महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ०५ ] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६ - २२, २०२६ / चैत्र २६ ते वैशाख २, शके १९४८ [ पृष्ठे ०१
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापूर
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ (८) नुसार पदनिदशित अधिकारी घोषित करणेबाबत
अधिसूचना
क्रमांक मु.का.आ./नि. व वि.शा./३२१/२०२६.----ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ (८) अन्वये नियोजन प्राधिकरण, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या कलमान्वये आणि कलमे ५४, ५५ व ५६ अन्वये, नियोजन प्राधिकरणाच्या अधिकारांचा वापर करण्याच्या प्रयोजनांसाठी पदनिदशित अधिकारी म्हणून, नियोजन प्राधिकरणांच्या एखाा अधिकायास पदनिदशित करील. पदनिदशित अधिकायास, अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अशा स्थानिक क्षेत्रावर अधिकारिता असेल आणि वेगवेगया स्थानिक क्षेत्रांसाठी वेगवेगळे पदनिदशित अधिकारी पदनिदशित करता येतील, अशी तरतूद आहे.
त्याअर्थी अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडील नगर रचनाकार या पदास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२, पोट-कलम १ मधील खंड (अ) व (क) करिता कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणमधील ४२ गावांतील कार्यक्षेत्रांकरिता पदनिदशित अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे, तसेच त्याअर्थी, नियमानुसार दिलेल्या परवानगीव्यतिरिक्त विकसक यांनी केलेले अनधिकृत / वाढीव बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२, पोट-कलम १ मधील खंड (ब) व (ड) करिता विकास परवानगी विभागाकडील खालील अधिकायांना पदनिदशित अधिकारी म्हणून घोषित करणेत येत आहे.
अ.क्र. स्थानिक कार्यक्षेत्र
पदनिदशित अधिकारी १ २
३
१. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापूर कार्यक्षेत्र नगर रचनाकार
त्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३ (८) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणेसाठी प्रस्तावित करणेत येत आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अमलात येईल.
दि. आ. कदम,
कोल्हापूर, २ एप्रिल २०२६.
मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.