महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक १७] बुधवार, जुलै १, २०२६/ आषाढ १०, शके १९४८ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ५५.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---नागपूर विभागीय पुरवणी
--------------------------- संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश ---------------------------
भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.
उपविभागीय अधिकारी तथा सक्षम भूसंपादन अधिकारी, यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ कलम ११(१) अन्वये खालील प्रारंभिक अधिसूचना
क्रमांक-कावी-स.म.अ.-प्रस्तु. १.-उविअ-४६७-२०२६.---
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक-संर्कीण ११-२०१४-प्र. क्र. ७७-अ-२ दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आलेला आहे) याव्दारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " समूचित शासन " असल्याचे मानण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे अधिसूचित करण्यात येते की, " उक्त जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी " आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
ना.-एक-१ (१५८०).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १, २०२६/आषाढ १०, शके १९४८ ..... आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील सोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.
पंरतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकारी विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातुन सूट देता येईल.
पंरतु, आणखी असे की, जर कोणत्या व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे यांच्या नियम १० च्या उपनियम (३) व्दारे विहीत केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांस पदनिर्देशित करीत आहे.
सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत. त्या अधिसूचनेच्या प्रसिध्दी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांचे कार्यालयात नोंदवाव्यात.
अनुसूची-एक
जमिनीचे वर्णन
मौजा विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर
अ. क्र. तालुका गावाचे नाव गट/ भूमापन क्रमांक प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र
हे. आर
१ बल्लारपूर
विसापूर १६६/४ ० ३६
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
: प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना.
प्रकल्पाचे कार्याचे विवरण
: चंद्रपूर जिल्ह्यतील प्रादेशिक नळ योजना पाणी पुरवठा योजनाना पारेषण संलग्न
सौर प्रकल्पात रुपांतरीत करणे
प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ
: या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यतील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाकरीता
पाणी पुरवठा योजना.
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
विस्थापित होत नाही.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक नागपूर विभागीय पुरवणी, जुलै १, २०२६/आषाढ १०, शके १९४८ ३अनुसूची-चार
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सांराश
महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च, २०२५ च्या (ख) नुसार विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, पाणीपूरवठा व जलसंधारण यासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिलेली आहे.
अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम :- -निरंक- :- -निरंक- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे :- -निरंक-
त्या अधिसूचनेचा तपशील विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)
टीप : उक्त जमिनीच्या आराखडयाचे भूसंपादित जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत निरीक्षण करता येईल.
डॉ. अजर्ुन पावरा, बल्लारपूर : दिनांक १० जून, २०२६.
उपविभागीय अधिकारी तथा सक्षम भूसंपादन प्राधिकारी, बल्लारपूर ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.