Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1518 Extra Ord. Amravati Part 1 (16-04-2026) Publication of L.A. Act, 2013 under Section 11(1) by In-Charge Sub-Divisional Officer and L.A. Officer, Morshi. Extra Ordinary No.03, Sr. No. 10.

Published 16 April 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-04-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १६, २०२६/चैत्र २६, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक ३ ] गुरुवार, एप्रिल १६, २०२६/चैत्र २६, शके १९४८ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक----अमरावती विभागीय पुरवणी

--------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------

भाग १ (असा.) (अ.वि.पु.). म.शा.रा., अ. क्र. १०.

प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

अन्वये कलम १९ ची घोषणा

क्रमांक-शिरस्तेदार-भूसंपादन-कलम-१९-कावि-३१९-२०२६.----

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्यच्या जिल्हाधिकायंाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात पुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना, क्रमांक शिरस्तेदार-भू.सं-कलम-११-कावि-९२१-२०२५, दिनांक १६ सप्टेंबर, २०२५ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्नीदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे;

आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मोर्शी यास पदनिर्देशित करीत आहे. अ-एक --१ (१५१८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १६, २०२६/चैत्र २६, शके १९४८ अनुसूची----एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-४७-२०२४-२०२५, मौजा सहादापुर, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती.

अ. क्र. चालता क्र. गट नं./स.नं. एकूण क्षेत्र संपादित करावयाचे क्षेत्र (१) (२) (३)

(४)

(५)

हे. आर हे. आर

१ १ १७/१ १ ९८ १ ९८

२ २ १७/१अ १ ९९ १ ९९

३ ३ १७/२ १ ४१ १ ४१

४ ४ १७/३ १ ४१ १ ४१

५ ५ १७/४ १ ३९ १ ३९

६ ६ १७/५ १ ६२ १ ६२

७ ७ १७/६ १ ६२ १ ६२

८ ८ १६/५ पै. ० ८१ ० ८१

९ ९ १६/५ पै. ० ८१ ० ८१

१० १० १६/४ १ ०१ १ ०१

११ ११ १६/३ १ ०१ १ ०१

१२ १२ १६/१ २ ०२ २ ०२

१३ १३ १६/२ १ १५ १ १५

१४ १४ १६/३ ३ ५८ ३ ५८

अनुसूची----दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

:---- मराठी भाषा विद्यापीठ.

प्रकल्प कार्याचे वर्णन :----- मराठी भाषा विद्यापीठाचे कामाकरीता.

भूसंपादन प्रकरण क्रमांक :---- ०३-४७-२०२४-२५, मौजा सहादापुर, ता, मोर्शी.

समाजाला मिळणारे लाभ :---- या प्रकल्पाव्दारे शैक्षणिक फायदा होणार असून क्षेत्रातील विद्याथ्र्याचा

शैक्षणिक विकास होणार आहे.

अनुसूची----तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

विस्थापनाची आवश्यकता नाही. सबब माहीती - निरंक -

अनुसूची----चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ अ, दिनांक १३ मार्च, २०१५ उक्त अधिनियमाचे प्रकरण २ व ३ मधील तरतुदी लागू करण्यापासून सूट प्राप्त.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल १६, २०२६/चैत्र २६, शके १९४८ ३ अनुसूची----पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात : आवश्यकता नाही, सबब माहीती -- निरंक --

आलेल्या अधिकायाचे पदनाम

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : -- निरंक --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची : -- निरंक --

नियुक्ती करण्यात आली आहे,

त्या अधिसूचनेचा तपशील

टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मोर्शी या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

मोर्शी : दिनांक १० एप्रिल, २०२६.

सागर ढवळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मोर्शी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 April 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-04-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-04-16.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1.