Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1587 Extra Ord. Part 1-A Nagpur (07-07-2026) Publication regarding modification of MRTP Act, 1966 under Section 37 by Metropolitan Commissioner, Nagpur Metropolitan Region Development Authority, Nagpur. Extra. Ord. No: 22, Sr. No. : 265-266

Published 07 July 2026

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

Reg. No. NP CITY/236/2018-20. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ७, २०२६/आषाढ १६, शके १९४८ १

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक २२ ] मंगळवार, जुलै ७, २०२६/आषाढ १६, शके १९४८ [पृष्ठे २, किंमत : रुपये १८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----नागपूर विभागीय पुरवणी

--------------- (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६५.

महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल

सूचना

क्रमांक मं.वि.यो.-नामप्रविप्रा-सूचना-कलम ३७-८८९४.----

ज्याअर्थी, नागपूर महानगर प्रदेशाची विकास योजना शासन अधिसूचना, नगर विकास विभाग क्रमांक टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(अ)-२०१६- नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ अन्वये भागश: मंजूर झालेली असून, दिनांक ०९ फेब्रुवारी, २०१८ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, उर्वरित भागाची विकास योजना (EP/Excluding Part) शासन निर्णय क्रमांक टिपीएस-२४१६-प्र.क्र.-१२२(ब)-ई.पी.-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मंजूर झालेली आहे; (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजा वारेगांव, तह. कामठी, जि. नागपूर येथील खसरा क्र. २३, क्षेत्र ४.४८ हे. आर जमिनीपैकी ३.२२ हे. आर ही जागा North -A अर्बन सेक्टर मध्ये स्थित असून "कृषी व सार्वजनिक-निमसार्वजनिक" विभागात समाविष्ट आहे. (यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त जागा "कृषी व सार्वजनिक-निमसार्वजनिक (Public/Semi Public)" या विभागातून वगळून " रहिवास " वापर विभागात अंतभर्ूत करणेस्तव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे. सदरक्षेत्राकरीता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण आहे व यासाठी प्राधिकरणाचे दिनांक ०४ मे, २०२६ रोजीचे बैठकीतील विषय क्र. ३ (iii)/११/०४/०५/ २०२६ अन्वये प्राधिकरणाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे ; त्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा उक्त विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर, नागपूर-४४० ००१ या कार्यालयात कामकाजाच्या सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, ना.-एक-अ-१ (१५८७). (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जुलै ७, २०२६/आषाढ १६, शके १९४८ सदर अधिसूचना प्राधिकरणाच्या www.nmrda.org या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की. ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधीत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या सूचना किंवा हरकती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त होतील, त्यावर नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून सुनावणी देण्यात येईल. तद्नंतर फेरबदलाचा उक्त प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.

नागपूर : दिनांक ६ जुलै, २०२६.

संजय मीणा, महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर.

--------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६६.

BY METROPOLITAN COMMISSIONER, NAGPUR METROPOLITAN REGION

DEVELOPMENT AUTHORITY

Modification Under Section 37 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966

NOTICE

No. D. P. (NMRDA)-Notification-Sec.37- 8894.—

Whereas, the Development Plan of Nagpur Metropolitan Region Development Authority has been partially sanctioned by the Government vide Urban Development Department Notification No. TPS-2416-CR-122(a)-2016- UD-9, Dated 05th January, 2018 and came into force from 9th February, 2018. Excluded part of Development Plan has been sanctioned vide Government Notification No. TPS-2416-CR-122(b)-EP-2016-UD-9, Dated 21st February, 2019. (hereinafter referred to as "said Development Plan");

And whereas, in the said Development Plan, the land bearing Khasara No. 23 of Mouza Waregaon, Tah- Kamptee, Dist.-Nagpur admeasuring 3.22 Ha. out of total area 4.48 Ha. is situated in North-A Urban Sector and included in "Agriculture & Pulic /Semi-Public" Zone (hereinafter referred to as "said Land");

And whereas, as per Section 37(1)of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Nagpur Metro- politan Region Development Authority has decided to exclued the said land from the " Agriculture & Public/Semi Public Zone " and to be included in the "Residential Zone." The Planning Authority for the said land is Nagpur Metropolitan Region Development Authority. The Authority has passed Resolution No. 3(iii)/11/04/05/2026 on dated 04th May, 2026 to make the afore said modification.

Therefore, the part of said Development Plan showing the aforesaid modification are kept open at the office of the Nagpur Metropolitan Region Development Authority, Station Road, Sadar, Nagpur - 440 001 for inspection by public during office hours on all working days. This Notification shall also be available on this office website www.nmrda.org. The suggestions and objections which may be received to Nagpur Metropolitan Region Develop- ment Authority in respect of the said modification to the Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette will be heard by the Nagpur Metropolitan Region Development Authority before submitting the said modification proposal, to the State Government for sanc- tion.

SANJAY MEENA,Metropolitan Commissioner, Nagpur : Nagpur Metropolitan Region Dated the 6th July, 2026. Development Authority, Nagpur. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR SMT. MANISHA KUMBHAR.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 July 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-07-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-07-07.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.