Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1582 Extra Ord. Amravati Part 1-A (03-07-2026) Publication of MRTP Act., 1966 under Section 23(1) [With Section 21(2)] by Chief Officer, Nagar Panchayat, Bhatkuli. Ord. No. 19, Sr. No. 68-69.

Published 03 July 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-03.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ३, २०२६/आषाढ १२, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक १९ ] शुक्रवार, जुलै ३, २०२६/आषाढ १२, शके १९४८ [पृष्ठे २, किंमत : रुपये ६२.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

-----------------------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

-----------------------------

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६८.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) [ कलम २१(२) सहा ] नुसार भातकुली नगर पंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत

सूचना

क्रमांक नपंभा-६१२-२०२६.----

शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. एम.यु.एन-२०१४-प्र.क्र.९२-नवि-१८, दिनांक ०९ एप्रिल, २०१५ अन्वये भातकुली नगर पंचायत नव्याने स्थापन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) अन्वये भातकुली नगर पंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) [कलम २१, (२) सह] अन्वये भातकुली नगरपंचायत विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. १७१, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२६ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(२) नुसार भातकुली नगर पंचायतच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा भातकुली नगर पंचायतच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांची याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत मुख्याधिकारी, भातकुली नगर पंचायत यांचेकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

भातकुली : दिनांक १ जुलै, २०२६. भाग्यश्री सं. बोरेकर, मुख्याधिकारी, नगर पंचायत, भातकुली. अ.-एक-अ-१ (१५८२). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, जुलै ३, २०२६/आषाढ १२, शके १९४८ भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६९.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

Declaration of Intention to prepare Development Plan of Bhatkuli Nagar Panchayat u/S 23 (1) [ Read with Section 21(2) ] of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

NOTICE

No. NPB- 612-2026.—

Government of Maharashtra in Urban Development Department vide its Notification No. MUM-2014-C.R.92-UD-18 dated 09th April, 2015 constituted Bhatkuli Nagar Panchayat. It is necessary to prepare the Development Plan for the area of Bhatkuli Nagar Panchayat as per Section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned Development of the said area.

Hence, the Bhatkuli Nagar Panchayat by its resolution No. 171, dated 11th February, 2026 has given consent to declare its intention to prepare Development Plan as per provision of Section 23(1) [ read with Section 21(2)] of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Bhatkuli Nagar Panchayat is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Municipal Council, as required under Section 23(2) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.

Any suggestions / objections of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Bhatkuli Nagar Panchayat within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The suggestion / objection shall be duly condidered while preparing the Development Plan.

Bhatkuli : Dated the 1st July, 2026.

BHAGYASHREE S. BOREKAR, Chief Officer, Nagar Panchayat, Bhatkuli.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-03.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-03.Extra-Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.