याच्या संबंधात, महानगरपालिकेने किंवा तिच्या कोणत्याही अधिका-यांनी अथवा प्राधिका-यांनी केलेल्या सर्व कारवाया किंवा कार्यवाह्य किंवा केलेल्या गोष्टी ह्य, सर्व प्रयोजनांसाठी मुख्य अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींनुसार, करण्यात आलेल्या किंवा हाती घेण्यात आलेल्या कारवाया किंवा कार्यवाह्य किंवा केलेल्या गोष्टी असल्याचे मानण्यात येईल आणि त्या नेहमीकरिता करण्यात आल्या असल्याचे व केल्या असल्याचे मानण्यात येईल ;
(ब) अशा प्रकारे बसविलेल्या व गोळा केलेल्या कोणत्याही मालमत्ता करांच्या परताव्यासाठी महानगरपालिकेविरुद्ध किंवा तिच्या कोणत्याही अधिका-याविरुद्ध किंवा प्राधिका-याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही अधिका-यासमोर अथवा प्राधिका-यासमोर कोणताही दावा किंवा अपील किंवा इतर कार्यवाह्य दाखल करण्यात येणार नाही किंवा चालविण्यात येणार नाही ;
(क) कोणतेही न्यायालय किंवा अन्य कोणतेही प्राधिकरण, अशा प्रकारे बसविलेल्या व गोळा केलेल्या कोणत्याही मालमत्ता करांच्या परताव्याचा निदेश देणारा कोणताही हुकूमनामा किंवा आदेश बजावणार नाही ;
(ड) बसविलेल्या व गोळा केलेल्या मालमत्ता कराच्या कोणत्याही रकमेपैकी, प्रदान केलेली मालमत्ता कराची अधिक रक्कम, कोणतीही असल्यास, परत करण्यात येणार नाही आणि मुख्य अधिनियमान्वये देय असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेपोटी समायोजित करण्यात येईल.
(२) शंका निरसनार्थ, याद्वारे असे घोषित करण्यात येते की, पोट-कलम (१) मधील कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही व्यक्तीस,---
१८८८ चा ३.
(अ) सुधारणा अधिनियमाद्वारे सुधारणा केल्याप्रमाणे, पोट-कलम (१) मध्ये र्िनदिष्ट केलेल्या मालमत्ता कराची किंवा शास्तीची आकारणी करण्यास, ती बसविण्यास, तिची मागणी करण्यास, ती गोळा करण्यास किंवा तिचे पुर्नविलोकन करण्यास हरकत घेण्यापासून ; किंवा
(ब) सुधारणा अधिनियमाद्वारे सुधारणा केल्याप्रमाणे, मुख्य अधिनियमान्वये मालमत्ता कराच्या स्वरुपात तिच्याकडून देय असलेल्या रकमेपेक्षा तिने अधिक प्रमाणात प्रदान केलेल्या कोणत्याही मालमत्ता कराच्या परताव्यासाठी दावा करण्यापासून,
प्रतिबंध होतो असा अन्वयार्थ लावण्यात येणार नाही.
(३) मालमत्ता कराची कोणतीही रक्कम अधिक प्रमाणात प्रदान झाली असेल तर, ती देय मालमत्ता करामध्ये समायोजित करण्यात येईल.
अडचणी दूर करण्याचा अधिकार.
६. (१) या अधिनियमाद्वारे सुधारणा केल्याप्रमाणे, मुख्य अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना, कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरुप उद्भवेल त्याप्रमाणे, ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी, त्यास आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाद्वारे सुधारणा केलेल्या मुख्य अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे करता येईल :
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ ७परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वषार्ंचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
(२) पोट-कलम (१) अन्वये काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्यात येईल.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८उद्देश व कारणे यांचे निवेदन.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने, जमिनींच्या व इमारतींच्या भांडवली मूल्याच्या आधारे, बृहन्मुंबईमधील जमिनींवर व इमारतींवर मालमत्ता कर बसविण्याची पद्धत १ एप्रिल २०१० पासून स्वीकारली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याच्या कलम १५४ च्या पोट-कलम (१अ) मध्ये, मालमत्ता कर आकारला जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निर्धारित करण्याची तरतूद केली आहे आणि उक्त कलम १५४ च्या पोट-कलम (१ब) मध्ये, स्थायी समितीच्या मान्यतेने त्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार, आयुक्ताला प्रदान करण्याची तरतूद केली आहे.
२. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताने, इमारतींच्या किंवा जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१० आणि इमारतींच्या किंवा जमिनींच्या वापरकत्यार्ंच्या घटकांना व प्रवगार्ंना (बहुविध भारांक देणे) भांडवली मूल्य निश्चित करणे नियम, २०१५ तयार केले आहे. आयुक्ताने, २० मार्च २०१२ रोजी सन २०१० चे उक्त भांडवली मूल्य नियम केले आहेत आणि ते, १ एप्रिल, २०१० पासून भूतलक्षी प्रभावाने लागू केले आहेत.
३. मुंबई उच्च न्यायालयाने, २०१३ ची रिट याचिका क्रमांक २५९२ व इतर याचिका यांमध्ये दिलेल्या त्याच्या दिनांक २४/०४/२०१९ च्या न्यायनिर्णयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने २०१९ ची, विशेष अनुज्ञा याचिका (सी) क्रमांक १७००९ व इतर याचिका यांमध्ये दिलेल्या त्याच्या दिनांक ७/११/२०२२ च्या न्यायनिर्णयांमध्ये असा निर्णय दिला आहे की, उक्त अधिनियमानुसार, आयुक्ताला, भूतलक्षी प्रभावाने नियम तयार करण्याचे अधिकार प्रदान केलेले नसल्याने, २०१० चे उक्त नियम, भूतलक्षी प्रभावाने नव्हे तर भविष्यलक्षी प्रभावाने लागू होतील आणि न्यायनिर्णयामध्ये नमूद केलेल्या कारणांकरिता, २०१० व २०१५ च्या उक्त भांडवली मूल्य नियमांचे नियम क्रमांक २०,२१ व २२ हे, उक्त अधिनियमाच्या तरतुदींशी अधिकारबा असल्याने, ते रद्दबातल करण्यात येत आहे.
४. मालमत्ता कर हा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा मुख्य स्त्रोत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त न्यायनिर्णय लक्षात घेता, महानगरपालिकेकडून मालमत्ता कराची आकारणी करणे, तो बसविणे, गोळा करणे ठप्प झालेले असल्याने, उक्त महानगरपालिकेच्या महसुलाची मोठी हानी झाली आहे. म्हणून, आरोग्य सेवा, शिक्षण, गृहनिर्माण, परिवहन, पाणीपुरवठा, इत्यादीसारख्या विविध सेवा व सुखसुविधा आणि इतर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी भारताच्या संविधानाच्या अनुसूची बारा अन्वये आणि मुंबई महानगरपालिका अधिनियमान्वये महानगरपालिकेस सोपविलेली तिची कर्तव्ये व जबाबदा-या प्रभावीपणे पार पाडण्यात तिला अडचणी येत आहेत. महसूल गोळा न केल्यास, सामान्य जनतेला सुविधा पुरविणे, महानगरपालिकेस शक्य होणार नाही. म्हणून, मुंबई उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयांमध्ये नमूद केलेली कारणे दूर करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमामध्ये व उक्त नियमांमध्ये सुयोग्य सुधारणा करून, महानगरपालिकेच्या महसुलाच्या मोठया हानीस प्रतिबंध करणे आवश्यक झाले आहे.
म्हणून, पुढील प्रयोजनांकरिता कायदा प्रस्तावित करणे इष्ट आहे, असे शासनास वाटते :-
(क) मालमत्ता करासाठी पात्र असलेल्या जमिनींचे व इमारतींचे भांडवली मूल्य निश्चित करण्याकरिता आणि उक्त तरतुदींमध्ये सुस्पष्टता आणण्याच्या दृष्टीने, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १५४ ची पोट-कलमे (१अ) व (१ब) सुयोग्यरीत्या बदली दाखल करणे ;
(ख) मालमत्ता करासाठी पात्र असलेल्या कोणत्याही जमिनीचे किंवा इमारतीचे भांडवली मूल्य निश्चित करण्याचे सूत्र व इतर कोणत्याही बाबी, नियमांद्वारे, भविष्यलक्षी किंवा भूतलक्षी प्रभावाने, विहित करण्यासाठी आयुक्ताला अधिकार प्रदान करणे ;
(ग) २०१० चे भांडवली मूल्य नियम, ०१.०४.२०१० पासून, भूतलक्षी प्रभावाने, पुनर्अधिनियमित करणे ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८ ९(घ) उक्त नियमांच्या पुनर्अधिनियमित केलेल्या तरतुदींन्वये मालमत्ता कर बसविण्यासाठी व गोळा करण्यासाठी भांडवली मूल्य नियम, २०१० याचा व भांडवली मूल्य नियम, २०१५ याचा नियम २१, पुनर्अधिनियमित करणे ;
(ङ) भांडवली मूल्य नियम, २०१० याचे व भांडवली मूल्य नियम, २०१५ याचे नियम २० व २२ वगळणे आणि उक्त नियमांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे ;
(च) मालमत्ता कर आकारण्याच्या, बसविण्याच्या, गोळा करण्याच्या, इत्यादी बाबतीत, महानगर- पालिकेने हाती घेतलेल्या कारवाया विधिग्रा करणे.
५. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा, या विधेयकाचा हेतू आहे.
मुंबई, दिनांक २४ मार्च, २०२६.
एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री
(नगर विकास).
१ ० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २५, २०२६/चैत्र ४, शके १९४८वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन.
या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे पुढील प्रस्ताव अंतभर्ूत आहेत :----
खंड २.--- मुंबई महानगरपालिका अधिनियम (१८८८ चा ३) याची पोट-कलमे (१अ) व (१ब) बदली दाखल करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, पोट-कलम (१अ) अन्वये भांडवली मूल्य निश्चित करण्याच्या प्रयोजनार्थ, जमिनीच्या किंवा इमारतीच्या प्रवगार्ंचे अथवा जमिनीच्या किंवा इमारतीच्या इतर कोणत्याही घटकांचे तपशील, अशा विविध घटकांना नेमून द्यावयाचे बहुविध भारांक (weightage by multiplication), जमिनीचे किंवा इमारतीचे किंवा तिच्या भागाचे भांडवली मूल्य निश्चित करण्याचे सूत्र व इतर कोणत्याही बाबी, नियमांद्वारे विहित करण्याचा अधिकार, आयुक्ताकडे घेण्यात आला आहे.
खंड ५.--- या खंडान्वये, या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, या अधिनियमाच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वषार्ंच्या कालावधीत, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे, ती दूर करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.
२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे वर नमूद केलेले प्रस्ताव, सामान्य स्वरुपाचे आहेत.
विधान भवन : मुंबई, दिनांक २५ मार्च, २०२६.
जितेंद्र भोळे, सचिव--१, महाराष्ट्र विधानसभा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.